स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे

Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34

स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.

जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.

स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नीधप,
कुठली शिलाई मशिन चांगली. मला पण अगदि घरात वापरायला हवी आहे. कमी जागा घेणारी

आभार मामी Happy क्रोमा शोधते लगेच Happy

वा अँकी ची खरेदी झाली पण आणी मी अजुन माहितीच काढत आहे. तस मला हॉस्टेल वर हे सगळ ठेवता येणार नाही , हे सगळ घ्यायच म्हणजे आधी फ्लॅट लवकर फायनल करायला हवा, जे संक्रातीला करण्याचा बेत आहे Happy

क्रोमा, मध्ये क्रोमा ब्रँड (होम ब्रांड) च्या ४६" LCD वर ३२" LCD फ्री आहे, कुणी ह्या ब्रांड च्या LCD वापरला अहे का? क्रोमाचा ४६" LCD ८६ ते ८९,०००.०० पर्यंत जातो.

येरवाड्यात "ऊत्सव" प्रदर्शन आल होत, फर्निचर, ऊपकरण वै. सगळ्यांचे स्टॉल होते. प्रदर्शनात स्वस्त वस्तु मीळतात अस फ्रेंड ने सांगीतलेल पण मला प्रदर्शना बद्दल शेवटच्या दिवशी समजल्याने, मला हव्या सलेल्या सगळ्याच वस्तुंच्या तीथल्या आणी बाहेरच्या किंमती टॅली करण्याचा चान्स मीळाला नाही.

मी तेथे "ग्रीनशेफ" ची ग्लास टॉप ची ३ बर्नरची शेगडी बुक केली २०० रु. देऊन. मला हि शेगडी एकुण ३२००.०० रु. ला पडणार आहे, पण अजुन मी गॅस कनेक्शन घेतलेल नाही, "गॅस कनेक्शन घेतांना तीथुनच शेगडी घ्यावी लागते अस काही जण म्हणाले हे खर आहे का? तसा नियम/कायदा वै. आहे का?
(ह्या शेगडीला ISI Mark नाही पण बहुदा ISO Mark आहे.)

गॅस कनेक्शन घेताना शेगडी घेणे कंपल्सरी नाही पण एजंसी तुम्हाला जबरदस्तीने घ्यायला लावते कारण त्यांना कमिशन मिळते. नाहीतर ते कनेक्शन देत नाहीत. तुम्ही शेगडि घेतली असल्यास त्यांना समजावण्याचा प्रयत्न करा.

प्रदर्शनात फुड प्रोसेसर चे पण बरेच स्टॉल होते, जयपान च मीक्सर + फुड-प्रोसेसर ३६००.०० रु. ला आणी ग्रीनलाईनच ५२९५.०० रु. ला. केतान वै फुड प्रोसेसर पण होते. सगळेच त्यांची ब्रान्ड प्रमोट करत होते दुसर्‍या बान्ड चे -ve सांगुन, त्यामुळे नेमक कोणत घ्याव कळेना.

ग्रीनलाईन मध्ये नारळ वाटी पण खोवता येते, वाटाणे सोलले जातात, शीवाय २ मुख्य ब्लेड चकत्या एक-एक न मीळता २-२ मीळतात. ग्रीनलाईन फुड प्रोसेसर चा कुणाला अनुभव आहे का?

जयपान मध्ये मीक्सर च भांड काढुन मग फुड-प्रोसेसर लावायचा (OR V-V) म्हणजे एका वेळी एकच ऊपकरण मशीनला लावयच अस आहे, दुसर्‍या फुड-प्रोसेसर सारख फुपो L शेप मध्ये नाही (जे मीक्सर वापरतांना जोडुन ठेवावच लागत लॉकींग साठी), त्यामुळ कमी पॉवर लागते अस त्यांच म्हणण तर जयपान प्रकारात फुपो L शेप मध्ये नसल्याने (पट्ट्याच्या आभावे) पीठ नीट मळल जात नाही अस खेतान च म्हणण.

मीक्सर व फुपो दोन्ही एकाच वेळी वापरता येतात का म्हणजे एक पदार्थ आपण मीक्सर मध्ये टाकला आणी एक फुपो मध्ये.

@ अमि आभार Happy मी अजुन LPG कनेकशन घेतलेल नाही (अप्लाय पण केलेल नाही) पण शेगडी बुक केली आहे.

LPG कनेकशन साठी पॅन कार्ड लागेल ना? माझ पॅन चोरीला गेल्याने मी नविन पॅन चा अर्ज केलाय ते येण्यास २-३ आठवडे लागतील तोवर गॅस कनेकशन ची चौकशी पण पुढे ढकलली आहे Happy

Adress Proof म्हणुन घराच Agreement(अजुन लाईट बिल वै. नाही) and Pan Card हया दोन गोष्टी पुरतील ना गॅस कनेकशन साठी? की अजुन दुसरी डॉक्युमेन्टस पण लागतील.

