१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.
२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)
३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383
४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385
बरं, कारळं म्हणजेच जवस का
बरं, कारळं म्हणजेच जवस का
सिंडरेला, पण एक प्रश्न
सिंडरेला, पण एक प्रश्न अनुत्तरीत आहेच! पर्यावरण सुरक्षित ठेवून उरलेल्या तेलाची योग्य विल्हेवाट कशी लावायची?
वा वा, असं इन्स्टंट अनुमान
वा वा, असं इन्स्टंट अनुमान बाकीच्या "रसवंती-गृह बाफ/गुर्हाळ/चर्हाट बाफ" वर निघालं तर उपयोग...:)
कारळं म्हणजेच जवस का >> मेधा,
कारळं म्हणजेच जवस का >>
मेधा, are you kidding?
वर तळणीच्या तेलाबद्दल बरिच
वर तळणीच्या तेलाबद्दल बरिच उपयुक्त माहिती मिळाली. मी आमच्या गावातल्या रिसायकल-सेंटर ला ईमेल करुन विचारले असता त्यांनी असे सांगितले - (ते ईमेल तसेच्यातसे इथे टाकत आहे),
You actually have several options to dispose of used fryer oils.
The first option would be to see if you can find a restaurant that will accept it. They will have it rendered into other products such as bio-diesel or cosmetics.
You can filter it and freeze it then just reuse. You can also filter it and just put it into an airtight container and store it in a dark place. With both of these reuse options you will have to make sure the oil has not gone rancid before you reuse it. Most manufacturers don't recommend storing it for more than 6 months.
If it's time to get rid of it and none of the above options will work you can throw it into your trash can but not as a liquid. You would need to mix it with sawdust or an oil absorbing material that can be purchased from any automotive store. I would never recommend using kitty litter as some of them pose a fire hazard when mixed with oil products.
The other option is to bring it to the next Household Hazardous Waste event.
मेधा, कारळं आणि जवस दोन्ही
मेधा,
कारळं आणि जवस दोन्ही वेगवेगळे आहेत. मीपण रूनीसारखंच विचारते: Are you kidding?
फ्लॅक्स सीड्स म्हणजेच कारळं
फ्लॅक्स सीड्स म्हणजेच कारळं ना ?
फ्लॅक्स सीड्स म्हणजेच जवस/
फ्लॅक्स सीड्स म्हणजेच जवस/ अळशी.
कारळं नाही
रचु, धन्यवाद. मी गमतीत
रचु, धन्यवाद. मी गमतीत विचारला होता प्रश्न. इथे येणार्या प्रश्नांमध्ये सर्वाधिक येणारा प्रश्न असेल हा
सध्या मी भाजी करताना
सध्या मी भाजी करताना नेहमीच्या फोडणीत बडिशेप घालते. बडिशेप घातली की गूळ/ साखर कमी किंवा नाही घातली तरी चालते. शिवाय बडिशेपेचा सुमधुर स्वाद काय मस्त लागतो, अहाहा! एकदा करुन बघाच!
अकु, आज संध्याकाळी भाजीत
अकु, आज संध्याकाळी भाजीत घालून बघते बडिशेप. लातूरला शेजारच्या काकू पुरणपोळीत थोडीशी बडिशेप घालायच्या. वेगळाच छान स्वाद लागायचा तो.
मला एक युक्ती सांगा. सुके खोबरे खराब होतंय. ते किसून भाजून ठेवलं तर चांगलं टिकेल का ?
ते किसून भाजून ठेवलं तर
ते किसून भाजून ठेवलं तर चांगलं टिकेल का ?>>>
हो.
किसून डीप फ्रिजमधे ठेव मितान.
किसून डीप फ्रिजमधे ठेव मितान. इथे मुंबईत असंच चांगलं टिकतं सु.खो.
कोणत्या भाजीत बडिशेप चालते?
कोणत्या भाजीत बडिशेप चालते?
रिमा, ज्या भाज्यांना अंगची
रिमा, ज्या भाज्यांना अंगची गोड चव / गोडसरपणा असतो त्या त्या भाजीत मी बडिशेप घालते : उदा : श्रावणघेवडा/ फरसबी, कोबी, फ्लॉवर, बटाटा, दोडका - पडवळ वर्गातील भाज्या, दुधी, तांबडा भोपळा इ. इ. आपण नेहमी जी मोहरी-जिरे, हळद, हिंग, तिखट इत्यादीची फोडणी करतो त्यातच जरा चिमटीभर बडीशेप घालायची.
