निसर्गाच्या गप्पा-१

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 December, 2010 - 10:33

इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा

ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.

आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx

पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड

पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका

पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या

पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी

पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी

पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु

पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्‍या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)

पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद

पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल

पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा

पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.

पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण

पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण

पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/

पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3

पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड

पान १९:
चर्चा - डोंबिवली, अ‍ॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अ‍ॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय

पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस

पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर

पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी

पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने

पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल

पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी

पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0

पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अ‍ॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,

पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा

पान ३०:
चर्चा - पांगार्‍याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्या ० ते ५ वर्षापर्यंतच्या बालकांना पोलिओचे २ थेंब द्यायला विसरु नका.

बहुतेक महाराष्ट्रातले लोक पोलियोचे दोन थेंब द्यायला विसरताहेत... कालच ऐकले रेडिओवर की आता हा कार्यक्रम जिथे रुग्ण सापडताहेत तिथेच करणार म्हणुन कारण इतरत्र पोलिओनिर्मुलन होत आलेय. आणि रुग्ण सापडण्याच्या यादीत महाराष्ट्राचेही नाव आहे Sad

ब-याच वर्षांपुर्वी वाचलेले - कलिंगड अर्धे कापुन आतला गर पुर्ण काढुन घ्यायचा. आता ते कलिंगड एखाद्या गाडग्यासारखे दिसु लागेल. उन्हाचा कडाका असलेल्या भागात दुपारी बाहेर जायचे असेल तर हे गाडगे टोपीसारखे डोक्यावर घालुन वर काहीतरी आवरण आच्छादुन बाहेर गेल्यास उन अजिबात बाधत नाही.. जिथे कडाका आहे तिथल्या लोकांनी हे करुन पाहावे आणि आम्हाला फोटो पाठवावेत - दोन्ही - असली टोपी घालुन हिंडणा-या माणसाचे आणि ते पाहुन हसणा-या इतरांचेही Proud

साधना, ते कलिंगडाचे खरे आहे, मी दूर्गभ्रमण तयारी, मधे लिहिले होते.
आपल्या त्या दिवशी घायपाताबद्दल गप्पा चालल्या होत्या. सध्या माझ्या घरासमोरचे घायपात फूलले आहे, फोटो टाकतोच. तशी झाडे न्यू झीलंडला पण होती. तिथे ते त्याच्या चटया, बॅगा विणतात. पण त्याचा फूलोरा वेगळा होता.

दिनेशदा नक्कीच सालांपासुन रुचकर पदार्थ बनवता येतात.

डॉ. अनिल आम्ही पण काल आमच्या लोकल पोलिओ बुथ वर जाउन लहान मुलांना इनरव्हिल क्लब तर्फे टोप्या, मास्क व शिट्या वाटल्या.
आमचे इनर्व्हिल क्लबचे कालच उदघाटन झाले. इनर्व्हिलच्या डिस्ट्रीक्ट गव्हरनर सौ. मंजु शर्मा व इ.एक ह्यांनी क्लबचे उदघाटन करुन कमिटी व सदस्यांना शुभेच्छा दिल्या. इनरव्हिल क्लब तर्फे त्यांनी आम्हाला उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी वरिल पोलिओ बुथवर वाटण्यासाठी सामान दिले. मी इनरव्हिल क्लबची सेक्रेटरी झाले कालपासुन.

होय, २६ तारखेला मी आणि प्रभूदेसाइ कूट्म्बीय शेतावर जात आहोत. नन्तर मी तुला आणखी माहिती देईन.

आमच्याकडची दिल्ली सावर अशी भरभरुन फूलली होती. (पण त्या प्रमाणात तिला बोंडे लागत नाहीत.)

हा आहे घायपाताचा एक प्रकार.
माझ्या घरातून दिसणारा तूरा..

उभ्या असलेल्य, गाडीच्या तूलनेत त्या तूर्‍याची उंची...

त्यातली फूले..

वर लिहिल्याप्रमाणे हा घायपाताचा एक उपप्रकार आहे. ज्याच्यापासून धागे काढतात तो पांढरट हिरव्या रंगाचा असतो. त्यालापण इतका उंच नसला तरी उंच तूरा येतो. पण त्याला थेट रोपे (पिल्ले) लागतात. ती पिल्लेच मग आजूबाजूला रुजतात.
या पानाचा मधला काटा पकडून जर पान ओढले तर त्या काट्याला लागून लांब धागा राहतो (तसे याच्या पूर्ण पानातुनच धागे निघतात ) हा म्हणजे एक नैसर्गिक सूईदोराच असतो.
घायपाताची मूळे जमिनीत खोलवर जातात त्यामूळे जमिनीची धूप थांबवायला, तो उपयोगी ठरतो.

दिल्ली सावर मस्त दिसतेय..

माझ्या ऐशुच्या शाळेच्या दरवाजात घायपात होता. त्याला तुरा आला की त्याची बोंडे सगळीकडे उधळत. आत्ताच डिसेंबरात त्यांनी काढला तो घायपात. मस्त मोठा झालेला. का काढला देव जाणे. पानाच्या टोकांना इंचभर लांब काटे असतात.

विजय, मजा करा उद्या, ओढ्यात फिशींग करा आणि इथे टाका फोटो... Happy

दिनेश, लोणचे उद्या करते. उद्या संध्याकाळी लेकीला भेटायला जातेय, तिच्या साठी घेऊन जाईन.

