प्रसारमाध्यम

तुमचा बातमीचा विश्वासार्ह सोर्स काय?

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 August, 2017 - 13:56

हल्ली एखादी नवीन वादग्रस्त घटना घडली की ती मला तरी पहिले व्हॉटसपवरच समजते. मग तिचा शोध घेतला जातो. शोध घेताना परस्परविरोधी अश्या बरेच बातम्या सापडतात. काही ठिकाणी तर चक्क व्हॉटसपवर फिरणारया खोट्या पोस्टच शहानिशा न करता छापल्या आहेत असे वाटते. आता हा निष्काळजीपणाही असू शकतो किंवा ते कोणाच्यातरी दबावाखाली वा विकले गेल्याने खोटी बातमी देत असावेत.

शब्दखुणा: 

दिसतं तसं नसतंच.... पण किती???

Submitted by विद्या भुतकर on 25 July, 2017 - 20:16

डिस्क्लेमर: लिहिताना माणूस कुठल्या टोन मध्ये बोलत आहे हे कळत नसल्याने अनेक गैरसमज होऊ शकतात. तसे झाले तरी ते स्वतःजवळच ठेवावेत. या पोस्टमधून कुणालाही दुखवण्याचा काडीमात्रही हेतू नाहीये. माझ्या चिकित्सक स्वभावामुळे पडणारे प्रश्न मोठया व्यासपीठावर मांडण्याचा हा छोटा प्रयत्न आहे इतकंच.

नोटबंदीचे सु-परीणाम भाग २

Submitted by मिलिंद जाधव on 15 July, 2017 - 04:52

पुर्वी " नोटबंदीचे सु-परीणाम " असा ऐक धागा काढलेला होता. त्या धाग्यावर आता प्रतिक्रीया सुविधा बंद केलेली असल्याने नविन धागा उघडलेला आहे.

टीव्ही व मालिका

Submitted by शिवाजी उमाजी on 10 July, 2017 - 16:20

टीव्ही व मालिका

माणुस एक तर आक्रमक असावा किंवा फार दुबळा असावा, या दोघांनाही अनुक्रमे सर्वांचे लक्ष केंद्रित करता येते वा सहानुभुती मिळवता येते. असलेच विषय हल्लीचे हिंन्दी व मराठी मालिका तयार करणारे निवडतात, ज्या मधुन समाजाला कोणताच सकारात्मक संदेश दिला जात नाही. उलटपक्षी नैतिकतेच्या चिंद्या करीत, अनैतिक संबंधाचं बटबटीत चित्रण दाखवून केवळ साचेबद्ध नातेसंबधांच उदात्तीकरण केलेलं दाखवतात, जवळचेच काहि नातेवाईक, मित्र खलनायक दाखवत कथानक तयार करून प्रायोजक मिळवून प्रसारीत करायचे व गल्ला वाढवित रहायचे. या सार्‍यात केवळ टी.आर.पी. वाढवायच्या नावाखाली मुळ कथेचं पार मातेरं केलं जातं.

जागतिक दिन

Submitted by अतुलअस्मिता on 9 July, 2017 - 09:48

गेल्या रविवारी जागतिक श्वानदिन होता. दिनू जरा अंमळ उशिरानेच उठला होता. शनिवारी रात्रीच कुठल्यातरी जागतिक शिरा स्पर्धेमध्ये सर्वोत्तम शिऱ्याची निवड करण्याच्या निकषांवर अभ्यास करून त्याचा सारांश निदान शंभर समव्यसनी अशा ओळखीच्या व बिनओळखींच्या व्यक्तींना त्यांच्या व्हात्साप्प्वर निरोप पाठवून पाठवून बोटांची झीज झाल्यामुळे त्यांची आग होत असल्याच्या कारणास्तव त्याचा जरा जास्तच वेळ डोळा लागला होता. तरीसुद्धा डोळा उघडल्याबरोबर त्याने आपण सूर्योदयाशी स्पर्धा जिंकली आहे याची खात्री करून घेतली होती.

शब्दखुणा: 

भारताच्या पुढचे प्रदुषणाचे आव्हान !!

Submitted by मिलिंद जाधव on 8 July, 2017 - 13:37

डीस्पोजीबल प्लॅस्टीक ग्लासेस, प्लेट्स, पिशव्याचा गार्बेज रिसाक्लींग हा भारताचा एक ज्वलंत प्रॉब्लेम झालेला आहे. सध्या भारतात प्लॅस्टीक
गार्बेज हे ईतर गार्बेजप्रमाणेच डंप केले जाते कारण काही तुरळक अपवाद सोडता भारतात प्लॅस्टीक रीसाक्लींगची ईफेक्टीव पद्धती वापरली जात नाही. प्लास्टीक गार्बेज हे डीग्रेडेबल नसल्याने ते ह्या डंप ग्राऊंड मध्ये मुळ रुपात तसेच रहाते.

आपका स्वागत है , मेरे दोस्त !!

Submitted by मिलिंद जाधव on 8 July, 2017 - 09:11

गेल्या ७० वर्षाम्तला भारताच्या पंतप्रधानांचा पहीला इज्राईल दौरा !!

गेल्या ७० वर्षांत ईज्रायल सारख्या सामर्थ्यवान देशाला ईग्नोर करण्याच महान काम आपल्या सरकारने आता पर्यंत
केलेल आहे. त्याच बरोबर पॅलेस्टाईन सारख्या देशाच समर्थन सुद्धा केलेल आहे.

नितिन गडकरी साहेबांचे प्लान्स !!

Submitted by मिलिंद जाधव on 2 July, 2017 - 14:09

पर्यायी इंधन आणि स्वस्त परंतु आरामदायी व पर्यावरणस्नेही वाहतूक व्यवस्था हा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अभ्यासाचा विषय. त्या क्षेत्रात त्यांनी कामही केले आहे. ‘बदलता महाराष्ट्र’च्या ऊर्जापर्वाचा समारोप करताना त्यांनी त्यांचे अनुभवजन्य विचार मांडून, ऊर्जा क्षेत्रातील नव्या प्रकाशवाटा उलगडून दाखविल्या.. त्यांच्या भाषणाचा संपादित अंश.

झीरो बजेट नॅचरल शेती पद्दती !!

Submitted by मिलिंद जाधव on 1 July, 2017 - 04:30

शेतीसाठी, शेतकर्यांसाठी, अथक परीश्रम करुन , संशोधन करुन नविन पद्दती निर्माण केलेल्या कृषी महर्षी
श्री सुभाष पाळेकर यांचे अभिनंदन !! संपुर्ण भारत देशात शेतकर्यांत ह्या महर्षींची ख्याती पसरलेली आहे. हरीयाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, केरळ, आंध्रा, तामिळनाडु, कर्नाटक राज्यात झीरो बजेट नॅचरल शेती करणारे ४० लाख शेतकरी आहेत. पण ह्याला अपवाद आहे महाराष्ट्राचा. ह्या महाराष्ट्र पुत्राला त्याच खुप दुखः आहे. पण आता चित्र बदलत आहे !!

Pages

Subscribe to RSS - प्रसारमाध्यम