Submitted by हसरी on 3 February, 2010 - 23:00
उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?
धन्यवाद माधवा! छान सांगितले
धन्यवाद माधवा!
छान सांगितले आहे.. धन्यवाद!
>>>प.पू श्री गजानन महाराजांनी 'कशापासून जग झाले' याचे मनन करायला सांगितले आहे.
हे कुठल्या प्रसंगात ... केव्हां आणि का सांगितले आहे ..याविषयी ही कृपया सांगावे.
अश्विनी,
न लगे साधन संपन्नता | न लगे षट्शास्त्रचातुर्यता |
एक विश्वास असावा पुरता | कर्ता हर्ता गुरु ऐसा ||श्रीसाईसच्चरित १९.७४ ||
याविषयी अजून थोडे सांगावे ही नम्र विनंती! धन्यवाद!
सावट्जी, कर्म व त्यासंबंधातले
सावट्जी,
कर्म व त्यासंबंधातले ज्ञानेश्वर माउलींचे ज्ञानेश्वरीतले विवेचन व त्याचा भावानुवाद वाचुन आनंदलो. अजुनही काही वाचावयास मिळावे ही विनंती.
मा. नितीनजी, >>>शेवटी
मा. नितीनजी,
>>>शेवटी ब्रम्हाचा तरी ठाव ठिकाणा कोठे लागतो...
असे आपणास का वाटते? कारण सर्व शास्त्रे.. तर ब्रम्हाचा ठावठिकाना लागावा.. याकरिताच लिहीली गेली आहेत, नाही काय? किंबहुना तो ठावठिकाना लागल्यानंतरच.. तसे छातीठोकपणे सांगण्यात आले.. असे आपणास वाटत नाही काय?
धन्यवाद!
गुगल्यांवर गुगल्या येताहेत.
गुगल्यांवर गुगल्या येताहेत. मोठ्या पाटाएवढ्या रुंदीची बॅट आणायला हवी गुगली थोडीतरी अटेम्प्ट करता यावी म्हणून
सावट, जरा निवांतपणे लिहायचा प्रयास करेन वरच्या ओवीबद्दल.
मा. नितीनजी ... आपल्याला
मा. नितीनजी ...
आपल्याला कर्माविषयी जाणून घ्यायलाच हवे ... हे आपण म्हणता त्या प्रमाणे अगदी खरे आहे. कारण.. आपण पडलो बंदिशाळेतले.. बंदिवान... आपल्याच पुर्वकर्माचे फळ म्हणून... म्हणजेच हे जे फळ आल आहे ते ज्या झाडाला(शरीर) आले आहे .. ते झाड ज्या बीजापासून आले आहे.. ते 'बीज' आहे ते आपल्या या जन्मा अगोदरचे आहे. आता या झाडाला परत प्रकृती नियमानुसार 'फळ' हे येणारच... त्यातून परत नवीन 'बीज' बाहेर पडणार. मग नवीन वातावरणात हे जुनेच बीज परत फोफावणार.
विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे.. जर जुने बीज-कोय आंब्याची असेल तर.. झाडपण आंब्याचेच येणार हे नक्कीच... आणि त्या झाडाला नवीन फळ येऊन.. त्या कोयीतून नवीन झाड येणार ते पण त्याच गुणधर्माचेच-आंब्याचेच येणार... हे ढळढळीत 'सत्य' आहे. आता हाच गुणधर्माचा निसर्ग-नियम जर 'सत्व-रज-तम' या त्रिगुणांना लावला तर असे लक्षात येते की.. एखादे तमोगुणधर्माचे शरीर... आणि त्याचे बीज हे पण त्याच तमोगुणधर्माचेच असणार! आणि हे चक्र निसर्गनियमानुसार अखंड चालत रहाणार.
त्यातून बाहेर कसे पडायचे?
म्हणजेच गुण.. सत्व-रज-तम असे कोणतेही असले.. तरीही.. या चक्रातून बाहेर पडता येत नाही. त्याकरिता गुणातीत होणे... 'निर्गुण' होणे हा एकच उपाय आहे.
म्हणूनच 'कर्माला' अतिशय महत्त्व आहे..!
माधव,
>>>
१. शरीराने - यात पूजा, उपास, मौखीक जप, इतर व्रते ई. येतात.
२. मनाने - यात तुमचे साध्य नेहमी तुमच्या मनात असते. ह्यात मानस जप ई येतात.
३. बुध्दीने - यात तुमच्या बुध्दीने किंवा विवेकाने अयोग्य ते गाळत तुमच्या साध्यापर्यंत पोचायचे असते.
या तीन प्रकारावरून अनुक्रमे कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग हे तीन मार्ग आहेत.
हे जरी खरे असले तरीही... शरीर-मन्-बुद्धी अशी वेगवेगळी करून तसे 'कर्म' होत नाही. कारण कर्म कोणतेही असो.. शारिरीक-वाचिक्-मानसिक, त्याला अधिष्ठान हे 'शरीर' हेच आहे. जर शरीर नसेल तर 'कर्म' होणारच नाही. तसेच नुसतेच 'शरीर' असेल तरीही कर्म होणार नाही... कर्ता(कर्तेपणा)..बुद्धी.. मन.. प्राण.. इंद्रिय देवता या संगळ्याचा सहभाग असेल तरच 'कर्म' होणार अन्यथा नाही होणार!
हेच जर वेगळ्या अर्थाने पहायचे झाल्यास... 'कर्मा'शिवाय.. 'ज्ञान'प्राप्ती होणार नाही.. आणि कर्म होताना जर 'भक्ती' नसेल आणि कर्म झाले असले तरिही त्या पासून.. ज्ञानप्राप्ति होणार नाही! तसेच ज्ञानाशिवाय 'पराभक्ती' प्रकटत नाही आंणि अज्ञानाने(ज्ञानाचा अभाव)-अविद्येने जे कर्म होते.. त्यात स्वभावतः 'भक्ती' नसते!......आणि जन्म झाला आहे म्हणजे प्रकृतीकर्म नियमानुसार 'कर्म' हे होणारच! मग असे 'ज्ञान आणि भक्ती' विरहीत असणारे कर्म.. हे कर्माची फळे वाढवण्यात.. क्रियमाणात भर घालण्यातच खर्ची पडते.
