Submitted by हसरी on 3 February, 2010 - 23:00
उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?
माधवा.. हजेरी बद्द्ल धन्यवाद!
माधवा.. हजेरी बद्द्ल धन्यवाद!
>>>त्यांना कांदा नैवेद्यात प्रिय आहे. म्हणून घरी गणपती असूनही मी नि:शंकपणे ऋषीपंचमीला झुणका भाकरी बरोबर कांदा ठेवतो नैवेद्याला.
झुणका..भाकर आणि कांदा नैवद्यात मागणार.. हा अवलिया.. अवधूत प्.पू. श्रीगजानन महाराजांना टाकून दिलेल्या पत्रावळीवरील उष्टे.. खरकटे ही.. अन्न म्हणूनही चालत होते... हेही आपण लक्षात घेतले पाहीजे.
>>>पण असे जरी असले तरी श्री वासुदेवानंद सरस्वती येण्याच्या आधी गजानन महाराजांनी मठ आरशासारखा स्वच्छ करायला आणि सोवळ्याचे पालन करायला आपल्या भक्तांना सांगितले होते. कारण श्री वासुदेवानंद सरस्वती हे पण ब्रह्मपदी पोहचले होते (आपल्या भाषेत सोवळ्याओवळ्याच्या मार्गाने)!
या 'सोवळ्याओवळ्याच्या' मार्गाला श्रीगजानन महाराज काय म्हणत तेही कृपया सांगावे. तसेच भेटीत काय बोलणे झाले हेही सांगावे... तसेच श्रीगजानन विजयाच्या सहाव्या अध्यायात श्रीमहाराज स्वतः कोणता मार्ग अनुसरत आणि श्री नरसिंगजी कोणता?... त्याच्याही संबंधीत श्रीगजानन विजयातील भाग.. आहे तसा येथे लिहावा ही विनंती.
धन्यवाद!
सावट, लिहायचा प्रयत्न करते.
सावट, लिहायचा प्रयत्न करते. चुकल्यास सांभाळून घ्या, चूक दाखवा.
सरसावून? नाही, नाही. मी शिकायला आले आहे. त्यात सरसावायला परवानगी नाही. 
आश्विनी
मला वाटते, अंतःकरण म्हणजे जिवाचे मन आणि बुद्धी ह्यांना जोडणारा सेतू. अथव सत् आणि असत् ह्यांच्यामधील फरक ओळखता येण्याचे आणि ते जिवाला जाणवून देण्याचे साधन. जणू काही आपल्या आत असलेला परमात्म्याचा अंश. तो निरपेक्ष आहे, निष्काम आहे. त्याला काहीही अपेक्षा नाही, कसलेही vested interests नाहीत. एखादी गोष्ट जर जिवाने अयोग्य केली असेल, तर बाकी कोणाला कळले नाही, तरीही अंतःकरणाला ते ठाऊक असते. माझी आज्जी म्हणे, कधी कधी जे बुद्धीला पटेल ते मनाला पटेलच असे नाही. अशा वेळी काय करावे? अंतःकरणाचा कौल घ्यावा. जगात कोणालाही फसवता येऊ शकते, पण स्वतःच्या अंतःकरणाला नाही. हे अंतःकरण प्रत्येक जीवापाशी असते.
जीव आणि आत्मा ही एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणता येतील का? जसे शरीर म्हणजे जिवाचे आवरण, तसे जीव म्हणजे कदाचित आत्म्याचे आवरण म्हणू? चराचरात जे चैतन्य भरुन राहिले आहे, जी शक्ती कार्यरत आहे, जी जाणवते पण दिसत नाही (परमात्मा), तिचाच थोडाफार अंश जो आत्मा, हा जिवाच्या वासना/ इच्छा/ कर्मे वगैरे नियंत्रित करत असावा. सत् आणि असत् ह्यांचा झगडा कदाचित इथे जाणवत असावा.
वेडेबागडे लिहिले आहे..
सावट, उष्टे.. खरकटे ही.. अन्न
सावट,
उष्टे.. खरकटे ही.. अन्न म्हणूनही चालत होते >> ते मला(?) ही जमावे म्हणूनच तर धडपड चालू आहे. आणि तसेही कांदा मी फक्त ऋषीपंचमीलाच खाऊ धजावतो. गणपतीचे इतर दिवस नाही. या 'सोवळ्याओवळ्याच्या' मार्गाला श्रीगजानन महाराज काय म्हणत >> कर्ममार्ग! (मी धरीला भक्तीपंथ | कर्ममार्गी वासुदेव रत |)
देशपांडे महेश... नवीन ghn नाव
देशपांडे महेश... नवीन ghn नाव घेतलेले...आपण 'हे' वाचत असल्यास कृपया हात वर करावा...!:)
आपली गरज आहे.
( एक 'महेश' परत हरवले... आता हे 'नवीन' नावाचे पण 'जूनेच' महेश सापडतात का पाहू या!)
धन्यवाद!
मास्तुरे, धरपकड चालू आहे का?
