इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा
ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.
आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html
पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx
पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड
पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका
पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या
पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी
पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी
पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु
पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)
पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद
पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल
पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा
पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.
पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण
पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण
पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/
पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3
पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड
पान १९:
चर्चा - डोंबिवली, अॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html
पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय
पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस
पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर
पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी
पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने
पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल
पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी
पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0
पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,
पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा
पान ३०:
चर्चा - पांगार्याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले
गिरिपुष्प उर्फ ग्लिरिसिडिया
गिरिपुष्प उर्फ ग्लिरिसिडिया एवढ्या मोठ्या संख्येने लावलेले पाहुन मला अगदी बरे वाटते कारण ही झाडे जमिनीचा कस वाढवतात. मी मुद्दाम त्याच्याखालची माती (फक्त टॉपसॉइल, खोदुन काढली नाही) गोळा केली कारण ही मातीही समृद्ध झालेली असते.
कांडोळचा फोटो टाका कुणीतरी.
कांडोळचा फोटो टाका कुणीतरी. पाहिल असेल कदाचित वेगळ्या नावाने.
कैलास, कधी हुंदडत होता? २६
कैलास, कधी हुंदडत होता? २६ तारखेला मी वरच्या फोटोतल्या झाडाखालची माती गोळा करुन आणली.>>>>>>
झेंडावंदन झाल्यानंतर चिंगीने फिरायला जायचा हट्ट धरला... मग साधारणता ११ वाजता वगैरे गेलो होतो.
त्या वरच्या झाडाखाली बसणार होतो... पण जर नीट पाहिले तर दिसेल त्या झाडाखाली एक कपल बसलं होतं...... त्यांना काही वाटलं नाही.. मलाच ओशाळवाणं झाल्यासारखं झालं.
कोकीळ मी सुद्धा पाहिला... पण दुर्दैवाने कॅमेर्यात आलाच नाही.
११ म्हणजे खुपच उशिरा हे
११ म्हणजे खुपच उशिरा
हे ठिकाण २६ तारखेला माबोकरांसाठीच बुक केले होते.... मी ८.३० ला गेले. घरातुन बाहेर पडत असतानाच असुदेचा फोन आला आणि माती गोळा करुन खाली उतरेपर्यंत फोन चालुच होता... 
मी म्हणतोय त्या फूलाचा वेल
मी म्हणतोय त्या फूलाचा वेल असतो. पांढरे फूल येते (फोटो टाकतोच रात्री).
पण डॉ. तूम्ही म्हणाताय ते झाड. (कराया गम, म्हणालो तर तूम्हाला जास्त ओळखीचे वाटेल) त्याच्या मोहर तपकिरी रंगाचा, सुकलेल्या शेवाळाच्या पुंजक्यासारखा दिसतो. मग त्यातच लाल रंगाचे चांदणीसारखे फळ लागते, त्याला खुप कुसे असतात, पण ते भाजून त्यातल्या बिया खाता येतात.
पण डॉ. तूम्ही म्हणाताय ते
पण डॉ. तूम्ही म्हणाताय ते झाड. (कराया गम, म्हणालो तर तूम्हाला जास्त ओळखीचे वाटेल) त्याच्या मोहर तपकिरी रंगाचा, सुकलेल्या शेवाळाच्या पुंजक्यासारखा दिसतो. मग त्यातच लाल रंगाचे चांदणीसारखे फळ लागते, त्याला खुप कुसे असतात, पण ते भाजून त्यातल्या बिया खाता येतात>>>>>>>>>>>
बरोबर दिनेशदा... ती फळे ओली असताना आम्ही भाजून त्यातला गर खायचो... तर वाळल्यावर कुसे आपोआपच गळून जावून काळ्या- तपकीरी रंगाची लहान फळे मिळायची ,ज्यांची साल काढून त्यातला शेंगदाण्यासारखा गोळा खाता यायचा.
मी आजच कांडोळीचा फोटो पोस्टतो.