म्हणजेच 'कर्म-ज्ञान-भक्ति' तत्त्वतः वेगवेगळी करता येत नाही! मग अशा या 'कर्मा' चे आणि ते योग्य आहे की अयोग्य आहे, हे सांगणार्या 'धर्म' या प्रथम पुरुषार्थाचे, महत्व किती आहे.. हे सहजपणे लक्षात येते.
धन्यवाद!:)
शरीर-मन्-बुद्धी अशी वेगवेगळी
शरीर-मन्-बुद्धी अशी वेगवेगळी करून तसे 'कर्म' होत नाही. >> बरोबर. प्रत्येक कर्मात या तिघांचा सहभाग असतोच. पण प्रत्येक वेळी तो ३३.३३% असेलच असे नाही. कधी कमी तर कशी जास्त असतो.
कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग हे उपासनेचे मार्ग आहेत. या मायेत रहाताना कर्म कॉणाला चुकली नाहीत. तसेच प्रत्येक जीवाला प्रेम ही भावना असतेच आणि ज्ञान मिळवण्याची जिज्ञासा पण असते. पण आंतिम सत्याकडे जाताना प्रत्येक जीव त्याला अनुरुप असा मार्ग निवडू शकतो - तसा तो निवडतो किंवा त्याचे सद्गुरु त्याच्याकडून तो निवडून घेतात.
वृंदावनातल्या गोपींनी फक्त श्रीकृष्णाची भक्ती केली. त्यांनी ना कसली व्रत वैकल्ये केली ना त्यांना 'अंतिम ज्ञान' मिळवायची ओढ होती. पण हे सगळे 'विद्येच्या' मार्गावर. 'अविद्येच्या' मार्गात म्हणजे रोजच्या जीवनात त्या नैमित्तिक कर्मे करतच होत्या. आणि त्यांना ताकाला लोणी जास्त कसे येईल येवढे तरी ज्ञान मिळवण्याची इच्छा नक्कीच होती
'कर्म-ज्ञान-भक्ति' तत्त्वतः वेगवेगळी करता येत नाही >> अगदी बरोबर. श्री गजानन महाराजांनी सांगूनच ठेवले आहे - 'या तिन्ही मार्गांचे अंतिम फल ज्ञान असे'
धन्यवाद
धन्यवाद माधवा!
>>>वृंदावनातल्या गोपींनी फक्त श्रीकृष्णाची भक्ती केली.
हा 'गोपीभाव-मधुराभाव' फार अवघड भाव आहे... ! 'ज्ञान' मिळाल्यामूळे तशी दृष्टी येते.. आणि त्यावेळची भाव स्थिती ही 'भक्ति' ने दर्शविली जाते. ज्ञानाचे काम झाले कि ते ज्ञान ही लुप्त होते.. रहाते ती फक्त स्थिती... आणि या स्थितीत 'गोपी' अखंड होत्या.. त्याचा 'लोणी' विकतानाचाही अखंड भाव होता, कोणी 'गोविंद' घ्या.. कोणी 'गोपाळ' घ्या!
असो... छान सांगितले आहे! धन्यवाद!
आणि त्यावेळची भाव स्थिती ही
आणि त्यावेळची भाव स्थिती ही 'भक्ति' ने दर्शविली जाते. ज्ञानाचे काम झाले कि ते ज्ञान ही लुप्त होते.. रहाते ती फक्त स्थिती... आणि या स्थितीत 'गोपी' अखंड होत्या.. >>> आणि भक्तीचे हे अखंडत्व, अभंगत्वच श्रीहरिला एकाच वेळी प्रत्येक गोपीसोबत रहाण्यास भाग पाडत होतं. प्रत्येक गोपीला तो नेहमीच तिच्यासोबतच दिसे. हे गोकूळ, हा गोलोक म्हणजेच भर्गलोक. हे गोप गोपी म्हणजेच पुर्वाश्रमीचे वानरसैनिक, 'जीवात्मा' पदाला पोहोचलेले जीव, संत ज्यांना नेहमीच परमात्म्याचे सानिद्ध्य मिळत आले.
माधव आणि नितीनजी, >>>श्री
माधव आणि नितीनजी,
>>>श्री गजानन महाराजांनी सांगूनच ठेवले आहे - 'या तिन्ही मार्गांचे अंतिम फल ज्ञान असे'
हे कसे? हे पण थोडे समजावून घेऊयात.
श्री भगवंताना अपेक्षित असणार्या भक्ती मार्गात... 'भक्त आणि भगवंत'.. 'श्रीगुरु आणि शिष्य'.. हे एकच आहेत.. म्हणजे 'भक्त' हा 'संपुर्णपणे' देहभाव( मी म्हणजे देह) गेलेलाच असतो...आणि या स्थितीत अधिष्ठान श्रीभगवंतच असतात. त्यालाच 'भक्त' म्हणतात. प.पू. श्रीसमर्थांच्या व्याख्ये नुसार बाकी सगळे 'विभक्त'. (अभक्त नाही !):)
'अहं ब्रह्मास्मि'... .. असे साक्षिरुप 'आत्मज्ञान' झालेले असतानाही.. या मधला 'अहं' हा..श्रीभगवंतांच्या व्याख्ये नुसार 'विभक्त' च असतो... कारण 'मी आणि श्रीभगवंत' वेगळे आहेत असा भाव या स्थितीतही असतोच.
याचाच अर्थ... या तिन्ही मार्गाचे फल हे जरी 'आत्मज्ञान' असले तरीही...जो पर्यंत 'ज्ञान' प्राप्तिनंतरही.. ज्ञानाची स्वतंत्र 'जाणीव' जागृत असते, तो पर्यंत त्याला 'भक्त' म्हणता येत नाही... पण 'ज्ञान' प्राप्तिशिवाय.. 'अहं ब्रह्मास्मि' या पायरीतून गेल्याशिवाय.. ज्ञानाची निवृत्तिही शक्य नसते, हेही तितकेच खरे आहे.
