काव्यलेखन

वेदनांचे वलय वेदनांचाच मी

Submitted by वैवकु on 21 January, 2015 - 10:29

काय बोलू अता सांगना मी तुला
जीव माझ्यामधे गुंतलेल्या फुला

याचसाठी इथे साधना लागते
भान विसरून प्या आणि थोडे डुला

चाळ बांधून घे नाच याहीइथे
वेगळे हे वळण वेगळा 'चौफुला'

वेदनांचे वलय वेदनांचाच मी
वेदनांचे वजन वेदनांचा झुला

चांगल्या-वाइटाची कुणाला भिती
मी तुझ्या बाजुला मी तुझ्या बाजुला

न्यूनतेला पूर्णता करतेस तू

Submitted by जयदीप. on 20 January, 2015 - 23:47

न्यूनतेला पूर्णता करतेस तू
मी कमी पडतो तिथे असतेस तू

शांत सगळी वादळे करतेस तू
हात माझा ज्या क्षणी धरतेस तू

सांग ना नक्की कुठे लपतेस तू
मारतो मी हाक अन् सुचतेस तू

सांग हे करणे कसे जमते तुला -
पाहतो जेव्हा फुले, दिसतेस तू ...

बोलके तर माैनही असते तुझे
पाहतो डोळ्यात अन् कळतेस तू

काळजी माझी किती रस्त्यासही
वाट माझी केवढी बघतेस तू...

जयदीप

पहिली लोकल

Submitted by रसप on 20 January, 2015 - 23:34

सावळा निश्चल रस्ता पहाटेच्या रात्री पहुडलेला
संथ पाउलांचा ताल मंद ठोक्यांशी जुळलेला
आणि आपलाच आपल्याशी एक मूक हिशोब चाललेला
धुसफुसीचा,
घुसमटीचा,
शक्याशक्यतांचा,
स्वप्न-वास्तवाचा,
आणि जिथे काही समजलं नव्हतं,
तिथे हातचा राखत..
जुळवाजुळव करत....

हाच सगळा हिशोब एका पिवळसर कागदावर मांडला होता
आणि तिच्या निद्रिस्त उश्याशी ठेवला होता
बाहेर निघताना दाराला कडी घातली नव्हती
कारण एक मूर्ख आशा कोयंड्यात साठली होती

स्टेशनवर पहिली लोकल यायला अवकाश होता
आणि बसायला जागा भरपूर होती
वर्तमानाशी नातं सांगणारी निरर्थकता..
त्या निरर्थक शून्यत्वात,
अजून एक शून्य मिसळलं..

होय श्रद्धा महागली आहे

Submitted by वैभव फाटक on 20 January, 2015 - 22:52

भेटवस्तूत तोलली आहे
होय, श्रद्धा महागली आहे

ठेव विश्वास आज त्याच्यावर
आज हातात बाटली आहे

गुंफ शेरास तू शिताफीने
तोकडी ही लगावली आहे

तू तिथे गाळलेस अश्रू अन
वीज येथे कडाडली आहे

आजवर जी पहातही नव्हती
आज ती चक्क लाजली आहे

वैभव फाटक, वापी ( ०७-०१-२०१५)

http://vaibhavphatak12.blogspot.in/2015/01/blog-post.html

ग्रो अप बेबीज

Submitted by वीणा सुरू on 20 January, 2015 - 11:01

डोळ्यात होते वात्सल्य
बाळाकडे पाहताना
तो खुदकन हसला
त्याचे केस उडताना
बाळ हसले खळीदार
तेव्हां हरखून गेला तो
आणि टचकन पाणावले
दोन्ही डोळे
त्या अनाथ असहाय्य बाळासाठी
रस्त्यात उभे राहून शोधत होता
टाकून जाणारा बाप
असहाय्य आई
आणि
थोडीशी माणुसकी
ते उघडं नागडं गोंडस बाळ
आणि
टक्क झोपलेली माणुसकी
माणसं विरळल्यावर
जड पावलं उचलत तो उठला
जाण्यासाठी
आणि समोरून
बाटलीत दूध घेऊन येणारा
मनुष्य दिसला
बहुतेक बाळाचा बाबा
दंगलीत लपूनछपून
स्वत:ला वाचवत
बाळासाठी जीव टाकत आलेला
बाळाच्या आईला शोधणारा

याने त्याचं नाव विचारलं
त्याने सांगितलं

आणि कमरेची तलवार उपसत

जिंदगी बोफोर्स असल्या सारखी

Submitted by मयुरेश साने on 20 January, 2015 - 04:53

जिंदगी क्रैशकोर्स असल्या सारखी
वेदनेचा सोर्स असल्या सारखी

जन्मतर मॄत्यूस देते जिंदगी पण
वाटते अफकोर्स असल्या सारखी

जिंदगीचा थांग ना पत्ता कुणा
भासते जी फोर्स असल्या सारखी

जन्म जातो व्यर्थ खटल्या सारखा
जिंदगी बोफोर्स असल्या सारखी

जिंदगी माझीच होती जन्मभर
वाटली एनडोर्स असल्या सारखी

..........मयुरेश साने

प्रक्रिया

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

अजब.. विचित्र असते
आतल्याआत तुटत जाण्याची प्रक्रिया...

