Submitted by राफा on 1 December, 2010 - 05:45
‘पुणेरी पाट्या’ संस्कृतीचे आक्रमण 'मॅकडोनाल्ड्स' वर झाले तर ?
- आमचे येथे बर्गर व परकर मिळतील. तसेच बाहेरील खाद्य पदार्थांस एक रुपयात सॉस लावून मिळेल.
- ह्या ब्रांचचे मालक इथेच जेवतात (टीप: मालकांच्या वजनाची चौकशी करू नये - हुकूमावरून)
- दोन माणसात तोंड पुसायचे तीन कागद मिळतील. नंतर ज्यादा आकार पडेल.
- कारणाशिवाय बसू नये. कारण काढूनही बसू नये. फक्त खाण्यासाठी बसायची सोय.
- टिव्ही चालू ठेवायचा किंवा नाही हा निर्णय व्यवस्थापनाचा आहे. तरी बंद टिव्हीचा आरशासारखा उपयोग करून केस वगैरे विंचरू नयेत.
- टिव्ही चालू असेल तरी फार पहात बसू नये. हे खाद्यगृह आहे प्रेक्षागृह नव्हे.
- कृपया फ्रेंच फ्राईज मोजून घ्यावेत. नंतर तक्रार चालणार नाही. (लहान साईज: १९ फ्राईज, मध्यम : २७ फ्राईज, मोठा: ४६ फ्राईज)
- गि-हाईकांचा संतोष हेच आमचे ध्येय. (व्यवसायाच्या वेळा : ११ ते १ व ४ ते ८. तक्रारीची वेळ : ११ ते ११.०५)
- पहिल्या दहा मिंटात ऑर्डर मिळाली नाही तर.. पुढच्या दहा मिंटात मिळेल ! पैसे परत मिळणार नाहीत.
- कृपया ड्राईव थ्रू च्या खिडकीवरील मुलीशी गप्पा मारू नयेत.
- विनाकारण सॉस मागू नये. टमाटू फुकट येत नाहीत.
- शीतपेयाच्या ग्लासच्या झाकणास भोक पडलेले नाही तर चोखनळी (स्ट्रॉ) साठी पाडलेले आहे. बदलून मिळणार नाही ह्याची नोंद घ्यावी.
- दुस-या कंपनीच्या बरगरच्या किमती इथे सांगू नयेत.
- उरलेले अन्न नेण्यास घरून डबा आणावा. कागदी वा प्लास्टिक पिशवी मिळणार नाही.
- हॅपी मिलची खेळणी संपलेली आहेत (ही पाटी कायमची का आहे ते विचारू नये - हुकूमावरून)
- आमची कुठेही शाखा आहे ! (पण दुस-या शाखेच्या तक्रारी इथे सांगू नयेत)
- कृपया बाहेरील आमच्या जोकरच्या पुतळ्याशी फार लगट करू नये. सभ्यपणे फोटो काढावेत.
- शीतपेय संपल्यावर ग्लास टाकून द्यावा. चोखनळीने विचित्र आवाज करत बसू नये.
- राफा
गुलमोहर:
शेअर करा
सही
सही
हे ईश्वरा ...........तु
हे ईश्वरा ...........तु सगळ्या॑चे भल कर
पण सुरवात .............माझ्यापासुन कर
(No subject)
(No subject)
(No subject)
राफा!! नेहमीप्रमाणेच तुफान
राफा!! नेहमीप्रमाणेच तुफान
दिनेशदांचे सर्वच भारी
दिनेशदांचे सर्वच भारी आहेत.
केपी यांचा एकच पण ज ब र द स्त आहे.
कृपया रांगेत शिस्तीत उभे
कृपया रांगेत शिस्तीत उभे राहून आपापले खाद्य पदार्थ न्यावेत. एकदा ऑर्डर केलेले पदार्थ संपल्यानंतर पुन्हा नवीन ऑर्डर करायचे असल्यास पुन्हा रांगेत उभे राहणे बंधनकारक आहे. (लग्नातील बुफे सारखे मध्येच घुसू नये).
दिनेशदा, दट्ट्या >>>>
दिनेशदा,
दट्ट्या >>>>
मस्त.
मस्त.
* आपली ऑर्डर ५ मिनिटांच्या आत
* आपली ऑर्डर ५ मिनिटांच्या आत नोंदवावी. इथे कुठले कुठले पदार्थ मिळतात ते आता जगजाहीर आहे. तेव्हा सर्विस काऊंटरवरच्या फलकांकडे बघत उभे राहून इतरांना अडचण करू नये.
चोखनळीबद्दलचे पोटनियमः १. एका
चोखनळीबद्दलचे पोटनियमः
१. एका शीतपेयामागे एकच चोखनळी मिळेल. तुमच्या व्रात्य मुलांनी ती जमिनीवर पाडली तर उरलेले शीतपेय वरचे झाकण काढून प्यावे. पुन्हा चोखनळी मिळणार नाही.
२. दुसर्या चोखनळीची अगदिच गरज भासली तर शेजारच्या टेबलावरच्या गिर्हाईकाकडे मागावी. चोखनळी किंवा नकार काहीतरी एक मिळेलच.
३. चोखनळीचा शीतपेयं पिण्याव्यतिरिक्त इतर काहीही वापर करू नये. तुमच्या कल्पनाशक्तीस इथे कोणत्याही प्रकारचे उत्तेजन / पारितोषिक मिळणार नाही याची नोंद घ्यावी.
४. चोखनळीचा उपयोग कान कोरण्यासाठी करण्यास बंदी आहे. हुकुमावरून.
सगळेच भन्नाट आहेत.
सगळेच भन्नाट आहेत.
>> आमची कुठेही शाखा आहे !
>> आमची कुठेही शाखा आहे !
ए धमाल! मला त्या पाट्या
ए धमाल! मला त्या पाट्या नजरेसमोर तरळू लागल्या आहेत! उद्या चुकूनमाकून मॅक्डी मध्ये गेले आणि अशा पाट्या तिथे दिसल्या तर त्याला जबाबदार तूच राफा!
काय लिहिलेय जबरी... हसुन हसुन
काय लिहिलेय जबरी...
हसुन हसुन मेले
राफाच लिहू जाणे !!!!
राफाच लिहू जाणे !!!!
कृपया ड्राईव थ्रू च्या
कृपया ड्राईव थ्रू च्या खिडकीवरील मुलीशी गप्पा मारू नयेत.
----------------------------------------------------------------
सही.
राफा
राफा
(No subject)
अशक्य हसतेय. सगळीच
अशक्य हसतेय.
सगळीच वाक्ये आणि त्यांचे प्रतिसाद भन्नाट !
मस्तं मस्तं मस्तं खूप हसायला
मस्तं मस्तं मस्तं
खूप हसायला आलं वाचून...
कृपया ड्राईव थ्रू च्या खिडकीवरील मुलीशी गप्पा मारू नयेत. ..हा हा हा
-परीक्षित
धमाल आहे....
धमाल आहे....
सॉलिड लिहिलंय
सॉलिड लिहिलंय
राफा ज ब री
राफा ज ब री
राफा रॉक्स!
राफा रॉक्स!
जबरी आहेत सगळेच
जबरी आहेत सगळेच
(No subject)
मस्त लिहिलय. आवडल.
मस्त लिहिलय. आवडल.
मस्त
मस्त
Pages