Submitted by हसरी on 3 February, 2010 - 23:00
उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?
सावट, उत्तर मिळालं तरी ते
सावट, उत्तर मिळालं तरी ते अंगवळणी पडणे, अनुभवणे यानेच खुंटा बळकट होतो आणि मग वाट आपोआप दिसू लागते व त्या वाटेवर पावलेही पडू लागतात.
पण ती अनुभुतीआधीची स्टेज ह्या प्रश्नोत्तरांच्या खेळात गुंतवून ठेवते. एका क्षणाला एक धागा गवसतो आणि गुंता सुटून जातो. नंतर फक्त त्या देवयान पंथाच्या वाटेवरुन चालणे, त्या चालण्याचा आनंद घेणे एवढेच उरते. कुणाशी डिस्कशन झालेच तर एक उजळणीचा आनंद मिळतो.
छान अश्विनी...
छान अश्विनी... धन्यवाद!
>>>
पण ती अनुभुतीआधीची स्टेज ह्या प्रश्नोत्तरांच्या खेळात गुंतवून ठेवते. एका क्षणाला एक धागा गवसतो आणि गुंता सुटून जातो. नंतर फक्त त्या देवयान पंथाच्या वाटेवरुन चालणे, त्या चालण्याचा आनंद घेणे एवढेच उरते. कुणाशी
आपले 'प्रश्न' आणि त्याचे 'उत्तर' किंवा आपल्या मनाने सोडलेले 'संकल्प' आणि त्याच्या अनुषंगाने त्याच मनात उपटलेले 'विकल्प'.... हा खेळ, पूर्वदिशेला(देवयान पंथ) चालू लागल्यावरच संपतात.... किंवा दिशा-पंथ मिळालीतरी-मिळाल्यावरही... सुरुवातीला हे संकल्प-विकल्प जास्त प्रमाणात येतात.... असे शास्त्र सांगते. पण म्हणून 'चालणे' थांबवून चालत नाही.. किंबहूना हे 'चालणे' हेच आपल्या प्रश्नांचे .. 'उत्तरस्वरूप' असते... चालण्यानेच.. अभ्यासानेच.. उत्तरे आपोआप मिळतील...!
'चालणे' थांबले.. आणि उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला तर.. दिशा चुकल्यामूळे... 'उत्तरे' मिळणे किंवा मिळालीतरी, ती 'उत्तरे' आहेत हे न कळणे.. हे सहज घडते...किंबहूना प्रत्येकाची... जिज्ञासू.. मुमुक्षू.... साधक ही अवस्था म्हणजेच वरचे 'घडणे' आहे. त्यात चूक-बरोबर.. शहाणा-मुर्ख असा भाव नसतो ... हे असेच घडते!
म्हणूनच आपल्या मनाला जे श्रीसद्गुरुतत्व रुप भावते .. त्यालाच शरण जाणे ... हेच या सर्व प्रश्नाचे 'उत्तर' आहे...मग अशी एक अवस्था येईल... ज्यामध्ये 'प्रश्नच' शिल्लक रहाणार नाहीत.... कारण हे श्रीसद्गुरुतत्व आपल्या अनन्यशरणागताला.. 'आपल्यासम' करण्याकरिता अनादिकाळापासून कार्यरत आहे... सुप्रसिद्ध आहे.
आपल्या मनात 'प्रश्न' हे असणारच.. 'श्रीगुरुप्रदत्त-साधना' नियमित होणे... यानेच सर्व 'उत्तरे' आपोआप मिळतील.
बोला.. "गण गण गणात बोते".
धन्यवाद!:)
श्रीसाईच्चरितातील... 'भक्ति'
श्रीसाईच्चरितातील... 'भक्ति' प्राप्त होण्याचे साधन...क्रम थोडासा पाहू...!
'प्रेम' असावें अकृत्रिम | जाणिलें पाहिजे भक्तिवर्म |
सहज लाधेल परमार्थ | नासेल विषम अविद्या || श्री साईच्चरित ३.१८३ ||
नलगे इतर साधनीं शीण | करुं हें साईचरित्र श्रवण |
संचित आणि क्रियमाण | अल्पप्रमाणही नुरवूं || १८४ ||
श्रीभगवंताविषयी.. अकृत्रिम असे 'प्रेम' असणे-उपजणे... हेच श्रीभगवंताची 'भक्ती' प्राप्त होण्याचे 'वर्म' आहे...हे अगोदर जाणावे लागते.. आणि असे 'प्रेम' हे अगोदर पाहिजेच.( जाणिले.. पाहिजे) यानेच विषम अशी 'अविद्या' नासेल. असे 'प्रेम' उपजले तरच 'परमार्थ' सहजपणे लाधेल! ( त्याच्या अगोदर नाही.) 'प्रेम आणि भक्ति' विषयी किती सुरेख सांगितले आहे नाही!:)
असे 'प्रेम' हे जर 'पाहिजेच' अशी अट असेल तर तसे साधनही पाहीजे...
असे 'प्रेम' उपजण्या करिता 'साधन' काय? तर 'श्रीगुरुचरित्र' श्रवण.... नुसते वाचन नाही.. नुसते ऐकणे नाही.. तर त्याचे 'श्रवण' झाले पाहीजे! असे 'श्रवण' घडले तरच.... 'संचित आणि क्रियमाण', अल्पप्रमाणातही उरणार नाही... ! ( मग प्रारब्धाच काय? हे विचार करण्यासारख आहे.. त्याचे काय होते?).
आपले 'श्रवण' असे असते का? जर नाहीतर मग आता काय करायचे? आपले असे 'श्रवण' घडत नाही.. त्यामूळे 'अकृत्रिम प्रेम' ही उपजत नाही.. आणि हे मुख्य 'वर्मच' जर गवसले नाही.. तर 'भक्ति' फारच दूर रहाते... असे श्रीसाईवचन आहे!
धन्यवाद!