चेहर्‍यावर पसरलेली असते
वाळवंटासारखी रुक्ष कोरडी शांतता
आतमधे मात्र सलसलत असतात
चरचरणार्‍या जखमा ओल्या!!!!

जितकी ती आपल्याला तोडत जाते
तितकीच ती जोडत जाते
आपल्यातील बळ.. सामर्थ्य कणकणाने!

ह्या सगळ्याची अनपेक्षित सवय होईपर्यंत
ही प्रक्रिया आयुष्याचा एक हिस्सा बनून जाते...
एखाद्या कडेकोट अभेद्य किल्ल्यासारखी
ती स्वतःला बंदीस्त करुन ..सामावून घेते...

हळूहळू आपल्या जगण्याच्या कलेवर
प्रतिकुल परिस्थितित मात करुन
प्राप्त केलेल्या बळावर.. सामर्थ्यावर
कोरडेपणावर आणि हृदयहीनतेवरही
आपले प्रेम होऊन जाते...

प्रकार: 

मैत्र

Submitted by _हर्षा_ on 20 January, 2015 - 00:49

नात्यांच्या बोथट जाणीवा
भरकटलेलं वाळवंटी आयुष्य
आपलाच तोल सावरत असतो आपण
आणि जाणीव होते मैत्रीची

कुठेतरी दूर दूर जाणारी माणसे
कुठलं नातं कुठे जोडु?
आपल्याच मनाची धडपड
आणि लाभते खास संगत मैत्रीची

कोवळ्या उन्हाची वाट बघताना
क्षणात सगळं रखरखीत होतं
आणि हात पसरुन वाट पहात असते
एक सुगंधी फुलबाग तीही मैत्रीचीच

आयुष्यात काय कमावलं
काय गमावल, अनेक विचार
सगळं काही विसरायला लावतो
एक विश्वास तो ही मैत्रीचाच

कसल्याशा मोठ्या वादळात
विस्कटलेलं मन सावरायला
उबदार स्पर्शाची जाणीव
"मी आहे ना?" ची साद तीही मैत्रीचीच

अगदी आत्तापर्यंत कायम
माझ्याबरोबरच आहे

शब्दखुणा: 

लाजरी सखी

Submitted by पल्ली on 19 January, 2015 - 07:23

लाजून झाकते ती
झाकुन लाजताना
दूर दूर का करते राणी
तुझेच आहे म्हणताना...
गळून पडावी लाज सखीची
प्राजक्ताच्या फुलांपरी
दरवळावे माझे अंगण
अन उरावी नशा ऊरी...
सलज्ज धरती भिजवी श्रावण
झरझर झरत्या धारांनी
तसाच अवखळ मीही झालो
होशिल माझी हरित धरी?...
वाटे मजला हवेहवेसे
नकारातले अर्थ खुळे
नाही नाही म्हणताना
मिठीत अलगद सखी शिरे.....

शब्दखुणा: 

प्रवास - समृध्द अनुभव देणारा

Submitted by भागवत on 19 January, 2015 - 04:41

अनोळखी व्यक्ती सोबत समृध्द अनुभव देणारा
कधी ओळखीचा, कधी अवघड, न बोलणारा

अंतर्मुख करणारा, अव्यक्त, कधीही न संपणारा
स्वतःच स्वतः ची ओळख घडवणारा

कधी उदास, प्रसन्न, रिफ्रेश करणारा
मौज मस्ती, बेधुंद, स्वप्न फुलवणारा

कधी ओढ, सहज अश्रू आणणारा
अति कठोर सत्वपरीक्षा पाहणारा

नीरस, संकटे, खुप अंत बघणारा
निसर्गाची असंख्य, अखंड रूपे दाखवणारा

ओळखीचा, मैत्रीचा, हितगुज करणारा
कधी रुक्ष, भकास, कंटाळा येणारा

प्रवास कधी मूक शब्द सोबत करणारा
जवळच्या व्यक्तीच्या मनाचा ठाव घेणारा

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन