शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चवरी म्हणजे बहुदा दोरी. चवरीचा दुसरा अर्थ गवळ्याची दुध साठवण्याचे भले मोठे पातेले. त्याला विदर्भात गुंडी म्हणतात.

चवरीचा दुसरा अर्थ गवळ्याची दुध साठवण्याचे भले मोठे पातेले<<<<<<<
बी, दुधाची असते ती चरवी; चवरी नाही.

'चवरी' म्हणजे वनगायींच्या केसांच्या झुबक्याला मूठ बसवून माशा इ. हाकलण्यासाठी तयार केलेले साधन.

त्या गाण्यात 'लक्षुमीच्या हातातली चवरी व्हावी वर खाली, इडा पीडा जाईल..' अशा ओळी आहेत. म्हणजे लक्षुमीच्या हातातली (कृपारूपी ? ) चवरी ढळू दे आणि त्याने माझ्या सगळ्या इडा-पीडा दूर जाऊ दे, असा अर्थे घेता येईल. चू.भू.द्या.घ्या.

'कडकलक्ष्मी' डोक्यावर घेऊन येणार्‍या माणसाजवळ अशी चवरी असते. कडकलक्ष्मीच्या पाया पडायला येणार्‍या माणसाच्या तोंडासमोर तो ती वारा घातल्यासारखी खालीवर करतो व 'इडा-पीडा टळू दे...' वगैरे वगैरे बोलतो.

श्रद्ध तुझे बरोबर आहे. दुधाची ती चरवीच.

धन्यवाद....! Happy

असाच मला पडलेला प्रश्न म्हणजे...दत्तबावन्नीमधे म्हणा किंवा दत्त महाराजांच्या कुठल्याही स्तोत्रामधे 'स्मर्त्रूगामी' हा शब्द येतो...त्याचा अर्थ काय?

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
खबरदार जर एके ४७ घेउनी जाल पुढे चिंधड्या
उडविन राई राई एवढ्या......
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

नयना_मोरे : 'स्मर्तृगामी' (मूळ संस्कृत नाम : स्मर्तृगामिन् (/स्मर्तृगामी) ) शब्दाची सामासिक फोड केल्यावर अर्थ स्पष्ट होतो. 'स्मर्तृ (/स्मर्ता)' आणि 'गामी (/गामिन्)' या दोन शब्दांपासून 'स्मर्त्याकडे (स्मर्ता = स्मरण करणारा/ आठवण काढणारा) जाणारा (गामी = जाणारा/जाणारी/जाणारे)' अशा अर्थाचा हा समास बनतो. दत्तबावनी, इतर दत्तस्तोत्रांमध्ये दत्ताला 'स्मर्तृगामी' म्हटलंय, कारण दत्त/गुरू त्यांची आठवण काढणार्‍याकडे (= स्मर्त्याकडे) तत्काळ जाणारे (= गामी) मानले जातात. 'स्मर्तृगामी'सारखेच 'पुरोगामी (पुरो ++ गामी = पुढे जाणारा)', 'प्रतिगामी (प्रति ++ गामी = विरुद्ध दिशेकडे जाणारा)', 'मूलगामी (मूल ++ गामी = मुळाकडे जाणारा)' असे इतर शब्द आपण मराठीत बर्‍याचदा वापरतो.

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

चवर्‍यावरून पुशिंची शेवगा आठवली -- कुठे बरे चवरी ढाळताना हे दोन शब्द वाचले ते दोन दिवसांपासून आठवत होतो. आज चक्क कवितासह शब्दांची जागापण आठवली.

दोन प्रहर. निवांत सारें.
श्रमभराने बाजेवरतीं
पांगुळलेली तू.
खिडकीबाहेर ढाळितो चवरी
आसुरलेला शेवगा दारचा.

'नव्याचे नउ दिवस' या आशयाचा इंग्रजीमध्ये वाक्प्रचार अथवा म्हण अथवा शब्द आहे का???असल्यास कुठला??

----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी

वा !! "फ" अतिशय सुंदर अर्थ सांगितलात! आणि खरोखरच मन श्रीदत्तगुरुंपुढे नतमस्तक झाले.! धन्यवाद!

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
खबरदार जर एके ४७ घेउनी जाल पुढे चिंधड्या
उडविन राई राई एवढ्या......
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

'हेत्वी' या शब्दाचा अर्थ काय ?

-मनी.
The strength of a nation derives from the integrity of the home.

एखादी गोष्ट खूप काळानंतर केली जात असेल तर त्यासाठी "सटी षण्मासी" असा शब्दप्रयोग केला जातो. यातील "सटी" या शब्दाचा व "सटी षण्मासी"चा नक्की अर्थ काय?

अरे माझ्या प्रश्नाचे कुणीच उत्तर दिले नाहि
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी

मैत्रीण आणि मैतरणी यात काही फरक आहे का? की त्यांना त्र उच्चारता येत नाही त्यांही मैत्रीणचे मैतरणी केले Happy
मी पाहिले आहे की प्रकाश या नावाचा काहे जण परकाश असा पण उच्चार करतात Happy

सटी म्हणजे षष्ठीला. सट म्हणजे ग्रामीण भागात षष्ठीला म्हणतात. वांगीसट म्हणजे वांगी खाण्याची षष्ठी. तिला नेहमीच्या वापरात वेगळा शब्द आहे तो आता मला आठवत नाहीये. सटी सामाशी असेही म्हणतात. सहा महिन्यातून येणार्‍या षष्ठीला म्हणजे कधीतरी अथवा वन्स इन अ ब्लूम या अर्थाने Happy

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

किंकर्तव्यमूढ या शब्दाचा अर्थ कुणी सांगेल का?

