पुणेरी पाट्या आणि 'मॅक्डी' !

Submitted by राफा on 1 December, 2010 - 05:45



‘पुणेरी पाट्या’ संस्कृतीचे आक्रमण 'मॅकडोनाल्ड्स' वर झाले तर ?


  1. आमचे येथे बर्गर व परकर मिळतील. तसेच बाहेरील खाद्य पदार्थांस एक रुपयात सॉस लावून मिळेल.
  2. ह्या ब्रांचचे मालक इथेच जेवतात (टीप: मालकांच्या वजनाची चौकशी करू नये - हुकूमावरून)
  3. दोन माणसात तोंड पुसायचे तीन कागद मिळतील. नंतर ज्यादा आकार पडेल.
  4. कारणाशिवाय बसू नये. कारण काढूनही बसू नये. फक्त खाण्यासाठी बसायची सोय.
  5. टिव्ही चालू ठेवायचा किंवा नाही हा निर्णय व्यवस्थापनाचा आहे. तरी बंद टिव्हीचा आरशासारखा उपयोग करून केस वगैरे विंचरू नयेत.
  6. टिव्ही चालू असेल तरी फार पहात बसू नये. हे खाद्यगृह आहे प्रेक्षागृह नव्हे.
  7. कृपया फ्रेंच फ्राईज मोजून घ्यावेत. नंतर तक्रार चालणार नाही. (लहान साईज: १९ फ्राईज, मध्यम : २७ फ्राईज, मोठा: ४६ फ्राईज)
  8. गि-हाईकांचा संतोष हेच आमचे ध्येय. (व्यवसायाच्या वेळा : ११ ते १ व ४ ते ८. तक्रारीची वेळ : ११ ते ११.०५)
  9. पहिल्या दहा मिंटात ऑर्डर मिळाली नाही तर.. पुढच्या दहा मिंटात मिळेल ! पैसे परत मिळणार नाहीत.
  10. कृपया ड्राईव थ्रू च्या खिडकीवरील मुलीशी गप्पा मारू नयेत.
  11. विनाकारण सॉस मागू नये. टमाटू फुकट येत नाहीत.
  12. शीतपेयाच्या ग्लासच्या झाकणास भोक पडलेले नाही तर चोखनळी (स्ट्रॉ) साठी पाडलेले आहे. बदलून मिळणार नाही ह्याची नोंद घ्यावी.
  13. दुस-या कंपनीच्या बरगरच्या किमती इथे सांगू नयेत.
  14. उरलेले अन्न नेण्यास घरून डबा आणावा. कागदी वा प्लास्टिक पिशवी मिळणार नाही.
  15. हॅपी मिलची खेळणी संपलेली आहेत (ही पाटी कायमची का आहे ते विचारू नये - हुकूमावरून)
  16. आमची कुठेही शाखा आहे ! (पण दुस-या शाखेच्या तक्रारी इथे सांगू नयेत)
  17. कृपया बाहेरील आमच्या जोकरच्या पुतळ्याशी फार लगट करू नये. सभ्यपणे फोटो काढावेत.
  18. शीतपेय संपल्यावर ग्लास टाकून द्यावा. चोखनळीने विचित्र आवाज करत बसू नये.



- राफा

गुलमोहर: 

मस्तच ....... एक से बढकर एक पाट्या आणि त्यवरचे प्रतिसाद देखील.

आता ही एक पाटी

"खाऊन झाल्यावर पैसे देऊन त्वरित निघून जावे, इथल्या पाट्या वाचत बसू नये"

प्रेमी युगलांनी येथे बसून गुटुर्गु करू नये ......हुकुमावरून
कारण नसतांना इंग्लीश बोलून वेटर ची परीक्षा घेऊ नये ..

हा हा हा हा राफा

Hay friends I am new on maayboli is anyone want to be my friend????

मलाही आताच मेल मधून आलंय हे. मूळ लेखकाच्या नावाशिवाय. Sad

I gave replied as below:
+++++++++++++++++++++++++++++
Hi,

The author of this stuff is a person on maayboli. His name is missing at the end of ur mail……….

See this link http://www.maayboli.com/node/21576

Please send this info back to the person who sent it to u…………….. and when u fwd this next time please mention the person’s name below…………… a genuine request Happy
+++++++++++++++++++++++++++++

Rofl Biggrin सही!!
१३. दुस-या कंपनीच्या बरगरच्या किमती इथे सांगू नयेत. >> सारखं
दुसर्‍या कंपनीच्या नावाचा बर्गर इथे मागू नये..
त्यावर 'आमच्याकडे ह्या नावाचा पदार्थ नाही' असे उत्तर मिळाल्यास 'का नाही?' असेही आगाऊपणे विचारु नये..! Proud

हे माझ्या एका मैत्रिणीने केलं होतं एकदा..बर्गर किंगच्या एक बर्गरची Mcडी मधे जाऊन ऑर्डर दिली आणि जागेवर जाऊन बसली..घ्यायला ट्रे घेऊन मी गेले तर त्या काऊंटरवरच्या बाईने इतक्या जळजळीत नजरेनी पाहिलं माझ्याकडे...मला नॉन-झेपेश त्यामुळे मी अचंबीत आणि ती वैतागलेली..!मग मी सटकले तिथुन आणि मैत्रिणीला झापलं नंतर..! Lol

चला वर्तूळ पूर्ण झालं !

