सहजपणे टाळता येणारी दुर्घटना - महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा

Submitted by उदय on 18 April, 2023 - 00:58

रविवार, १६ एप्रिल २०२३, खारघर (जि रायगड ) येथे महाराष्ट्र भूषण सोहळा दिमाखात पार पडत असतांना एक दुर्घटना घडली आणि त्यामधे १० + लोकांना प्राण गमवावे लागले. Sad

पुरस्कार वितरण समारंभ प्रत्यक्ष डोळ्यांनी बघण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते, आणण्यात आले होते. सभास्थानी, मोकळ्या मैदानात, उन्ह डोक्यावर घेत, हजारो/ लाखो लोक सकाळपासून ताटकळत बसले होते.
व्यासपीठावर राज्याचे तसेच केंद्रातल्या नेत्यांनी हजेरी लावली होती. एव्हढा मोट्ठा श्रोतागण आपल्याला एकण्यासाठी आले आहेत म्हटल्यावर त्यांच्याही उत्साहाला पारावर उरला नव्हता. हळू हळू तापमान ३८ से. कडे सरकत होते. तापमान, अनेक तास थेट उन्हाशी संपर्क, हवेतील आद्रता या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून अनेक उपस्थितांना उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यामुळे दहा पेक्षा अधिक लोकांना प्राण गमवावे लागले.

एव्हढा मोठा प्रेक्षक वर्ग एकत्र येत असतांना त्यांच्या साठी आवश्यक अशा किमान सोई सुविधांची व्यावस्था करण्याचे सौजन्य आयोजकांनी ठेवायला हवे होते. उन्हापासून रक्षण करण्यासाठी डोक्यावर छत नाही, थंड पिण्याच्या पाण्याची सोय नाही. एप्रिल महिन्यात, भर दुपारी, मध्यान्हीची वेळ, अनेक तास चालणार्‍या समारंभासाठी निवडली कुणी? या घटनेस जबाबदार कोण ?

ही मानवनिर्मीत घटना सहजपणे टाळता येण्यासारखी होती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून दोन कोटी खर्च केला असता तर एक रात्र राहण्याची ,खाण्याची सोय करणे सरकार ल कठीण नव्हते.>> सरकारने म्हणजे तुमच्या आमच्या खिशातूनच ना? कशाला ? यांना मिरवण्याची/ मिरवुन घेण्याची इतकी हौस आहे तर आपल्या खिशाला कशाला भार? त्या बुवांनी करायचा होता सगळा खर्च नाहीतर सत्ताधारी पक्षाने आपल्या फंडातून करायचा होता.

धाग्यावरचा 'मेलेले त्यांच्या मूर्खपणामुळे मेले हा भावनिक सूर थोडा खटकला.>> हा सुर तर स्वारीं च्या बावळ्या भक्तांनी लावलाय फेसबुक ट्विटर वर .

ते जाऊद्या स्वारींनी पुरस्कार केला का परत?

आता हे कीस पाडण्याकडे झुकतेय असे वाटते.
धाग्याचे शीर्षक पुरेसे आहे. जून जुलै महीन्यात पंढरपूरला पालख्या निघतात तेव्हां अंदाजे दहा ते पंधरा लाख भाविक पालखीसोबत चालतात. प्रत्यक्ष पंढरपुरात किती लोक येतात याचा आकडा उपलब्ध होत नाही. तो २५ लाखाच्या आसपास सहज असेल. पण अशी घटना घडत नाही.

उत्तर प्रदेशात २५ लाखांच्या सभा होण्याच्या अनेक घटना आहेत. पण अशी घटना घडलेली नाही.
जगन्नाथ पुरीच्या यात्रेत अनेकदा चेंगराचेंगरी मुळे, रथाखाली चिरडून माणसे मरतात. पण त्यावर सोल्युशन निघत नाही. ही रिस्क माहिती असूनही लोक जमतात. त्यांना शासन आमंत्रित करत नाही.

इथे सरकारी पुरस्कार सोहळा होता. तो हॉलमधे करता आला असता. त्या ऐवजी महाराष्ट्रातल्या २५ लाख अनुयायांना बोलावून मोकळ्या मैदानात एप्रिलच्या उन्हाचा अंदाज न घेता कार्यक्रम घेतला. दहा वाजता चा कार्यक्रम दीड दोनपर्यंत चालला तर काय होईल याचा अंदाज एकालाही येऊ नये ? अशा ढिसाळ पणामुळे एक माणूस मेला कि वीस मेले कि शंभर मेले हा प्रश्नच उद्भवत नाही, ना त्याची गणितं इथे लागू होतात.

