युक्ती सुचवा/ युक्ती सांगा

Submitted by पूनम on 12 March, 2009 - 05:13

१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.

२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)

३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383

४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नुसतं बदाम मिल्क करायचं Happy

बदामाची पावडर, साखर, केशर आणि वेलची मिक्स करायची. दुध आणि कंडेन्सड मिल्क एकत्र करुन एक उकळी आणायची त्यात वरचे मिश्रण घालुन मंद आचेवर गरम करायचे. फार उकळायचे नाही. मधुन मधुन ढवळायचे. मस्त बदाम मिल्क तय्यार Happy

हिच प्रोसेस स्लो कुकर मधे करायची. दुध आणि कंडेन्सड मिल्क एकत्र करुन एक उकळी आली की कुकर लो सेटिंगवर ठेवायचा. सारखे ढवळावे पण लागत नाही.

१. माझी मुलगी डब्यात नेहेमी डोसाच पाहीजे म्हणते. माझा असा प्रोब्लेम आहे की डोसा थोड्या वेळाने कोरडा पडतो, शिवाय शाळेत सांबार आणायला टीचर नको म्हणतात कारण सांडू शकतं. चटणी तर देतेच मी. शिवाय बटर-डोसा, चीझ-डोसा असेच देते, तरी तो मूळ डोसा कोरडा वाटतो. तेल पण आपल्या डोश्यापेक्शा जरा जास्त घालते. जेव्हा करते तेव्हा अगदी नरम मस्त जाळीदार होतो. तो ३ तास तसाच राहण्यासाठी काय करता येईल ? सिल्वर्-फॉईल मध्ये गुंडाळून ठेवू का ?
२. माझ्याकडे मागच्या वर्षीचे पाटणकर चे तयार चकली पीठ सापडले आहे फ्रीजर मध्ये. आणल्यापासून फ्रीजर मध्येच आहे. आता वापरता येईल का ? वास वगैरे येत नाहीये, पण एक्स्पायरी डेट ३ महीने लिहीली आहे.
या प्रश्नांची उत्तरे आधीच्या पानांवर असतील तर तसे सांगा, मी शोधेन.

मवा, डोसा तसा कोरडाच पडणार. फॉइलमधे गुंडाळून थोडा फरक पडेल. आवडत असेल तर तूप लावता येईल.
माझ्या मते चकलीचे पिठ वापरु नये.
भाजणी करताना, धान्यातील पाण्याचा अंश जवळजवळ पूर्णपणे काढून टाकला जातो. अशी भाजणी वर्षभर टिकते. पण विकतची भाजणी किती आधी केलीय ये सांगता येत नाही. अगदी स्पेसिफिकली ३ महिने, लिहिले आहे, म्हणुन वापरु नये.

अछा बघते तूप तिला आवडतेय का. पण मग डोसा करताना तेल वापरू की नको ? तेल्-तूप एकत्र चालेल का ?
ओके भाजणी टाकूनच देईन मग. धन्यवाद उत्तराबद्दल.

मवा, डोसा किंचीत जाडसर घालून बघ. किंवा डोसा पीठ न वापरता तांदुळाच्या पीठात थोडा रवा किंवा बेसन घालून घावन करून बघ लेकीला आवडतंय का...

हं ही घावन ची चांगली वाटतेय आयडीया. लहान होती तेव्हा तांदळाची/आंबोळीची धिरडी खायची आवडीने. थँक्स गं. Happy

मवा, डोसा केला की आतून तिला आवदणार्‍या भाज्या पसरून मग गुंडाळी केली तर मऊ राहील तो.
म्हैसूर डोशाला जशी आतून चटणी असते तशी बटाट्याची/ कोबीची/ फ्लॉवरची अशा भाज्या पसरवून बघितल्या तर ?

डोसा नरम रहायला थोडा भात नाहीतर जाडे पोहे घालायचे. मस्त नरम रहातो. कुठलाही डोसा काढून बाहेर उघडा ठेवला बर्‍याच वेळ तर कोरडा होतो पण भात घातल्याने नाही होत तितक्या लवकर.

दुसरे म्हणजे काढला ना तव्यावरून की पेपर टॉवेल मध्ये गुंडाळायचा.