मास्तुरे, धरपकड चालू आहे का? सगळ्या पोरांना धरुन पकडून आणा आणि समोर परवचा म्हणायला बसवा
:आदरयुक्त दिवा देणारी बाहुली (अशी बाहुली माबोवर पहिलीच असेल):
सर्वभक्त जन, गुरुचरित्राबाबत
सर्वभक्त जन,
गुरुचरित्राबाबत अद्याप हे स्त्रीयांनी वाचु नये असे कोणा अधिकारी पुरुषाने सांगितले आहे का ते तपासणे गरजेचे आहे.
काही वेळा काही रुढी असतात. त्यामागे शात्र असतच अस नाही. म्हणुन हा तपास घ्यावा.
मायबोलीवर जर कोणी गुरुचरित्र नित्य उपासक असल्यास उलगडा करावा.
परंतु जर कोणा सिध्द /अधिकारी व्यक्तीने असे खात्रीने सांगितले असल्यास त्याचे पालन करावे. वर उल्लेख आल्यप्रमाणे शरीरभेद जसे दृष्य आहेत तसेच सुक्ष्म सुध्दा आहेत. त्या काळात या सुक्ष्म भेदाचे शात्रीय विवेचन करण अशक्य होते म्हणुन सिध्द्/अधिकारी यांचे म्हणणे प्रमाण मानावे.
केवळ गुरुचरित्र हे एकमेव मोक्ष प्राप्तीचे साधन आहे असे नाही. अन्य साधने तपस्वी, गुरुजनांच्या कृपेने उपलब्ध आहेत.
उदाहरणादाखल एक माहिती देत आहे.
एका व्यक्तीला उष्ण्तेचा त्रास होत होता. वैद्यांनी नाडी पाहुन नाडी दोष नसल्याचे जाणले परंतु हाता - पायवरची कातडी जळण्याचे कारण समजेना म्हणुन वैद्यांनी त्या व्यक्तीस दिनचर्या विचारली. सदर व्यक्ती रोज एक तासापेक्षा जास्त काळ श्रीगायत्री पुरश्चरण करत असे. यामुळे उष्णता निर्माण होत होती. वैद्यांनी त्यांना पाण्यात उभे राहुन किंवा ओलेत्याने पुरश्चरणाचा सल्ला दिला व त्रास थांबला.
ही व्यक्ती पुरुष होती. हट्टाने एखादी स्त्री जर असे पुरश्चरण करु पाहिल तर ती गर्भवती होण्यास अडथळे येतील. हे शारिरीक भेद आहेत.
माझ्या मित्राचे वडील आजही श्रीगायत्रीचे पुरश्चरण भर थंडीत गार पाण्याने स्नान करुन करतात. थंडीतही बर्फाचे पाणी पितात. तदवत स्त्रीयांच्या शरीरावर गुरुचरित्र पठणाने काही वेगळे परिणाम होत असल्यास त्यांचे संशोधन होणे गरजेचे आहे.
माधव, >>>उष्टे.. खरकटे ही..
माधव,
>>>उष्टे.. खरकटे ही.. अन्न म्हणूनही चालत होते >> ते मला(?) ही जमावे म्हणूनच तर धडपड चालू आहे. आणि तसेही कांदा मी फक्त ऋषीपंचमीलाच खाऊ धजावतो.
या विषयी थोडे अजून पाहूयात...
म्हणजे सुरुवातीला कांदा खायचा नाही... मग त्यामूळे 'आत्मज्ञान' होते...मग कांदा खायला परवानगी मिळते.. असे आहे काय?:) किंवा प.पू. श्री महाराज कांदा खात होते ..म्हणून ते 'आत्मज्ञानी' आहेत असे असेल तर सगळ्या कांदा खाणार्यांना मोक्ष आपोआप मिळेल नाही काय? किंवा जे कांदा खात नाहीत यानेच 'मोक्ष' मिळत असेल तर त्यानाही इतर साधनाची माथेफोड करायचे कारण नाही.. नाही काय?
तसेच खरकटे.. अन्न खाणे.. हे जर 'अवधूत' असण्याचे लक्षण मानले... तर एखादा वेडा ही तसेच करत असेल..तर त्यालाही 'ब्रह्मज्ञानी' म्हंटले पाहीजे नाही काय?:)
आपल्यास काय वाटते?
धन्यवाद!
शैलजा, कालच्या 'लिस्ट' मध्ये
शैलजा,
कालच्या 'लिस्ट' मध्ये अजून वाढ झाली आहे...
कर्म..शरीर्..जीव..आत्मा आणि परमात्मा ... अंतःकरण,मन, बुद्धी... हळू...हळू लिस्ट योग्य आकार धारण करत आहे...!:)
धन्यवाद!
शैलजा... >>>शरीर वेगळे
शैलजा...
>>>शरीर वेगळे असल्यामूळे 'साधन' ही त्या शरीराला अनुसरूनच पाहीजे
>>>हेही मान्य. माझे म्हणणे हे, की ज्याला त्याला हे ठरविण्याचे स्वातंत्र्य हवे, कोणी तिसरे सांगते की गुरुचरित्र स्रियांनी वाचू नये, म्हणून ते वाचायचे नाही, ह्याला काय अर्थ?एखदे साधन आपल्याला झेपणारे नसले की त्याची आतून नक्की जाणीव होते. किंवा जर खरोखर तुम्ही भगवंताच्या हातात स्वतःला सोपवले असेल, तर तुमच्या साठीची योग्य साधना/ उपासना तुम्हांला मिळते, त्याचे लक्ष असते
म्हणजे आपल्याला असे म्हणायचे आहे काय... की.. 'साधना' कोणती करायची... निवडायची हे ज्याचे त्याला कळते.. तिसर्या कोणाची लूडबूड.. साधक आणि श्रीभगवंत यांच्या मध्ये जरूरी नाही.
