दिवाळी गटग @ ठाणे

Submitted by मंजूडी on 1 November, 2010 - 04:09
ठिकाण/पत्ता: 
दिवाळी निमित्ताने सर्व मायबोलीकरांचे गटग ठाणे येथे आयोजित करण्यात आले आहे. त्याचे तपशील पुढीलप्रमाणे: -

तारीख : ६ नोव्हेंबर, २०१०
वेळ : सकाळी १०.०० वाजता
स्थळ : गडकरी रंगायतन, ठाणे

दिलेल्या वेळेवर भेटणे, दिवाळी शुभेच्छांची देवाण-घेवाण, नेहमीप्रमाणेच धमाल-मस्ती-गप्पा-टप्पा, फराळाची (कोणी आणला असल्यास) चव बघणे आणि नंतर 'आमंत्रण' येथे मिसळ खाण्यासाठी मोर्चा वळवणे अशी गटगची साधारण रूपरेषा असेल.

सर्व मायबोलीकरांना आग्रहाचं आमंत्रण!

नेहमीप्रमाणेच मोठ्या संख्य्नेने उपस्थित राहून आपण हे गटग यशस्वी करूया.

आपल्या सदस्यत्व खात्यात जाऊन ह्या कार्यक्रमासाठी नावनोंदणी करावी ही सर्वांना विनंती.

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, November 6, 2010 - 00:30 to 04:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगं मी लक्ष्मीपुजन करुन रात्रीच्या गाडीने गावी जातेय. नाही जमणार त्यामुळे.. पुणे- मुंबई दोन्हीकडंच गटग मिसणार.. Sad

मी संभ्रमावस्थेत आहे.......... येऊ की नको..... आणि येवून करू काय? >>>> फराळ खा. उरलेल्या वेळात जमलंच तर गप्पा मार. Proud

वेळ काही सांगून येत नाही यो...:फिदी:

रश्मि वाघ... या अहो ओळखी होतील मायबोलीकरांशी...:स्मित:

- दरवेळी गटगला कुणी ना कुणीतरी नवीन भेटतंच. Happy
यावेळी वत्सला आणि भुंगा हे दोघं भेटले. भुंग्याची सर्वांशी ओळख परेड चालू असताना विनय भिडे आणि आनंद_सुजू यांनी थोडावेळ निखिल वागळे स्टाईल सूत्रसंचालन करून धमाल उडवली.

- नुपूर, सानिका आणि नीरजा (घारूअण्णा, कविता आणि मंजू-डी यांच्या मुली) आता माबो-गटगची पुढची पिढी म्हणून झपाट्याने नावारूपास येत आहेत. आज त्यांना जागूची मुलगी आणि वत्सलाची मुलगी या प्रथमच भेटल्या. त्यांनीही आपापसांत ओळख परेड करून घेतली असावी. त्यांच्यातला "तू इथे नवीन आहेस का?" असा काहीसा संवाद मोठ्या पिढीतल्या काही माबोकरांनी ऐकला. Lol

- 'टेंपटेशन्स्'च्या चिमुकल्या आईसक्रीम पार्लरमधे सगळे एकावेळी घुसले. आत तुफान गर्दी झाली. आणि ती गर्दी पाहून नंतर आलेले इतर काही आईसक्रीम-सेवनेच्छुक ग्राहक "बापरे! केवढी गर्दी बघ आत...!" असे उद्गार काढत बाहेरच्या बाहेर निघून गेले. Lol

लोक्स, वृत्तांत आणि फोटु टाका लवकर Happy

अधिकृत स्त्रोताकडुन दूरध्वनीवर कळले आहे की फारच धमाल केली तुम्ही Happy

फोटुच्या लिंका मला धाडायला विस्रु नका... हुकुमावरुन Proud

33 मायबोलीकर जाणार आहेत. >>> मात्र लौकीकाला जागत बहुतेक सगळेच हजर होते... ख्यातनाम टांगारूंचा अपवाद वगळता :p

उपस्थीती...
मंजूडी (+ निरजा), सुमेधा पुनकर, सूर्यकिरण, अश्विनी के, योगेश२४, मेधा२००२, ललिता-प्रीति, विनय भिडे (सहकुटुंब), योगमहे, मृदूला के, किरू (सहकुटुंब), कविता नवरे (सहकुटुंब), तेजोमयीXमोदक, असुदे, मनिषा लिमये, आनंदमैत्री, sameer_ranade (सहकुटुंब), भुंगा, इंद्रधनुष्य, आशुतोष०७११,
गिरीविहार, vaibhavayare123... , नीलू, वैभु, गिरीश कुलकर्णी, किशोर मुंडे, अमर कुलकर्णी, परेश लिमये, वत्सला

विनय भिडेंनी केलेला तह @ परेश :d

ईंन्ड्रा,

ते " तेजोमयीXमोदक " अस का लिहिलायस ? ते तेजोमवी व्हर्सेस मोदक अस वाटतय Biggrin

Light 1 घ्या रे दोघांनी

अजून एक सांगायच र्‍हायलच. लोकं खांद्यावरुन डोकावून वगैरे बघतात, वत्सला माझ्या डोक्यावरुन डोकावून बघू शकत होती. Happy

मिसळला मिसलो ! >>>>यो आणि ज्यांनी ज्यांनी दिवाळी गटग मिसलंय त्यांच्यासाठी हि स्पेशल तिखट मिसळ आणि मिडियम तिखट मिसळ Wink

योगेश यांनी असली चित्त चाळवणारी आणि पोटातल्या जाणिवा खवळवणारी चित्रे इथे टाकू नयेत. अन्यथा अ‍ॅडमिनांच्या कानावर घालण्यात येईल. Proud

मला पण सगळ्याना भेटुन मस्त वाटले!

असुदे, नीलु, Biggrin
नीलु, आत्ता समजले तू माझ्यापासुन येवढी लांब लांब का होतीस ते? टेंन्शन नही लेने का ऐसी बातो का!!!

मिसळ मी दोन वेळा घेतली! अनेक वर्षांनी खात होते अशी हाटीलातली मिसळ!

माझी एकच मिसळ खाताना फेफे उडाली होती. त्यावर मी भुंग्याचा एक मोतीचूर लाडू खाल्ला आणि ताक प्यायले. ४ ग्लास पाणी प्यायले.

वत्सला तुला साष्टांग नमस्कार गो बाय Happy

लोकं खांद्यावरुन डोकावून वगैरे बघतात, वत्सला माझ्या डोक्यावरुन डोकावून बघू शकत होती >> Lol असुदे तुझी उंची किती?

लोकं खांद्यावरुन डोकावून वगैरे बघतात, वत्सला माझ्या डोक्यावरुन डोकावून बघू शकत होती >> हाहा असुदे तुझी उंची किती? >>>>> रुनी बात मे दम है ! Proud

Pages