निर्मयी, एखाद्या कापडी पिशवीत भाजलेले शेंगदाणे घालून त्या पिशवीचे तोंड बंद करून ते दाणे छान धोपटून काढायचे. हाताने दाब देऊन पिशवीच्या कापडाच्या माध्यमातून दाणे चांगले चोळायचे - रगडून काढायचे. नंतर एखाद्या प्लेट/ ताट/ कागदावर काढून पसरायचे.... बर्‍याच दाण्यांची फोलपटे वेगळी झाली असतील. नसतील त्यांना पुन्हा पिशवीत घालून धोपटणे प्रोग्रॅम करायचा. ताटातील शेंगदाण्यांची फोलपटे फुंकर घालून वेगळी करायची. (ब्लोअर असला तर तोही वापरता येईल ;-)) मी हे सर्व प्रकार आमच्या शेजारच्या आजींना करताना पाहिले आहेत त्यामुळे खात्रीलायक आहेत! करून बघ!

कापडी पिशवी नसेल तर जरा गार झाल्यावर हाताने रगडले तरी चालतात. ताटात व्यवस्थित पाखडले जातात. घाई असेल तर गरम असतानाच स्वच्छ किचन टॉवेलमध्ये गुंडाळून रगडायचे.

परवा बिनखव्याचे गुलाब जाम केले होते[मायबोली जय हो!] त्यासाठी व्हीप्ड क्रीम आणल होतं. ते उरलय. आज बघितल तर त्यावर ३ दिवसात वापरा अस लिहीलय. काय करु? एखादा बेसिक केक करुन मग ह्या क्रीम च आईसिंग थापता येईल का?
रच्याकने माझ्याकडे कन्डेन्स मिल्क चा १ डबा पण आहे. सायो च्या मलई बर्फी कर्ता येईल का?[तेथे लाजो यान्नी थिक क्रीम वापरुन मलई बर्फी/पेढे कृती लिहीली होती.त्याप्रमाणे केलं तर?]
मिल्क पावडर पण आहे.
सुगरणीनो मदत करा प्लीज!

ऑर्किड, क्रिम च आयसिंग लावलस तर तो केक पण लगेच संपववा लागेल कारण ते फ्रेश क्रिमच रहिल (एक्सपायरी डेट तिच राहिल).

त्यापेक्षा बर्फी कर. नाहीतर मी कुल्फी ची पण रेसिपी लिहीलिये क्रिम वापरुन, ती करुन बघ. आणि कुल्फी फ्रिझर मधे अस्ल्याने ३-६ महिन्यांपर्यंत ठेवता येइल (फ्रिझर प्रमाणे). किंवा पंजाबी स्टाईलच्या भाज्यांमधे, बिर्याणी वगैरे मधे वापरुन टाक क्रिम.

http://www.maayboli.com/node/14420 इथे आहे कुल्फी.

थँक्स आरती२१ आणि मनःस्विनी. :). मी टोमॅटो ची चटणी लावते कधी कधी आतून.
मनःस्विनी, तयार भात वाटताना घालायचा का ? पेपर टॉवेल चे पण करुन पाहते, किती वेळ ठेवायचे ?

सिताफळाचा गर सहजपणे काढण्याबद्दल पाककृती बाफवर झालेली ही चर्चा:

साधना | 27 October, 2010 - 11:18
आज सकाळीच सिताफळे खात होते तेव्हा सिताफळ रबडीची आठवण झाली आणि मग सिताफळाचा गर अगदी सहजपणे वेगळा कसा करता येईल असा प्रश्न मनात आला. इथे कोणाला माहित आहे का सहजपणे, जास्त वेळ आणि गर वाया न घालवता गर आणि बिया कशा वेगळ्या करता येतील?

प्रतिसाद दिनेशदा | 27 October, 2010 - 11:23
साधना, जेवणाच्या काट्याने सिताफळाचा गर वेगळा करता येतो. काहि मिक्सरच्या व्हीपर ब्लेडने ते काम होते.
रबडीत, किसलेले सफरचंद किंवा संत्र्याचा गर पण घालतात. दोन्ही फळे गोड असावीत.

प्रतिसाद मंजूडी | 27 October, 2010 - 11:43
रबडी किंवा मिल्कशेकसाठी सिताफळं पूर्ण पिकलेली घ्यावीत. सिताफळाचा गर मिक्सरमध्ये घालून इंचरवर (म्हणजे सर्वसाधारणपणे डावीकडे) मोजून चार सेकंद तीनदा फिरवायचं. आणि मग गाळण्यावर टाकून ढवळायचं. गर खाली आणि बिया गाळण्यावर... गाळण्याखाली पातेलं ठेवायला विसरू नकोस

आपल्या ह्या पोस्टी युक्ती सुचवा/ सांगा मध्ये हव्यात.