मा. नितीनजी, >>>तो दिप
मा. नितीनजी,
>>>तो दिप संपुर्ण विझु नये म्हणुन मी रोज एक अध्याय वाचन करतो त्याच सोबत महाराजांचे दर्शन आणि काही नित्य उपासना मात्र नित्य करतो.
'दिप' म्हंटला की... वात, तेल आणि अग्नि आलेच! या सगळ्याची काळजी 'नित्य' घ्यायला लागेल.. नाही काय?
गौरी, >>>मी जेव्हा इथे
गौरी,
>>>मी जेव्हा इथे गुरुद्वारा मधे जाते, तिथे देवाची प्रार्थना करताना, 'नाम दी बक्षिश दे' असे परमात्म्याला विनवण्यात येते. तुझेच नाम घेण्याची, स्मरण करण्याची तुच बुद्धी दे.
आपण प.पू. श्रीसद्गुरु नानकमहाराज आणि त्यांचे संप्रदाय उत्तराधिकारी पू.श्रीअंगद महाराज( पूर्वाश्रमीचे श्री लहणाजी) यांच्या गुरु-शिष्य नात्याविषयी वाचले आहे काय?
नमस्कार सावट, माझे फार वाचन
नमस्कार सावट,
माझे फार वाचन नाही पण गुरुद्वारा मधे कथा, किर्तनाच्या माध्यमातुन जी गुरु अंगद देव महाराजांची महती कानावर पडली आहे तेवढी इथे मांडायचा प्रयत्न करते.
गुरु अंगद देव पूर्वाश्रमीचे भाई लेहणा ( एक हिंदु). माता वैष्णोदेवीचे निस्सीम भक्त. गुरु नानकांची किर्ती ऐकल्यावर, एकदा देवीचे दर्शन घेऊन परतताना, गुरु महाराजांचे दर्शन घेतले आणि त्यांचे त्या क्षणापासुन भक्त बनले. आपण जे इतके वर्ष शोधतोय ते ह्यांच्या पायापाशी आहे हे त्यांना गवसले.
प्रत्येक गुर्वाज्ञेचे त्यांनी पालन केले होते. त्याबद्द्ल बर्याच कथा आहेत पण त्यापैकी एक चांगलीच लक्षात राहिली.
एकदा एक योगी - बाबा बुध्दा गुरु महाराजांच्या दर्शनाला आले आणि त्यांचा अफाट शिष्यसमुदाय पाहुन त्यांचे कौतुक करु लागले. त्यावर गुरु महाराजांनी त्यांना हसुन म्हटले की ठीक आहे आपण उद्या काय ते पाहुया. त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना दुसर्या दिवशी सकाळी प्रभातफेरीसाठी तयार राहायला सांगितले.
दुसरा दिवस काही वेगळाच होता, आकाशात वीज कडाडत होती, सोसाट्याचा वारा आणि पाऊस होता. त्यात गुरु महाराजांचे रुप ही वेगळे भासत होते, हातात धारदार सुरा आणि हातात अजस्त्र कुत्रे! काही शिष्यगण त्या रुपाला पाहुनच चरकले आणि प्रभात फेरीतुन बारगळले, तर बाकीच्यांनी गुरुची आज्ञा पाळायची म्हणुन त्यांच्याबरोबर चालायला सुरुवात केली. वाट जंगलातली होती.
जंगलातले बरेच अडथळे पार केल्यावर काही शिष्य कंटाळले, तरी चालत होते. थोडे पुढे गेल्यावर त्यांना वाटेत तांब्याची नाणी दिसली. ती आपल्यासाठीच गुरु महाराजांनी ठेवली आहेत कारण गुरु आज्ञा आपण पाळली असे समजुन ती नाणी तिथे वेचत बसले. थोडे पुढे गेल्यावर रुप्याची आणि सोन्याची नाणी दिसली, ती वेचण्यात बाकीचे शिष्य गढुन गेले. सरतेशेवटी योगी, गुरु आणि भाई लेहणा राहिले.
थोडे आणखीन पुढे गेल्यावर तिथे एक झाकलेले, सडलेले प्रेत दिसले. गुरु महाराजांनी सांगितले, जा आणि ते प्रेत खा. योगी घाबरुन गेले आणि तिथेच उभे राहिले, तर भाई लेहणा प्रेताजवळ पोचुन महाराजांची आज्ञा घेऊ लागले की सुरुवात कुठुन करु? मध्यभागापासुन असा आदेश मिळाला, भाई लेहणांनी प्रेतावरची चादर दुर केली तेव्हा प्रेताच्या जागी फुलांचा सडा दिसला आणि मध्यभागी हलव्याचा प्रसाद. ते दृश्य पाहुन योग्याने, गुर्वाज्ञेचे पालन करणार्या भाई लेहणांना गुरुंचेच दुसरे 'अंग' म्हटले म्हणुन गुरुगद्दीवर बसवल्यावर त्यांचे नामकरण गुरु अंगद देव असे करण्यात आले.
प्रत्येक शीख गुरुंनी गुरुगद्दी वारसा पुढे चालवावा म्हणुन पुढच्या पिढीला दिली नाही तर ती योग्य व्यक्तीच्या हाती सोपवली. प्रत्येक गुरुचे कार्य महान आहे, गुरु अंगद देवांनीही महान कार्य केले, त्यांना दुसरे नानक म्हटले जाते. धन्य तो गुरु-शिष्य महिमा.
संदर्भ आला म्हणुन कथा लिहीली. काही चुकले असेल तर माफ करा.वाहेगुरुजी का खालसा वाहेगुरुजी की फतेह!
सावट, आपले वाचन अफाट आहे आपल्याला प्रणाम!
| बोलो सो निहाल सत श्री अकाल
| बोलो सो निहाल सत श्री अकाल |
गौरी, तुम्हाला शिख धर्माबद्दल
गौरी, तुम्हाला शिख धर्माबद्दल एवढी आवड कशी काय ? अजुन काही माहिती असेल तर एक वेगळा धागा चालू करून तिकडे लिहाल का ?
महेश, इथे जवळपास देऊळ नाही.
महेश,
इथे जवळपास देऊळ नाही. एकदा देवळात जायची खुप इच्छा झाली पण खुप लांब असल्याने गुरुद्वारा मधे जाऊन दर्शन घेऊया असे वाटले. तिथे दर्शन घ्यायला गेलो ते नेमके लंगरच्या वेळी. खोटे नाही बोलणार, पण तो प्रसाद एवढा गोड लागला की प्रसादाच्या ओढीने म्हणुन जाऊ लागलो. त्यानंतर कथा, किर्तन ऐकायचे भाग्य मिळाले आणि जसे जमेल तसे, बाबाजींची इच्छा असेल तेव्हा जाणे होते.
तिथे गेल्यावर एक वेगळेच समाधान मिळते, शेवटी काय त्या परमात्म्याची इच्छा असेल त्याची गोडी तोच लावतो.
आपल्या सगळ्यांसाऱखे माझे खुप वाचन नाही, जेवढे कानावर पडेल तितकीच माहिती आहे. वेगळा धागा नाही पण काही संदर्भ निघाला आणि त्याविषयी काही माहिती इथे लिहिण्यासारखी असेल तर नक्की लिहिन.
विषयांतर मोड ऑन --- मला शिख
विषयांतर मोड ऑन ---
मला शिख धर्म खुप आवडतो, ते वेगळा धर्म का म्हणतात राम जाने.
भारतात असलेल्या अनेक जनजातींमधे हे लोक खुप वेगळे आणि भारी वाटतात मला.
जमल्यास लवकरच एक धागा सुरू करावा म्हणतो.
वाहे गुरूजी दी फतेह वाहे गुरूजी दा खालसा !
विषयांतर मोड ऑफ ---
@सावट : तुम्ही जगाच्या पाठीवर कुठे भेटू शकाल ?
शेवटी काय त्या परमात्म्याची
शेवटी काय त्या परमात्म्याची इच्छा असेल त्याची गोडी तोच लावतो. >>> अगदी अगदी गौरी
महेश, सावट जगाच्या पाठीवर फक्त माबोच्या धार्मिक बाफांवरच भेटतात असं वाटतंय. मी देखिल त्यांना तुम्ही कुठे रहाता असं विचारलं होतं, त्यांनी उत्तर टाळलं होतं. असो, कदाचित या आय्.डी.ची धार्मिक बाफवरती लिहिण्याची एक खासियत आहे, हा आय्.डी. त्यांच्या विचारांशी इतका घट्ट जोडला गेलाय की आपल्यालाही 'सावट' म्हणजे धार्मिकवरच्या अत्यंत दर्जेदार पोस्ट्स हेच समिकरण बघायला आवडेल. त्यांच्या बाकिच्या आयुष्यात ते नक्कीच आपल्यासारखे इतर आवडी असणारे, मित्र परिवार असणारे (सं: पुर्वी वाचलेली झक्कीकाकांसंबंधातली पोस्ट) असणार परंतू आपण करतोय तशी आयडेंटिटी डिस्क्लोज न केल्यानेच 'हा आय्डी म्हणजे फक्त आणि फक्त अध्यात्म' ही तयार झालेली त्यांच्याबद्दलची कल्पना डायल्युट झाली नाहिये :-). त्यामुळे मला एकाअर्थी सावट यांचा आय्डेंटिटी डिस्क्लोज न करण्याचा निर्णय पटला आहे.
अश्विनी के, सहमत आहे. शेवटी
अश्विनी के,
सहमत आहे. शेवटी ब्रम्हाचा तरी ठाव ठिकाणा कोठे लागतो.
गौरी, प्रणाम! छान सांगितले
गौरी,
प्रणाम!
छान सांगितले आहे, धन्यवाद!
प.पू.श्री नानकजीमहाराजाविषयी, पू.श्री अंगददेवांच्या मनात असलेली 'अनन्यता' वरील प्रसंगात ठळकपणे जाणवते... म्हणूनच स्वत: च्या दोन मूलांची 'गद्दी' वर बसण्याची इच्छा डावलून, श्रीलहणाजींना, प.पू.श्री महाराजांनी आपला उत्तराधिकारी निवडले.
याच प्रसंगात... प.पू. श्रीनानकजींनी आपल्या हातातील काठीने, समोर दिसेल त्याला झोडपायला सुरुवात केल्यावर, सगळ्यात शेवटी श्रीलहणाजी मुकाट्याने मार खात राहीले... बाकी सगळ्यांनी कधीच धूम ठोकली होती... खुद्द त्यांच्या मुलांचा असा ग्रह झाला की, प. पू.श्रीमहाराजांचे डोके ठिकाणावर नाही.. !
मार खात असलेल्या श्रीलहणांजीना पाहून.. शेवटी प.पू. श्री महाराजांनी आपली 'लीला' आवरली आणि श्रीलहणाजींना प्रश्न केला,"अबे लहणें, तू भागता क्यूं नहीं, क्यू पिटंता जा रहा हैं?"
मित्रहो... श्री लहणाजींनी जे उत्तर दिले त्याकडे आपले पुर्ण अवधान पाहीजे... ते म्हणतात,"गुरुजी भागूं तो किधर भागू? आपके सिवा मेरा ये दुनियामें कोई नहीं हैं!" एवढे शब्द ऐंकताच प.पू. श्री महाराजांचे उसने अवसान गळून पडले.. त्यांनी श्रीलहणाजींना पोटाशी कवटाळले... दोघांच्याही प्रेमाश्रूनीं लौकिकातले 'गुरू-शिष्य' हे 'द्वैत' जणू एकच झाले!
...अशी शरणागती जर साधली, तर श्रीगुरू आपल्या शिष्याला, आपल्यासम करून सोडतात हेच परत एकदा अधोरेखित झाले.
