सहजपणे टाळता येणारी दुर्घटना - महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा

Submitted by उदय on 18 April, 2023 - 00:58

रविवार, १६ एप्रिल २०२३, खारघर (जि रायगड ) येथे महाराष्ट्र भूषण सोहळा दिमाखात पार पडत असतांना एक दुर्घटना घडली आणि त्यामधे १० + लोकांना प्राण गमवावे लागले. Sad

पुरस्कार वितरण समारंभ प्रत्यक्ष डोळ्यांनी बघण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते, आणण्यात आले होते. सभास्थानी, मोकळ्या मैदानात, उन्ह डोक्यावर घेत, हजारो/ लाखो लोक सकाळपासून ताटकळत बसले होते.
व्यासपीठावर राज्याचे तसेच केंद्रातल्या नेत्यांनी हजेरी लावली होती. एव्हढा मोट्ठा श्रोतागण आपल्याला एकण्यासाठी आले आहेत म्हटल्यावर त्यांच्याही उत्साहाला पारावर उरला नव्हता. हळू हळू तापमान ३८ से. कडे सरकत होते. तापमान, अनेक तास थेट उन्हाशी संपर्क, हवेतील आद्रता या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून अनेक उपस्थितांना उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यामुळे दहा पेक्षा अधिक लोकांना प्राण गमवावे लागले.

एव्हढा मोठा प्रेक्षक वर्ग एकत्र येत असतांना त्यांच्या साठी आवश्यक अशा किमान सोई सुविधांची व्यावस्था करण्याचे सौजन्य आयोजकांनी ठेवायला हवे होते. उन्हापासून रक्षण करण्यासाठी डोक्यावर छत नाही, थंड पिण्याच्या पाण्याची सोय नाही. एप्रिल महिन्यात, भर दुपारी, मध्यान्हीची वेळ, अनेक तास चालणार्‍या समारंभासाठी निवडली कुणी? या घटनेस जबाबदार कोण ?

ही मानवनिर्मीत घटना सहजपणे टाळता येण्यासारखी होती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बैठक!
हा शब्द ऐकून मनात एक घंटी वाजली. का बर?

सकाळी १० च्या कार्यक्रमात एप्रिल महिन्यात माणूस मरेल इतकी उष्णता आता महाराष्ट्रात असते ?>>>>

हा प्रश्न गाढवपणाचा आहे असे वरील काही कमेंट वाचुन लक्षात आले पण मलाही हाच प्रश्न पडलाय. मुंबईत इतकी वर्षे काढली पण सनस्ट्रोकमुळे मुम्बैत माणसे मेली हे कधी वाचले नाही. उत्तर भारतातुन असल्या बातम्या भरपुर यायच्या, दक्षिणेतुन तुरळक. पण मुम्बईत असे झाल्याचे कधी ऐकले नाही.

पर्यावरण किती भयंकर बिघडलेय याची अस्वस्थ करणारी बोच ह्या घटनेने लागली. यापुढे अजुन काय काय पाहावे लागेल देव जाणे.

ते लोक उष्माघाताने थोडेच मेले!
आपल्या नेत्याला पुरस्कार द्यायला दिल्लीश्वर दस्तुरखुद्द अवतरले यामुळे त्यांना गहिवरून आले. डोळ्यात आनंंदाश्रू आले. अश्रूंचा आवेग अनावर झाला. त्यामुळे डीहाय्द्रेषण झाले!
ईश्वर मृतात्म्यांना सद्गति देवो.

साधना मॅडम .
पर्यावरण बदलले आहे पण ते जग जाहीर आहे.
त्याच वातावरणात लोक जगत आहेत.
कोणाचा मृत्यू होत आहे का?
कारण सहा सात तास continues कोणी उन्हात राहत नाही .
गरज पडेल तेव्हा पाणी उपलब्ध असते.
शेतातील काम पण ह्याच हवामानात होतात.
पण सावली,पाणी, ह्याची सोय योग्य वेळी असते.
किती अंध भक्ती करणार.
सहा, सात तास लोक उन्हात होती.
पाण्याची सोय नाही.
लोक मारतील नाही तर काय होईल.
हवमान बदलाचा इथे काहीच संबंध नाही.
फालतू नियोजन,विनाकारण गर्दी jamavne,.
चुकीची वेळ कार्यक्रम साठी निवडणे .
ह्या वर काहीतरी बोला

आदर्णीय अमित शहा स्वतः: म्हणाले ४२ डिग्री तापमानात कडाक्याच्या उन्हात लाखो लोक बसून आहेत.