संपादन प्रतिसाद साधना | 27 October, 2010 - 11:42
मंजे आज करुन बघते. बियासुद्धा रगडल्या गेल्या नाही म्हणजे मिळवले

प्रतिसाद अल्पना | 27 October, 2010 - 11:53
मंजू मी पण करुन बघते आजच. आहेत घरात भरपूर सिताफळं आणि दुधपण. काल रात्रीच सिताफळ रबडीबद्दल इथलं पोस्ट वाचून करायचा विचार केला होता, पण गर काढण्याच्या कंटाळवाण्या कामामूळे विचार बाद केला.
मंजू कालच्या रेसेपीबद्दल परत एकदा धन्यवाद. मी काल मटर पनीर बुर्जी केली होती. त्या रेसेपीमधून मसाल्याच्या टीप्स घेतल्या. त्याशिवाय काल कांदा-लसूणासिवाय दाल माखनी, चना दाल तडका, माणी (लाल भोपळ्याची कढी, दही / ताक न घालता) वैगरे पण केलं होतं. आता सवडीने एक एक रेसेपी टाकेन.

प्रतिसाद जागू | 27 October, 2010 - 12:00
अरुंधती
साधना सकाळिच काय सिताफळ खातेस ? मी मस्त वाकटी फ्राय खाउन आले.
काल मी रवा बेसन लाडू मावेत केले. आज बेसनचे आणि मुगाचे लाडू करणार.

प्रतिसाद रोचीन | 27 October, 2010 - 12:18
@मंजू
मिक्सर मधे ब्लेड कोणतं वापराय्चं?

प्रतिसाद मंजूडी | 27 October, 2010 - 12:28
चटणीसाठी वापरतो ते नेहमीचं ब्लेड चालतं.

रोचीन | 27 October, 2010 - 12:36
धन्स!! यात थोडं दूध वगैरे नाही ना टाकायचं? नुसता गर गाळला जातो का??

प्रतिसाद मंजूडी | 27 October, 2010 - 12:41
मी तरी दूध घालत नाही. आणि म्हणूनच पूर्ण पिकलेली सिताफळं घ्यायची की ज्याचा गर बीपासून सहज वेगळा होतो.

सिताफळ बासुंदी करतांना तीचा रंग पांढरा कसा ठेवायचा?? आणि दुध -सिताफळाचा गर याचं प्रमाण काय ठेवायचं? साखर लीटर ला १ वाटीच ठेवायची की कमी घ्यायची??

दूध आटवल्यावर त्याचा रंग थोडासा बदलतोच, शिवाय पूर्ण पिकलेलं सिताफळ आतून पिवळसर पांढरं असतं त्यामुळे सिताफळ बासुंदी पांढरीशुभ्र होणार नाही.

सिताफळं गोड असतात त्यामुळे साखर नेहमीच्या बासुंदीपेक्षा कमी घालायची. माझं प्रमाण 1 लिटर दुधाला अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी सिताफळाचा गर आणि साधारण एका सिताफळाचा हाताने काढलेला गर असं प्रमाण घेते.

सिताफळाच्या बिया गार दुधात घालायच्या आणि हाताने कुस्करायच आपोआप आणि पट्कन सगळा गर वेगळा होतो मग बिया फेकुन द्यायच्या आणि ते दुध बासुंदीत घालाय. Happy

>>दूध आटवल्यावर त्याचा रंग थोडासा बदलतोच
हो, तो बदलतोच पण आमची बासुम्दि म्हणजे गुलबट रंगावर जाते. म्हणून विचारलं. बाजारतील पांढरी असते. गर आणि रस शेवटि मीक्स करायचा ना. गार झाल्यावर कि गरम असतांना चालेल?? भाउबीजेला करायचा विचार आहे. आणि १ ल्यांदाच करणार म्हणून एवढे प्रश्न!!!

दूध प्रखर आचेवर (जाड बूडाच्या भांड्यात, सतत ढवळत ) आटवले तर दूधाचा रंग पांढरा राहतो. मंद आचेवर आटवले तर ते गुलाबी रंगाचे होते.

पांढरी बासुंदी हवी असेल तर आधी दुध तापवुन घ्यायचे.दुध वर आले की गॅस बंद करुन दुधावर झाकण ठेवायचे.म्हणजे साय धरणार नाही. मग थोड्या वेळाने दिनेशदा नी सांगितल्याप्रमाणे प्रखर आचेवर सतत ढवळत दुध आट्वायचे. १ लिटर दुध आटवायला साधारण २० मिनीटे लागतात.पातेल्याच्या बुडाशी छोटा चमचा किंवा झाकण घालायचे. पुर्वी नाणे घालण्याची पद्धत होती. ते हायजेनी वाट्त नाही म्हणुन मी हा बदल केला.

Pages