श्रीभगवंताच्या हातात स्वतःला सोपवायचे की झाले..मग योग्य साधना मिळते..आणि मग पुढे काय? 
धन्यवाद!
नाही सावट, माझे असे म्हणणे
नाही सावट, माझे असे म्हणणे अजिबात नाही. हा माझ्या म्हणण्याचा विपर्यास झाला
थोड्या वेळाने अजून उलगडून लिहायचा प्रयत्न करते.
शैलजा.. >>>तसेच फक्त 'कन्नड'
शैलजा..
>>>तसेच फक्त 'कन्नड' जाणाणार्या एखाद्या कानडी माणसालाही हे मराठीत असणारे श्रीगुरुचरित्र वाचता येणार नाही...
आपले 'साध्य' श्रीमहासिद्ध श्रीगुरुचरित्र वाचणे.. किंवा श्रीवेद वाचणे हे नाही आहे.. तर 'मोक्ष' मिळवणे हे आहे. मग त्याकरिता लागणारे 'साधन' जसे कन्नड माणसाला ...कानडीतच लागेल.. तसेच मराठी जाणानारे शरीर असले तरिही.. शरीर वेगळे असल्यामूळे 'साधन' ही त्या शरीराला अनुसरूनच पाहीजे.... नाही काय?
यावर आपण लिहलेत...
कानडी येत नसेल, पण खूप तळमळ असेल, तर कानडी शिकायची प्रवृत्ती होईल ना?
हेही आपले म्हणणे कृपया स्पष्ट करा...!
शैलजा हे सगळे विचारण्याचे कारण... आपल्याच विचारांची आपल्यालाच स्पष्टता असते का? हे जाणणे आहे!:) हे जर कळले.. तर मग योग्य विचार कोणता हे पहाणे सोपे जाते... किंवा ते समजावणे शक्य होते. उदाहरण घ्यायचे झाल्यास... तुमच्या लिहण्यातून जाणवलेली गोष्ट म्हणजे.. तुमची श्रीभगवंतावर श्रद्धा आहे.. तुम्ही.. 'आत्मा-परमात्मा' मानता. तुम्हाला हे ही माहीत आहे की श्रीभगवंत conditional असूच शकत नाहीत्..पण आ़जूबाजूला पाहील की तसे जाणवत नाही.. गरीब-श्रीमंत.. स्त्री-पुरुष... अडानी-शिकलेले, धडधाकट्-अपंग.. असे सगळे भेदच दिसतात... एवढेच नाही तर एक माणूस दुसर्या पेक्षा दिसायलाही वेगळा असतो..मग हे असे का होत असेल? याचे कारण समजावून घेणे.. हाच उद्देश आहे.
धन्यवाद!
सावट, तुमच्याइतके चपखल
सावट, तुमच्याइतके चपखल शब्दांत मला लिहिता यायचे नाही, तरीही प्रयत्न करते.
>>तिसर्या कोणाची लूडबूड.. साधक आणि श्रीभगवंत यांच्या मध्ये जरूरी नाही
अजिबात नाही. सद्गुरुंची कृपा तर हवीच. त्याशिवाय काय आहे?
गुरु, गोविंद दोऊ खडे, का के लागू पाय? तर बलिहारी गुरु... हे आधी. नंतर गोविंद वगैरे.
जेथे देव पाठमोरा
तेथे सद्गुरु धावतो...
तेह्वा तुम्हांला जर असे वाटले असेल, की, मला सद्गुरुंचा हात डोक्यावर असण्याचे महत्त्व ठाऊक नाही, तर तसे नाही.
माझ्या म्हणण्याचा हा मतितार्थ नक्कीच नाही, पण देवाच्या भक्तीचे भांडवल करुन मधे जे एजंट बनतात, त्यांच्याबद्दल मात्र निश्चित आक्षेप आहे, आणि आजकाल असे एजंट भरपूर आहेत. तर त्याकडे माझा रोख होता. लिखाणातून काही दुसरे प्रतीत होत असेल, तर तो माझ्या लि़खाणाचा दोष आहे, हे खुशाल समजावे 
सद्गुरुही तुमच्या अंतःकरणातला भाव पाहूनच तुमची उपासना ठरवतील ना? की तुमचा जन्म/ शरीर कोणते मिळाले आहे ते पाहून? अद्ध्यात्मातील अधिकार - गुरुचा वा शिष्याचा - हा व्यावहारिक जन्म, वय ह्यावर नक्कीच अवलंबून नसेल, असे मला वाटते. नपेक्षा मुक्ताबाईने चांगदेवांना उपदेश दिला नसता, शबरीसाठी श्रीरामाने वाट वाकडी केली नसती. जनाबाईला श्रीखंड्याने मदत केली नसती आणि मीरेला भगवंताने तारले नसते.