सहज टाळता येण्यासारखी घटना होती. मांडव घातला असता, टोप्या पुरवल्या असत्या आणि पाण्याची सोय केली असती....
या गोष्टी अशक्य होत्या का ? एव्हढा एकच मुद्दा आहे.

माझ्या मते सोयी पुरवण्याची क्षमता, योजना आणि अक्कल नसताना दूर दूर वरून लोकांना अक्षता देऊन ' या हं आमच्या कार्याला ' असे बोलावणे हेच चुकीचे होते. आणि सरकारने एवढा मोठा कार्यक्रम अंगावर घेण्याची काहीच जरूर नव्हती.
हे केवळ शक्तिप्रदर्शन आणि एकगठ्ठा मतांसाठीचे हिडीस राजकारण होते.

गेल्या आठवड्यापासूनच मुंबई आणि ठाण्यात उष्णतेची लाट आहे. याचे इशारे वेधशाळेकडून येत असतात. सरकारला ते मिळत नसतील का ?
https://www.loksatta.com/mumbai/heat-wave-continues-in-thane-including-m...

या वर्षी अपवादात्मक रित्या जानेवारी पाठोपाठ फेब्रुवारीत सुद्धा थंडी टिकून राहिली. एरव्ही जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून थंडी कमी होते. फेब्रु मधे उन्हाळ्याची चाहूल लागते. मार्च मधे उन्हाळा जाणवायला लागतो.

एप्रिल मधे मात्र अनेकदा वैशाख वणवा अनुभवायला मिळतो. सकाळी सातपर्यंतच वातावरण ठीक असतं. नंतर तापमान वाढत जातं. नऊच्या दरम्यान उन्हाच्या झळा जाणवतात. सकाळी दहा म्हणजे आल्हाददायक वातावरण असल्यासारखा कांगावा करण्यात अर्थ नाही. मुंबईत समुद्रावर मोकळे वारे असते . मात्र ठाणे, भांडूप, मुलुंड, खारघर, दादरचा आतला भाग इथे आर्द्रतेमुळे घामाच्या धारा लागतात. डीहायड्रेशन त्यामुळेच होतं. ही परिस्थिती लपवून ठेवण्यासारखी आहे का ?

उन्हाळ्यात लग्नाला गेलं तरी घुसमट होते. कारण गर्दीमुळे ऑक्सिजन कमी पडतो. हवा खेळती राहत नाही. या सर्व गोष्टी अडाणी माणसाला सुद्धा ठाऊक असतात.

केके चा उल्लेख झालाच म्हणून. नाहीतर त्या वेळी असे घडले होते हे टाळलेले बरेच.
पण त्या वेळी केकेचा खून झाला इथपासून झालेल्या सदोष मनुष्यवधाच्या चुकीबद्दल ममता बॅनर्जी यांना अटक करून चौकशी व्हावी अशा मागण्या झालेल्या होत्या.
https://www.financialexpress.com/india-news/bjp-blames-mismanagement-by-...

केकेच्या दुर्दैवी अंताआधीचे व्हिडीओ समाजमाध्यमावर फिरत होते. खारघर ला वृत्तवाहीन्यांचे कॅमेरे होते ना ? ड्रोन सुद्धा होते ना ? मग चेंगराचेंगरीचा एकही व्हिडीओ कसा बाहेर आलेला नाही ? तो बघण्याची हौस नाही. पण ही घटना कॅमेर्‍यात कैद झाली नसेल असे वाटते का ?

आजूबाजूच्या इमारतींमधल्या रहिवाश्यांनी केलेले चित्रीकरण पाहवत नाही. भयानक आहे ते. हे व्हिडीओज खारघर मधलेच आहेत का याची सत्यता पोलीस पडताळून पाहतीलच. तिथलेच असतील तर गर्दी आणि अफरातफरीमुळे अँब्युलन्स पोहोचणे शक्यच नाही असे दिसतेय.