एवढ्या मोठ्या गर्दी मध्ये माणसे मेली तरी लगेच बातमी बाहेर आली हेच नशीब ,गणपती वेळी कितीत तरी गर्दी मध्ये घाणेरडे प्रकार होतात पण गर्दी पुढे काही करता येत नाही

Submitted by हस्तर on 18 April, 2023 - 02:59

फक्त अंध फक्त लोकांचे एक मराठी संकेत स्थळ आहे तिथे तुमच्या कला गुणांना वाव आहे.
ना कोणते लॉजिक.
ना कोणता विचार.
ना निती मत्ता.
फक्त बेशरम पना हा खास गुण अंध भक्तांचा आहे.
आणि त्या साठी मराठी मध्ये संकेत स्थळ पण आहे.
तिकडे लिहीत जा.
तुमचे विचार फक्त त्याच लोकांना पटतील

According to Dr Babasi Kalel, the forensic expert who performed autopsies on the 13 dead, the heat had a devastating effect on their bodies.

“Their kidney, liver, lungs and brains had shrunk,” he said. “This seems to be the effect of sun exposure for at least six to seven hours.”

Kalel was among the medical staff stationed at the event to handle any emergencies. “We were in a shaded booth and even then we required a lot of water to keep ourselves hydrated,” he added. “Those on the open ground were dehydrated.” Some suffered from anuria, a condition in which the kidney is damaged and the body cannot pass urine.

एक गोष्ट कळत नाहीये आपल्याला त्रास होतोय हे त्यांना कळलं नसेल??
उन्हाने जीव कासावीस होतोय, प्यायला पाणी नाहीये तरीही 5 6 तास ताटकळत बसून राहण्याची अशी काय मजबुरी होती
आयुष्यात परत ते धर्माधिकारी दिसले नसते असे काही होतं का?

बर उन्हाळ्याचे दिवस आहेत, एप्रिल महिना आहे
मुंबईत कार्यक्रम आहे
तर आयोजक देतील या भरवश्यावर न राहता आपल्यासोबत पुरेसे पाणी ठेवावे हा अगदी म्हणजे अगदी बेसिक फंडा आहे

आयोजनात ढिसाळपणा झाला, व्यवस्थापन नव्हतं या सगळ्या पुढच्या गोष्टी
पण आपली आपल्याला काळजी घेता येऊ नये? आग लागली, स्फोट झाला तर तुमच्या हातात काही नसतं, अचानकपणे उदभवणारे संकट आहे ते
पण उन्हाचा कडाका वाढत चालला आहे, घसा कोरडा पडतोय, जीवाची काहिली होतीय हे सावकाशपणे होणारे परिणाम आहेत
मग आपण तिथून निघावं, सावलीत जाऊन बसावं, नसेल सावली तर निघून घरी यावं असं न वाटता लाखो लोक बसून राहत असतील तर काहीतरी चुकतंय

Swami च्या कार्यक्रमात मृत्यू आला म्हणजे स्वर्गात सरळ प्रवेश, .
भाग्यवान लोकांनाच हे भाग्य मिळते.
असा विचार करणारी च ही गर्दी आहे.
अंध भक्ती ह्यालाच म्हणतात
शाहणा माणूस एक तर अशा कार्यक्रमात जाणार नाही.
आणि गेला तरी उन्हात सहा सात तास थांबणार नाही

क्रिकेटर कसे खेळतात? आणि प्रेक्षक पण उन्हा तानात बसून खेळ बघतात.
BCCI आपल्याला लुबाडताहेत ह्याची पण जाणीव नाही. जगातील श्रीमंत बोर्ड पण मुत्रीत जावत पण नाही.
एकाने तरी तक्रार केली आहे?
ही पण अंधभक्ती.

जे काही घडले ते फार दु:खद आहे. मला पडलेले प्रश्न-
कार्यक्रमाच्या दिवशी हीट इंडेक्स साधारण किती असेल याची पूर्व सुचना मिळाली होती का? मिळाली असल्यास त्याचे घातक परीणाम लक्षात घेवून प्रसार माध्यमांतून जनहितार्थ सुचना दिल्या होत्या का? त्याचबरोबर हिट स्ट्रोकचा संभाव्य धोका लक्षात घेवून नियोजित कार्यक्रम मोजक्या लोकांच्या उपस्थितीत बंदिस्त सभागृहात करावा आणि इतरांसाठी लाईव स्ट्रिमिंग असा प्रस्ताव मांडला गेला होता का ? काही दिवस आधी असा बदल करायचे ठरल्यास त्याला विरोध न करता नियम पाळायला लोकं तयार झाले असते का? की त्यावरुन नवाच वाद सुरु झाला असता?
महत्वाचे म्हणजे हवामान बदलत आहे हे लक्षात घेवून असे काही पुन्हा घडू नये यास्तव जनजागृती केली जाणार आहे का?