पण आ़जूबाजूला पाहील की तसे जाणवत नाही.. गरीब-श्रीमंत.. स्त्री-पुरुष... अडानी-शिकलेले, धडधाकट्-अपंग.. असे सगळे भेदच दिसतात... एवढेच नाही तर एक माणूस दुसर्या पेक्षा दिसायलाही वेगळा असतो..मग हे असे का होत असेल?
प्रारब्ध. पूर्वकर्म. त्यामध्ये गुंतून राहणे, इच्छा, वासनांचा लय न होणे आणि जे काही घडत असते, ते, मी हे केलेले आहे असा स्वतःविषयी कर्तेपणाचा भाव बाळगणे.
माधव, >>>त्यामुळे या मायेच्या
माधव,
>>>त्यामुळे या मायेच्या जगातला प्रत्येक कण हा नाव आणि रुप घेउनच अवतरतो. आणि या नाव आणि रुपामुळेच प्रत्येक कण हा दुसर्या कणापेक्षा वेगळा ठरतो.
एखाद्या मूलद्रव्याचा 'अणू' घेतल्यास... त्यातील धन, ॠण आणि उदासिन असणारे घटक घेतल्यास.. हा अणू त्याच मूलद्रव्याच्या अजून एखाद्या 'अणू' पेक्षा वेगळा असतो काय? अणूभारांक..अण्वांक यात फरक पडतो काय?:)
धन्यवाद!
धन्यवाद.. शैलजा! >>>>पण
धन्यवाद.. शैलजा!
>>>>पण आ़जूबाजूला पाहील की तसे जाणवत नाही.. गरीब-श्रीमंत.. स्त्री-पुरुष... अडानी-शिकलेले, धडधाकट्-अपंग.. असे सगळे भेदच दिसतात... एवढेच नाही तर एक माणूस दुसर्या पेक्षा दिसायलाही वेगळा असतो..मग हे असे का होत असेल?
याविषयी आपण लिहलेत की...
>>>प्रारब्ध. पूर्वकर्म. त्यामध्ये गुंतून राहणे, इच्छा, वासनांचा लय न होणे आणि जे काही घडत असते, ते, मी हे केलेले आहे असा स्वतःविषयी कर्तेपणाचा भाव बाळगणे.
म्हणजेच वासनांचा लय न झाल्यामूळे असा भेद निर्माण होतो...जर वासनांचा लय झाला तर सगळे सर्व प्रकारे एकसारखेच होतील... असेच आपल्याला म्हणायचे आहे काय?:)
धन्यवाद!
>जर वासनांचा लय झाला तर सगळे
>जर वासनांचा लय झाला तर सगळे सर्व प्रकारे एकसारखेच होतील... असेच आपल्याला म्हणायचे आहे काय? >> वासना, इच्छा सारेच नष्ट झाले तर भेद उरला कोठे? मुळात सर्व एकच आहेत, पण अज्ञानामुळेच तर भेद उत्पन्न होतो. माझे - तुझे हे वाद होतात. परमात्मा तरी वेगळा कोठे? तो आपल्यातच आहे ना?
मोको कहां ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में,
न मैं मंदिर न मैं मस्जिद, न काबे कैलाश में।
पण हेच तर समजत नाही. ते समजावे, म्हणून तर ही धडपड.
असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योमां अमृतम् गमय|
या प्रार्थना तरी वेगळं काय काय सांगतात?
पण आता माझे बोलणे पुरे.
शैलजा, >जर वासनांचा लय झाला
शैलजा,
>जर वासनांचा लय झाला तर सगळे सर्व प्रकारे एकसारखेच होतील... असेच आपल्याला म्हणायचे आहे काय? >> वासना, इच्छा सारेच नष्ट झाले तर भेद उरला कोठे? मुळात सर्व एकच आहेत, पण अज्ञानामुळेच तर भेद उत्पन्न होतो. माझे - तुझे हे वाद होतात. परमात्मा तरी वेगळा कोठे? तो आपल्यातच आहे ना?
प्रश्न असा होता की हे 'भेद' कशामूळे असतात? तुम्ही उत्तर दिलेत की.. वासनांचा लय न झाल्यामूळे... आणि आपण असेही म्हणता की सगळ्या वासना नष्ट झाल्या तर भेद उरत नाही... सगळे एकच आहे.
मग हे लक्षात घ्या की.. आपल्याच म्हणण्यानुसार.. याच वासना स्त्री-पुरुष असा शारीरिक भेद करतात... मग वासनाच वेगळ्या असतील आणि त्यामूळेच हा शरीर भेद असेल.. तर या वेगळ्या वासनेसाठी.. वेगळे साधन सांगितले तर चालेल की नाही चालणार?
'वासने' मूळे 'शरीर' बदलत असेल, तर 'साधन' का नाही?
धन्यवाद!
>>वासनाच वेगळ्या असतील आणि
>>वासनाच वेगळ्या असतील आणि त्यामूळेच हा शरीर भेद असेल.. तर या वेगळ्या वासनेसाठी.. वेगळे साधन सांगितले तर चालेल की नाही चालणार?
