दिवाळी गटग @ ठाणे

Submitted by मंजूडी on 1 November, 2010 - 04:09
ठिकाण/पत्ता: 
दिवाळी निमित्ताने सर्व मायबोलीकरांचे गटग ठाणे येथे आयोजित करण्यात आले आहे. त्याचे तपशील पुढीलप्रमाणे: -

तारीख : ६ नोव्हेंबर, २०१०
वेळ : सकाळी १०.०० वाजता
स्थळ : गडकरी रंगायतन, ठाणे

दिलेल्या वेळेवर भेटणे, दिवाळी शुभेच्छांची देवाण-घेवाण, नेहमीप्रमाणेच धमाल-मस्ती-गप्पा-टप्पा, फराळाची (कोणी आणला असल्यास) चव बघणे आणि नंतर 'आमंत्रण' येथे मिसळ खाण्यासाठी मोर्चा वळवणे अशी गटगची साधारण रूपरेषा असेल.

सर्व मायबोलीकरांना आग्रहाचं आमंत्रण!

नेहमीप्रमाणेच मोठ्या संख्य्नेने उपस्थित राहून आपण हे गटग यशस्वी करूया.

आपल्या सदस्यत्व खात्यात जाऊन ह्या कार्यक्रमासाठी नावनोंदणी करावी ही सर्वांना विनंती.

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, November 6, 2010 - 00:30 to 04:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मजा केलेली दिसतेय भरपूर, म्या मिसल Sad , दिवाळीच्या मधेच ठेवल्याने तुमचा जाहिर णिषेढ
बापरे ती मिसळ म्हणजे तिखटाच पाणी वाटतय, आशुने ताकाने आंघोळ केली असणार Proud

रुनी, मुद्द्याचा पॉईंट आहे. माझी उंची एव्हढीच आहे की अमुक फूट आणि तमुक इंच सांगितले की त्यापुढे 'उंच' अस म्हणावस वाटत नाही. ५' ४" फक्त Proud अब्राहम लिंकनच्या डेफिनेशन प्रमाणे पुरेशी . कारण उभा राहिल्यावर पाय कमरेपासून जमिनीपर्यंत पुरतात.

अम्या Lol

बाकी.. लाजो तूला मिसलं मी .. वत्सलाकडे चौकशी पण केली. Proud

बाकी , मिसळवर कोणी बबरबटून हात मारला असेल तर वत्सलानेच ... Proud

स्पेशल भेटी - जागू, वत्सला, नीलवेद,मनिष कदम.

धम्माल आली एकदम .. मंजूडीची धावती भेट, विन्याचा निखिल वागळे , आण्णा, योगेश२४, केळकर,वैभव, यांचे ऐकमेकांचे झब्य्यातले झब्बू, मामलेदार मिसळचा पर्‍याचा पहिला नं.. , टेम्प्टेशनला जाता जाता ..अधे मधे थांबणारे मायबोलीकर,टेम्प्टेशनमधे आईस्क्रिमही लाजून विरघळेल इतके "चॉकळेट फ्ळ्श" , "चॉकलेट संडी", "लिंबू मिरची" अन "शहाळं स्पेशल" << नावावर केलेले जोक.

"मोदक" Straight From Al Burj वाटला.

Temptation शेजारीच Nature साडी दालन अन त्यामधे काही हौशी मायबोलीकरांची हजेरी..

अन संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खरेदी, खरेदी, अन खरेदीच.. Proud १० वाजता.. तापाने फणफणून घरी. Proud

सुकि, ६ वाजेपर्यंत ठाण्यातच होतास?
त्या शेजारच्या दुकानात मी नीलवेद बरोबर गेले होते त्याच्या बायकोला पाडव्याची साडी सिलेक्ट करायची होती म्हणून. नंतर बरेच जण न्यू इंग्लिश स्कुलमधे भरलेल्या प्रदर्शनात फिरत होते.

अश्वे आम्ही पण वळालो शेजारच्या दुकानात पण तूम्ही सगळे दृष्टीआड झाल्यावर Proud

वंदनाला जाऊन तिथून एशियाड ने पुण्याला.. बाकी प्रदर्शनात आम्ही फिरकलो नाही.

एक इमर्जन्सी आल्याने मला ''टांगारु'' व्हावं लागलं.... क्षमस्व मित्रंनो..:( कुणी वृत्तांत लिहीला तर फार बरं होईल. Happy

हे गटग अगदी घराजवळ असल्यासारखं होतं.... त्यामुळे मिसायचं नव्हतं... पण असो... Happy

म्या पण मिसलं Sad

मस्त सकाळी तयारी करून निघणारच होती.... पण भाऊ म्हणाला फिरायला जाऊया... मग गेलो विथ फॅमिली ... Happy

नंतर बरेच जण न्यू इंग्लिश स्कुलमधे भरलेल्या प्रदर्शनात फिरत होते.
>>
माजा जीव अगदी वर आला होता त्या प्रदर्शनाला सोडुन पुढे यायला. तितक्यात विन्याने मला टेम्पटेशन कडे वळवलेच. दुकानात जातेय तोवर बाजुच्या 'पेशवाई' वर नजर गेली. तिथे आनंदसुजु वाटच बघत होता माझी मला दुकानात पाठवायला.. Proud

हे हे. धमाल गटग झाला.
इंद्राने मला त्याच्या लिस्ट्मध्ये धरलच नाही. मला अदृष्यच करुन टाकलय.

अरे हो... स्वारी जागू... मिसळचा परिणाम :p

तापाने फणफणून घरी. >>> सुकी... खरेदीचा ताप का?

Pages