शंभर वेळा सहमत.
अवांतर :
मुंबईत वैशाखातल्या लग्नमुंजींना जाणं मोठं जिकिरीचं असतं. भले मोठे पंखे कोपऱ्यात उभे केलेले असतात. तो वाऱ्याचा भला मोठा झोतही सहन होत नाही. जेवणाची वेळ होईपर्यंत खुर्च्यांच्या रांगा विस्कटलेल्या असतात. त्यातून वाट काढत बूफे मधली जेवणाची थाळी भरून घेऊन खुर्चीत बसायला जावं तर ताटातल्या पापड कुरडया सैरावैरा उडतात. कधीकधी गुलाब जामच्या प्लॅस्टिकच्या वाट्या ताटातच उपड्या होतात. साडीची चापून चोपून चोपून बसवलेली पदराची घडीच्या घडी दुसऱ्याच्या ताटात जाऊन विसावते. कार्यालयातून कधी एकदा पळ काढतो असे होते. अलीकडे वातानुकूलित कार्यालय असते तिथे तर अधिकच घुसमट होते.

< खारघर ला वृत्तवाहीन्यांचे कॅमेरे होते ना ? ड्रोन सुद्धा होते ना ? मग चेंगराचेंगरीचा एकही व्हिडीओ कसा बाहेर आलेला नाही ? तो बघण्याची हौस नाही. पण ही घटना कॅमेर्‍यात कैद झाली नसेल असे वाटते का ?>
खरंय. प्रसारमाध्यमांनी सेल्फसेन्सॉरशिप लागू केली असेल.

ह्या सगळया घटनेकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून अ प यांच्या बातम्या पुढे येत राहील्या आहेत, माध्यमं तेच हायलाईट करतायेत असा संशय आलाय आता.

विरोधी पक्षांनी सरळ कोर्टात जायला हवं पण तेही फार वाच्यता करत नाहीयेत.

पोलिस गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरा वापरत नाहीत का? पंतप्रधान प्रकल्पांची प्रगती बघायला ड्रोन वापरतात.

बहुसंख्य लोकांना हे धर्माधिकारी कोण आहेत हे माहीत नाही.
मला पण आता पर्यंत माहीत नव्हते.
पण त्यांचे लाखो अनुयायी आहेत म्हणजे किती गुप्त पने कार्य चालू आहे.
श्री सदस्य ना जाहीर ठिकाणी पण त्याची वाच्यता करण्याची परवानगी नसेल.
लोकांना हे धर्माधिकारी कोण हे माहीत नाही पण राजकीय पक्षांना बरोबर माहीत आहे.

तेथील कोणतेच व्हिडिओ,फोटो श्री सदस्य सार्वजनिक करणार नाहीत..गुप्तता पाळणे हाच उपदेश त्यांस बैठकीत देत असतील.
बाकी राहिलेले काम सरकार करेल .
मुख्य मीडिया ला लांब ठेवून ते तर बिचारे हुकमाच दावेदार

मोदींनी 2014 ला सत्तेवर आल्यानंतर लगेच महाराष्ट्रातील संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानच्या धर्तीवर अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने पुरस्कार कि योजना सुरू केली होती. त्यावेळी अपवाद वगळता सर्वांना त्यांचे नाव माहीत झाले होते.

त्यांना जाहीरपणे पद्मश्रीने सन्मानित केले होते.

ड्रोन चित्रीकरण करता यावे ह्यासाठी मंडप घातला गेला नव्हता असं फ्री प्रेस ने म्हटलं आहे

हे लॉजिक चुकीचे आहे .
मंडप असेल तरी dron shooting करता येते.
जास्त उंचावरून ते उडत नाहीत.
क्रिकेट सामन्यांचे शूटिंग होते त्या मध्ये ते पण कमी उंची वरून च केले जाते

सर्व राजकीय पक्षांना धर्माधिकारी माहीती आहेत की, सगळे जातात तिकडे. विलासराव देशमुख काळातही नानासाहेब धर्माधिकारी यांना बहुतेक महाराष्ट्र भुषण पुरस्कार अशा मोकळ्या मैदानावर खूप जणांच्या उपस्थितीत दिलेला. तेव्हाही आणि आत्ताही मला वाटलं की एवढी लोकं जमवून कशाला. आमच्याकडच्या मदतनीस ताई त्यावेळी गेल्या होत्या, यावेळी गेल्या नाहीत, मला तीच काळजी वाटली की त्या गेल्या असतील तर सुखरुप आहेत ना.