धन्यवाद!
महेश, >>>मला शिख धर्म खुप
महेश,
>>>मला शिख धर्म खुप आवडतो, ते वेगळा धर्म का म्हणतात राम जाने.
भारतात असलेल्या अनेक जनजातींमधे हे लोक खुप वेगळे आणि भारी वाटतात मला.
लोक वेगळे आणि भारी असल्यामूळे, हा 'धर्म' आवडतो असे आपल्यास म्हणावयाचे आहे की काय?
धर्माची मूळ मूल्ये-तत्वे पहायला हवीत, कारण 'धर्म' हा धर्म म्हणून जाणला जातो ते त्या मूल्यामूळेच!
बाकी, आपण कोणत्या धर्मात जन्म घ्यावा.. आपले आई-बाप कोण असावेत, यावर आपला आधिकार असतोच कोठे? आणि मग 'धर्म' कोणताही असला तरीही, श्रीसद्गुरुतत्व आपले काम करणार नाही काय?
धन्यवाद!
सावट, आपल्याशी सहमत आहे. इकडे
सावट, आपल्याशी सहमत आहे.
इकडे लिहिणार्या (आणि वाचणार्या देखील) सर्वांना एक विनंती,
नुकताच "नाचू किर्तनाचे रंगी" या नावाचा धागा सुरू केला आहे.
त्यावर आपले विचार लिहावेत. धन्यवाद !
ते म्हणतात,"गुरुजी भागूं तो
ते म्हणतात,"गुरुजी भागूं तो किधर भागू? आपके सिवा मेरा ये दुनियामें कोई नहीं हैं!" एवढे शब्द ऐंकताच प.पू. श्री महाराजांचे उसने अवसान गळून पडले.. त्यांनी श्रीलहणाजींना पोटाशी कवटाळले... दोघांच्याही प्रेमाश्रूनीं लौकिकातले 'गुरू-शिष्य' हे 'द्वैत' जणू एकच झाले!
>>> अगदी डोळ्यासमोर घडतंय असं वाटलं. वाचताना तोच भाव मनात उमटला
तयावीण नाही ध्यान | तयावीण न लक्ष आन |
तोच एक नित्य अनुसंधान | नवलविंदान गुरुचे || ६६ ||
हीच माझ्या गुरुची अपेक्षा | काही न इच्छी तो यापेक्षा |
केली न माझी केव्हा न उपेक्षा | संकटी रक्षी सदैव || ६७ ||
तसेच..
तू मजकडे अनन्य पाही | पाहीन तुजकडे तैसा मीही |
माझ्या गुरुने अन्य काही | शिकवले नाहीच मजलागी || ७३ ||
न लगे साधन संपन्नता | न लगे षट्शास्त्रचातुर्यता |
एक विश्वास असावा पुरता | कर्ता हर्ता गुरु ऐसा || ७४ || (श्रीसाईसच्चरित अध्याय १९)
आपण कोणत्या धर्मात जन्म
आपण कोणत्या धर्मात जन्म घ्यावा.. आपले आई-बाप कोण असावेत, यावर आपला आधिकार असतोच कोठे? आणि मग 'धर्म' कोणताही असला तरीही, श्रीसद्गुरुतत्व आपले काम करणार नाही काय? >>> अगदी अगदी.
महेश, किर्तनाचा धागा वाचला. माझ्याकडे त्यात भर घालायला फारसं काही नाही. कारण किर्तनं ही मी खूप लहानपणी रामनवमी व इतर उत्सवांच्या निमित्ताने अतिशय आवडीने ऐकल्येत, त्यात रंगून गेलेय. प्रायमरीत असताना राष्ट्रीय किर्तनकार गोविंदबुवा आफळेंच किर्तन ऐकलं. पण आता किर्तनं पहायचा योग कित्येक वर्षांत आला नाही. अर्थात तो धागा अजून समृद्ध झाला की वाचायला नक्कीच आवडेल. अन्य ग्रंथांतून थोडेफार उमगलेले दासगणूंच्या किर्तनांचे प्रसंग मनात साठवलेले आहेत
सद्गुरु म्हणजे काय? त्यांचं
सद्गुरु म्हणजे काय? त्यांचं मुख्य कार्य हे की ते आपल्या प्रभामंडलाचे रक्षण करतात. आपल्या क्षणोक्षणी बदलणार्या विचारां/आचारांनुसार त्याची फ्रेम बदलतात. ही फ्रेम बदलणे हे आपल्या प्रभामंडलाच्या रक्षणासाठीच असते. प्राण्यांना प्रभामंडल नसते परंतु ज्या क्षणी मानवाचा जन्म मिळाला त्याक्षणी आपल्याला प्रभामंडलाची देणगी मिळते.
सावट आणि इतर सगळे, गजानन
सावट आणि इतर सगळे,
गजानन महाराजांनी 'कशापासून जग झाले' याचे मनन करायला सांगितले आहे. त्यावर तुमचे सगळ्यंचे विचार ऐकायला आवडतील.
हसरी, वरवर बघितले तर बाफच्या विषयापेक्षा वेगळा विषय आहे. पण तरी प्रश्ण इथेच विचारतोय. चालेल ना?
हसरी, नमस्कार! >>>मला
हसरी,
नमस्कार!
>>>मला गुरुचरित्राच्या १४ व्या अध्यायाचा (अर्थ) हवाय प्लिज द्याल का?
हसरी, स्त्रियांनी श्रीगुरूचरित्र(मूळ) वाचू नये, असे शास्त्र सांगते. आपल्याकडून शास्त्र मर्यादेचे उल्लंघन होऊ नये याकडे आपले कायम 'लक्ष' पाहीजे. शास्त्र ज्यावेळी एखादी गोष्ट करू नये, असे सांगते त्यावेळीच आपण शास्त्राचे 'आभार' मानले पाहीजेत, कारण शास्त्र आपल्या भल्याविषयीच सांगत असते.
