प्रसारमाध्यम

ग्रहण - १९८४ च्या शीखविरोधी दंग्यांवर आधारीत वेबमालिका

Submitted by सहजराव on 2 July, 2021 - 23:47

डिस्ने हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ग्रहण ही वेबमालिका प्रेक्षकांच्या सेवेत रुजू झालेली आहे.
जरी ही मालिका एका कादंबरीवर आधारीत असल्याचे सांगण्यात येत असले तरीही १९८४ साली झालेल्या शीख विरोधी दंग्यांची पार्श्वभूमी या मालिकेला आहे. १९८४ मधे दिल्ली, कानपूर आणि बोकारो इथे इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलीत लहान मुले, बायका, वृद् आणि तरूण पुरूष या सर्वांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

ट्रान्सजेंडरइंडियाडॉटकॉम

Submitted by स्वेन on 27 June, 2021 - 06:20

सोशल मीडिया हा आजच्या जगात एक प्रभावशाली माध्यम असून समाजातील कुठल्याही घटकासंदर्भात बदल घडवून आणण्याचं साधन म्हणूनही याकडे पाहिलं जातं. अलीकडच्या काही वर्षांत लैंगिक अल्पसंख्याक समुदायासाठी सोशल मीडिया म्हणून अशा प्लॅटफॉर्मचा उपयोग होतो आहे आणि अशा समुदायातील लोक वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त व्हायला लागले आहेत. समाजाकडून त्यांची दखल घेतली जाऊ लागली आहे. त्यांच्या अशा व्यक्त होण्यामुळे आपल्यालाही काही गोष्टी समजायला लागल्या आहेत.

परिस्थिती

Submitted by omkar_keskar on 2 May, 2021 - 06:44

सध्या मी whatsapp चे स्टेटस बघणं टाळलंय.
परंतु आल्या मेसेजला उत्तर देण्याचं पथ्य मात्र पाळलंय.
अवघड झालंय जगणं अन खडतर झालाय प्रवास.
प्रत्येक रात्रीवर उधार पडलाय उद्याचाच श्वास.
फोटो कुणाचा हे बघण्याआधी, आधी खाली पहावं लागतं
फुलं असतात दोन्हीकडे, तिथलं म्हणणं मात्र समजून घ्यावं लागतं.
पहिली जरा थंडावताच दुसरी लाट आली.
उमलत्या सुखाच्या प्रवासात काटेरी वाट आली.
झाला कुणाचा जन्म अन ओढवलं कुणाचं मरण
शेवटी नशिबाच्या सोंगटीवर एकजात सारे शरण.
कुठला वर्ण कुठला देश कुठला जात अन धर्म
माणसाशी माणूस म्हणून वागण्यातच माणुसकीचे मर्म.

शब्दखुणा: 

मिडीयावाल्यांचे आणि राजकारण्यांचे भाषेचे प्रयोग..

Submitted by पाचपाटील on 29 April, 2021 - 17:44

राजकारण्यांना 'काय बोलायचं आता' हा मूर्ख प्रश्न कधीही सतावत नाही.. ते लोक अनंत काळापर्यंत ऐसपैस बोलत राहू शकतात..!
पण मिडीयावाल्यांचे मात्र फारच हाल होतात ..!
कारण दिवसभराचा मुबलक वेळ आ वासून उभा असतो.. आणि दळत रहायचं म्हटलं तर हाताशी पुरेसा कंटेंटही नसतो..
मग काय करणार..! वाक्यांची लांबी वाढवण्याचा एकमेव उद्देश डोळ्यांसमोर ठेवून, वाक्यामध्ये बिनकामाचे शब्द
घालून घालून, नेमून दिलेली वेळ मारून न्यावी लागते बिचाऱ्यांना..!

शब्दखुणा: 

रासपुतीन

Submitted by बाख on 15 April, 2021 - 03:28

बोनी एम्" या ग्रुपच्या "रासपुतीन" या गाण्यावर नाचणाऱ्या नवीन रज्जाक आणि जानकी ओमकुमार यांच्या तीस सेकंदाच्या विडिओवर इतका गहजब का माजला आहे? असे काय वावगे आहे या व्हिडिओत काही कळले नाही. कुणाला माहिती असेल तर कृपया कळवावे.