आभारी आहे.

आता नक्की काय करावे या विचाराने मूढ ))मूर्ख झालेला .

खरे तर अक्कल चालत नसलेला.' बधीर' झालेला

रॉबिनहुडाने बरोबर सांगितलंय. 'किंकर्तव्यमूढ' शब्दाच्या समासातले घटक शब्द आहेत - 'किं (काय) ++ कर्त्यव्य (करावे) ++ मूढ(मूर्ख/गोंधळलेला)'. समास फोडल्यावर उकलणारा अर्थ : 'काय करावे याबाबत गोंधळलेला.'

सतीश माढेकर, टोणगा : सठी सहामासी या शब्दामागची पार्श्वभूमी टोणग्याने सांगितली तशी असायची बरीच शक्यता वाटते. पण अजून एक संदर्भ मध्यंतरी वाचला होता - साधारणपणे साठ वर्षांनी येणारा 'कपिलाषष्ठी' योग हा खालील सहा गोष्टी जुळून आल्यावर येतो :
१. भाद्रपद महिना
२. वद्य पक्षातली षष्ठी
३. मंगळवार
४. चंद्र रोहिणी नक्षत्रात
५. सूर्य हस्त नक्षत्रात
६. योग 'व्यतिपात' योग असतो तेव्हा.
चांद्रमानाच्या भारतीय पंचांगातली संवत्सरं एकूण साठ आहेत. या साठा संवस्तरांमध्ये एकदा हा योग जुळून येतो. तोही भाद्रपदातल्या वद्य षष्ठीला.. त्याचा काही संदर्भ 'सठी सहामासी' या संकल्पनेत असावा काय अशी शंका येते.

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

मलाही हा संदर्भ जास्त बरोबर वाटतो.

रॉबीन धन्यवाद!

संजाब या शब्दाचा अर्थ काय होतो? माझ्यामते संजाब म्हणजे दरारा, धाक, जरब वगैरे.

संजाब म्हणजे डोक्याचे सर्व केस कापुन शेंडी राखने. बटु किंवा ब्राम्हण जशी राखतात तशी.
हा शब्द बहुदा फारसी असावा.

"अनुष्टुभ" या शब्दाचा अर्थ काय?

'मजेशीर', 'निराळा' या अर्थी 'और' या शब्दाचा मराठी भाषेत उपयोग केला जातो. हा शब्द आणि हिंदीतील 'और' हा शब्द एकच आहे का? पण हिन्दीमधे 'और' म्हणजे आणि/आणखी. पण हिन्दीमधेही हा शब्द मजेशीर या अर्था वापरला जातो. जसे की - इसका मजा कुछ औरही है|

आभारी आहे.

वन्स इन अ ब्लूम नाहीये वाक्प्रचार. वन्स इन अ ब्लू मून -एकाच रोमन महिन्यात दोन पौर्णिमा आल्या तर दुसर्‍या पौर्णिमेला ब्लू मून म्हणतात . असा योग फार क्वचित येतो ( १९९० डिसेंबर मधे होता ब्लू मून ३१ तारखेला ) म्हणून हा वाक्प्रचार.

सतीश माढेकर : 'अनुष्टुभ्' (हे मूळ संस्कृत लेखन) हे एका छंदाचं नाव आहे. संस्कृत साहित्यात, वैदिक साहित्यात छंदोबद्ध रचना करताना अनुष्टुभ्, गायत्री, जगति, बृहति, त्रिष्टुभ्, उष्णिक् नामक छंद योजले गेलेत.
रामरक्षेच्या सुरुवातीला रामरक्षेची बांधणी अनुष्टुभ् छंदात असल्याचा उल्लेख आहे (अख्खी रामरक्षा या छंदातच आहे का याचं मला ज्ञान नाही.). पण मिसळपावावर अनुष्टुभ् छंदाबद्दल झालेली चर्चा याबाबत मार्गदर्शक ठरू शकेल.

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

इसका मजा कुछ औरही है| >> मला वाटते तो बोली भाषेत रुढ झालेला वाकप्रचार आहे. "इसका मजा कुछ औरही (अधिक/अलग्/बढिया) है" ह्या अर्थाचे संक्षिप्त रुप.

माझ्या मते संपूर्ण रामरक्षा एकाच छंदात नाहिये.. अनुष्टुभ् छंदाचा उल्लेख अथर्वशीर्षात पण येतो..

--------------------------
बहोतसे आधे बुझे हुए दिन पडे है इसमें
बहोतसी आधी जली हुइ राते गिर पडी है
ये ऍशट्रे भरती जा रही है

फ,

धन्यवाद! तुमच्याकडे खूपच छान माहिती आहे. तुमचे मराठी व संस्कृतचे ज्ञानही सखोल आहे.

उल्लेख.. टण्या माझे पाठ आहे अथर्वशीर्ष. कुठल्या ओळीत येतो अनुष्टुभचा उल्लेख?

असामी, धन्यवाद!

फ, मस्त लिंक आहे. धन्यवाद!
बी, नीट वाच की रे. 'अनुष्टुभ' हा छंद आहे. त्या लिंकवर जा. सोदाहरण समजेल.
------------------------------------------
A good listener is not only popular everywhere, but after a while he knows something.

अनुष्टुभ छंदः सीता शक्ती, श्रीमद हनुमान कीलकम..

असा छंदाचा उल्लेख आहेच की रामरक्षेत.. Happy

Pages