तूमच्या आसपास कुठे कावळ्याचे
तूमच्या आसपास कुठे कावळ्याचे घरटे असले तर एक गंमत बघण्यासारखी असते. (अर्थात नेमकी वेळ साधायला पाहिजे.) कावळा बाहेर गेला असला, आणि कावळीण घरट्यात असली, कि कोकिळ तिची कळ काढतो. घरट्याजवळ जाऊन तिला टोच मारतो. कावळीण चिडते आणि घरट्यातून बाहेर येते आणि त्याला हुसकून लावायला बघते. यावेळी कोकिळ खुप वेगळा आवाज काढतो. तो कोकिळेला इशारा असतो. मग कोकीळ (मादी, ती वेगळी दिसते, तपकिरी पांढरे रंग, साधनाला दिसली ती. ) पटकन घरट्यात जाऊन अंडे घालते. हे काम खुप झटपट होते. तेवढ्यात कावळा वा कावळी परत आले कि ती देखील पळून जाते. पळताना अत्यंत कर्कश आवाज करते. हे नाट्य मी गोव्याला घरासमोरच बघितले होते.
पण कावळा कावळी भोळे असतात. त्यांना मोजता येत नाही. घरट्यात अंडी आहेत किंवा नाहीत एवढेच त्यांना कळते. अंडी कमीजास्त झालेली त्यांना कळत नाहीत.
कावळा कावळी भोळे असतात खरेच
कावळा कावळी भोळे असतात
खरेच भोळे आणि आचरट.. अंडी आहेत एवढे कळते, दुस-यांची अंडी फोडून खाता येतात पण स्वतःची अंडी किती ते कळत नाही.
कावळे कबुतरांना भितात हेही मी पाहिलेय. माझ्या गच्चीत खायला दाणे टाकले की कावळे आणी कबुतरे धावतात. कावळे ३-४ आणि कबुतरे १०-१५. मग कावळे निमुटपणे कठड्यावर बसुन कबुतरांचे खाणे बघतात. त्यांचे खाणे झाले की मग स्वतः उतरतात. चिमण्या धीट आहेत कावळ्यांपेक्षा. कबुतरे खाताना चिमण्या आल्या तर कबुतरे धावुन जातात त्यांच्या अंगावर तरीही चिमण्या मधुन मधुन चोच खुपसुन दाणे पळवतातच.... कावळ्यांना असले काही जमत नाही.
दिनेशदा मी लहानपणापासुन ऐकतेय
दिनेशदा मी लहानपणापासुन ऐकतेय की कोकीळेचे अंडे कावळीण उबवते. तुम्ही प्रत्यक्ष पाहीले आहे. ग्रेट.
डॉ. कैलास मेल चेक करा.
डॉ. कैलास मेल चेक करा.
जागू, कोकिळच नाही, इतर अनेक
जागू, कोकिळच नाही, इतर अनेक पक्षी असे करतात. कधी कधी मोठे पक्षी, छोट्या पक्ष्यांच्या घरट्यात अंडी घालतात. बाहेर येणारे पिल्लूच, दायीपेक्षा आकाराने मोठे असते. तरी ती बिचारी कर्तव्यबुद्धीने त्याला भरवते. एखाद्या कुत्रीने, मांजरीच्या पिल्लाला पाजले तर ती बातमी होते पण पक्ष्यांच्या जगात असे होतच असते.
पण काही पक्षी (पेलिकनच्या कूळातले ) तितके समर्थ नसतात. ते घालताना २ / ३ अंडी घालतात, पण त्यातून जे पहिले बाहेर येते, ते जास्त डॉमिनेटींग असते, सर्वात जास्त खाणे त्यालाच मिळते. आणि ते बाकिच्या भावंडाना मागे सारते, कधी कधी घरट्यातून खाली ढकलून देते. अशा पिल्लाला खायला, इतर पक्षी, मगरी टपलेल्या असतातच. शेवटि त्या जोडीकडे एकच पिल्लू उरते. याचे चित्रण अटेन्बरो साहेबांनी केले आहे. आपल्याला बघताना वाईट वाटते, पण त्या पक्ष्यांसाठी ते नॉर्मल असते. सर्वात बलवान पिल्लूच जगते.
साधना, वेळ मिळाला कि चिमण्यांचे नीट निरिक्षण कर. आपण त्यांची चिमणा चिमणी म्हणून वर्गवारी करतो, पण त्यांच्यातही गळ्यावरील नक्षीप्रमाणे दर्जा असतो. कुणी कुणासमोर दाणे टिपायचे, याचे नियम ठरलेले असतात. हे सर्व लाईफ ऑफ बर्ड्स, या सिडीत बघायला मिळते.