लोकमतने २०१९ ला कुठलातरी पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते उद्धव ठाकरे यांना दिलेला २०१९ सुरुवातीला किंवा तेव्हा युती होणार हे ठरल्यावर आणि आप्पासाहेबांनाही कुठलातरी पुरस्कार दिलेला हे त्यावेळी टीव्हीवर बघितलं होतं. मुख्यमंत्री झाल्यावर उ ठा ही मुलाखतीत म्हणाले होते की मी आप्पासाहेबांना फोन करत असतो. हे सर्व मी स्वतः बघितलं आहे.

मागील पानावर आशुचॅम्पने एका फेसबुक पेजचा स्क्रीनशॉट दिला आहे, ती स्वारी भक्ताची पोस्ट फारच insensitive वाटली. या ' स्वारी ' आणि त्यांच्या fans बद्दल कुतूहल वाटलं, म्हणून त्या पेज वरच्या बऱ्याच posts वाचल्या (हे अप्पासाहेब धर्माधिकारी मला दुर्घटना झाल्यावरच माहित झाले. पद्मश्री आहेत हे वर पोस्ट वाचुन कळले)

आधी मला बहुतेक अनुयायी ग्रामीण भागातले वाटले. पण नंतर त्यातील DEF (Doctors Engineers Federation) असा काही ग्रुप पाहिला आणि धन्य वाटलं. त्यांच्यासमेत सगळेच अनुयायी defensive mode मधे आहेत. जे मृत्यु पावले ते उपस्थित संख्येच्या तुलनेत कमी आहेत, स्वारींचा कसा दोष नाही, व्यवस्था कशी उत्तम होती हे सांगण्याची चढाओढ आहे. सगळ्यात विनोदी पोस्ट म्हणजे
' मृत्यू व्यक्तींमध्ये बौद्ध आणि ब्राह्मण नाहीत #समजलं ना काय ते ' खरं तर मला तरी समजलं नाही. पण अनुयायी मृत व्यक्तींची पण जात पाहताहेत यावरून त्यांच्या स्वारींची शिकवण मात्र दिसली. तिथेही नेहमीप्रमाणे ब्राह्मण वि बहुजन समाज आणि भाजपा वि इतर पक्षचाहते हे शाब्दिक युद्ध चालु आहे. मग मला नेहमीप्रमाणे माबोची आठवण आली आणि मी इथे परत आले.

मागील पानावर आशुचॅम्पने एका फेसबुक पेजचा स्क्रीनशॉट दिला आहे, ती स्वारी भक्ताची पोस्ट फारच insensitive वाटली >>> अगदी अगदी.

माझ्या साजुतीनुसार ते फेसबुक पान आता वेगळ्याच लोकांनी ताब्यात घेतलं असून तिथे लिहिणारे श्रीभक्त नाहीत. मुद्दाम तश्या पोस्ट लिहिल्या जात आहेत.
उदा. आता आम्ही भाजपला मत देणार नाही कारण त्यांनी आमची बदनामी केली.

अंजू म्हणताहेत ते आठवत नव्हतं. शोधलं तर आताच्याच बातम्यांत पुरस्कार सोहळा व्हायच्या आधीच्या बातम्यांत हे मिळालं.
"२००८ साली डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाने मरणोत्तर महाराष्ट्रभूषण पुरस्कार दिला, खारघरमध्ये न भूतो न भविष्यति असा सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी देश-विदेशांतून सुमारे ५० लाख लोकांची गर्दी झाली होती. या रेकॉर्ड ब्रेक गर्दीला २०१० मध्ये 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये स्थान मिळालं. हा पुरस्कार तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडून आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी स्वीकारला होता. आज त्याच अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान होत आहे."

एवढी गर्दी जमूनही तेव्हा काही दुर्घटना झाली नाही हे नवल म्हणायचं की गर्दीचे आकडे फुगवलेत?

एकंदर याबाबत सगळे राजकीय नेते एका माळेचे मणी.

तरीही मला हे दोन्ही धर्माधिकारी कोण आणि काय करतात ते धड माहीत नाहीत. बातमी वाचल्यावर मला स्वाध्याय परिवार आठवला . मी त्या दु:खद घटना धाग्यावरही स्वाध्यायी असं लिहिलं. ते पांडुरंगशास्त्रे आठवले ना?

चिनुक्स, हो त्या पेजवरील बरेच जण अनुयायी नाहीत. ते बैठक आणि स्वारींची धिंड काढायला पेजवर आले आहेत.