तर उत्तर आहे नाही आणि होय, दोन्ही.
>'वासने' मूळे 'शरीर' बदलत असेल, तर 'साधना' का नाही? >
अजून मला काय हवे?
उत्तर होय का तर अशासाठी - जन्म घेतलेल्या प्रत्येक जिवाच्या वकुबानुसार ( irrespective of शरीर) साधना जरुर बदलेल. त्याबाबत मी विरोध केलेला नाहीये.
उत्तर नाही अशासाठी - की "केवळ" स्री "शरीर" आहे म्हणून काही विशिष्ट साधना/ उपासना करायला परवानगी नाही, हे चूक. आणि माझे हे ठाम मत आहे, ते बदलणार नाही
माझ्या आधीच्या सर्व पोस्ट्स मधून मी हेच म्हटलेले आहे आणि तुम्हीही ते वरच्या १-२ पोस्टींमधून मान्य केलेले आहे.
आधीपासून मी हे आणि इतकेच म्हणत आहे. आजवर मी श्रीगुरुकृपेने गुरुचरित्र वाचले आहे, त्याचे अनुभव घेतले आहेत आणि सुखात आहे. माऊली कधी तरी आपल्या बालकाचे, त्याने चुका केल्या तरीही, वाईट होऊ देईल काय?
भगवंत सहज आहे, नितळ आहे, अंतर्बाह्य आहे. त्याच्यापाशी भेद नाही, कमी, जास्त नाही, उच्च नीच नाही... भेद आपण निर्माण केले, तेह्वा ह्या सार्या मान्यता समाजमनाच्या. भगवंतांच्या नव्हेत, असे मला वाटते. तो तर विरोधी भक्तीचेही साजिरे फळ देणारा असीम कृपासिंधू आहे. तेह्वा त्याचयकडे जायचा कोणताही रस्ता स्वीकारला तरीही त्यावर आपल्याला धडपडताना, तो सावरायला नेहमीच सज्ज आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती...
असो. माझ्या शंकांचे उत्तर द्यायचा प्रयत्न केल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
इथेच थांबते. माझ्या मनातील विचारांचा खुंटा हलवून बळकट करण्यासाठी मदत केल्याबद्दल अनेक आभार.
म्हणजे सुरुवातीला कांदा खायचा
म्हणजे सुरुवातीला कांदा खायचा नाही... मग त्यामूळे 'आत्मज्ञान' होते...मग कांदा खायला परवानगी मिळते.. असे आहे काय? >> सावट
अन्न हे पूर्णब्रह्म आहे. त्यात चांगले वाईट असा भेद नाही. हे झाले अंतिम सत्य. पण मायेच्या जगात प्रत्येक अन्न पदार्थ आपल्या शरीर्/मन्/बुध्दीवर विशिष्ठ असा परिणाम करतो. आणि त्या परिमाणांनुसार त्यांचे सात्विक, राजसी आणि तामसी असे वर्गीकरण केले आहे. साधनेत सात्विक पदार्थांवर भर दिला जातो, ज्यात कांदा येत नाही. (पण याचा अर्थ असा नाही की कांदा वाईट आहे.) म्हणून सामान्यतः तो वर्ज मानला जातो. पण 'सरड्याची धाव कुंपणापर्यंत' या उक्तीप्रमाणे गुणांची मात्रा या मायेच्या जगातच चालते. जो मायेच्या पलीकडे पोहचला त्याच्यावर कसा होणार या गुणांचा परिणाम? आणि अशा मायेच्या पलीकडे असलेल्या गुरुंना त्यांना आवडणारा (हे पण एक कौतुकच. कारण त्यांना आवड / नावड काहीच नसते) कांद्याचा नैवेद्य मी दाखवतो आणि तो प्रसाद म्हणून खातो तेंव्हा त्याचा माझ्या साधनेवर काही विपरीत परिणाम होत नाही. उलट प्रसादाचा मिळणारा फायदाच मिळतो.
सगळ्या कांदा खाणार्यांना मोक्ष आपोआप मिळेल नाही काय? >> हो नक्की मिळेल पण जेंव्हा गुरु सांगतील तेंव्हाच :). 'श्रीमन्नारायण' असा नुसता जप करून मला मुक्ती मिळणार नाही ('मग कशाने मिळेल?' असा पुढचा प्रश्ण विचारणार असाल तर त्याचे उत्तर अजूनपर्यंतच्या माझ्या अभ्यासक्रमात आलेले नाही
) पण जेंव्हा महाराजांच्या सांगण्यावरून दुसर्या एका माधवाने त्याचा जप केला तेंव्हा त्यांना मुक्ती मिळाली.
तसेच खरकटे.. अन्न खाणे.. हे जर 'अवधूत' असण्याचे लक्षण मानले... तर एखादा वेडा ही तसेच करत असेल..तर त्यालाही 'ब्रह्मज्ञानी' म्हंटले पाहीजे नाही काय? >> महाराजांनाही अनेक जण वेडाच समजायचे की. तेंव्हा एखाद्याला वेडा म्हणायचे धाडस कसे काय करावे?
