दिवाळी गटग @ ठाणे

Submitted by मंजूडी on 1 November, 2010 - 04:09
ठिकाण/पत्ता: 
दिवाळी निमित्ताने सर्व मायबोलीकरांचे गटग ठाणे येथे आयोजित करण्यात आले आहे. त्याचे तपशील पुढीलप्रमाणे: -

तारीख : ६ नोव्हेंबर, २०१०
वेळ : सकाळी १०.०० वाजता
स्थळ : गडकरी रंगायतन, ठाणे

दिलेल्या वेळेवर भेटणे, दिवाळी शुभेच्छांची देवाण-घेवाण, नेहमीप्रमाणेच धमाल-मस्ती-गप्पा-टप्पा, फराळाची (कोणी आणला असल्यास) चव बघणे आणि नंतर 'आमंत्रण' येथे मिसळ खाण्यासाठी मोर्चा वळवणे अशी गटगची साधारण रूपरेषा असेल.

सर्व मायबोलीकरांना आग्रहाचं आमंत्रण!

नेहमीप्रमाणेच मोठ्या संख्य्नेने उपस्थित राहून आपण हे गटग यशस्वी करूया.

आपल्या सदस्यत्व खात्यात जाऊन ह्या कार्यक्रमासाठी नावनोंदणी करावी ही सर्वांना विनंती.

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, November 6, 2010 - 00:30 to 04:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी नाही आहे... Sad

हा धागा 'मुंबई'मध्ये का उघडला आहे ?? 'ठाणे' मध्ये का नाही ???

फराळ ( घरचा ) सगळ्यांनी आणा रे... गप्पांबरोबर चिवड्याचा बकाणा भरायला मजा येइल्..:फिदी:

'मुंबई'मध्ये का उघडला आहे ?? 'ठाणे' मध्ये का नाही ??? >>> जाउ दे भटक्या प्रांतिक वादात अडकू नकोस... Happy भेटा .. आणि मजा करा..

फराळ ( घरचा ) सगळ्यांनी आणा रे... गप्पांबरोबर चिवड्याचा बकाणा भरायला मजा येइल्..>>>>मग, फक्त चिवडाच आणा रे Proud

हा धागा 'मुंबई'मध्ये का उघडला आहे ?? 'ठाणे' मध्ये का नाही ??? >>> नशिब समज बिहार मधे नाही उघडला... :p

फक्त चिवडाच आणा रे >>> ठिक आहे... कृ. चिवड्याचे फोटो काढू नयेत...

जिथे जागा मिळाली तिथे धागा उघडलाय... कुठे?का?कधी?कोण कोण? कशाला? इत्यादी प्रश्न विचारू नयेत, कारवाई करण्यात येईल.

यायचं बघा!!

Proud

स्मिता Wink
आणि 'चोंबड्या चौकश्या' हेही लिहायचं राहिलं वरती...

विनय, मैत्रीला पाच दिवस सुट्टी आहे दिवाळीची, त्यामुळे गटगसाठी फराळ तो स्वहस्ते बनवून आणणार आहे.

Biggrin

अरे अत्ताच सकाळच्या ऑनलाईन दिवाळी अंकात वाचलं...

"लाडू नीट झाले नाही तर फराळाचा "चिवडा" होतो.

"बायकांची होते ती दिवाळी अन नवर्‍यांचं वाजतं ते दिवाळं"

>>> मुंबई काय ठाणे काय सारखीच... <<<<
नाय रे भो, सारखे कसे असेल?
पुणे सारखे णे'कारान्ती ठाणे ची सर मुम्बैला कशी येईल??? Proud

जल्ला सकाळी नाही जमणार.. >>> हरकत नाही ... दिवाणे आम नंतर दिवाणे खास सुरू होईल... तळ्यात नाही जमलं तरी मळ्यात नक्की ये Wink

१२चा योग कसा जुळणार? aim smileys

Pages