जिंजर तोफू विथ व्हेजीटेबल्स

Submitted by अंजली on 11 January, 2011 - 23:37
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ गाजर
१ छोटी सिमला मिरची
१ पोर्टेबेलो मश्रूम
४ तोफूचे तुकडे (२ इंच लांब, १ इंच रुंद, १/४ इंच जाडीचे)
२ टे. स्पू. किंवा थोडे जास्तच लांब पातळ चिरलेले आल्याचे तुकडे (Ginger julienne)
१ टे. स्पू. सोया सॉस
१/२ टी. स्पू. मध किंवा साखर
मीठ
१ टे. स्पू. तेल

क्रमवार पाककृती: 

गाजराचे साल काढून लांब, पातळ तुकडे करा. सिमला मिरचीचे, मश्रूमचे लांब तुकडे करा.
सोया सॉस, मध (किंवा साखर), चिमूटभर मीठ घालून चांगले हलवून एकजीव करून घ्या.
त्यात तोफूचे तुकडे दोन्ही बाजूने बुडवून घेउन किंचीत तेलावर नॉनस्टीक पॅनमधे शॅलो फ्राय करून घ्या (थोडक्यात, कॅरमलाईज्ड करून घ्या). शॅलो फ्राय करताना तोफूतल्या पाण्यामुळे तेल उडायची शक्यता आहे त्यामुळे झाकण ठेवा. थोडे मऊसर असतानाच बाहेर काढा. बाजूला ठेवा.
त्याच पॅनमधे थोडे तेल घेउन आलं घाला. गाजर, सिमला मिरची, मश्रूम घालून भराभर हलवून टॉस करत मिक्स करा. सोया सॉस-मधाचे मिश्रण घाला. चव बघून मीठ घाला. तोफू घालून परत एकदा नीट मिक्स करा. गरम गरम सर्व्ह करा.

वाढणी/प्रमाण: 
२ लोकांसाठी
अधिक टिपा: 

मधामुळे किंचीत गोडसर चव येते. तशी आवडत नसल्यास मध/साखर घातले नाही तरी चालेल.

माहितीचा स्रोत: 
स्वप्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पनीर चिलीसारखी पाकृ आहे. सोया सॉस + मधाची आयडिया आवडली.
भ्रमा, पनीरपेक्षा तोफू जास्त हेल्दी आहे Happy तू पनीर वापरू शकतोस.
आता इथे मुंबईत रेडीमेड तोफू मिळू लागलाय.

अस्सं होय तोफू म्हणजे सोयाबीनच्या दुधाचे पनीर Happy
मला सोयाबीन, दूध आणि पनीर हे अज्जिबात आवडत नाही Happy पण फिनलंडला असताना तोफू आईस्क्रीम खाल्ली आणि जबरदस्त आवडली. Happy

आत्ता पाहते आहे ही कॄती. धन्यवाद अंजली Happy मस्तच लागेल असं वाटतंय. टोफू एक्स्ट्रॉ फर्म वापरायचं ना ?