शैलजा, >>>>'वासने' मूळे
शैलजा,
>>>>'वासने' मूळे 'शरीर' बदलत असेल, तर 'साधना' का नाही? >
उत्तर होय का तर अशासाठी - जन्म घेतलेल्या प्रत्येक जिवाच्या वकुबानुसार ( irrespective of शरीर) साधना जरुर बदलेल. त्याबाबत मी विरोध केलेला नाहीये.
उत्तर नाही अशासाठी - की "केवळ" स्री "शरीर" आहे म्हणून काही विशिष्ट साधना/ उपासना करायला परवानगी नाही, हे चूक. आणि माझे हे ठाम मत आहे, ते बदलणार नाही
माझ्या आधीच्या सर्व पोस्ट्स मधून मी हेच म्हटलेले आहे आणि तुम्हीही ते वरच्या १-२ पोस्टींमधून मान्य केलेले आहे. अजून मला काय हवे?
मान्यच आहे... आणि तेच 'सत्य' आहे...! वर प.पू. श्री सिद्धारूढ स्वामींचे उदाहरण आले आहे. त्यात अंतःकरण अशुद्ध असल्यामूळे 'ब्रह्मोपदेश' करता येणार नाही.. असे सांगितले आहे... पण म्हणून ते शरीर 'मोक्षा' साठी पात्र नाही असा कधीही अर्थ काढता येत नाही.. श्री स्वामीही तसे म्हणाले नाहीत.. तर त्यांनी अंतःकरण शुद्धी साठी म्हणजेच वासनेचा लय करण्यासाठी वेगळी साधना सांगितली..!
म्हणजेच जो पर्यंत अंतःकरण अशुद्ध असते.. त्यावेळी ते ज्या वासने मूळे अशुद्ध असते त्यानुसार साधन वेगवेगळे असते. आणि एकसारखेच 'स्त्री' शरीर मिळाले आहे म्हणजे काही एकसारख्या वासनांचा समुदाय असणारच हे निश्चित आहे.. नाहीतर तसे शरीरच मिळालेच नसते... 'जन्म घेणे लागे वासनेच्या संगे', असे श्रीसंत वचन आहे.
तसेच 'पुरुष' शरीर आहे म्हणजे पुरुषांच्या काही वासना एकसारख्या असणारच. या वेगळ्या वासनांचा वेगळा समुदाय शरीरानुसार लक्षात घेऊन जर श्रीसद्गुरुकडून वेगवेगळा उपदेश केला गेला तर ते योग्यच असेल.. शास्त्राला धरूनच असेल. एवढेच नाही तर पुरुषशरीराला सुद्धा अधिकारानुसार म्हणजेच अंतःकरण शुद्धी नुसार.. म्हणजेच वासनेनुसार वेगवेगळी साधना सांगितली जाते.
हा... या वासंनाचा लय होतो तेव्हा... होणारा 'ब्रह्मोपदेश' एकच असतो.. तो वेगवेगळा नसतो.
>>>आजवर मी श्रीगुरुकृपेने गुरुचरित्र वाचले आहे, त्याचे अनुभव घेतले आहेत आणि सुखात आहे. माऊली कधी तरी आपल्या बालकाचे, त्याने चुका केल्या तरीही, वाईट होऊ देईल काय?
श्रीगुरुकृपेने.. श्रीगुरुंनी सांगितल्यास श्रीगुरुचरित्र अवश्य वाचावे.. त्यात आपली बुद्धी चालवू नये. कारण वरील श्रीस्वांमींच्या उदाहरणाप्रमाणे श्रीगुरुंना अंतःकरणाची शुद्धता.. म्हणजेच वासना जाणता येतात.
धन्यवाद!
माधव, >>>'श्रीमन्नारायण' असा
माधव,
>>>'श्रीमन्नारायण' असा नुसता जप करून मला मुक्ती मिळणार नाही..
अहो असे काय म्हणताय्...या जपाने तर हजारो पावन झाले... या साधनाला 'अधिकार' पहावा लागत नाही... या जपाचा सर्वांना सारखाच अधिकार आहे.. अगदि ब्रह्मज्ञान झाले तरीही .. हा जप लागतोच.:)
धन्यवाद!
आपण आधी सांगितल्याप्रमाणे
आपण आधी सांगितल्याप्रमाणे मुक्तीकरता साध्य आणि साधन दोन्ही गरजेचे असते. जर मला साध्यच माहिती नसेल तर कोणताही जप किंवा दुसरे कोणतेही साधन करून काय फायदा होइल?
नामाच्या शक्तीबद्दल मला काहीच शंका नाहिये.
माधव, 'नामाची' शक्ती ती
माधव,
'नामाची' शक्ती ती हीच...साधन करता करता 'साधक आणि साधन' हा भेद जावुन दोन्ही 'साध्य'रुप होते.
म्हणूनच... साधनेच्या दोन पद्धती आहेत... 'रुपाची' साधना.. यातून मग 'नाम' प्रकटते... आणि 'नामाची' साधना .. यातून 'रुप' प्रकटते... मग नाम, नाम घेणारा ... नामी हा भेद नष्ट होतो.
धन्यवाद!
नाम हे साधन. नामी हे साध्य.