अकु, पंच फोरनमध्ये असते ना
अकु, पंच फोरनमध्ये असते ना बडिशेप ? छान चव येते भाज्यांना बडिशेपेची.
हो, हो, सिंडरेला, त्यावरूनच
हो, हो, सिंडरेला, त्यावरूनच सुचलं, जरी पंचफोडण ची फोडणी नाही केली तरी नेहमीच्या फोडणीतही बडीशेप घालू शकतो आपण!
गुजराथी लोकांमध्येही बडीशेप घालतात फोडणीत. मस्त स्वाद येतो.
ते किसून भाजून ठेवलं तर
ते किसून भाजून ठेवलं तर चांगलं टिकेल का ?>>> नक्कीच टिकेल, पण भाजताना गॅस मध्यम ठेवून भाजावे, म्हणजे छान भाजले जाते आणि टिकतेही. काचेच्या बरणीत ठेवावे.
उकडलेले बटाटे कीती दिवस फ्रिज
उकडलेले बटाटे कीती दिवस फ्रिज मधे ठेवले तर चालतात?
दहा-पंधरा दिवस तरी आरामात.
दहा-पंधरा दिवस तरी आरामात. खरंतर अजुनही टिकत असतील. कधी ठेवले नाहीयेत.
उकडलेले बटाटे साल न काढता
उकडलेले बटाटे साल न काढता ठेवले फ्रिजमधे तर आरामात बरेच दिवस टिकतात. फक्त त्यांना भेगा जायला नकोत उकडतांना!!
मामी, रोचीन धन्स
मामी, रोचीन धन्स
मी काल नाश्त्यासाठी उपमा
मी काल नाश्त्यासाठी उपमा केला, पण दोघांनाही खायला वेळ नाही झाला आणि तो उपमा आता भरपूर उरलाय. आज मी थोडा गरम करून खाल्ला. पण सारखा तोच नाही खाववणार. काय करता येइल उरलेल्या उपम्याचं? थोडा चिकट झालाय.
प्रज्ञा, त्या उपम्याचे लहान
प्रज्ञा, त्या उपम्याचे लहान लहान गोळे/ वळकट्या करून इडली स्टँडमध्ये ठेवून वाफव त्यांना. ह्या स्नॅक सोबत चटणी - सांबार किंवा सॉस. वाफवायच्या अगोदर उपम्यात ओल्या खोबर्याचे पातळ काप, भिजवलेली हरभरा डाळही घालता येईल. मागे मी इथं राईस बुलेट्सची पाकृ लिहिली होती त्याच्या जवळपास जाईल ही रेसिपी.
विष्णु मनोहरनी एक्दा उपमा वडे
विष्णु मनोहरनी एक्दा उपमा वडे केले होते. बटाट्यावड्यासारखेच.
उपमा थोडा मळून घेऊन त्यात
उपमा थोडा मळून घेऊन त्यात उकडलेला बटाटा, तांदूळ पीठ / बेसन / पाण्यातून काढलेला ब्रेड यापैकी काहीतरी, आलंलसूण पेस्ट, कोथिंबीर, गाजर किसून असं काहीही आवडीचं घालून कटलेट्स करायची. अप्रतिम लागतात. मी केली आहेत
ओह!! किती व्हरायटी करता येते!
ओह!!

किती व्हरायटी करता येते! थँक्स सगळ्यांना.
केल्यावर परत इथे येउन फोटू डकवेन असं वाटतय!
आता उपमा अजून उरलाच असेल तर,
आता उपमा अजून उरलाच असेल तर, छोट्या भज्यांचा आकार देऊन ती तांदळाच्या पीठात बुडवून तळायची. या तांदळाच्या पीठात थोडे आले किसून, जिरे व मीठ घालणे. टोमॅटो सॉस बरोबर देणे.
मला इडलीच प्रमाण हवयं उद्या
मला इडलीच प्रमाण हवयं उद्या नाश्तासाठी करायची आहे. तांदुळ आणि डाळीची. आमच्या इडल्या नेहमी चुकतात म्हणजे जड होतात लुसलुशीत होत नाही म्हणुन करणे टाळतो. प्लिज मला कोणी प्रमाण आणि थंडीत पिठ आंबण्यासाची रेसिपी द्याल का?
काल लापशी रव्याचा उपमा केला
काल लापशी रव्याचा उपमा केला होता, आता नुसताच शिजवलेला रवा उरलाय, थोडाच आहे, काय करता येईल ? खीर कशी करता येईल?
Pages