मलाही आज सकाळी इमेल ने हा लेख आला Sad ( १८ पाट्यांच्या खाली 'हुकुमावरून' अशी एक 'अ‍ॅडिशन' ही केली होती. 'राफा' मात्र उडाले होते :)). फार 'नेट सॅव्ही' नसलेल्या मेल पाठवणा-या मित्राला मी अर्थातच लेखकाचे नाव कळवले आहे Happy

ज्या मा.बो. करांनी इ-पत्र पाठवून किंवा 'विचारपूस' करून आस्था दाखविली / माहिती दिली / लेख आवडल्याचे सांगितले व इथेही भरभरून प्रतिसाद दिला त्या सर्वांचे पुन्हा मनःपूर्वक आभार !

आज नाईलाजाने (उशिरा का होईना) मी इथे PDF ची लिंक देतो आहे ज्यात footer मधे लेखकाचे नाव व ब्लॉगची लिंक आहे. कुणाला लेख मित्रमैत्रिणींना पाठवायचा असल्यास कृपया ही PDF उतरवून घ्यावी व इपत्राला जोडून पाठवावी ही विनंती !

मायबोली वापराचा कुठलाही नियम मी (बहुत करून) तोडत नाही आहे.. असल्यास कृपया अ‍ॅडमीन टीमने लक्ष घालून मार्गदर्शन करावे ही विनंती ! (केवळ संकोचाने मी आत्तापर्यंत अशी लिंक दिली नव्हती )

ह्या लेखाची PDF : पुणेरी पाट्या आणि मॅक्डी !

माझ्याबाबत हे पहिल्यांदा होत नाही आहे किंवा असा प्रकार घडलेला मी एकटा किंवा पहिला नाही तरीही व्हायचा तो त्रास होतोच..

ह्यापुढे मायबोलीवर लिखाण पोस्ट करताना ह्या बाबत नेमके काय करावे ह्याचा आत्ता तरी संभ्रम आहे !

- राफा

राफा,
मला पण हे ढकलपत्र आले होते. सगळ्या फॉरवर्डर्सना मी परत रिप्लाय दिला तुझ्या मुळ पीडीएफ सह.
असो.
भन्नाटच लिहिल आहेस तू Lol
लेक मॅक्डीभोक्ती आहे तिला आज ऐकवल्या सगळ्या पाट्या. पोट धरुन हासत होती.

राफा,
हा लेख आता फेसबुक वर पण आला आहे, तुमच्या नावाशिवाय Sad
मी त्या व्यक्तीला ओळखत नाही, पण मेसेज करून हा लेख स्वतःच्या प्रोफाईल वरून काढायची विनंती केली आहे.
आणि माबोवरच्या लेखाची मूळ लिंक पण दिली आहे.

मलाही आज सकाळी इमेल ने हा लेख आला ( १८ पाट्यांच्या खाली 'हुकुमावरून' अशी एक 'अ‍ॅडिशन' ही केली होती. 'राफा' मात्र उडाले होते ). >>>
मला आलेल्या इमेल मध्येही सेम हिच सिच्युएशन होती. Sad

vishnumanik, तुमचे मनःपूर्वक आभार.

ह्याविषयी (म.टा. मधील 'हसा लेको' मधे ह्या लेखातील काही भाग प्रसिद्ध झाल्याचे) इ-पत्राने ज्यांनी कळवले त्या सर्वांनाही धन्यवाद.

सर्वांच्या माहितीसाठी : मी त्यावर तिथेच 'प्रतिक्रिया' दिली आहे. (ती प्रसिद्ध होताच मला इ-पत्र येईल असा संदेश होता. अजून तरी तसे झालेले नाही). शिवाय म.टा. संपादकानांही वेगळे लिहीले आहे. बघूया नुसते 'पत्र नसलेला मित्र' काही वेगळे करतो का ते (दुस-या वृतपत्राने आयशॉटचा निबंद प्रसिद्ध केला होता स्पष्ट श्रेय न देता व त्याविषयी कळवल्यावर संपादकाकडून उत्तरही आले नव्हते... त्या तुलनेत.)

- राफा
ता.क. नम्रपणाने वगैरे म्हणत नाहीये, पण खरंच : लिहून झाल्यावर स्वतःला आवडले म्हणूनच प्रसिद्ध केले महाजालावर पण हा लेख एकूणच इतका प्रवास करेल (इतके 'फुटेज' खाईल ) असे वाटले नव्हते :).

राफा Lol Biggrin जबरीच रे.....

पण नेहमीप्रमाणेच सगळीकडे तुझ्या नावाविना गेला ना? Sad Sad

राहुल तुझे लेख कायम मटावरच कसे काय येतात ह्याचा शोध घ्यायला पाहिजे... सुदैवाने चेहरा पुस्तकावरचा तरी काढला गेलाय...

मटा कडून ही अपेक्षा नव्हती. Sad

मीही मटावरची ती लिंक पाहिली. पण त्या खाली राफाचा किंवा अन्य कुणाचा प्रतिसाद दिसला नाही. प्रतिसादही उडवलेत की काय?? Uhoh

ह्या आठवड्याच्या स्टार प्रवाह वर 'ढिंगा चिका' कार्यक्रमात हे स्क्रिप्ट होते. प्रसाद ओक मॅक्डी फ्रँचायजीचा मालक-कम-वेटर झाला होता.

Pages