त्यामूळे या सगळ्या पायर्यांच्या वर असणार्या 'गोपी' या सर्वश्रेष्ठ स्थितीत होत्या..आहेत!
आपण(मी-अहं)), ज्यावेळी 'ज्ञान-कर्म-भक्ती(उपासना)' या मार्गाने श्री भगवंताचे काही 'करतो' असे म्हणतो, त्यावेळी आपण 'गोपीभावात' नसतो.. तर त्याच्या अगदी विरुद्ध 'देहभावात' असतो... आणि म्हणूनच हे सगळे 'मी' करणे हे सगळे 'कर्मातच' गणले जाते.. कारण आपला स्वतंत्र 'कर्ता' भाव... म्हणजे 'मी' ज्ञानी आहे.. मी भक्ती(उपासना) करतो... मी कर्म करतो किंवा अमुक-अमुक 'कार्य' माझ्यामूळे झाले .. हे जो पर्यंत जात नाही.. तेते सगळे 'कर्मच'.. फळ देणारे!
'करणे आणि होणे' यात फरक तो हाच... एक 'देहभावात' असतो (प्रकृतीच्या-मायेच्या अधिपत्याने होणारी कर्मे..मीच केली असे समजून बसतो).. तर दुसर्याला कळुन चुकलेले असतेकी मी 'कर्ता' नाही आहे... प्रकृती - शरीर यांच्याकडेच हे 'कर्तेपण' जाते... मग तो 'होणे' अनुभवत असतो.
असो...!
धन्यवाद!
माधव, >>>शरीर-मन्-बुद्धी अशी
माधव,
>>>शरीर-मन्-बुद्धी अशी वेगवेगळी करून तसे 'कर्म' होत नाही. >> बरोबर. प्रत्येक कर्मात या तिघांचा सहभाग असतोच. पण प्रत्येक वेळी तो ३३.३३% असेलच असे नाही. कधी कमी तर कशी जास्त असतो.
समजा ज्ञानेंद्रियाच्या द्वारे विषय-ज्ञान जाणणारी ज्ञाती-बुद्धी..त्या कर्माचा योग्य-अयोग्य असा निर्णय देऊन मोकळी झाली.. तरिही मन आणि शरीर(कर्मेंद्रिये-प्राण-देवता) जर नसतील तर ते कर्म ...कार्य रुपाने प्रत्यक्षात येत नाही.
जसे समजा एखाद्याला चालायची इच्छा(निर्णय) आहे....
१)पण 'पाय' च नाहीत.. तर चालणे हे कार्य होणार नाही...
२)तसेच समजा 'पाय(स्थूल)' हे इंद्रिय आहे.. पण अर्धांग-'वायु' झाला... म्हणजेच त्या इंद्रियात 'प्राण' खेळत नाहीत... तरीही ते कार्य होणार नाही...
३) समजा सुस्थितीत असणारे पाय पण आहेत.. पण भितीने गाळण उडाली आहे.. तरिही चालणे होणार नाही....
४)समजा एखाद्याचे 'मन' थार्यावर नसेल.. तर चालायला हवे आहे.. हा बुद्धीचा निर्णय.. कर्मेंद्रिया पर्यंत जाणारच नाही!
५)समजा बुद्धीच भ्रमिष्ट झाली आहे.. तर जाणणेच होणार नाही.
असे प्रत्येक इंद्रियाच्या बाबतीत आहे.
म्हणजेच एखादे कार्य जर संपन्न व्हायचे असेल तर वरील सगळ्यांचा सहभाग आवश्यकच आहे.
आता आपण 'ज्ञान-कर्म-भक्ती' अशी फोड जरी केली तरीही ही सर्व कार्ये पार पाडण्याकरीता शरीर हेच अधिष्ठान आहे... म्हणजे मार्गाचे बाह्य स्वरुप काहीही असो... परिणाम शरिरावरच(स्थूल-सूक्ष्म-कारण) होणार.. व्हायला हवा!
जसे एखाद्याला समजा 'पैलवान'(भक्ती-साध्य) व्हायचे आहे.. आणि त्याने तशी पुस्तके वाचून 'ज्ञान' मिळवले..! म्हणून तो काय लगेच पैलवान होणार नाही.. तर पुस्तकात वाचलेल्या ज्ञानानुसार तसे कार्य-आचरण ही लागेलच... म्हणजे 'कर्म' करणे आलेच. समजा एखाद्याला हे पुस्तकी ज्ञान नाही.. पण तो.. दुसर्या एखाद्या नावाजलेल्या पैलवानाचे 'अंधानुकरण'(ज्ञानविरहीत-कर्म) करतो आहे.. तर तो ही कालांतराने तसाच होईल.. आणि अनुभवाने येणारे 'ज्ञान' त्याच्या ठिकाणी आपोआप प्रकट होईल... त्यावर तो पुस्तकही लिहू शकेल.
आणि समजा तो पुस्तकातून(शास्त्रप्रचिती) ज्ञानही मिळवत आहे..आणि जाणत्याचा(श्रीगुरुप्रचिती) अनुभव-हात त्याच्या प्रगतीवर-कार्यावर (आत्मप्रचिती) देखरेख करत असेल तर.. आणि तो तसा 'आहार आणि विहार' पाळत असेल तर त्याचा पैलवान होण्याचा 'काळ' लवकर येईल... म्हणजेच, मला आता दुबळेपणाचा(भवबंधाचा) कंटाळा(वैराग्य) आला आहे.. मला लवकरात लवकर सामर्थ्यवान(भवभयमुक्त) व्हायचे आहे.. असा भाव.. अशी श्रद्धा(भक्ती) त्याच्या ठिकाणी असेल... तर त्याचे 'काम' लवकर होणार.... नाही काय?:)
धन्यवाद!
महेश, तूम्हीं सोडलेले काही
महेश,
तूम्हीं सोडलेले काही 'संकल्प'(:)) पाहूयात...