ते पांडुरंगशास्त्रे आठवले ना?>>>> हो, पांडुरंग शास्त्रींचे गुजराथी फॅन्स जास्त होते. मुंबईत ट्रेन मधे आणि शेजारीपाजारी स्वाध्यायी (अनुयायी) बरेच असायचे.

मला मरणोत्तर वगैरे खरंच आठवत नव्हतं मात्र, ते सविस्तर लिहिल्याबद्दल धन्यवाद भरत. विलासराव देशमुख, नानासाहेब धर्माधिकारी, मैदान, गर्दी आठवत होतं. मला बैठक वगैरे ऐकुन माहीतेय कारण इथली बरीच लोकं जातात, आमच्या मदतनीस ताई आणि त्यांचे मिस्टरही जातात. तिथे दासबोध निरुपण असतं हेही ऐकून माहीतेय. आमच्या एम आय डी सी मधला एक पुर्ण मोठा रोड नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने आहे, हे पटकन माझ्या लक्षात येत नाही. मी आपली कावेरी, पटेल वगैरे दुकानं आहेत तो मोठा रोड असं म्हणते.

बाकी धर्माधिकारी प्रतिष्ठानचे वृक्षारोपण, ती झाडं जगवणे, वाढवणे हे कार्य कारने बदलापूर पाईपलाईन रोडवर अनेकदा फिरत असतो म्हणून महितेय. व्यसने लोकांची सुटली आहेत हे ऐकून माहितेय.

मी त्या दु:खद घटना धाग्यावरही स्वाध्यायी असं लिहिलं. ते पांडुरंगशास्त्रे आठवले ना? >>> हो. तेही बहुतेक रायगड जिल्ह्यातले पण काम गुजराथमध्ये जास्त.

विलासराव देशमुखांनी सत्य साईबाबांना बोलवले होते. मुळशी तालुक्यातील एका आश्रमाचे उद्घाटन होते.
धर्माधिकारी पण का?

पण कार्यक्रम संध्याकाळी च पाच सहा च्या दरम्यान ठेवला पाहिजे होता.
7 पर्यंत संपला असता

नवीन Submitted by Hemant 333 on 19 April, 2023 - 11:39

धन्य तुमचे आयोजन

वृक्षारोपण वगैरे बरेच ग्रुप, संस्था करतात. त्यात काही खास नाही.
त्यांनी आरे वाचवण्यासाठी काही केल होत का? नाही करणार!
आमच्या इथे पुण्यात वेताळ टेकडीवर बिल्डर लॉबीची वक्र नजर वळली आहे. ती टेकडी आणि तिथली झाडे वाचवण्यासाठी काही लोक एकाकी लढा देत आहेत. शेवटी बिल्डर जिंकणार हे निश्चीत आहे.
तेव्हा, हे स्वामिजी, या इथे आणि वाचावा ती झाडे. नाही येणार. कारण? सांगायला पाहिजे काय?

पांडुरंग शास्त्री यांचे अनुयायी पेनसिल्व्हेनियातही होते. सर्व गुजराथी होते. भारतिय लोकांच्ययात्या निमित्ताने, ओळखी व्हाव्यात म्हणुन आम्ही एकदोनदा गेलेलो. पैकी नवरा सत्संगला येत नसे पण मी मात्र जात असे. एकंदर मला तो प्रकार बोअर झालेला. काही नित्योपासनेचे श्लोक/भजन/ स्तोत्रे असत.

झालेली घटना दुर्दैवी आहे. एवढ्या मोठ्या जनसागरात आपण हरवु नये या कारणाने लोक जागा सोडत नसावेत की पाणी शोधत नसावेत - असे वाटले.
बाकी कोणाचा अनुनय करायचा हा ज्याचा त्याचा पर्याय आहे. ज्याचे त्याचे स्वातंत्र्य आहे. जसे टीकास्त्र सोडण्याचे तुम्हाला स्वातंत्र्य तसेच अगदी तसेच.
गर्दीच्या ठिकाणी अजिबात जाउ नये. वाईट्ट प्रकार घडतात. देवीच्या जत्रेला एकदा बोकडाचे रक्त इलोक्ट्रोक्युट होउन लोकं मेल्याची बातमी लहानपणी ऐकलेली होती. स्टँपेड तर सर्रास होतात. परत रोगराई, अस्वच्छता आणि गैरसोय ती वेगळीच. सप्तशृंगी जत्रेला कोण्या मुलीवर जमावाने हात साफ करुन घेतला अशा विकॄत बातम्याही वाचनात आलेल्या आहेत.

Pages