तो
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
5
डोळ्यांतून भरलेली लाचारी सांडणारा
मनातल्या मनात स्वत:शीच भांडणारा
आतड्यातला पीळ लोकांसमोर मांडणारा
तो...
माध्यान्हीला पाय पोळत अनवाणी चालणारा
अर्ध्यामुर्ध्या चिंध्या कपडे म्हणून घालणारा
स्वत:च्या आयुष्याला स्वत:च सलणारा
तो...
जगाच्या दृष्टीने कोणीही नसलेला
कचर्याचा भाग बनत कचर्यावर पोसलेला
मरण येत नाही म्हणून जगत असलेला
तो...!
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
बर्याच दिवसांनी दिसलीस
बर्याच दिवसांनी दिसलीस आरेम्डी !
(No subject)
हो ना! बर्याच दिवसांनी वेळ
हो ना! बर्याच दिवसांनी वेळ मिळाला.
तो....... म्हणजे....कचरेवाला
छान आहे.....कवीता
रुपा, छान आहे कविता. या
रुपा, छान आहे कविता.
या दोघांना का रडायला आलं