>>>>
26 March, 2010 - 08:20 -लवकरच सविस्तर काही लिहिण्याचा प्रयत्न आहे, पाहू कसे जमते.
15 April, 2010 - 08:39- समजायला वेळ लागणार आहे. त्यामुळे आत्ता लगेच काही लिहिणार नाही.
30 June, 2010 - 02:36- लवकरच सविस्तर लिहू शकेन. तो पर्यंत येथे वाचन भक्ती चालू आहेच.
29 October, 2010 - 02:45 -सत्संगाबद्दल नारदांची एक गोष्ट माहिती आहे, सवडीने लिहिन.
24 November, 2010 - 20:40 -मला शिख धर्म खुप आवडतो, ते वेगळा धर्म का म्हणतात राम जाने.
भारतात असलेल्या अनेक जनजातींमधे हे लोक खुप वेगळे आणि भारी वाटतात मला.
जमल्यास लवकरच एक धागा सुरू करावा म्हणतो.
5 December, 2010 - 08:08 -एकदम सविस्तर लिहिणे होणार नाही. जसा वेळ मिळेत तसे लिहित जाणार आहे.
6 December, 2010 - 10:07 -सद्ध्या स्वतंत्रपणे सविस्तर लिहिणे जमणार नाही म्हणुन आंतरजालाची मदत घेत आहे. यथावकाश स्वतःचे विचार पण लिहिणार आहे.
आता यावर 'सविस्तर' बोला!
माधव, >>>आता ही पोस्ट इथेच
माधव,
>>>आता ही पोस्ट इथेच संपवतो, पण वस्तूची खरी ओळख अजून संपलेली नाही.
कधी संपवणार?
सावट, आज मास्तुरे मोडात आहात.
सावट, आज मास्तुरे मोडात आहात. सगळ्यांचे गृहपाठ तपासताहात ते!
करतो - मला उमजलेली ओळख पूर्ण करतो लवकरच!
सावट ____/\____ पुस्तकाचं
सावट ____/\____
पुस्तकाचं नावं सांगा ना
नमस्कार, मागे गुरुचरित्र
नमस्कार,
मागे गुरुचरित्र स्त्रीयानी न वाचण्याच्या संदर्भात काही आले आहे. गुरुचरित्रात बायकानी ओम चा उच्चार करु नये असेही लिहिले आहे.
हाच प्रश्न आमच्या गुरु प.पु. कलावतीमाता याना एका शिष्येने विचारला होता आणि असेही विचारले होते की मग मी "ओम नमः शिवाय" म्हणणे सोडुन देउ की काय?.
त्यावर आमच्या गुरुनी सांगितले
"आजकाल ट्रकवर, घरावर ,अंगठीवर सगळीकडे ओम हे अक्षर असते. त्यामुळे ओम चा उच्चार न करणे लोकाना कितपत जमत असेल? आणि हा उल्लेख आहे ही माहिती देण्याच्या उद्देशाने त्या बायकानी ओमचा उच्चार केलाच की नाही? एकदा म्हटले काय आणि दहादा म्हटले काय सारखेच. मला सिद्धारुढ स्वामीनी ओम नमः शिवाय म्हणायला सांगितले आणि त्याचे मी नि:शंकपणे पालन केले त्यामुळे मला त्याचे फळ मिळाले याकडे लक्ष पुरवा म्हणजे मन चलबिचल होणार नाही".
असो.
बाकी इथली सुंदर चर्चा मी नियमित वाचतो. इथे काही लिहिण्याएवढी प्रगल्भता माझ्यात आलेली नाही त्यामुळे पोस्ट करत नाही.
धन्यवाद.
स्त्रीयांनी गुरुचरित्र वाचावे
स्त्रीयांनी गुरुचरित्र वाचावे की नाही याबाबत एखादा ज्ञानी माणुस अनुभवाचे बोल लिहील ते ग्राह्य धरावे. पण ओमकार स्त्रीयांनी म्हणावा की नाही याबाबत प्रथमच दोन मते वाचतो आहे.
गुरुचरित्राच्या ओवीचा/अध्यायाचा संदर्भ दिल्यास फार बरे होईल.
माझा अनुभव असा. माझे गुरु श्री विश्वासराव मंडलीक कुलपती योग विद्या धाम - नाशिक हे विशिष्ठ पध्दतीने स्त्री व पुरुषांना ओंकाराचा जप शिकवण्याची पध्दत निर्माण करुन अनेकांना याची दिक्षा देत आहेत. योगाभ्यासाबरोबरच ओंकाराचा जप करावा हे आग्रहाने सांगताना त्याम्नी कधीच स्त्री - पुरुष असा भेद केला नाही. जपसंख्येबाबत सुध्दा त्यांनी स्त्री पुरुष असा भेद सांगीतला नाही.
ओंकाराच्या विशिष्ठ पध्दतीने केलेल्या जपाने काही रोग बरे होतात असे त्यांचे संशोधन आहे.सबब वरील गुरुचरित्रात आलेला उल्लेख कोणत्या परिस्थीतीत आलेला आहे हे शोधावे लागेल.
रामदेव बाबांनी देखील असे कधी भेद केल्याचे स्मरत नाही.
कशापासून जग झाले? - २ नाम
कशापासून जग झाले? - २
नाम आणि रुप याबद्दल मागच्या पोस्ट्मध्ये लिहिले होते. म्हणजे माया या दोघांच्या सहाय्याने भिन्नत्व निर्माण करून तिचा खेळ मांडते. एखादा चित्रकार त्याच्या मनात उमटलेले चित्र प्रत्यक्षात उतरवताना जसा कॅनवास आणि वेगवेगळे रंग वापरतो, तशीच माया पण या विश्वाचे चित्र चितारताना नाम आणि रुपाने निर्माण झालेली विविधता आणि स्थल (space) आणि कालाचा कॅनवास वापरते.
