rmd कविता

पाऊस आवडतो का ?

Submitted by निलेश बामणे on 13 July, 2012 - 04:54

पाऊस आवडतो का ?

मध्यरात्री पावसात ...

टप-टप गळणार्‍या झोपडीत...

आपल्या पाखरांवर टोप धरून..

बसलेल्या आई-बाबांना आपण..

विचारूच कस शकतो...

पाऊस आवडतो का ?

हातावर पोट असणार्‍या...

अंग झाकायला कपडे घेतानाही...

ज्याला विचार करायला लागतो..

असा माणूस जेंव्हा पावसात ..

छत्री नाही म्हणून भिजत असतो..

त्याला विचारूच कस शकतो..

पाऊस आवडतो का ?

घरात पावसाच पाणी शिरल..

म्हणून उरलसुरलेल्या सामानासह ...

खाटेवर संसार थाटणार्‍या आईला...

आपण विचारूच कस शकतो

पाऊस आवडतो का ?

पावसात रत्याने चालताना..

खड्यात पाय अडकून पडणार्‍या...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तो

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

डोळ्यांतून भरलेली लाचारी सांडणारा
मनातल्या मनात स्वत:शीच भांडणारा
आतड्यातला पीळ लोकांसमोर मांडणारा
तो...

माध्यान्हीला पाय पोळत अनवाणी चालणारा
अर्ध्यामुर्ध्या चिंध्या कपडे म्हणून घालणारा
स्वत:च्या आयुष्याला स्वत:च सलणारा
तो...

जगाच्या दृष्टीने कोणीही नसलेला
कचर्‍याचा भाग बनत कचर्‍यावर पोसलेला
मरण येत नाही म्हणून जगत असलेला
तो...!

प्रकार: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - rmd कविता