दिलीप माजगावकरांचे प्रभाकर पणशीकरांना पत्र...

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

परवा आई-बाबांशी बोलताना 'कशी आहेस? कसे आहात?' हे विचारायच्या/सांगायच्या आधीच त्यांनी दोन गोष्टी सांगीतल्या...योगायोगानं दोन्ही 'दिलीप' नावाच्या व्यक्तीभोवती असलेल्या. पहिली... आत्ताच दिलीप प्रभावळकरचा फोन येऊन गेला, त्याला संगीत नाटक अ‍ॅकॅडमीचा पुरस्कार मिळालाय... एकदम खूष होता ...मस्त वाटलं... त्याला अभिनंदन कळव !
दुसरी गोष्ट म्हणजे रविवारच्या लोकसत्तामधे दिलीप माजगावकरांनी प्रभाकर पणशीकरांनी लिहिलेलं पत्र प्रसिद्ध झालंय... अगदी आवर्जुन वाच.. आणि तुझी प्रतिक्रीया माजगावकरांना नक्की कळव!

बाबांनी आवर्जुन वाचच म्हणून सांगीतलेला हा लेख, हे पत्र मी वाचलं... आणि परत एकदा दिलीप माजगावकर म्हणजे काय प्रकरण आहे हे जाणवलं. एक साधं पत्र...पुस्तकाची पहिली प्रत लेखकाला सुपुर्त करताना एका प्रकाशकानं लिहिलेलं पत्र... पण त्यातून ज्याला पत्र लिहिलंय त्या प्रभाकर पणशीकरांचं व्यक्तीमत्व, त्याची उंची जितकी जाणवते, तितकीच ज्यानी पत्र लिहिलंय त्या माजगावकरांच्या विचारांच्या खोलीही स्पष्ट दिसून येते....
कलाकार, कलाकृती, आयुष्य, विचार... खूप काही सांगून, शिकवून जातं हे पत्र !

'आपल्याच कलाकृतीच्या अति प्रेमात न पडता त्याच्याकडे निर्मितीनंतर थोडं तटस्थपणे पाहायला शिकायला हवं' हे संस्कार माझ्यावर लहानपणापासून ते आजपर्यंत कळत-नकळत ज्यांच्यामुळे झाले आहेत, अश्यातली एक व्यक्ती म्हणजे दिलीप माजगावकर ...
"पुस्तकाबद्दल बरंच काही लिहिता येईल, पण आपल्या बाळाचं कौतुक लोकांच्या नजरेत येणार नाही इतकंच करावं म्हणून थांबतो' असं सहज, हलकेच पण खूप शिकवणारं 'जड' लिहून जाणारे दिलीप माजगावकर .. आणि त्यांनी प्रभाकर पणशीकरांना 'तोच मी' ह्या आत्मचरित्राची पहिली प्रत पाठवताना लिहिलेलं हे पत्र...आवर्जुन वाचण्याजोगं !

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=129...

---------------------------------------------
हे लिखाण माझं वैयक्तीक लिखाण नाही. मी केवळ एक ब्लॉग ह्या दृष्टीकोनातून विचार करून माझ्या 'रंगीबेरंगी' पानावर लिहिले आहे...जेणेकरून मला जे वाचलेलं आवडलं ते अजून चार लोकांपर्यंत पोचावं !
पण ह्या लिखाणाची जागा चुकली असेल, तर अ‍ॅडमिन आणि टीम ने ते योग्य ठिकाणी हलवावे ही विनंती Happy

प्रकार: 

आरती, खरंच अगदी आवर्जुन वाचण्यासारखंच आहे ते पत्र. आयुष्यातली जमेची बाजु म्हणजे काय किती सहजसुंदर लिहीलंय. धन्यवाद.

माजगावकरांचं अजून एक अप्रतिम पत्र म्हणजे 'तें दिवस' ह्या पुस्तकातलं प्रकाशकाचं मनोगत.
'तें दिवस..' मला आवडलंच, पण अगदी मनातलं खरं सांगायचं तर मला पुस्तकाइतकीच त्याची प्रस्तावना, ते माजगावकरांचं पत्र आवडलंय Happy

माणसं स्वत:च्या कर्तृत्वानं मोठी होताना आपण बघतो, पण त्यांची आयुष्याविषयीची समज मोठी होतेच, असं नाही. आपण तिथं वेगळे ठरता.>>>>

'या दोन मोठय़ा माणसांशी भांडल्यानंतर ज्यांच्याबरोबर आपण भांडावं, अशा उंचीची माणसंच आज उरली नाहीत,’ >>>

क्या बात है!

थँक्स रार.:)