(रच्याकने, साळुंख्या पण कावळ्यांना घाबरवतात. उगाचच आरडाओरडा करत, त्यांच्यात घुसतात.)
हे नेरुळगावातील गावदेवी
हे नेरुळगावातील गावदेवी मंदिराजवळील कांडिळीचे झाड.
वॉव, दिनेशदा तुम्ही प्रत्यक्ष
वॉव, दिनेशदा तुम्ही प्रत्यक्ष पाहिलंत का हे नाट्य? ग्रेट !
मला फार गंमत वाटते पक्षी-प्राण्यांची मानसिकता कशी असेल हा विचार करून.
एक प्रश्न- जिराफाला स्वरयंत्र नसतं हे खरंय का ??? सृजनसाठी 'प्राणी-आपले दोस्त' हे पुस्तक आणलंय. त्यात असं लिहिलंय. मला हे माहीत नव्हतं....आणि मला अजून हे खरंही वातत नाहीये. कारण स्वरयंत्र नसेल तर जिराफ एकमेकांशी कम्युनिकेट कसं करत असतील ?
याच मंदिराजवळील हे पिंपळाचे
याच मंदिराजवळील हे पिंपळाचे झाड..... याचे विस्तीर्ण पसरणे अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे.
जागू,मी तुम्हाला मेल करतो तो एक्झॅक्ट अॅड्रेस.
डॉक, पिंपळाचं झाड खरंच कसलं
डॉक, पिंपळाचं झाड खरंच कसलं पसरलंय !!
पिंपळाची पाने पाण्यात भिजत ठेवून त्याला जाळ्या पाडायच्या, आणि मग त्यावर रंगरंगोटी करून मैत्रिणींना द्यायची, हा शाळेतला खास उद्योग.:)
हो रुणुझुणू, जिराफाला आवाज
हो रुणुझुणू, जिराफाला आवाज काढता येत नाही. पण त्यांची मान लांब असल्याने, ते एकमेकांशी व्हिज्यूअली, कम्यूनिकेट करतात.
डॉ हो हेच ते. (पण फूलाची वेल वेगळी.)
तूमच्यापैकी कुणाला पिंपळपान हा निबंध अभ्यासाला होता का ? प्रचंड उन्हाळा आणि पिंपळाची लसलसती पालवी, यांचे सुंदर शब्दचित्र होते त्यात (कदाचित पु. भा. भावे ?)
पिंपळाच्या पानाचा लांब देठ, त्याचा पसरट आकार, यामुळे पिंपळाची पाने कायम सळसळत असतात.
मला लहानपणी. र चा उच्चार येत नसे. त्यावर उपाय म्हणून आईने, पिंपळाच्या पानाची पत्रावळ करुन त्यावर तूपभात जेवायला वाढला होता. आणि योगायोग म्हणा कि गूण म्हणा, मला र चा उच्चार यायला लागला. पिंपळाची कोवळी पाने, तेलात परतून त्याची चटणी पण करता येते.
पिंपळाच्या पानांची चटणी ? जे
पिंपळाच्या पानांची चटणी ?
जे लोक लग्न न होताच मरतात, ते पिंपळाच्या झाडावर मुंजा होऊन बसतात, असं एकदा ऐकलं होतं.....अवांतर माहिती. खरं-खोटं देव जाणे, मला मात्र भिती वाटते.
लहानपणी आम्ही पिंपळाची पान
लहानपणी आम्ही पिंपळाची पान पाण्यात ५-६ दिवस बुडबुन ठेवायचो. काधल्यावर पानाला छान जाळी आलेली असायची.
ताजी ताजी पिंपळपाने काय गोड
ताजी ताजी पिंपळपाने काय गोड दिसतात... तान्ह्या बाळाच्या हाता पायांना स्पर्श केल्यावर जी भावना येते मनात सेम तीच भावना कोवळ्या पिंपळपानाला हात लावताना येते...
(No subject)
जिप्स्या एकदम ढिंच्याक फोटू
जिप्स्या एकदम ढिंच्याक फोटू रे...
रच्याकने, माझ्या रोपाला पाने फुटली का???
