पुणेरी पाट्या आणि 'मॅक्डी' !

Submitted by राफा on 1 December, 2010 - 05:45‘पुणेरी पाट्या’ संस्कृतीचे आक्रमण 'मॅकडोनाल्ड्स' वर झाले तर ?


 1. आमचे येथे बर्गर व परकर मिळतील. तसेच बाहेरील खाद्य पदार्थांस एक रुपयात सॉस लावून मिळेल.
 2. ह्या ब्रांचचे मालक इथेच जेवतात (टीप: मालकांच्या वजनाची चौकशी करू नये - हुकूमावरून)
 3. दोन माणसात तोंड पुसायचे तीन कागद मिळतील. नंतर ज्यादा आकार पडेल.
 4. कारणाशिवाय बसू नये. कारण काढूनही बसू नये. फक्त खाण्यासाठी बसायची सोय.
 5. टिव्ही चालू ठेवायचा किंवा नाही हा निर्णय व्यवस्थापनाचा आहे. तरी बंद टिव्हीचा आरशासारखा उपयोग करून केस वगैरे विंचरू नयेत.
 6. टिव्ही चालू असेल तरी फार पहात बसू नये. हे खाद्यगृह आहे प्रेक्षागृह नव्हे.
 7. कृपया फ्रेंच फ्राईज मोजून घ्यावेत. नंतर तक्रार चालणार नाही. (लहान साईज: १९ फ्राईज, मध्यम : २७ फ्राईज, मोठा: ४६ फ्राईज)
 8. गि-हाईकांचा संतोष हेच आमचे ध्येय. (व्यवसायाच्या वेळा : ११ ते १ व ४ ते ८. तक्रारीची वेळ : ११ ते ११.०५)
 9. पहिल्या दहा मिंटात ऑर्डर मिळाली नाही तर.. पुढच्या दहा मिंटात मिळेल ! पैसे परत मिळणार नाहीत.
 10. कृपया ड्राईव थ्रू च्या खिडकीवरील मुलीशी गप्पा मारू नयेत.
 11. विनाकारण सॉस मागू नये. टमाटू फुकट येत नाहीत.
 12. शीतपेयाच्या ग्लासच्या झाकणास भोक पडलेले नाही तर चोखनळी (स्ट्रॉ) साठी पाडलेले आहे. बदलून मिळणार नाही ह्याची नोंद घ्यावी.
 13. दुस-या कंपनीच्या बरगरच्या किमती इथे सांगू नयेत.
 14. उरलेले अन्न नेण्यास घरून डबा आणावा. कागदी वा प्लास्टिक पिशवी मिळणार नाही.
 15. हॅपी मिलची खेळणी संपलेली आहेत (ही पाटी कायमची का आहे ते विचारू नये - हुकूमावरून)
 16. आमची कुठेही शाखा आहे ! (पण दुस-या शाखेच्या तक्रारी इथे सांगू नयेत)
 17. कृपया बाहेरील आमच्या जोकरच्या पुतळ्याशी फार लगट करू नये. सभ्यपणे फोटो काढावेत.
 18. शीतपेय संपल्यावर ग्लास टाकून द्यावा. चोखनळीने विचित्र आवाज करत बसू नये.- राफा

गुलमोहर: 

12.शीतपेयाच्या ग्लासच्या झाकणास भोक पडलेले नाही तर चोखनळी (स्ट्रॉ) साठी पाडलेले आहे. बदलून मिळणार नाही ह्याची नोंद घ्यावी. >>> Rofl

18.शीतपेय संपल्यावर ग्लास टाकून द्यावा. चोखनळीने विचित्र आवाज करत बसू नये. >> Lol

3.दोन माणसात तोंड पुसायचे तीन कागद मिळतील. नंतर ज्यादा आकार पडेल. >> Rofl

Rofl राफा.. पून्हा एकदा .. छा गये भिडू.

अरे देवा, हसून हसून मेले मी.....

१. आमचे येथे बर्गर व परकर मिळतील. तसेच बाहेरील खाद्य पदार्थांस एक रुपयात सॉस लावून मिळेल.

>>> अगदि, अगदि.

माझी पाटी:

"आमच्या बर्गरची मूळ कल्पना शामकाकांची आहे. जोशी वडापाववाले यांची नाही याची कृपया नोंद घ्यावी"

1] पेपर नॅपकीन तोंड पुसायला आहे पर्समधे कोंबु नये.
२] जवळ वेटर असताना लांबच्या वेट्रेसल बोलवु नये.
३] नीट इंग्रजी येत नसेल तर कृपया मराठी / हिंदीत बोला.

कृपया बाहेरील आमच्या जोकरच्या पुतळ्याशी फार लगट करू नये. सभ्यपणे फोटो काढावेत. >>> Lol

दोन माणसात तोंड पुसायचे तीन कागद मिळतील. नंतर ज्यादा आकार पडेल. >> Lol

<<टिव्ही चालू ठेवायचा किंवा नाही हा निर्णय व्यवस्थापनाचा आहे. तरी बंद टिव्हीचा आरशासारखा उपयोग करून केस वगैरे विंचरू नयेत. <<
आणि इतर सगळेच अफलातुन Rofl Rofl

राफा बॅक!!!

अरे देवा! अशक्य आहे!
Rofl laughing-smiley-018.gif

मामी इस म्हणिंग राईट. हवंतर सरळ स्क्रीनशॉट घेउन चित्र म्हणुन टाका वॉटरमार्कसहित..नाहीतर चोरीस जाण्याची शक्यता आहे!

Rofl टोमॅटो वा बटाट्यामधे आळ्या आढळल्यास (खरच आढळल्या होत्या) त्याची तक्रार शेतकर्‍याकडे करावी. शेतकर्‍याचा पत्ता हवा असल्यास वेगळा चार्ज पडेल. फोन लागला नाही तर व्यवस्थापन जबाबदार नाही.

* इथे गोमांस वापरले जात नाही, कृपया काचा तोडू नयेत.

*फ्राईजची लांबी कमीजास्त होऊ शकते, कृपया मोजत बसू नये, सरासरी लांबी काढून बघू नये.

*सॉसच्या यंत्राचा दट्ट्या फार वर खाली करु नये.

* कोडी सोडवायला पेन्सिल मिळणार नाही, आपली आपण आणावी.

*चित्रात दाखवलेय, त्यापेक्षा तयार पदार्थ वेगळा दिसू शकतो.

* इथे ज्या कंपनीचे शीतपेय मिळते, तेच मागावे.

कृपया बाहेरील आमच्या जोकरच्या पुतळ्याशी फार लगट करू नये. सभ्यपणे फोटो काढावेत. >>

शीतपेय संपल्यावर ग्लास टाकून द्यावा. चोखनळीने विचित्र आवाज करत बसू नये.
>> Rofl Lol

8.गि-हाईकांचा संतोष हेच आमचे ध्येय. (व्यवसायाच्या वेळा : ११ ते १ व ४ ते ८. तक्रारीची वेळ : ११ ते ११.०५)

9.पहिल्या दहा मिंटात ऑर्डर मिळाली नाही तर.. पुढच्या दहा मिंटात मिळेल ! पैसे परत मिळणार नाहीत.
>>>>>

एकदम खास्सच Rofl

Pages