नाम हे साधन. नामी हे साध्य. इथे नाम हे नामीपेक्षाही महत्वाचे कारण नामाचे वाहन करुनच नामीची कृपा आपल्यापर्यंत येते.
१) अंतःकरण शुद्ध
१) अंतःकरण शुद्ध करण्यासाठी,वासना,मोह ह्यातुन सुटण्यासाठी कोणती साधना करतात?
२) प्रत्येकाला जन्म त्याच्या पुर्व कर्मानुसार मिळत आहे मग प्राण्याच्या जन्माला आलेल्या प्राण्याला कोणते वाइट कर्म करत नसेल ना? म्हणजे कोणत्याही प्राण्याचे काम खायचे आणि फिरायचे असते मग त्या जन्मात त्याचे वाईट कर्म होत नसेल ना? आता वाश्,सिंह हे निसर्गताच मांसहारी प्राणी आहेत. मग त्यांनी पोटासाठी शिकार केली तर ते वाईट कर्म होइल का?
१) अंतःकरण शुद्ध
१) अंतःकरण शुद्ध करण्यासाठी,वासना,मोह ह्यातुन सुटण्यासाठी कोणती साधना करतात?
- मला वाटतं अशी कुठली पर्टिक्युलर साधना नसते. कुठलीही भगवंताची उपासना आपोआप अंतःकरण शुद्ध करत जाते. आपण परत परत ते अशुद्ध करत रहातो पण शुद्धतेचं पारडं हळू हळू जड होत जातं.
२) प्रत्येकाला जन्म त्याच्या पुर्व कर्मानुसार मिळत आहे मग प्राण्याच्या जन्माला आलेल्या प्राण्याला कोणते वाइट कर्म करत नसेल ना? म्हणजे कोणत्याही प्राण्याचे काम खायचे आणि फिरायचे असते मग त्या जन्मात त्याचे वाईट कर्म होत नसेल ना? आता वाश्,सिंह हे निसर्गताच मांसहारी प्राणी आहेत. मग त्यांनी पोटासाठी शिकार केली तर ते वाईट कर्म होइल का?
- प्राणी योनी ही भोग योनी आहे. ते जसे वाईट कर्म करत नाहीत तसं चांगलंही करत नाहीत. त्यांना कर्मस्वातंत्र्य नसते. जे काही असते तो त्यांचा नैसर्गिक स्वभाव असतो. त्यांना त्यांच्या वागण्याचं ना पाप लागतं ना पुण्य. एका प्राणी योनीतून दुसर्या प्राणी योनीत, असे जन्म घेत घेत उत्क्रांत होत होत एका स्टेजला मनुष्य जन्म घेण्या इतपत तो जीव शुद्ध झाल्यावर नरदेह देवून त्याला सत्कर्म करण्याची संधी देण्यात येते. हा नरजन्म त्या जीवाने फुकट न घालवता सत्कृत्य करुन आपले उरलेले प्रारब्ध फेडून उच्च योनीत किंवा परत मनुष्य जन्म घेण्याइतपत शुद्धता राखणे अपेक्षित असते. आहार विहार आचार विचार यांच्या सहाय्याने जो या जन्माचं सोनं करतो तो मोक्षही मिळवतो. अथवा, कर्मस्वातंत्र्याचा दुरुपयोग करुन परत प्राणी योनीत कर्मा प्रमाणे जन्म घेतो. पुन्हा येरझार्या सुरु...
हसरी, नमस्कार कशा आहात?
हसरी,
नमस्कार कशा आहात? बर्याच दिवसांनी आलात.
अगदि योग्य प्रश्न विचारला आहे... धन्यवाद! अंतःकरणाला लिंग नाही हे बरोबर आहे...पण त्यातील वासनाच स्थूलात आल्यावर शरीर धारण करतात. जसे अंतःकरण हे एक भांडे पकडले तर त्या भांड्याची शुद्धता ही त्याच्या आतील द्रव्यावर ठरते... आत जर श्रीगंगेचे पवित्र पाणी असेल तर ते भांडे आपोआप पवित्रच असेल... आणि जर त्याच्या आत दारू असेल ते भांडे सोन्याचे का असेना ... अपवित्रच. ( अश्विनी...
)
हे अजून एका उदाहरणाने पाहू म्हणजे लक्षात येईल....
जसे वडाच्या झाडाचे बीज आहे...अतिशय लहान.. अध्यात्मिक भाषेत अतिशय सुक्ष्म-अव्यक्त असते. पण ते 'बी' कशाचे आहे... हे ज्याला वडाचे झाड माहीत नाही, त्याला सांगता नाही येत.. किंवा अशा अनेक वेगवेगळ्या झाडाचे 'बी' एकत्र मिसळले तर... त्यातून झाड काय येणार आहे... हे 'अज्ञानी' माणसाला... झाडाने व्यक्त स्वरुप धारण केल्यावरच कळते... आपण या सगळ्यांना 'झाड' या एकाच नावाने जरी ओळखत असू तरिही.. या झाडात अनेक प्रकार आहेत हे आपण जाणतो.... याला कारण ते मूळ 'बीज' आहे... आपल्यास कोणी विचारले की 'बी' मधे अगोदरच झाड दाखवा तर ते शक्य होत नाही.