या विविधतेच्या आणि स्थलकाल सापेक्षतेच्या - म्हणजेच पर्यायाने मायेच्या - पलीकडे जे उरते ते अस्ती किंवा सत. ते एकच असते म्हणजे त्यात कोणत्याही प्रकारची भिन्नता नसते त्यामुळे नाम आणि रुप ही मायेची आयुधे त्यावर नि:ष्प्रभ ठरतात. ते कधीच बदलत नाही म्हणून सत. म्हणजेच ते निर्माण अथवा नष्ट होत नाही. कारण निर्माण अथवा नष्ट झाले असते तर त्याला वेगवेगळ्या अवस्था असत्या म्हणजेच पर्यायाने त्यात बदल झाला असता. पण असे त्याच्याबाबतीत घडत नाही. ते निव्वळ असते - म्हणून अस्ती. ते जे आहे ते अणू (येथॅ विश्वातला सगळ्यात लहान कण असा अर्थ अभिप्रेत आहे, विज्ञानातला अणू नाही) पेक्षा लहान असते आणि विश्वाहून मोठे असते. म्हणजे त्याचे विभाजन होऊ शकत नाही आणि त्याच्याहून मोठे असे काही बनू शकत नाही. दुसर्या श्ब्दात सांगायचे झाले म्हणजे ते सर्व गोष्टीत आहे आणि सर्व गोष्टी त्याच्यात आहेत.
खूप गोंधळून टाकले का मी? आता इथेच थांबतो.
mansmi18, नमस्कार, कसे आहात?
mansmi18,
नमस्कार, कसे आहात? घरभर पसरलेल्या वाती काय म्हणतायेत?:)
प.पू श्रीसद्गुरु सिद्धारूढस्वामीमहाराज आणि प.पू. आईमहाराज श्रीकलावती.. या उभयंता..श्रीगुरु- शिष्य.. श्रीचरणी साष्टांग नमस्कार!
>>>श्रीगुरुचरित्रात बायकानी ओम चा उच्चार करु नये असेही लिहिले आहे.
तसा संदर्भ आपणास माहीत असल्यास कृपया सांगावे... नसेल माहीत तर तसे अवश्य सांगावे.
>>>त्यावर आमच्या गुरुनी सांगितले...मला सिद्धारुढ स्वामीनी ओम नमः शिवाय म्हणायला सांगितले आणि त्याचे मी नि:शंकपणे पालन केले त्यामुळे मला त्याचे फळ मिळाले.
श्रीगुरुवचन... श्रीगुरुमुखातून मिळालेला 'श्रीगुरुमंत्र'.. म्हणजे चलनी नोट... परमार्थाच्या बाजारात नि:संशय पणे वठणारी.... पण प्.पू.श्री आईमहाराज सांगतात त्याप्रमाणे.."मी नि:शंकपणे पालन केले त्यामुळे मला त्याचे फळ मिळाले."... म्हणजेच तसे 'पालन' ही होणे...शिष्य म्हणून जरूरी आहे.... आणि प.पू.श्रीआईमहाराजांनी 'फळ' म्हणजे काय सांगितले आहे हे पहाणे महत्त्वाचे...!
असो!
आता तुमचा मूळ प्रश्न...
'अधिकार तैसा करू उपदेश', या श्रीसंतवचनानुसार्...श्रीसद्गगुरुचा उपदेश(मंत्रानुग्रह) ही भिन्न-भिन्न असतो. आपण जरी 'संत आणि सद्गुरु' हे दोन शब्द एकाच अर्थाने वापर असू तरीही 'शास्त्र' दृष्ट्या त्यात तात्विक भेद आहे. ज्यावेळी श्रीसद्गुरू.. श्रीसंतभावाने जनास उपदेश करतात.. त्यात पावसाच्या बरसण्याचा भाव असतो..म्हणजेच जमीन चांगली-वाईट.. पावसाच्या पाण्याचा उपयोग होणारी... न होणारी.. असे न पहाता ...सरसकट्...संगळ्याना शास्त्रसंमत असा उपदेश केला जातो... जमीन चांगली असेल तर तसे पिकही येते.... नाहीतर त्या व्यक्तीकरता तो उपदेश वाया ही जाऊ शकतो..पण म्हणून पाऊस पडायचा थांबत नाही!
पण ज्यावेळी हेच श्रीसंत... श्रीगुरु रुपाने ए़खाद्याच्या समोर ठाकतात त्यावेळी.. त्याचे मागचे सात जन्म तपासून पाहीले जातात..आणि जसा 'अधिकार'( हे ठरविणारे श्रीसद्गुरु..आपण स्वतःचा अधिकार ठरवून चालत नाही.) असेल तसा 'मंत्रानुग्रह' होतो....असे शास्त्र आहे.
नाहीतर...म्हणूनच प.पू. श्रीमाउली म्हणतात...
अगा बावन्ना वर्णांपरता| कोण मंत्रु आहे पंडुसुता| कां बावन्नही नुच्चारितां| जीवु आथी ? ||श्री ज्ञा. १८.३७३||
परी मंत्राची कडसणी| जंव नेणिजे कोदंडपाणी| तंव उच्चारफळ वाणी| न पवे जेवीं ||३७४||
मनुष्य जन्म आहे म्हणजे.. ५२ वर्णांचा उच्चार करता येणारच...आणि सगळेच 'मंत्र' या ५२ वर्णांनी बनलेलेच असणार.. पण नुसताच उच्चार करता येतोय म्हणून ...तो उच्चार शास्रांनी सांगितलेल्या 'मंत्राचे'.. 'फळ' देणार नाही... तो श्रीगुरुमुखातूनच मिळाला पाहीजे... आणि त्या शिष्यानेही तो मंत्र.. आचार-विचार- उच्चार... आहार्-विहार पाळूनच केला पाहीजे.. तरच तो 'फलवत' होईल. अन्यथा होणार नाही. प.पू. श्रीआईमहाराजांचे श्रीचरित्र याकरिता अवश्य वाचावे.
