rmd यांचे रंगीबेरंगी पान

तो

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

डोळ्यांतून भरलेली लाचारी सांडणारा
मनातल्या मनात स्वत:शीच भांडणारा
आतड्यातला पीळ लोकांसमोर मांडणारा
तो...

माध्यान्हीला पाय पोळत अनवाणी चालणारा
अर्ध्यामुर्ध्या चिंध्या कपडे म्हणून घालणारा
स्वत:च्या आयुष्याला स्वत:च सलणारा
तो...

जगाच्या दृष्टीने कोणीही नसलेला
कचर्‍याचा भाग बनत कचर्‍यावर पोसलेला
मरण येत नाही म्हणून जगत असलेला
तो...!

प्रकार: 
शब्दखुणा: 

कळले नाही...!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

मी थांबले आणि संपले कधी, कळले नाही
वाटेत एकटी राहीले कधी, कळले नाही

मी उन्हात सुद्धा जात राहीले तुझ्याच मागे
पायाचे तळवे पोळले कधी, कळले नाही

ऋतू आले गेले, वाट पाहीली तरी तुझी मी
ते वेडे वय अन् सरले कधी, कळले नाही

मी बेरीज करता सारे काही वजाच झाले
अन् शून्य फक्त हे उरले कधी, कळले नाही!

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - rmd यांचे रंगीबेरंगी पान