तसेच माणूस म्हणून सर्व एकच असले तरिही.. प्रकृतीच्या दृष्टीने(आपल्या दृष्टिने किंवा मताने.. किंवा वाटण्याने नाही.) झाडात आणि आपल्या शरीरात (स्थूल(झाड) आणि लिंग(बीज)) काहीच फरक नाही आहे. म्हणजेच आपण ही माणूस असलो तरीही.. आपले.. प्रकट स्वभाव-शरीर ठेवण... वेगवेगळे असतात... याला कारण अंतःकरणातील बीज रुपात असलेल्या वासना.
म्हणूनच ज्याला अंतःकरंणातील वासना.. बीज काय आहे ते कळते ...तोच पुढे जाऊन यातून कोणते झाड येणार आहे हे झाड येण्या अगोदरच..सांगू शकतो... हेच ते श्रीसद्गुरु.
यात अजून येक प्रश्न उद्भवतो तो म्हणजे... जर अंतःकरणात वासनाच नसतील... तर अर्थात झाडच नाहीसे व्हायला पाहीजे.. पण ब्रह्मज्ञानी पुरुष जर पाहीले तर त्यांना 'आत्मज्ञान' झालेले असतानाही.. ते अजूनही 'झाड' असतातच... असे का व्हावे?
धन्यवाद!
अश्विनी, मागचाच प्रश्न
अश्विनी,
मागचाच प्रश्न परत...
प.प. श्रीटेंब्येस्वामीमहाराजांनी प्रश्न केला, " स्नान-संध्या झाली आहे काय?"(नसेल तर तूला दर्शन घेता येणार नाही.)
म्हणजे दर्शनासाठी शरीराची बाह्यशुद्धी असणे महत्त्वाचे आहे.... तर
प.पू. श्रीसिद्धारूढस्वामी म्हणाले, " तू अशुद्धचित्त(अंतःकरण) आहेस.. म्हणून तू ब्रह्मोपदेशास पात्र नाहीस... म्हणून तू 'सोमवारपयोव्रत' करावे म्हणजे.. तू 'धन्य,' होशील."
म्हणजे अंतःशुद्धी नसल्यामूळे ज्ञानोपदेश करता येणार नाही... तर
प्.पू.श्रीमाउली म्हणतात,"म्हणौनि अंतरीं ज्ञान व्हावें| मग बाह्य लाभेल स्वभावें| वरी ज्ञान कर्में संभवे| ऐसें कें जोडे ? ||श्रीज्ञा.१३.४७३||."
अंतरी 'ज्ञान' असेल तर... त्या स्थितीत 'बाह्य' ही स्वभावत:च .. निसर्गतःच लाभेल.
या तिन्ही उपदेशांची संगती कशी लावायची?
माधव, कालच्या प्रश्नात अजून
माधव,
कालच्या प्रश्नात अजून एक प्रश्न वाढवूयात...
>>>माधव,
>>>त्यामुळे या मायेच्या जगातला प्रत्येक कण हा नाव आणि रुप घेउनच अवतरतो. आणि या नाव आणि रुपामुळेच प्रत्येक कण हा दुसर्या कणापेक्षा वेगळा ठरतो.
एखाद्या मूलद्रव्याचा 'अणू' घेतल्यास... त्यातील धन, ॠण आणि उदासिन असणारे घटक घेतल्यास.. हा अणू त्याच मूलद्रव्याच्या अजून एखाद्या 'अणू' पेक्षा वेगळा असतो काय? अणूभारांक..अण्वांक यात फरक पडतो काय?
'अणू' मध्ये जरी धन, ॠण आणि उदासिन घटक असले तरीही 'अणू' चा 'विद्यूतभार' काय असतो.?
धन्यवाद!
नमस्कार सावट मि मजेत आहे.
नमस्कार सावट

मि मजेत आहे. तुम्ही कसे आहात?
मि इथे रोज येते पण फक्त वाचन करते आणि प्रश्न विचारते? माझं ज्ञान इतकं नाही आहे कि मि इथे काही लिहु शकेल. पण तुमच्या मुळे त्यात भर पडते आहे. धन्यवाद.
हसरी, >>>मि इथे रोज येते पण
हसरी,
>>>मि इथे रोज येते पण फक्त वाचन करते आणि प्रश्न विचारते? माझं ज्ञान इतकं नाही आहे कि मि इथे काही लिहु शकेल. पण तुमच्या मुळे त्यात भर पडते आहे. धन्यवाद.
आपल्याला 'ज्ञान' आहे का नाही... हे आपण माधवाना विचारुयात....
आणि हो..अगोदर 'भाव' पाहिजे... मग 'ज्ञान' ही आपोआप होईल... आणि आपल्याकडे 'भाव' तर आहेच आहे.. त्यामूळे काळजी नसावी. 
माधव,
>>>आपण आधी सांगितल्याप्रमाणे मुक्तीकरता साध्य आणि साधन दोन्ही गरजेचे असते. जर मला साध्यच माहिती नसेल तर कोणताही जप किंवा दुसरे कोणतेही साधन करून काय फायदा होइल?
आता सांगा हसरींना... 'साध्य' काय आहे, हे माहित झाले आहे का नाही?
धन्यवाद!
Pages