प.पू. श्री स्वामींनी .. पहील्यांदा "निरूपण कर", अशी आज्ञा दिली प.पू. श्री आईमहाराजांना दिली त्यावेळचे त्यांनी केलेले पहीले निरुपण होते... "नाम संकीर्तन साधन पै सोपे" या अभंगावर.:)
प्.पू.श्रीसिद्धारूढ महाराजांनी.. "शिवाय नमः" या पंचाक्षरी महामंत्राचा उपदेश बर्याच वेळेला केला आहे.. तर काहीनां गायत्रीमंत्राचा उपदेश... तुम्ही विचारलेले प्रश्नाच्या अनुरोधाने पाहील्यास... प्.पू.श्रीसिद्धारूढ महाराजांचा एक प्रसंग पहाण्यासारखा आहे... एक स्त्री.. प.पू. श्री स्वामींना अनुग्रह व्हावा अशी विनंती करती झाली.. यावर प.पू. श्री स्वामी म्हणाले, " तू अशुद्धचित्त आहेस.. म्हणून तू ब्रह्मोपदेशास पात्र नाहीस... म्हणून तू 'सोमवारपयोव्रत' करावे म्हणजे.. तू 'धन्य,' होशील." त्या स्त्रिनेही श्रीवचनानुसार केले...आणि ती 'धन्य' झाली.... म्हणजेच प.पू. श्री स्वामींनी पाहील काय.. तर चित्ताचा शुद्धपणा.. तो नसेल तर उपदेश असणार तो .. अर्थात 'चित्त' शुद्ध होण्यासाठी... आणि जर अगोदरच 'चित्त' शुद्ध असेल तरच..मगच.. ब्रह्मोपदेश होणार..! ( नाहीतर नाही होणार!) हे ठरविणारे कोण.. तर जाणते आणि दाविते.. श्रीगुरु!
असो ...!
असाच 'लोभ' असावा....:)
धन्यवाद!
माधव,
छान सांगितले आहे.. धन्यवाद!
सावट _/\_ तुमची वरची पोस्ट
सावट _/\_
तुमची वरची पोस्ट हेच--
न लगे साधन संपन्नता | न लगे षट्शास्त्रचातुर्यता |
एक विश्वास असावा पुरता | कर्ता हर्ता गुरु ऐसा ||श्रीसाईसच्चरित १९.७४ ||
या ओवीचे स्पष्टीकरण आहे की ! धन्यवाद
अश्विनी किती साध्या सोप्या
अश्विनी
किती साध्या सोप्या भाषेत आपण उपासनेचे वर्णन केलेत. आपल्या हिंदु धर्मात अशी तुमच्या सारखी अजुन लोक पाहीजेत जे आपला धर्म सहज सोपा व अनुसरायला हवा हवा सा वाटणारा करतील.
अश्विनी... _/\_ ! प.प.
अश्विनी... _/\_ :)!
प.प. श्रीटेंब्येस्वामीमहाराजांनी प्रश्न केला, " स्नान-संध्या झाली आहे काय?"(नसेल तर तूला दर्शन घेता येणार नाही.)
म्हणजे दर्शनासाठी शरीराची बाह्यशुद्धी असणे महत्त्वाचे आहे.... तर
प.पू. श्रीसिद्धारूढस्वामी म्हणाले, " तू अशुद्धचित्त(अंतःकरण) आहेस.. म्हणून तू ब्रह्मोपदेशास पात्र नाहीस... म्हणून तू 'सोमवारपयोव्रत' करावे म्हणजे.. तू 'धन्य,' होशील."
म्हणजे अंतःशुद्धी नसल्यामूळे ज्ञानोपदेश करता येणार नाही... तर
प्.पू.श्रीमाउली म्हणतात,"म्हणौनि अंतरीं ज्ञान व्हावें| मग बाह्य लाभेल स्वभावें| वरी ज्ञान कर्में संभवे| ऐसें कें जोडे ? ||श्रीज्ञा.१३.४७३||."
अंतरी 'ज्ञान' असेल तर... त्या स्थितीत 'बाह्य' ही स्वभावत:च .. निसर्गतःच लाभेल.
या तिन्ही उपदेशांची संगती कशी लावायची?
महेश, >>>आता अजुन एक प्रश्न,
महेश,
>>>आता अजुन एक प्रश्न, समजा केवळ डोळे मिटून मन निर्विचार करण्याचा प्रयत्न केला तर तो चांगला की वाईट.
जर परम तत्व निर्गुण निराकार आहे तर त्यात मन केंद्रित करून त्याच्याशी एकतानता साधण्याचा प्रयत्न करणे योग्य की अयोग्य ? कदाचित मी जरा धाडसी आणि वेडे प्रश्न विचारत असेन, पण शंकानिरसन करून घेण्यास प्रत्यवाय नसावा. आपल्या उत्तरावर माझे पुढचे प्रश्न अवलंबुन आहेत.
आता आपल्याच वरील प्रश्नाचे .. आपणच उत्तर द्यावे ही विनंती.:)
अश्विनी, >>>उत्तर मिळालं तरी
अश्विनी,
>>>उत्तर मिळालं तरी ते अंगवळणी पडणे, अनुभवणे यानेच खुंटा बळकट होतो आणि मग वाट आपोआप दिसू लागते व त्या वाटेवर पावलेही पडू लागतात
हे अंगवळणी पडणे.. नुसत्या उत्तर मिळाल्यामूळे शक्य होते का?
गौरी, >>>मी जेव्हा इथे
गौरी,
>>>मी जेव्हा इथे गुरुद्वारा मधे जाते, तिथे देवाची प्रार्थना करताना, 'नाम दी बक्षिश दे' असे परमात्म्याला विनवण्यात येते. तुझेच नाम घेण्याची, स्मरण करण्याची तुच बुद्धी दे.
'नाम दी बक्षिश दे' या विषयी अजून काही सांगाल काय?
माधव, >>>कशापासून जग
माधव,
>>>कशापासून जग झाले?
'अस्ति,भाती,प्रिय,नाम आणि रुप', या संबोधनांनी कशाचे वर्णन केले जाते?
>>>म्हणजे त्याचे विभाजन होऊ शकत नाही आणि त्याच्याहून मोठे असे काही बनू शकत नाही. दुसर्या श्ब्दात सांगायचे झाले म्हणजे ते सर्व गोष्टीत आहे आणि सर्व गोष्टी त्याच्यात आहेत.
