अक्षरवार्ता

नव्याजुन्या पुस्तकांची ओळख करून देणारा, त्यांचं स्वागत करणारा मायबोलीवरील हा नवीन विभाग. नुकतीच प्रकाशित झालेली, किंवा उत्कृष्ट असूनही जरा दुर्लक्षितच राहिलेली अशी दर्जेदार पुस्तकं या विभागात आपल्याला चाळता येतील. दर महिन्याला निवडक अशा पुस्तकांतील काही भाग इथे आपल्याला वाचता येईल. ही पुस्तकं मायबोलीवर खरेदीसाठी उपलब्ध आहेत. ग्रंथाली, राजहंस, मृण्मयी, चिनार, समकालीन यांसारख्या मातब्बर प्रकाशनांचं सहकार्य आपल्याला यासाठी मिळाले आहे.

'तें' दिवस - श्री. विजय तेंडुलकर

Submitted by चिनूक्स on 18 May, 2009 - 14:50

प्रत्येक माणसात असंख्य माणसं कोंबलेली असतात. वेगवेगळा स्वभाव, वेगवेगळ्या प्रवृत्ती घेऊन आलेली ही माणसं शोधणं फार कठीण असतं. तेंडुलकरांना मात्र ते सहज जमलं होतं.

विषय: 
शब्दखुणा: 

स्वरार्थरमणी रागरससिद्धांत - गानसरस्वती किशोरी आमोणकर

Submitted by चिनूक्स on 27 April, 2009 - 14:19

'संगीताने धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांची प्राप्ती होते, म्हणजेच चारी पुरुषार्थांची प्राप्ती होते,' असं भरतमुनींनी सांगितलं आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा जन्मच मुळी स्वरांतील सौंदर्य व्यक्त करण्यासाठी झाला आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

मुक्काम : आर्मी पोस्ट ऑफिस - वैदेही देशपांडे

Submitted by चिनूक्स on 14 April, 2009 - 15:42

'मुक्काम : आर्मी पोस्ट ऑफिस' हे वैदेही देशपांडे यांचे अनुभवकथन. सैनिकी आयुष्यातील अनुभव, घडामोडी, पद्धती या सार्‍यांचा अतिशय खोलात जाऊन वेध घेणार्‍या पंधरा लेखांचा हा संग्रह आहे. लेखिकेचे पती हे लष्करातील उच्चपदस्थ अधिकारी.

विषय: 
शब्दखुणा: 

माझंही एक स्वप्न होतं.. - वर्गीस कुरियन

Submitted by चिनूक्स on 31 March, 2009 - 13:54

'अमूल', 'धारा', 'आणंद', 'ऑपरेशन फ्लड' ही नावं ही नावं न ऐकलेली व्यक्ती विरळाच. या नावांना प्रत्येक भारतीयाच्या घरात आणि जगभरात मानाचं आणि आपुलकीचं स्थान मिळवून दिलं ते पद्मविभूषण डॉ. वर्गीस कुरियन यांनी.

विषय: 

पानीकम - श्री. संजय पवार

Submitted by चिनूक्स on 17 March, 2009 - 14:12

या मालिकेतील पहिलं पुस्तक आहे ग्रंथालीने प्रकाशित केलेले श्री. संजय पवार यांचं 'पानीकम'. १९९७ - २००२ या काळात श्री. पवार यांनी लिहिलेल्या स्फुटांचं हे संकलन. विद्रोही चळवळीशी अतिशय जवळचं नातं असणार्‍या श्री.

Pages