साधना, दिनेशदा धन्यवाद.

हा घायपात आमच्या ऑफिसच्या समोर आहे व त्यालाही सध्या तुरा आलेला आहे.
दिल्ली सावर छानच बहरलेय दिनेशदा.

दिनेश, तुमची जुनी पाने वाचत होते गेल्या आठवड्यात. मला पांगारा आणि पळस मध्ये नेहमी गोंधळ व्हायचा. आता मात्र लक्षात राहिल दोघातला फरक. इकडे पांगारा भरपुर दिसतो, त्यामानाने पळस नाही. पण फुलांमुळे मी पांगा-यालाच पळस समजत होते. आता मात्र पोपटाच्या चोचीसारखी पळसाची फुले लक्षात राहतील बरोबर.

या ला म्हणतात होय घायपात? हे तर वेताळ टेकडीवर भरपुर आहे.
आणि त्याच्या छोट्या फुलांवर छोटे छोटे सुंदर पक्षी येतात त्यातले किडे खात असावेत.
धंन्यवाद दिनेश.

हे खालचे झाड सावरीचे आहे का ? त्याला काटे दिसत नाहीत. परवा थोडे लांबुन दिसले तिथुनच फोटो घेतला.
savar.JPG

हे बहुतेक पांढरी सावर - शेफ्लेरा असावे... नक्की माहित नाही Happy शेफ्लेराला टोकाला कळ्या लागतात.

गावठी गुलाबाची (किंवा इतर कोणत्याही गुलाबाची) वेल कुठे मिळेल? मी एक पांढर्‍या गुलाबाची वेल कुंडीत लावलीये. बरीच वाढली पण फुलंच नाही येत.

आजच मेथीदाणे टाकलेत कुंडीत.

बरीच वाढली पण फुलंच नाही येत.

मीही नेरुळला राहात होते तेव्हा एक गुलाबाचे रोपटे जमिनीत लावलेले. घेतले तेव्हा एक फुल होते त्यावर. ते झाड नंतर एवढे वाढले की शेवटी छतावर जाऊन पोचले. खुप मोठे जंगल झाले त्याचे. पण तीन वर्षात एकही फुल कधी लागले नाही Sad

विजय फार्मभेट कशी झाली ?

मामी माझ्याकडे दोन गावठी गुलाबाचे दिन प्रकार आहेत. माझ्याकडे येउन घेउन जा. त्या पांढर्‍या गुलाबाला सुर्यप्रकाश मिळतो का भरपुर ?
साधना तुझ कुरीयर मिळाल. खुप खुप खुप धन्स. फोन करायचा राहीला मिळाल्याबरोबर. खुप गडबडीत होते.

हो हो माझी बाल्कनी पूर्वेकडे आहे. त्यामुळे सकाळी ११ पर्यंत भरपूर सुप्र. त्यावर ती पांढरी कीड मात्र पडलीये. या कीडीने वैताग आणलाय. बगिचाचं द्रावण कितीतरी वेळा मारलय. जागू, खरच येईन हा मी तुझ्याकडे उरणला.

गुलाबाच्या वेलीला फूले येत नसतील, तर ती छाटत रहा, तसेही करुन फूले येत नसतील, तर तिच्यावर कलम करायचे. ते चांगले होते, कारण त्या वेलीची मूळे जमिनीत चांगली रुजलेली असतात.
एकदा का कलम झाले, कि मग फक्त तोच फूटवा वाढू द्यायचा, बाकिचे फूटवे छाटून टाकायचे.

माझ्या शेजारणीकडे गुलाबाची तक्रार केल्यावर ती म्हणाली, एखादी फांदी निघते बिनफुलांची. आणि नेमक्या त्याच फांदीचे कलम आपण वापरले तर आपले अख्खे झाडच बिनफुलांचे निघणार.

दिनेश, अशा झाडावर दुस-या फुलवाल्याचे कलम करायची कल्पना खुप छान आहे. मला शाळेत जीवशास्त्र शिकवणा-या बाईंनी त्यांच्या घरातील गुलाबावर वेगवेगळ्या रंगाच्या गुलाबांची कलमे केली होती. झाडावर त्यामुळे एकाच वेळी पांढरे, भगवे आणि लाल गुलाब दिसायचे. त्यांची मुलगी माझ्या वर्गात होती, तिच्याबरोबर आम्ही मुद्दाम घरी जायचो गुलाब बघायला. Happy

ठीक आहे. कलम करून बघेन. पण कुंडीत लावल्यामुळे फुले येत नाहीत असे नाही ना? साधनाच्या अनुभवावरून तसे नसावे असे वाटते.

अगं एखादे झाड निघते असे. आताही माझ्या कॉलनीत एक झाड आहे. खुप वाढलेय, पण फुल कधी पाहिले नाही त्याच्यावर. आणि याच्या फांद्याही अगदी लांबलचक येतात. आपल्या फुलवाल्या गुलाबाच्य फांदीच्या टोकावर गुलाब येते, मग आपण ती फांदी जरा छाटतो, त्यामुळे फांद्यांची लांबी मर्यादित राहते. इथे छाटणी नसल्याने फाद्या अगदी हातहातभर लांब होतात.

ती फुले न येणारी गुलाबे कलम करण्यासाठी वापरतात. आपण जेंव्हा कलम बाजारातुन आणतो त्यातील जर कलम मरुन खालच झाड जगल तर ते भराभर वाढत पण त्याला फुल येत नाहीत.

Pages