दिवाळी गटग @ ठाणे

Submitted by मंजूडी on 1 November, 2010 - 04:09
ठिकाण/पत्ता: 
दिवाळी निमित्ताने सर्व मायबोलीकरांचे गटग ठाणे येथे आयोजित करण्यात आले आहे. त्याचे तपशील पुढीलप्रमाणे: -

तारीख : ६ नोव्हेंबर, २०१०
वेळ : सकाळी १०.०० वाजता
स्थळ : गडकरी रंगायतन, ठाणे

दिलेल्या वेळेवर भेटणे, दिवाळी शुभेच्छांची देवाण-घेवाण, नेहमीप्रमाणेच धमाल-मस्ती-गप्पा-टप्पा, फराळाची (कोणी आणला असल्यास) चव बघणे आणि नंतर 'आमंत्रण' येथे मिसळ खाण्यासाठी मोर्चा वळवणे अशी गटगची साधारण रूपरेषा असेल.

सर्व मायबोलीकरांना आग्रहाचं आमंत्रण!

नेहमीप्रमाणेच मोठ्या संख्य्नेने उपस्थित राहून आपण हे गटग यशस्वी करूया.

आपल्या सदस्यत्व खात्यात जाऊन ह्या कार्यक्रमासाठी नावनोंदणी करावी ही सर्वांना विनंती.

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, November 6, 2010 - 00:30 to 04:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विनय, मैत्रीला पाच दिवस सुट्टी आहे दिवाळीची, त्यामुळे गटगसाठी फराळ तो स्वहस्ते बनवून आणणार आहे.>>>> अफवांवर विश्वास ठेउ नये.

<<"बायकांची होते ती दिवाळी अन नवर्‍यांचं वाजतं ते दिवाळं">> अरेरे... अरेरे काय हे सुर्यकिरण आतापासूनच एवढी काळजी...

नाव नोंदवलंत तर गटगचे ठिकाण, वेळ, तारीख बदलल्यास तुम्हाला तशी ईमेल येईल. नाहीतर असे बदल झाले तर कळतीलच असं नाही. आयत्यावेळेची पंचाईत टाळण्यासाठी नाव नोंदवून ठेवा.

आयत्यावेळेची पंचाईत टाळण्यासाठी नाव नोंदवून ठेवा.>>>>आणि नाहीच जमलं तर आयत्यावेळी टांग द्या. हाकानाका Proud

नाव नोंदवलंत तर गटगचे ठिकाण, वेळ, तारीख बदलल्यास तुम्हाला तशी ईमेल येईल. नाहीतर असे बदल झाले तर कळतीलच असं नाही. आयत्यावेळेची पंचाईत टाळण्यासाठी नाव नोंदवून ठेवा. >> जल्ला असा पण हाय काय.. मग करतोच नोंदणी .. नाहीतरी नाव नोंदवायची सवय करायचीय.. Proud Wink

इंद्रा.. दिडेकच्या सुमारास असणारेय का ... येइन मग टिपीसाठी..

नाहीतरी नाव नोंदवायची सवय करायचीय.. >>> अरे नावाड्यांनो नाव नोंदणी करताना सोबत न्हावी का बरं आणलात?

चिमण तुझ्या गटगटवर आमचा बहिष्कार :p

अरेरे मी एवढ्या सगळ्यांना भेटायचि संधी मिसणार Sad
तुमच्या गटगला शुभेच्छा. Happy
योगेश माझ्यावतीने एक कॅमेरा जास्तीचा घेऊन जा प्लिज. मी नाहीतर कॅमेरा तरी. Lol

विनय, मैत्रीला पाच दिवस सुट्टी आहे दिवाळीची, त्यामुळे गटगसाठी फराळ तो स्वहस्ते बनवून आणणार आहे.>>>> अफवांवर विश्वास ठेउ नये.
>>>> वाचलो बुवा..:फिदी:

नाही ग बारीक झालोय ना... तुम्ही न ओळखण्याइतका... >>
विन्या, अजून आता किती बारीक व्हायचंय Uhoh

मी यायचय म्हणतेय पण एवढ्या लांबून यायच म्हणून नक्की ठरत नाहीय <<<

नीलू, हो उगीच घाईत निर्णय घेऊ नको हो. तुझ्या सध्याच्या वास्तव्यस्थानात आणि या गटगच्या नियोजित ठिकाणात बरीच भौगोलिक, सांस्कृतीक वगैरे वगैरे तफावत आहे. शिवाय एवढ्या दीर्घ पल्ल्याचा प्रवास. तेव्हा प्रवासातली दगदग, हवामानबदलाचे परिणाम वगैरे बाबत तज्ज्ञांचा सल्ला घे आणि मगच पुढचे पाऊल उचल हो.

Pages