'ते सर्व गोष्टीत आहे' .... 'सर्व गोष्टी त्याच्यात आहेत'.
मग 'ते' आणि 'ती गोष्ट' वेगळे असतात की नाही असत?
.
मा.
मा. नितीनजी,
>>>योगाभ्यासाबरोबरच ओंकाराचा जप करावा
यात 'योग' म्हणजे 'हठयोग' असा अर्थ अभिप्रेत आहे काय? आणि..
'ओंकाराचा जप' म्हणजे 'मत्रंयोग' म्हणायचे आहे काय?
'योग' कोणताही असो.. त्या योगाच्या अंगाने गेल्यास अंतिम गती-स्थिती काय असायला पाहीजे? किंवा श्रीभगवंत श्रीअर्जूनास... 'तू योगी हो', असा उपदेश करतात.. त्यावेळी श्रीभगवंताच्या मनातला 'योग' म्हणजे नक्की काय?
माधव, >>>म्हणजे माया या
माधव,
>>>म्हणजे माया या दोघांच्या सहाय्याने भिन्नत्व निर्माण करून तिचा खेळ मांडते.
भिन्नत्व... कशा पासून?
>>>एखादा चित्रकार त्याच्या मनात उमटलेले चित्र प्रत्यक्षात उतरवताना जसा कॅनवास आणि वेगवेगळे रंग वापरतो, तशीच माया पण या विश्वाचे चित्र चितारताना नाम आणि रुपाने निर्माण झालेली विविधता आणि स्थल (space) आणि कालाचा कॅनवास वापरते.
जशी कॅनवास वरची विविध रंगित चित्रे आणि चित्रकार वेगळे असतात...तशीच नाम-रुपे आणि माया वेगळी असते काय?
>>>या विविधतेच्या आणि स्थलकाल सापेक्षतेच्या - म्हणजेच पर्यायाने मायेच्या - पलीकडे जे उरते ते अस्ती किंवा सत. ते एकच असते म्हणजे त्यात कोणत्याही प्रकारची भिन्नता नसते त्यामुळे नाम आणि रुप ही मायेची आयुधे त्यावर नि:ष्प्रभ ठरतात.
'अस्ती-सत' आणि 'माया' यांचा परस्पर संबंध काय? मायेला 'सत' च्या विरूद्ध 'असत' ..असे म्हणता येईल काय?
'अस्ति,भाती,प्रिय,नाम आणि
'अस्ति,भाती,प्रिय,नाम आणि रुप', या संबोधनांनी कशाचे वर्णन केले जाते? >> ह्या विश्वात जे अस्तित्वात आहे त्या सगळ्याचे! एका शब्दात सांगायचे तर ब्रह्माचे!
मग 'ते' आणि 'ती गोष्ट' वेगळे असतात की नाही असत? >> नाही.
'मृत्यूलोक' असे ज्याचे नामकरण
'मृत्यूलोक' असे ज्याचे नामकरण आहे... त्या लोकात रहाणार्या लोकांच्या भावस्थितीचे... आपले.. रास्त वर्णन श्रीभगवंताच्या तोंडून ऐकूयात... श्रीभगवंताचे मनोगतच जणू...!
जेथ चहूंकडे जळत वणवा| तेथूनि न निगिजे केवीं पांडवा|
तेवीं लोकां येऊनि सोपद्रवां| केवीं न भजिजे मातें ||श्री ज्ञा.९.४९२||
हे अर्जूना... चहूकडे 'मृत्यूरुपी' वणवा पेटलेला असताना.. रोज लाखोजण डोळ्यादेखत मृत्यूपंथाला लागलेले दिसत असताना... अशा ठीकाणाहून बाहेर पडायचे तूला कस काय सूचत नाही.. तू इथून का निघत नाहीस.... या मृत्यूलोकाने तू़झ्यावर अशी काय भूरळ घातली आहे की.. या क्षणाक्षणाला नष्ट होणार्या लोकात येऊनही.. यातून बाहेर निघावे म्हणून... माझे भजन करीत नाहीस?
अगा मातें न भजावयालागीं| कवण बळ पां आपुलिया आंगीं|
काई घरीं कीं भोगी| निश्चिंती केलीं ? ||४९३||
नातरी विद्या कीं वयसा| ययां प्राणियांसि हा ऐसा|
मज न भजतां भरंवसा| सुखाचा कोण ? ||४९४||
अरे, अशा लोकात राहून.. मला न भजायचे ... बळ तूझ्या अंगी आले कोठून?.. इतर कोणत्या भोगांच्या बळावर एवढा निश्चिंतपणे..तू असा कसा वावरत आहेस? अशी कोणती विद्या-बळ तूझ्यात संचारल आहे की मला न भजता.. सुखाचा भरवसा तूला वाटत आहे?
अगा विषाचे कांदे वाटुनी| जो रसु घेईजे पिळुनी|
तया नाम अमृत ठेवुनी| जैसें अमर होणें ||४९८||
अरे महाभागा..जसे.. कोणी विषाचे कांदे वाटून त्याचा रस काढून... परभारे.. त्याचे नाव 'अमृत' असे ठेवले आणि..त्याचे सेवन केले.. तर कोणी अमर होते काय? अस कधी ऐकल आहेस काय?
तेवीं विषयांचें जें सुख| तें केवळ परम दुःख|
परि काय कीजे मूर्ख| न सेवितां न सरे ||४९९||
तसेच.. विषयात जे सुख आहे असे वाटते... ते..अंती.. परिणामतः ..परम दु:ख आहे... हे माहीत असतानाही.. मुर्खाला.. विषयांचा भोग घेतल्याशिवाय चैनच पडत नाही!
म्हणौनि मृत्युलोकीं सुखाची कहाणी| ऐकिजेल कवणाचिये श्रवणीं|
कैंची सुखनिद्रा अंथरुणीं| इंगळांच्या ||५०१||
जसे विंचवाच्या अंथरूणावर निजल्याने सुखाची निद्रा घेणे शक्य होत नाही.. तसेच मृत्यूलोकात येऊन सुखाची कहाणी ऐकणे शक्य नाही.