((मग आपण तिथून निघावं, सावलीत जाऊन बसावं, नसेल सावली तर निघून घरी यावं असं न वाटता लाखो लोक बसून राहत असतील तर काहीतरी चुकतंय)) +1
आशुचॅम्प सहमत

तुम्ही कुठल्या प्लॅॅनेट वर राहता?
तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नाही नाही नाही नाही नाही ... अस आहे. त्याचे काय आहे ही कोमाधीन जनता जाणार कोठे?
आम्हालाच निवडून देणार!

कल्ट म्हटलं की त्यात अंधानुकरण आलं. शेजारचा बसुन राहिला आणि आपण उठुन गेलो म्हणजे अपल्या भक्तीची पावर कमी आसेल असा विचार करुन सगळेच बसुन राहिले असतील.

हवामान काही जास्त बदलेले नाही..
साठ सत्तर वर्षा पासून हेच हवामान आहे.
उगाच विषय divert करण्यासाठी ..
हवामान बदल झाला आहे..हा पॉइंट पुढे केला जातो

वरचा परिच्छेद स्क्रोलच्या बातमीतून घेतला आहे.
उष्माघाताने मरण पावलेली एक महिला आधल्या रात्री साडेबाराला विरारहून निघाली होती. तिने सोबत पाण्याच्या दोन बाटल्या, चपातीभाजीचा डबा व काही सुके पदार्थ घेतले होते. रात्री अडीचला ती खारघरला पोचली. या लोकांना आणायला बसेसची सोय प्रतिष्ठाननेच केली होती. मैदानात शिरायला लांबच लांब रांगा होत्या.
प्रशासनाने पाणी, वैद्यकोपचाराची सोय केली होती. ती पुरेशी नसेल किंवा लोकां पर्यंत पोचली नसेल. इंडियन एक्स्प्रेसमधल्या बातमीत अधिकारी म्हणतात की आपल्याला त्रास होतोय हेच लोकांना कळलं नाही. वर हेमंत म्हणताहेत, तसं लोक भक्तिभावाने बसले होते.

हे पहा वायर काय म्हणतय
Lakhs of people from far-off Maharashtra, Madhya Pradesh, Karnataka and Gujarat were brought to the venue ground in Kharghar in what was evidently a show of political strength by the state government. They were sitting under the sun for more than six hours, reports the newspaper. Two tents collectively accommodating around 1,000 were reserved for VIPs, media, and others with separate entries.

Home minister praising the crowd for sitting in the open in this scorching heat.
Atleast 12 dead, More than 500 people who attended this Maharashtra Bhushan program in heat are admitted
Imagine the outrage by Godi media if this was by oposition leaders. pic.twitter.com/unf0H0KvOv

— Mohammed Zubair (@zoo_bear) April 17, 2023

मी गेल्या दीड ते दोन वर्ष्यांपासून खारघरला राहत आहे. तथापि मी ७ ते १४ एप्रिल दरम्यान नागपुरात होतो आणि तिकडेही पुरस्कार सोहळ्याच्या बातम्या वाचून एवढ्या २० - २२ लाखांच्या गर्दीच्या व्यवस्थेबाबत मलाही जरा आश्चर्यच वाटत होते.

१५ एप्रिल ला सकाळी परत आलो, ट्रॅफीक जॅम मध्ये फसू नये म्हणून स्वतःच्या गाडीने न जाता MGM मेडिकल कॉलेज, कामोठे ह्या माझ्या कार्यस्थळी ऑटोने गेलो आणि कधी नव्हे ते परत येतांना NMT बसनी आलो (बसमध्ये अजिबात गर्दी नव्हती). संध्याकाळी घरी जातांना, तेव्हा लोकांचे जत्थे खारघर मध्ये प्रवेश करत होते. मात्र कुठेही गोंधळ किंवा धक्काबुक्की नव्हती, किंबहुना श्रीसदस्यच पोलिसांना प्रत्येक ट्रॅफीक सिग्नलला मदत करत होते. ह्यादरम्यान स्थानिक प्रशासनाने व पोलीस खात्याने शुक्रवार-शनिवारपासूनच खारघरमधील शाळांना सुट्टी घोषित केली होती आणि रहिवास्यांना गरजेशिवाय घराबाहेर न पडण्याचे तसेच आवाहन केले होते.