माझ्या रोपाला पाने फुटली
माझ्या रोपाला पाने फुटली का???>>>>आजच नीट निरखुन पाहिल तर एक बारीक पान येताना दिसतंय.

एव्हढे दिवस ते आयफेल टॉवरसारखेच उभे होते.
ह्म्म्म्म.. जेवायला घातले
ह्म्म्म्म.. जेवायला घातले नसणार तु त्याला. सदानकदा तुझा पाय घराबाहेर....
(No subject)
साधने मी दिलेली झाडे जगली का
साधने मी दिलेली झाडे जगली का ग ? दिनेशदांनी दिलेल्या फळाच्या बियांना अजुन रोपे नाही आली. तुमच्याकडे आली का ?
जागू, तु दिलेल्या अळुला मस्त
जागू, तु दिलेल्या अळुला मस्त दोन पाने आली.
तो अळू थोडा मोठा झाला की
तो अळू थोडा मोठा झाला की त्याला बाजुला अजुन रोपे येतील. मग अळूच्या वडया करुन आण कुठल्यातरी गटगला.
जागू, पॅशनफ्रुटला का ? त्याला
जागू, पॅशनफ्रुटला का ? त्याला बरेच दिवस लागतात रुजायला. पण रुजतेच ! नाहीतर कधी मुंबईला जाणे झाले, तर माझ्या घरी आहेत ना ! साधनाचा पण क्लेम आहेच.
पिंपळपानावर बाळकृष्ण असतो ! (मग मूंजा कुठून असेल ?)
मोठे वाढलेले पिंपळाचे झाड म्हणजे पक्षी आणि प्राण्यांचे गोकुळच असते. पिंपळाला येणारी अगदी छोटि फळे पण पक्षी आवडीने खातात.
अपडेट्स - जागु तुझी झाडे जगली
अपडेट्स -
जागु तुझी झाडे जगली सगळी... आज सकाळीच गाणे ऐकले - मनात माझ्या बन पाचुचे..... तेव्हा तुझीच आठवण काढली. माझ्याकडेही पाचुचे बन बनणार बरं का.....
दिनेशनी मोकळ्या बिया दिलेल्या पॅशनफृटच्या - त्यांचे काय अजुन झाले नाही. रोज पाहतेय कुंडीत. त्यांनी दोन सुकलेली पॅशनफृटे दिलेली ती तशीच ठेवलीत. अजुन सुकायला
त्यांनी राणीबागेत अजुन एक शेंग दिलेली, तिही तशी आहे.
योग्या - तु काय दिलेलेस?? दिले नसशील तर दे...
राणीबागेतुन आणलेल्या अशोकांनी अजुन काहीच करायचे मनावर घेतले नाही. मी धीर सोडत नाही, काहीतरी होईलच.
मी दोन कलींगडाच्या बिया पेरलेल्या. दोन्ही बीया दोन पाने घेऊन हात जोडुन आणि काळी टोपी डोक्यात घालुन उभी आहेत. त्यांची योग्य ती सोय लावायची. यावर्षी घरचे कलींगड खाणारच ही घोर प्रतिज्ञा केलीय.
वांग्याची सगळी वांगी खाऊन झालीत. आता दोन वांगी आहेत झाडावर पण अजुन हिरव्या आवरणातुन बाहेर पडत नाहीत :). हे वांगे एकदम अतरंगी आहे. झाड फुलांनी भरते, मग अर्धी फुले गळतात आणि अर्धी फळे येतात. मग सगळी सामसुम.. मग परत फुले....
मिर्चीला फुले येताहेत,,, पण फळॅ नाहीत. सिजन संपला
अपडेत संपले
साधना, ती पॅशनफ्रुटची फळे
साधना, ती पॅशनफ्रुटची फळे सुकवायची गरज नाही. ती फोडून पाण्यात चोळायची. गाळणीवर बिया चमच्याने रगडून घ्यायच्या. (बिया खाल्ल्या तरी चालतात. ) एका फळापासून एक कपभर सरबत होईल. मग काळ्या बिया हव्यातर थोड्या वाळवून किंवा तशाच कुंडीत टाकायच्या. ५/६ आठवड्याने नक्की रोपे येतील.
त्या सूट्या बियांचे झाड असते का वेल असतो याची कल्पना नाही. मी फक्त फळे खाल्ली होती.
Pages