पण आपण लहान मूलासारखे करतो.. एखादी गोष्ट करू नको असे म्हंटल्यावर.. परत बालबोध वृत्तीने तीच करतो..आणि परत दुसर्यास सांगतो... काही होत नाही! पण नकळतपणे आपण 'शास्त्र' चुकीचे आहे असेच सांगत असतो. विस्तव- निखारा हातात जाणतेपणी घ्या किंवा अजाणतेपणी घ्या.. चटका दोन्हींही प्रसंगात बसणारच!
(श्रीगुरूनीं तसे वाचण्याविषयी सांगितले असेल.. तर ते त्या व्यक्ती पुरतेच मर्यादीत असते... ! )
प.पू. श्रीमाऊलींच्या भाषेत सांगायचे असेल तर...
शास्त्र म्हणेल जें सांडावें | तें राज्यही तृण मानावें |
जें घेववी तें न म्हणावें | विषही विरु || श्री ज्ञा. १६.४६० ||
शास्त्र सांगत असेल की ... हाती असलेले 'राज्य' ही सोड.. तर ते गवतासमान मानून सोडावयास हवे!
जर शास्त्र सांगत असेल... जर 'घे'.. तर ते विषही असेल तर ते ही घेण्यास मागे पुढे पाहू नये ..!( वर गौरींनी सांगितलेले 'सडलेले प्रेत खाणे' हे उदाहरण बोलके आहे )
ऐसिया वेदैकनिष्ठा | जालिया जरी सुभटा |
तरी कें आहे अनिष्टा | भेटणें गा ? || ४६१ ||
शास्त्रावर अशी 'निष्ठा' असेल तर त्या व्यक्तीचे 'अनिष्ट' कधीही होणार नाही. ( म्हणजेच विरुद्ध अर्थाने.. अशी निष्ठा-विश्वास जर नसेल तर.. आपण आपल्या मनास वाटेल तसे वागू, तर जे जे करू ते ते अनिष्ठच असेल.)
हसरी, हे असो! आता आपण १४ वा अध्याय थोडक्यात पाहू...
श्रीमद भगवन श्रीयती नृसिंहसरस्वती आपल्या भाऊ-बहीण, आई-वडील.. गावकरी यांचा निरोप घेऊन कारंजानगरीच्या बाहेर पडले आणि आपल्या शिष्य वर्गास जावून मिळाले. पुढे श्रीगोदावरी तीराने श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर.. नाशिक करत श्रीवासरब्रह्मेश्वर स्थळी पोहचले. त्रिकाळ स्नान-संध्या, रोजची उपासना.. साधना चालूच होती. सकाळच्या प्रहरात श्री महाराजांनी पोटशूळाने ग्रस्त असणार्याचे पोटशूळ थांबवले.( १३ वा अध्याय),'सायंदेव' नामक भक्त पादपुजा करून गेला.
असा हा दिवस संपल्यावर.. संध्यासमयी.. तेथील 'यवन' राजाचा दूत, सायंदेवाच्या घरी, 'राजाने बोलावले आहे' असा निरोप घेऊन आला. या यवन राजाचा प्रत्येक वर्षी किमान एका ब्राह्मणाचा वध करायचा असा नियम होता. त्याला अनुसरुन 'सायंदेव' या ब्राह्मणास बोलावणे आले होते.
मृत्यू भयाने ग्रस्त असणार्या सायंदेवास, श्रीमहाराजांनी अभय दिले आणि यवनाकडे जाण्यास सांगितले. यवन मुर्च्छीत पडला.. आपल्या शरीराचे अवयव कोणीतरी ब्राह्मण तोडून काढतोय असा भास त्यास होऊ लागला. तो सांयदेवास शरण आला आणि योग्य आदर सत्कार करून सायंदेवाची त्याने आदरपुर्वक रवानगी केली.
परत १५ वर्षांनी भेटण्याची खात्री सायंदेवास देऊन, श्री महाराज पुढे निघाले...!
धन्यवाद!
____/\____ सावट धन्यवाद
____/\____
सावट धन्यवाद .
सावट मि गुरुचरित्र अजुन वाचले नाही. आणि मला त्याबद्दल काहिच माहिती नाही.पण मला त्याचा १४ वा अध्याय वाचायला सांगितला आहे. मला त्याचा अर्थ कळला नाही म्हणुन तुम्हाला विचारले.
आता काय करु? सांगा.
माधव माझी काहीच हरकत नाही.
मला अध्यात्माची आवड आहे. पण मला त्याविषयी निटसे माहिती नाही सुरुवात आहे त्यामुळे माझ्या अनेक प्रश्नांची समाधानाचे उत्तर सावट आणि आश्विनी कडुन मिळतात. मला माहिती नसल्यामुळे मि हा बाफ वाचते अडखळ्यास ईथेच विचारते.
हसरी, श्रीगुरूनीं- अधिकारी
हसरी,
श्रीगुरूनीं- अधिकारी व्यक्तींनी ( श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ) तसे वाचण्याविषयी सांगितले असेल.. तर ते 'शास्त्र' वचनच समजून अगदी तसेच करावे.
सावट, एक विनंती आहे
सावट, एक विनंती आहे गुरुचरीत्राच्या प्रत्येक अध्याय सांगा ना. जाणुन घ्यायची इच्छा आहे.
