स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे

Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34

स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.

जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.

स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगं राण्यांनो माझ्याकडे अर्धी वाटी नारळ २० दिवस खपत नाही. किती खवणार? धन्यवाद पण. चला आता हपिसातून कल्टी. आज फ्रिज उघडून ती पाण्यात ठेवलेली नारळ वाटी बघून तुमची आठवण येइलच.

हल्लोविनच्या अनेक शुभेच्छा.

आम्ही tube well चे पाणी पितो. पण त्यात क्षार येवढे आहे कि ओट्याचे काळे granite पांढरे झाले आहे.
RO system नवरा लाऊ देत नाही,resistance power कमी होइल म्हणतो. आम्ही aqa sure वापरतो.
मला stone व्हायची भिती वाटते. पाणी boil केले तर भांडे इतके पांढरे होते कि घासून साफ होत नाही.
पाण्याला तुरटी लाउन पाहिली तर क्षार वेगळे झाले.पण एकाने सांगितले की रोज तुरटी वापरली तर दात
आणि हिरड्या खराब होतील. जाणकारांनी सल्ला द्यावा ही विनंति.

समई, जर पाण्यात इतके क्षार असतील तर ते नूसते पिणे धोकादायकच आहे. पारंपारीक पद्धतीची फिल्टर्स पण आता मिळतात (रेती/कोळसा टाईप ) पण पाणी शुद्ध करणे गरजेचे आहे. (मी स्वतः काही वर्षांपुर्वी किडनी स्टोन्सचा त्रास भोगला आहे.)
खबरदारी म्हणून आहारात चिंचेचे प्रमाण जास्त ठेवा. टोमॅटो, पालक, अळू, दूध वगैरे नियंत्रित प्रमाणात घ्या.
पोटात (बाजूला) दुखणे , उलट्या, बद्धकोष्ठ, लघवीतून रक्त अश्या प्राथमिक लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. एकदा सोनोग्राफी करुन घ्या, (सर्वानी). दातांची पण तपासणी करुन घ्या.

मी नारळ खवायचं यंत्र घेतलंय विळीची खवणी वेगळी तुटून पडली म्हणून. एका हाताने हॅण्डल मारत झरझर खवला जातो नारळ.

समई, तुमच्या aqua sure मधल्या पाण्याला पुन्हा तुरटी लावली तर क्षार निघतायत का?
कारण आम्ही त्यांचे 'नोवा' मॉडेल वापरतोय तर त्याला असाच प्रॉब्लेम आहे. Ideally असे नाही झाले पाहिजे ना?

काल टिव्हीवर होम शॉपिंगमध्ये बजाजचा फुप्रो (ज्युसर अटॅचमेंट) वापरून नारळाचे दूध काढताना दाखवले. त्याने व्यवस्थित दूध निघते का?

या ज्युसर बिसर अ‍ॅटेचमेंटमधे काम होतं एवढंस्सं आणि पसारा, साफ करा भरपूर. बर्‍याच अ‍ॅटेचमेंटसचा बाई बोर्‍या वाजवते त्यामुळे मग घरच्या बै घास रे रामा भांड्यांची रास.... त्यापेक्षा चटणीच्या भांड्यात एकदा फिरवून मग सरळ एका रुमालातून गाळून घ्यायचं नारळाचं दूध आणि रूमालाची गोळी चांगली दाबून दाबून उरलीसुरली सगळी स्निग्धता काढून घ्यायची ओल्या खोबर्‍यातून हे सोप्पं पडतं. पसारा कमी. दूध काढून झाल्यावर वरचं खोबरं फेकून दिलं की रूमाल इतर धुण्यात टाकता येतो.

आस,aqua sure च्या पाण्यालाही मी तुरटी लावून पाहिली.त्यातही क्षार वेगळे झाले,पण ते पाणी गाळुन
उकळले,तर भांडे पांढरे पडत नाही. पण तुरटी रोज वापरु नये असे कळले,म्हणून काळजी वाटायला लागली.

आस,aqua sure च्या पाण्यालाही मी तुरटी लावून पाहिली.त्यातही क्षार वेगळे झाले,पण ते पाणी गाळुन
उकळले,तर भांडे पांढरे पडत नाही. पण तुरटी रोज वापरु नये असे कळले,म्हणून काळजी वाटायला लागली.

ओके, आमचेही सेम आहे मग. पण मग aqua sure मुळे सगळेच पाणी साफ व्हायला हवे ना? तुरटी लावायची गरजच नाही पडली पाहिजे ना? कारण जेव्हा तो annual maintainance साठी माणुस येतो तेव्हा आम्ही त्याला विचारले होते तेव्हा त्याने candles बदलल्या. पण अजुनही पाणी तसेच येते.

मी एकदा मॅगीचे पॅक आणले होते. त्यात पावडर होती ती पाण्यात मिसळली की नारळाचे दुध तयार.... पण मला ते आवडले नव्हते. त्यात नारळाचा इसेन्स घातला असावा असे वाटले.

मी नारळ खवायचं यंत्र घेतलंय विळीची खवणी वेगळी तुटून पडली म्हणून. एका हाताने हॅण्डल मारत झरझर खवला जातो नारळ.