जो बहुवें विषयविलासें गुंफे| तो म्हणती उवाईं पडिला सापें|
जो अभिलाषभारें दडपे| तयातें सज्ञान म्हणती ||५०९||
अरे या मृत्यू लोकाचे अजून कौतुक काय म्हणून सांगू... इथले लोक....
जो विषय-विलासात पुर्णपणे गुंतला आहे.. जो विषयांच्या आसक्तीने दडपला आहे आणि.. आणि त्याच्या विषयीच अखंड बोलतो आहे..अशा माणसास 'सज्ञानी' म्हणतात..
जयाचें आयुष्य धाकुटें होय| बळ प्रज्ञा जिरौनि जाय|
तयाचे नमस्कारिती पाय| वडील म्हणुनी ||५१०||||
ज्याचे आयुष्य संपत आले आहे..त्याचे बळ-बुद्धी जिरली आहे... त्याना वडील म्हणून नमस्कार घालतात..
जंव जंव बाळ बळिया वाढे| तंव तंव भोजे नाचती कोडें|
आयुष्य निमालें आंतुलियेकडे| ते ग्लानीचि नाहीं ||५११
जस जस बाळाच बळ-वय वाढत जाते.. त्यावेळी त्याच्याभोवती गोळा होऊन नाचतात! आयुष्य सरत चाललय हे त्यांच्या लक्षातच येत नाही...
जन्मलिया दिवसदिवसें| हों लागे काळाचेंचि ऐसें|
कीं वाढती करिती उल्हासें| उभविती गुढिया ||५१२||
जन्मलेल्या दिवसापासून... तो काळाच्या वाटेला लागला आहे.. हे लक्षात न घेता.. उल्हासाने गुढ्याउभारून वाढदिवस(?) साजरा करण्यात गुंग आहेत...
दर्दूर सापें गिळिजतु आहे उभा| कीं तो मासिया वेंटाळी जिभा|
तैसें प्राणिये कवणा लोभा| वाढविती तृष्णा ||५१४||
जसे एखाद्या बेडूक, सापाच्या तोंडात आहे आणि तो बेडूक माशी खायला जीभ वेटाळत आहे.. अगदी तसाच जन्मतःच काळसर्पाच्या तोंडातला हा.. बेडूकरुपी माणूस.. लोभाने आपलीच तृष्णा वाढवत आहे..
अहा कटकटा हें वोखटें| इये मृत्युलोकींचें उफराटें|
एथ अर्जुना जरी अवचटें| जन्मलासी तूं ||५१५||
हे महाबुद्धीवान अर्जूना.. या मृत्यूलोकाची ही अशीच 'उफराटी' वागण्याची रीत आहे.. आणि अशा लोकात तूझा जन्म झाला आहे.. हे लक्षात घेऊन..
तरि झडझडोनि वहिला निघ| इये भक्तीचिये वाटे लाग|
जिया पावसी अव्यंग| निजधाम माझें ||५१६||
या लोकावर आणि इथल्या उफराट्या रितीवर न विसंबता...यापासून शक्य तितक्या तत्परतेने वेगळा हो.. आणि भक्तीच्या पंथाला- वाटेवर चालायला सुरु कर.. ज्यामूळे कोणतेही व्यंग-कमीपण नसलेल्या माझ्या निजधामास तू येऊन पोहचशील.. आणि मजस्वरुप.. कालातीत होशील.. परत तूला या मृत्यू लोकात यावे लागणार नाही.
धन्यवाद!
मा. सावटजी, मा.
मा. सावटजी,
मा. नितीनजी,
>>>योगाभ्यासाबरोबरच ओंकाराचा जप करावा
यात 'योग' म्हणजे 'हठयोग' असा अर्थ अभिप्रेत आहे काय? आणि..
'ओंकाराचा जप' म्हणजे 'मत्रंयोग' म्हणायचे आहे काय?
'योग' कोणताही असो.. त्या योगाच्या अंगाने गेल्यास अंतिम गती-स्थिती काय असायला पाहीजे? किंवा श्रीभगवंत श्रीअर्जूनास... 'तू योगी हो', असा उपदेश करतात.. त्यावेळी श्रीभगवंताच्या मनातला 'योग' म्हणजे नक्की काय?
जाणकार योगी-गुरु यांच्यामते योग आणि हटयोग यात अंतर आहे.
"हटप्रदिपीका" हा मार्गदर्शक ग्रंथ हटयोगाबाबत विस्तृत मार्गदर्शन करतो.
हटयोगतल्या बर्याच क्रिया या अभ्यासुचे अरोग्य चांगले रहावे यासाठीच्या आहेत. हटयोगात दिर्घायुष्य आणि अरोग्य याची प्रार्थमिकता असते.
"योग" हा मुक्ती किंवा परमेश्वर प्राप्तीचे साधन या दृष्टीने महत्वाचा.
ओंकार आणि प्रणवसाधना यावर आपण बोललो आहोत.
"तस्य वाचक प्रणव:" ह्या योगसुत्रातल्या सुत्रात ईश्वरप्रणीधान या संदर्भात अर्थात ईश्वराचे चिंतन्,मनन किंवा साधना अपेक्षीत आहे.
"मंत्रयोग" याबाबत मी फारसे वाचले नाही त्यामुळे लिहीत नाही.
'योग' कोणताही असो.. त्या योगाच्या अंगाने गेल्यास अंतिम गती-स्थिती काय असायला पाहीजे? किंवा श्रीभगवंत श्रीअर्जूनास... 'तू योगी हो', असा उपदेश करतात.. त्यावेळी श्रीभगवंताच्या मनातला 'योग' म्हणजे नक्की काय?
अंतिम गती-स्थिती मुक्ततेचा अनुभव असे वर्णन करता येईल. सुख -दु:ख, प्रेम्-दुस्वास, इ यांच्याही पलिकडे जाउन समत्व प्राप्ती ही स्थिती यायला हवी.
भगवंताच्या मनातला योग हा " समत्व प्राप्ती " असे असावे.
Pages