गणेशोत्सव
गेले करायचे राहून - सावित्रीच्या लेकी
पाककृती स्पर्धा क्रमांक एक (जिन्नस एक पदार्थ अनेक) - अनामिका. - मूगाष्टक - मूगाच्या आठ रूपांची चविष्ट मैफिल.
नमस्कार सगळ्यांना! 
गेल्या अनेक वर्षांपासून मायबोली गणेशोत्सवात भाग घ्यायचा होता पण योग आला नाही. ह्यावर्षी संयोजकांनी स्पर्धा घोषित केली आणि ठरवलं कि भाग घ्यायचाच. जिन्नस एक आणि पदार्थ अनेक. मस्तं संकल्पना. दोन तीन जिन्नस आले लगेच डोक्यात. अनेक एन्ट्री चालणार आहेत कळल्यावर उत्साह आला. पण एकेक जिन्नसाने सुरुवात करूया म्हणून मूगडाळ हा जिन्नस आधी नक्की केला आणि कामाला लागले. या मुगाष्टक थाळीत मी मूगडाळीपासून ८ पदार्थ तयार केले आहेत.
शशक स्पर्धा - ओबामा - बाप्पाचे हेडफोन! (अद्भुत आणि करुण)
यंदा पृथ्वीवर येण्यापूर्वी बाप्पांनी महागडे Noise Cancellation Headphones मागवले. भगवान शंकरांनी विचारलं, “काय रे, एवढा खर्च कशासाठी?”
बाप्पा वैतागून म्हणाले, “आरती पाच मिनिटं आणि डीजे पाच तास! गेल्या वर्षी ‘झिंगाट’ इतकं ऐकलं की माझा उंदीर दोन दिवस तिरका चालत होता आणि ‘मोरया’ऐवजी ‘झिंगाट... झिंगाट!’ म्हणत होता!”
दुसऱ्या दिवशी सगळ्या गणेशमूर्ती हेडफोन घालून प्रकट झाल्या. भक्त चक्रावले. विध्याधर बापट आनंदाने म्हणाले, “वा! निदान बाप्पांना तरी माझं म्हणणं पटलं!” पण लगेच हळहळले, “अरेरे, आता आपल्या प्रार्थना ऐकू जाणार कशा?”
गणपतीची माटी -मनीमोहोर
लेखाचं शीर्षक वाचून “कोकणातल्या जांभा खडकांवर ममोंनी लिहिलं होतंच, आता बहुतेक गणपतीच्या मातीवर लिहिलंय; पण टायपिंग करताना चुकून माती ऐवजी माटी लिहिलं गेलंय," असा विचार नका करू. मला कोकणावर लिहायला कोणताही विषय चालतो. त्यामुळे त्यावरही लिहीन कदाचित कधीतरी! पण हे मात्र मातीवर न लिहिता माटीवरच लिहिलं आहे. माटी म्हणजे काय? कोकणात हिचं महत्त्व काय आहे? कोकणवासीयांच्या मनात हिचं काय स्थान, वगैरे कहाणी ऐकायची असेल तर हातत तांदळाचे चार दाणे घेऊन बसा माझ्या बाजूला!
बृहनपुण्याचे बापट बाप्पामुळे बाल बाल बचावले
पुणे शहराच्या महापालिकेत गणेश मंडळांची बैठक होती. महापौर भाजपच्या आणि सत्ताही भाजपचीच. सर्व नगरसेवक भाजपचेच.
अशा या वातावरणात बाप्पाचा उत्सव कसा करायचा यावर गंभीर चर्चा चालू असतानाच पुण्याचे एक नागरिक श्रीयुत बापट म्हणाले कि उत्सव करा पण डीजेमुक्त करा. कुठेच डीजेही नको किंवा स्पीकर्स नको.
यामुळे वातावरण तंग झालं. नगरसेवक, गणपती मंडळांचे कार्यकर्ते तापले. कोण आहे रे तो असे आवाज येऊ लागले. बाका प्रसंग उद्भवला.
बापटांना कुठे काय बोलायचं हे भान नसल्याचे दिसले.
चित्रकला उपक्रम - माझे आवडते कार्टून - लहान गट
चित्रकला उपक्रम : माझी आवडती गाडी - किल्ली - ओम

ओमने (वय वर्षे ३) आधी हे एक cartoon रंगवलं होतं पण पार मारामारी केली होती तिकडे, अर्ध ice cream रंगवलं आणि अर्ध हेलिकॉप्टर.
गणेशोत्सवाच्या १० दिवसात एवढे प्रयत्न केले पण चित्र आज पूर्ण रंगवून झालं.
त्यातही वरची गुलाबी बॉर्डर आणि आरसे रमाने रंगवलेत मध्येच येऊन. ओम मी तुला शिकवते असं म्हणून... 
चित्रकला उपक्रम : माझे आवडते कार्टून - स्वाती_आंबोळे - गौरी आंबोळे
माझ्या आठवणीतली मायबोली - जागू
जवळ जवळ १५ वर्षांपूर्वी (१४ वर्षे ९ महिने मायबोलीच्या नोंदीमध्ये आहेत. पण १५ वर्षे कस भारी वाटत ना) कुठलीतरी रेसिपी शोधत असताना मायबोलीवर ती रेसिपी सापडली. तेव्हा हितगुज हे ठळक अक्षरात येत असल्याने साईटचे नाव हितगुज आहे ह्याच भ्रमात मी कित्येक दिवस होते. वाचण्यासाठी विविध प्रकारची लेखने, कविता, रेसिपीज, अस बरचस साहित्य एकत्रित मिळाल्याने ही साईट मला अत्यंत प्रिय झाली व रोज मी मायबोली वाचू लागले.