हो पुरेल.
मला शंका आहे की, भाकरी नॉन्स्टिक तव्यावर करता येते का? की तो जाड बुडाचाच लागतो? आणि येत असेल तर, तो तव पटकन तापून लवकर थंड होतो तर भाकरी करताना गॅसची आच कशी अ‍ॅडजस्ट करावी? (बटणाने सांगू नका, प्रमाण विचारतेय. Happy )

भाकरी नॉनस्टिकवर करता येते पण तो तवा गुळगुळीत असल्याने बरेचदा भाकरी पाणी लावताना सरकते. तवा पटकन गरम होतो त्यामुळे भाकरी टाकण्याआधी गॅस बारीक करून पाणी लावून मग मोठा करावा. उलटून दुसर्‍याबाजूने भाकरी भाजावी.
त्यामुळे शक्य असेल तर लोखंडी जाड तवा घ्या.

मीक्सर व फुपो दोन्ही एकाच वेळी वापरता येतात का म्हणजे एक पदार्थ आपण मीक्सर मध्ये टाकला आणी एक फुपो मध्ये.>. तसे शक्यतो करू नये. दोन्ही एकदम चालू होतात पण आपल्याला तेवढे कंट्रोल करता येत नाही. एका मागोमाग एक करावे. हात कापण्याची शक्यता असते. झाकण उडू शकते. स्विच ऑफ करेपरेन्त
धावाधाव होईल. दोन्ही एकत्र वापरून जो वेळ वाचेल त्यापेक्षा जास्त त्रास होण्याची शक्यता आहे. डेमो सीडी व बरो बर बुकलेट असेल त्यातील सूचना वाचून मगच मशीन वापरावे.

माझ्याकडे इनाल्साचा फुड प्रोसेसर आहे. ९ वर्षे चाललाय. छान आहे. यात (मिक्सर वापरायचा असला तरी )फुप्रोचे भांडे कायम लावून ठेवायला लागते. फुप्रो मध्ये भाज्या विशेषतः कांदे चिरणे, बटाटे, गाजरे किसणे, चकत्या करणे, (सुके) खोबरे किसणे ही सगळी कामे मस्त होतात. पीठ मळणे प्रत्येक वेळी मात्र नीट होत नाही. कधी कधी पाणी जास्त होऊन पीठ भांड्याला चिकटून बसते.(एकदा भांड्याला आधी तेल चोळून घेतले तेव्हा नीट झाले).

ग्रीनलाईनचा फुप्रो चांगला आहे. माझ्याकडे होता पुर्वी. फक्त त्याचे ब्लेडस् वगैरे मोठ्ठे आहेत. फार जागा व्यापतात. Sad

मामींना अनुमोदन. Happy

दोन्ही एका वेळेला चालवता कसे येईल पण? Uhoh उदा. चटणी करणे आणि कणिक मळणे एकाचवेळी? एकीकडे लक्ष देताना दुसरं काम थांबवावं लागेलच ना एखादं मिनिट तरी? मग कशाला इतकं मल्टीटास्किंग? मामींना अनुमोदन.

मीक्सर व फुपो दोन्ही एकाच वेळी वापरता येतात का
>>
'इनालसा' फुफो मध्ये जोवर मिक्सर लॉक करत नाही तोवर फुफो चालत नाही. वर सर्वांनी म्हटल्यानुसार शक्यतो दोन्ही एकाच वेळी वापरु नयेत.

LPG कनेक्शनसाठी ते लोक शेगडी घ्यायला जबरदस्ती करतातच.

@ आशु डी, मामी, पौर्णिमा, भरत, प्राची, अमि, योडी आभार Happy ..... शेगडी कॅन्सल करावी लागेल वाटतय Sad

समु, आधी एजंसीमध्ये बोलून तर पहा. त्यांना सांग की माझ्याकडे शेगडी आहे (बुक केलीय असं सांगू नकोस)

>> अमि लींक छान आहे <<

हम्म... अशा पद्धतीने मुंबईत कुणी हायजिनीक प्रकारे पोळ्या बनवायचा उद्योग सुरू केल्यास खुप प्रतिसाद मिळेल.

maza maharaja cha food pro mast chaallaay...

shegdi mi pan gas waalyaakadunach ghetli... (ek tar dokyavar basla hota... ani market rate peksha baraach swast det hotaa...)

javalach bari laundry milaalyamule maza washin m/c cha plan cancl zaala... Wink
anyatha samsung cha 6.2kg plastic drum almost fix zaala hota...

अ‍ॅंकी, प्लॅस्टिक ड्रम घेण्याचे काही विशेष कारण? मी डायमंड शेप्ड मेटल ड्रम सॅमसंग ६.२ वाले घेतलेय. फायबर ड्रमपेक्षा हे सुधारित आहे, धुणे, टिकण्याच्या क्वालिटीतही.

plastic drum waalya machine la caster wheels hoti, ani tyacha self weight thoda kami hota...
majhya rented gharaat machine operate kartana bathroom cha tondaapashi ani ervi bedroom cha daaraamage asa karaayla laagnaar hota... mhanun plastic drum...

pan ata machine cha plan ch baad... Lol

चाकूला धार लावायचा दगड मुंबईत / पुण्यात कुठे मिळेल ? असे दगड घेताना किंवा घेतल्यावर धार लावताना साठी काही टिप्स आहेत का ?

लॉण्ड्री म्हणजे.. परदेशात असतात तशी कॉइनवाली लॉण्ड्री मशिन्स? लॉण्डरमॉटस? हे भारतात आलंय? ड्रायरसकट? सहीच...

Pages