मराठी रेडिओ

Submitted by rmd on 14 January, 2021 - 13:15

देशात असताना घरी कायम रेडिओ चालू असायचा. अगदी लहान असल्यापासून तो आयुष्याचा अविभाज्य भागच झाला होता. त्यातही मराठी गाण्यांचे कार्यक्रम अगदी लक्षात ठेवून ऐकले जायचे. पुणे एफ.एम. वर संध्याकाळी ५.३० वाजता लागणारा सांजधारा हा विशेष आवडता.
अमेरिकेत आल्यावर बर्‍याच गोष्टी मिस करायला लागले त्यात देशातला आणि त्याहीपेक्षा मराठी रेडिओ ही एक गोष्ट होती. यूट्यूब किंवा गाना वगैरे सारख्या ठिकाणी गाणी ऐकून दुधाची तहान ताकावर भागवायचा प्रयत्न केला गेला. पण त्यात ती रँडम गाणी ऐकण्याची मजा येईना. आपल्याला कधीही माहिती नसलेल्या चित्रपटांची गाणी अचानक कानावर पडण्यात जी धमाल आहे ती त्यात नव्हती.

प्रीतम शाह यांना न्याय मिळेल का?

Submitted by बिपीन चन्द्र हर... on 21 November, 2020 - 04:40

अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानच्या शेजारी राहणाऱ्या प्रीतम शाह यांनी आत्महत्या केली असून त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीही पोलिसांना सापडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या या चिठ्ठीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची नावं आहे.

सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!...पार्ट २

Submitted by हनुमंज on 8 October, 2020 - 09:43

सुशांतसिंग रजपूत १ या धाग्याने २000 प्रतिसाद ओलांडल्याने हा नवीन धागा. यापुढील प्रतिसाद या धाग्यावर येऊ द्या.

पार्ट १ धाग्याची लिंक
https://www.maayboli.com/node/75114

तिरुमला ऑईल

Submitted by बिथोवन on 15 September, 2020 - 00:54

तुम्ही सचिन सुप्रिया या जोडगोळीचा "तिरुमला ऑईल" ही जाहिरात पाहिली असेल. ही जाहिरात पाहिल्यानंतर मला पडलेले प्रश्न.

(१) "मला आवडणारे पदार्थ मी नेहमीच खातो" असे म्हणताना सचिन त्याची तुंदीलतनु आतमध्ये खेचतो असे वाटते का?

(२) सचिनचे सुटलेले पोट दिसू नये म्हणून ढगळ असा टी शर्ट घातला असावा का? (कारण तो खरोखर फिट्ट असेल तर शर्ट आतमध्ये खोचलेला दाखवला असता असे वाटते.)

(३) सुप्रिया ज्या पद्धतीने "तिरुमला ऑईल" असे कॅन दाखवत ठासून म्हणते तेंव्हा ती एखादी इंजिन ऑईलची जाहिरात करते असे वाटते का?

द सोशल डिलेमा - नेटफ्लिक्स

Submitted by सई केसकर on 11 September, 2020 - 11:32

१९९९-२००० हे वर्ष माझ्यासाठी आणि माझ्यासारख्या त्यावेळी टीनएजर असणाऱ्या मुलामुलींच्या आयुष्यात फार मोठ्या बदलाचं होतं. घरातल्या फोनमधून चिर्रर्र चिर्रर्र असा आवाज करत आमच्या कम्प्युटरमध्ये इंटरनेट यायचं. आणि मग आम्हाला एक मोठं पटांगण बागडायला मिळायचं. सुरुवातीचे दिवस हे हॉटमेल आणि याहूचे होते. शाळा कॉलेजमधली गोड गोड प्रेमपत्र आता पासवर्ड प्रोटेक्टेड इमेलमध्ये येत असल्यामुळे अनेक जणांची सोय झाली होती. बरेच कवी मनाचे लोक आता तासंतास फोनवर गप्पा मारण्यापेक्षा जे वाटतंय ते पात्रात किंवा कवितेत लिहून पाठवू लागले.

Pages

Subscribe to RSS - प्रसारमाध्यम