स्त्रियांनी
स्त्रियांनी श्रीगुरूचरित्र(मूळ) वाचू नये, असे शास्त्र सांगते. आपल्याकडून शास्त्र मर्यादेचे उल्लंघन होऊ नये याकडे आपले कायम 'लक्ष' पाहीजे. >>>
असा उल्लेख मी श्रीगुरुचरित्राच्या प्रस्तावनेत की कुठे तरी, पण त्या पोथीतच वाचला आहे. पण तसे का बरं सांगितले असावे? हा प्रश्न मी केवळ कुतुहल म्हणून विचारतेय, कुजकटपणे विचारत नाहिये किंवा शास्त्राबद्दल शंका घेऊन विचारत नाहिये. योग्य माहितीसाठी प्रश्न पडणे हे देखिल आवश्यक आहे. शास्त्रातील वचने ही नेहमी ट्रान्स्परंट असतात त्यामुळे त्याचे कारणही माहितीसाठी कदाचित उपलब्ध असेल. कदाचित असंही असेल की या पठणातून मिळणारी स्पंदने स्त्रियांसाठी खूप कडक पडू शकत असतील (मासिक धर्मामुळे वगैरे मानसिक वा शारीरिकदृष्ट्या संवेदनशीलता आलेली असते). तसेच या ग्रंथात पुरुषांसाठीही खूप कडक पथ्ये सांगितली आहेत. आजच्या काळात हे कितपत पाळणं शक्य असेल कुणास ठाऊक
माझ्या सद्गुरुंनी सर्वांनाच १४वा अध्याय रोजच्या पठणात ठेवण्यास सांगितले आहे. सद्गुरुवचन म्हणजेच आज्ञा असे मानत असल्याने आम्ही तो अध्याय वाचतो. त्यांचीच आज्ञा असल्याने तो ग्रंथ आम्ही वाचण्याबद्दल भिती आमच्या मनात येत नाही. कितीतरी वेळा मी सकाळी जागी झालेय ती हा अध्याय पुटपुटतच. कुणी मूळ मराठी वाचतं कुणी संस्कृतात भाषांतर केलेला वाचतं. आम्ही कुणीही कानमंत्र वगैरे घेतला नसल्याने किंवा आमचे सद्गुरु असा कानमंत्र वगैरे देत नसल्याने (श्री गजानन विजय मध्येही महाराजांनी कानमंत्राची गरज गुरु करण्यासाठी नसल्याची कथा आहे) ही आज्ञा आम्ही सरसकट सर्वजण मानतो.
फक्त श्रीदत्तयाग, महालक्ष्मी/महाकाली/महासरस्वती यांच्या दर्शनाला मासिक धर्माच्या वेळी जायचे असेल तर पहिल्या दिवशी खूप लांबून दर्शन घेतले जाते कारण ती स्पंदने सोसू शकत नाहीत.
अश्विनी, नमस्कार! श्रीसद्गुरू
अश्विनी,
नमस्कार!
श्रीसद्गुरूवचन म्हणजेच शास्त्रवचन! त्याची कास धरायची नाही तर मग कोणाची धरायची?:)
>>>तसेच या ग्रंथात पुरुषांसाठीही खूप कडक पथ्ये सांगितली आहेत. आजच्या काळात हे कितपत पाळणं शक्य असेल कुणास ठाऊक?
अगदी खरे आहे मल्-मूत्र विसर्जनानंतर पुरुषासही स्नान करने बंधन कारक आहे. काळ कोणताही असो निसर्गाचे नियम आपल्याकरता बदलत नाहीत. काळ बदलला म्हणून आपण जेवायचे सोडत नाही.. झोपही लागतेच.. सकाळी आपण आंघोळ करतोच (मग कारण काहीही असो! )
बर्याच वेळा आपल्यास असे वाटते कि, सर्व परमेश्वरानेच बनविले आहे.. तो तर निर्गुण.. विधीनिषेधापलीकडचा आहे.. मग हे सोवळे-वोवळे कशासाठी? पण इथे 'प्रश्न' परमेश्वराचा नसून आपला आहे...हे आपण विसरतो. आपण प्रकृतीच्या अधिन आहोत..बंधनात आहोत... सगुणात आहोत. म्हणूनच आपला परमेश्वरही आपण 'सगुणातच' पहातो. आणि सगुण म्हटंलेकी प्रकृतीचे नियम परमेश्वरालापण लागू होतात.
असो..
जसे शरीर... तसा स्वभाव... तसे नियम.. हे अगदी स्वाभाविक-नैसर्गिक आहे. अगदी लहान मुलगा घेतला तर आपल्यास जाणवते त्याचे खेळणे वेगळे असते... खेळ-गाड्या याकडे नैसर्गिक ओढा असतो... तर लहान मुलगी.. बार्बी-टिकल्या-वेगवेगळे ड्रेस.. कानातले वैगरे याकडे ओढा असतो. यात चूक-बरोबर... श्रेष्ठ्-कनिष्ठ असे काहीच नाही... शरीर स्वभावच्-धर्मच तसा आहे. म्हणजेच निसर्गताच स्त्रि-पुरुष शरीर भिन्न आहे. आपल्याला काय वाटते किंवा काळ कोणता आहे यानुसार हे धर्म चालत नाहीत.
म्हणूनच शास्त्र ज्यावेळी पुरुषांना एखादि उपासना चालेल असे सांगते.. ते त्यांच्या शरीरधर्माला अनुसरून असते. जसे ज्यावेळी एखाद्या शरीराला( स्त्रि-पुरुष ) 'मधूमेह' झाला आहे असे ठरते, त्यावेळी त्या शरीराला 'गोड' खाणे म्हणजे अपथ्य आहे... हे आपोआप मानले जाते. तसेच स्त्रियांना होणारे काही रोग हे फक्त स्त्रि शरीरालाच होतात... पुरुषाचा शरीरधर्म वेगळा असल्यामूळे तो रोग पुरुषशरीराला निसर्गताच होणार नाहीत... हे अगदी सहज पटण्यासारखे आहे.
हे जर पटलेतर, आपल्याला शास्त्र असे का म्हणते हेही आपोआप पटेल.
श्रीगुरूचरित्राच्या काही अध्यायात( १४ व्या अध्यायात नाही.:)) काही वैदिकमंत्र असे आहेत की जे पुरुषाच्या शरीराला( सगळे नियम पाळून... अन्यथा पुरुष शरीराला ही नाही.. हे लक्षात घेण्यासारखे आहे) अनुसरून लिहले आहेत. स्त्रियांनी ते वाचू नयेत... याचा अर्थ असाही होतो की स्त्रियांनी ते वाचायची गरज नाही.. त्यांच्या करिता अजून सोपा-वेगळा- शरीरधर्माला अनुसरून, मार्ग असणारच आहे....! शेवटी ध्येय गाठण्याशी मतलब आहे.. नाही काय? प्रवचनासाठी जमलेली गर्दी पाहिलीतर असे जाणवते की स्त्रियांचा भरणा जास्त असतो... याचाच अर्थ त्यांची श्रद्धाही परमेश्वरावर सहज बसते...म्हणून परमेश्वरही स्त्रियांना सहज साध्य असतो.
असो .. आता थांबतो!:)
धन्यवाद!
अश्विनी, एक उदाहरण पाहू
अश्विनी,
एक उदाहरण पाहू म्हणजे विषय अजून लक्षात येईल.
इ.स. १९०८ च्या सुमारास प.पू. श्रीसद्गुरु टेंब्ये स्वामींचा मुक्काम पुण्यात भरत नाट्य मंदीरा शेजारी होता. श्री महाराजांच्या दर्शना करता गर्दी उसळली होती. त्याच वेळी जवळच्या तालमीत सकाळी कसरती करून जाता जाता श्रीस्वामींचे दर्शन घ्यावे, या चांगल्या उद्देशाने चार-पाच तरूण मंडळी आली.
श्री महाराजांनी प्रश्न केला, " स्नान-संध्या झाली आहे काय?" तर ती मंडळी पारोशी होती. त्यातला एक मुलगा म्हणत होता .. नुसते दर्शन तर घ्यायचे आहे!
श्रीस्वामींच ते.... त्यांनी थोडे जोंधळे आणावयास सांगितले. स्वतःच्या समोर एक रेघ मारली आणि त्या मुलास लांबून ते जोंधळे त्या रेषेच्या पलीकडे टाकण्यास सांगितले. असे करताच त्या जोंधळ्याच्या.. तडतड आवाज करत... लाह्या झाल्या! ते पाहून ती मुले चांगलीच घाबरली.
श्रीमहाराज म्हणाले... , " पाहीलेत जोंधळ्याच्या दाण्याचे काय झाले... त्याच ठीकाणी तुमची पारोशी मस्तके असती तर काय झाले असते!"
मग त्या मूलांनी क्षमा मागून, यथाविधी स्नानसंध्या करून, अतिव-आदराने विधीवत दर्शन घेतले.
असे हे आपले श्रीस्वामी महाराज... कृतीने पटवणारे!
धन्यवाद!
अगदी बरोबरच आहे. मला वाटतं
अगदी बरोबरच आहे. मला वाटतं तुमचं प्रभामंडल जेवढं स्ट्राँग होतं तेवढी पवित्र स्पंदनं स्विकारायची ताकदही वाढते. तसंच सततचं नामस्मरण, सततच्या नित्य उपासना, आज्ञा करुन दिल्या गेलेल्या उपासना यांनीही ते स्ट्राँग होत असतं. अशावेळी कदाचित आपल्याला (म्हणजे निदान मला तरी) कळत नाही की कोण काय स्विकारु शकतं पण सद्गुरु ते नक्की जाणतात.
रुपमहात्म्य म्हणजे नित्य दर्शनमहात्म्य हे सिमकार्डसारखं असतं आणि नाममहात्म्य/गुणसंकिर्तन हे कनेक्टिव्हिटी राखतं. हे दोन्ही जिथे सातत्याने असतं तिथे परमात्म्याशी / सद्गुरुंशी अनुसंधान ब्रेक होत नाही. सिग्नल्स नाहिसे होत नाहीत. हे देखिल आपलं प्रभामंडल जास्तितजास्त शुद्ध राखायला मदत करतं.
असो, आता निघते ऑफिसातून
माधव, नमस्कार! >>>गजानन
माधव,
नमस्कार!
>>>गजानन महाराजांनी 'कशापासून जग झाले' याचे मनन करायला सांगितले आहे. त्यावर तुमचे सगळ्यंचे विचार ऐकायला आवडतील.
माधव, तुमच्या पासून सुरुवात करूयात..!:)
अश्विनी,
>>>रुपमहात्म्य म्हणजे नित्य दर्शनमहात्म्य हे सिमकार्डसारखं असतं आणि नाममहात्म्य हे कनेक्टिव्हिटी राखतं.
'नाम आणि रुप' याविषयी, माधव आता काहीतरी सांगतीलच!
महेश,
तुम्ही 'किर्तना' विषयी लिहा, आम्ही त्या 'रंगात नाचतो.' (श्री मुरलीधर निजामपूरकराविषयी जरूर लिहावे.):)
धन्यवाद!
न्याय(योग्य) आणि अ-न्याय
न्याय(योग्य) आणि अ-न्याय (अयोग्य) कर्म आणि त्या मागचा हेतु या विषयी थोडेसे पाहू...
प्रकृतीच्या अधिन असणार्या जीवात्म्याकडून... प्रकृती जबरदस्तीने... प्रकृतीच्या नियमाप्रमाणे पूर्वकर्मफळ भोगावयास भाग पाडते. जीव हा 'कर्म' करताना जरी 'स्वतंत्र' असला तरीही त्या कर्माचीफळे भोगताना तो पुर्णपणे 'परतंत्र-परस्वाधीन' असतो. जसे एखादा 'चोरी' करताना स्वतंत्र असतो.. पण त्याची शिक्षा भोगताना तो परतंत्र असतो. प्रत्येक हेतु-कारणासहीत असलेले कर्म हे 'कर्मफळ' जन्माला घालून मगच तडीस जाते.
श्रीज्ञानेश्वरमाऊली म्हणतात....