हे यंत्र अगदी बेस्ट आहे. माझ्या सगळ्या वैन्यांकडे आहे. माझी आई कित्येक वर्षे मला सांगतेय हे घे म्हणुन. पण माझ्याकडे नारळ फक्त डोसे करते तेव्हाच आणला जातो, त्यामुळे आईच्या सुचनेकडे दुर्लक्ष.. Happy

ते मॅगीचे पॅक मी पण आणले होते. यक.... मी ते पावडरमिश्रीत पाणी न वापरताच फेकले. मी शिरवाळ्यात ते वापरणार होते. नशीब वापरले नाही. मुलीने शिरवाळ्यांसकट भांडे तोंडावर फेकले असते माझ्या. नारळाचे जाड दुध घातलेल्या शिरवाळ्या तिचा विक पॉइंट आहे Happy

माझा जुना मिक्सर बन्द पडला आहे. ओस्टरायझर चा होता. नविन कोणता घ्यावा? कोणि तो निन्जा वापरून पाहिला आहे का? म्याजिक बुलेट कसा आहे? दोन्हित कोण्ता बरा? का अजून दुसरे काहि आहेत जे जास्त चान्गले आहेत?

भारतात की परदेशात? प्रिती म्हणून येतो नवीन. जुना सुमित जो होता ती कंपनी टेकओव्हर केलेली आहे. चांगलं डिल मिळतं जुन्या मिक्सरच्या बदल्यात आणि मिक्सर पण चांगला आहे.

मना पासुन धन्यवाद नीधप. अमेरिकेत आहे. नविन खुप ब्रन्ड्स बाजारात सारखे येत अस्तात म्हणुन गोन्धळायला होत्. रेप्युटेड नेहमिचे घ्यावे का नविन काहि ट्राय करावे? गूगल करुन पण तशी फार माहिती मिळाली नाही. Magic bullet ani Ninja ची सारखी टीव्ही वर जाहिरात करत असतात म्हणुन वाटल कि विचाराव. लवकरच सगळी कडे सेल पण सुरु होतिल. म्हणुन थोडा रिसर्च.

मी मागच्या आठवड्यात अंजलीचा नॉन-स्टीक तवा घेतला. विक्रेता म्हणाला की तेल कमी वापरा नाहीतर लवकर खराब होईल. दुसरी गोष्ट म्हणजे घासताना घासणीने घासायला नको त्याऐवजी स्पंजचा वापर करावा.

मला फुलके आणि भाकरी करीता जाळी हवी आहे (सिरॅमिक गॅस टॉप वर ठेवायची).
देसी ग्रोसरी मधे मिळत नाही आहे अजुन कुठे मिळेल का ?

त्याला कुकी कूलिंग रॅक म्हणतात. सगळीकडे मिळायला हरकत नाही. शक्यतो रंग लावलेले नसतील असे रॅक घ्या. ते दिसायला असे दिसते. माझे देसी स्टोरमधून आणलेले असेच आहे फक्त स्टीलचे आहे त्यावर कसलेही कोटींग नाही.

रचु, तुला डॉलर स्टोरमधे पण मिळेल. स्टीलची हॅन्डलवाली जाळी आहे. फुलके आणि भाकरी दोन्ही छान होतात.

अमेरिकेत ऑस्टरायझरचा ब्लेंडर मी २० वर्षे वापरते आहे.
बर्फासाठी म्हणून २-३ वर्षांपूर्वी हॅमिल्टन बीच चा घेतला होता - तो बर्फ क्रश करायला फक्त वापरलाय - तो ही चांगला चाललाय. फक्त त्यात मसाले, चटण्या , डोशाची पीठं, एवढंच काय मिल्क शेक पण करत नाही - - बर्फाला वास लागून ड्रिंक्स खराब होऊ नयेत म्हणून.

ऑस्टरच्या ब्लेंडरना बरोबर बसणारी छोटी भांडी मिळतात मुंबैत. त्यात खोबर्‍याच्या चटण्या, कोरडे मसाले , सुकं वाटण वगैरे मस्त होतं. मी एक भांडं कॉफीसाठी अन एक बाकीसगळ्यासाठी असं वापरते.
डिशवॉशरमधे मात्र घालू नयेत ही भांडी .

मातीच्य्य भांड्यात स्वंयपाक करावा कि नाही ? केरळी लोक करतात अस ऐकल होत अशी भांडी आरोग्यासाठी योग्य असतात का?

हो ग @मेधा माझा पण ऑस्टरायझर चाच आहे पण बिघडलाय. म्हणजे भान्डे न ठेवता मोटर चालते पण
as soon as blades ghalun tey bhaanda thevla ki tyatun oon oon asaa awaaj yayla lagto (ki mala chaalaycha nahiye asa) Mhanun me indian store madhun navin blades aanli tar ekdam theek chaalala. So me khush houn gele. Pan dusrya divshi blades na itka ganj chadhla hota ki swachha karaychi pan soy nahi. Ani chaangle dhoon poosoon thevle hote. Tyamule waatla ki navinach ghyaava. Maagchya week madhe target chi jaahiraat hoti 15 dollar la aahe pan jaaychaa kantala kela ani tee pan geli ata. Pan tu mahiti dilis mhanun chhan waatla ata bahutek parat toch aanava.

भारतातल्यासारखे एका मिक्सरवर काम इथे झालेअसते तर किती बरे झाले असते. सुमितवगैरे गेले काही वर्षे मिळतात पण एकुणातच हा सगळा मामला वेगळाच होतो.

माझ्याकडे १ हॅमिल्टन बीचचा ब्लेंडर आहे कित्येक वर्षे नीट चाललाय. मला तो बिघडायला हवाय कारण मला नविन क्युसिनार्टचा घ्यायचाय Happy

Pages