तें शास्त्रार्थें मानिलेया| मार्गा अनुसरे धनंजया| तरी न्याय तो न्याया| हेतु होय ||श्री ज्ञा.१८.३६७||
'कर्म' करताना-होताना जो 'हेतु' असतो.. तो शास्त्राला धरून असेल.. तरच त्याला 'न्याय-हेतु' म्हणतात.
जैसा पर्जन्योदकाचा लोटु| विपायें धरी साळीचा पाटु| तो जिरे परी अचाटु| उपयोगु आथी ||३६८||
कां रोषें निघालें अवचटें| पडिलें द्वारकेचिया वाटे | तें शिणे परी सुनाटें| न वचिती पदें ||३६९||
तैसें हेतुकारण मेळें| उठी कर्म जें आंधळें| तें शास्त्राचें लाहे डोळे| तैं न्याय म्हणिपे ||३७०||
जसे पावसाचे पाणी.. जरी शेतातल्या पाटाने जात असेल... तरी..ते पिकाला उपयोगी पडते... किंवा
जसे एखादा माणूस घरी भांडून-रागावून घर सोडून बाहेर पडतो..आणि अवचितपणे श्रीद्वारकेच्या वाटेला लागतो... श्रीभगवंताच्या दारी पोहचतो... मग चालताना शिण झाला तरी.. योग्य कारणासाठीच झाला.. असेच होणार.. तसेच 'हेतु आणि कारण' यांच्या मेळामुळे जे कर्म आंधळे पणाने केले जाते.. ते जर शास्त्राला धरून असेल तर.. ते कर्म 'न्याय' कर्मच म्हणायला हवे.
ना दूध वाढिता ठावो पावे| तंव उतोनि जाय स्वभावें| तोही वेंचु परी नव्हे| वेंचिलें तें ||३७१||
तैसें शास्त्रसाह्येंवीण| केलें नोहे जरी अकारण| तरी लागो कां नागवण| दानलेखीं ||३७२||
जसे तापत ठेवलेले दूध .. स्वभावताच ऊतु जाणार.. ते उपयोगात आले असे म्हणता येत नाही...
किंवा एखाद्याला चोराने लुटले, तर त्याने आपली संपत्ती 'दान' केली असे म्हणता येत नाही...
तसेच एखादे कर्म, शास्त्रसाह्यावाचून केले तर ते वाया जाते!
अगा बावन्ना वर्णांपरता| कोण मंत्रु आहे पंडुसुता| कां बावन्नही नुच्चारितां| जीवु आथी ? ||३७३||
परी मंत्राची कडसणी| जंव नेणिजे कोदंडपाणी| तंव उच्चारफळ वाणी| न पवे जेवीं ||३७४||
जसे कोणताही 'मंत्र' घेतला तरीही.. तो बावन्न वर्णातीलच असणार.. तो कोणत्याही जीवाला उच्चारता येत नाही असे म्हणता येत नाही... पण..असे असले तरीही... तो श्रीगुरुमुखातून शास्त्राला धरून जो पर्यंत त्याचा उपदेश होत नाही, तो पर्यंत तो मंत्रसिद्ध होणार नाही... उपयोगात आणता येणार नाही.
तेवीं कारणहेतुयोगें| जें बिसाट कर्म निगे| तें शास्त्राचिये न लगे| कांसे जंव ||३७५||
कर्म होतचि असे तेव्हांही| परी तें होणें नव्हे पाहीं| तो अन्यायो गा अन्यायीं| हेतु होय ||३७६||
तसेच कारण-हेतु यांच्या संयोगामुळे जे कर्म होते.. ते जर शास्त्राला धरून नसेल तरीही.. ते कर्म होतेच पण ते होणे.. त्याचा हेतु ..हा 'अ-न्यायी' च असणार .. नाही काय?:)
धन्यवाद!
कशापासून जग झाले? वरवर पहाता
कशापासून जग झाले?
वरवर पहाता याचे उत्तर येते - या जगातल्या गोष्टीं मिळून हे जग बनले आहे. या गोष्टीत विविधता आहे. येथे एक गोष्ट दुसरी सारखी नसते. या विविधतेमुळे प्रत्येक गोष्टीला नाम आणि रुप प्राप्त होते. रुप म्हणजे त्या वस्तुच्या ठिकाणी असलेल्या गुणधर्मांचा (attributes) संच. म्हणजे त्या वस्तुचा आकार, रंग, गंध, भौतिक अवस्था (घन / द्रव / वायु), पोत आणि असेच इतर गुणधर्म. असे अनेक गुणधर्म मिळून त्या वस्तूचे वर्णन पूर्ण होते. जितके गुणधर्म जास्त तितके ते वर्णन परिपूर्ण असते.
या मायेच्या आवरणाखालची प्रत्येक गोष्टीला एक नाव असते. म्हणजे जशी माणसाने त्याच्या आसपासच्या गोष्टींना दिलेली नावे. आपण त्या गोष्टींना त्या नावांनेच ओळखतो. पण माणूस ही बरीच वरची पायरी झाली. प्रत्येक सजीव ज्या पेशीपासून बनलेला असतो तिला पण एक नाव असते आणि ते तिच्यातल्या डीएनए वर लिहिलेले असते. त्या नावानेच इतर पेशी तिला ओळखतात आणि त्यानुसार तिच्याशी देवाणघेवाण करतात.
त्यामुळे या मायेच्या जगातला प्रत्येक कण हा नाव आणि रुप घेउनच अवतरतो. आणि या नाव आणि रुपामुळेच प्रत्येक कण हा दुसर्या कणापेक्षा वेगळा ठरतो. म्हणजे मायेचा हा खेळ नाम आणि रुप यांच्यावरच आधारलेला असतो. म्हणूनच दासगणू महाराज म्हणतात 'नामरुपाचा गलबला प्रकृतिच्या आश्रयास'.
आता ही पोस्ट इथेच संपवतो, पण वस्तूची खरी ओळख अजून संपलेली नाही.
Pages