१६ एप्रिललाही सकाळी नियोजनबद्धच गर्दी होती, मात्र मी घरातच राहणे पसंद केले. आता ऑफिसमधील खारघर रहिवासी असलेल्या सहकाऱ्यांशी चर्चा केली असता समजले की दीड-दोन वाजल्यापासून संपूर्ण रस्ते श्रीसदस्यांनी व्यापून गेले होते. तहानेने कासावीस झालेली ही मंडळी थंड पाण्याच्या शोधात दुकाने पालथी घालत होती पण साध्या पाण्याचीही वानगा होती. खारघर सेंट्रल पार्कपासून ते बेलापूर स्टेशन पर्यंत NMT व BEST बस ने श्रीसदस्यांची जाण्याची व्यवस्था केली असल्याने प्रचंड वाहतूककोंडी झाली होती.

महाराष्ट्र शासनाने स्थानिक प्रशासन व सिडकोच्या मदतीने प्रचंड पैसा खर्च करून नियोजनबद्ध कार्यक्रम आखला असला होता मात्र त्यांनी आणखी काही रुपये खर्च करून मंडपाची व्यवस्था का केली नाही हा अनुत्तरित प्रश्न आहे. गेल्या २० वर्षांपासून खारघरवासियांची कोपरा ब्रिजकडून सायन-पनवेल हायवेला जोडणाऱ्या रस्त्याची मागणी होती, जी २४ तासांत पुरी झाली (खरतर नैसर्गिक प्रवाह बंद केल्याने आता पावसाळ्यात पुराची भीती आहेच).

पण हा एवढा अट्टाहास का? मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत एखाद्या सुरक्षित ठिकाणी हा पुरस्कार सोहळा पार पाडता का नसता आला? नुकताच 'गेट वे ऑफ इंडिया' जवळ आयोजित कार्यक्रमात आशा भोसलेंना २०२१ सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला गेला, पण त्यावेळी त्यांच्या जगभरातल्या चाहत्यांना उपस्थित राहण्याचे महाराष्ट्र शासनाकडून किंवा आशाताईंनी स्वतः आवाहन केले नव्हते, कारण त्यांचा मतदारांवर थेट परिणाम होत नाही. हल्ली प्रत्येक प्रसंगातून फायदा घेण्याचा जो सत्ताधारी व विरोधकांनी पायंडा पडला आहे, त्याचे हे जिवंत उदाहरण आहे. आता विरोधक पुरस्कार सोहळ्यातील गैरसोयींबद्दल गळे काढत आहेत, ते त्यांनी आधी का नाही काढले? जागोजागी सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांकडून आप्पासाहेब धर्माधिकारींच्या अभिनंदनाचे बॅनर लागले होतो, कारण सर्वांनाच मलिदा खायचा होता. नियोजनातील चुका निदर्शनात आणून श्रीसदस्यांच्या नजरेत यायचे नव्हते.

जागोजागी सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांकडून आप्पासाहेब धर्माधिकारींच्या अभिनंदनाचे बॅनर लागले होतो, कारण सर्वांनाच मलिदा खायचा होता. नियोजनातील चुका निदर्शनात आणून श्रीसदस्यांच्या नजरेत यायचे नव्हते.

नवीन Submitted by राहुल बावणकुळे on 18 April

हे लिहिल्याबद्दल धन्यवाद. याच धर्माधिकारी च्या वडिलांना हाच पुरस्कार २००८ मध्ये आजचे विरोधक म्हणजेच आघाडी सरकारने सर्व तामझामासहित दिला होता.

भर उन्हात लाखो लोक जमवणे हे चूक च ..
ज्यांना पुरस्कार दिला त्यांच्या वडिलांना काँग्रेस नी पुरस्कार दिला.
किंवा
विरोधी पक्षांनी नी सुध्दा स्वागताचे बोर्ड लावले होते म्हणून..
अपराध ची धार कमी होत नाही.
अपराध तो अपराध च

भर उन्हात लाखो लोक जमवणे हे चूक च ..
ज्यांना पुरस्कार दिला त्यांच्या वडिलांना काँग्रेस नी पुरस्कार दिला.
किंवा
विरोधी पक्षांनी नी सुध्दा स्वागताचे बोर्ड लावले होते म्हणून..
अपराध ची धार कमी होत नाही.
अपराध तो अपराध च

ला पडलेले प्रश्न-
कार्यक्रमाच्या दिवशी हीट इंडेक्स साधारण किती असेल याची पूर्व सुचना मिळाली होती का? मिळाली असल्यास त्याचे घातक परीणाम लक्षात घेवून प्रसार माध्यमांतून जनहितार्थ सुचना दिल्या होत्या का? >>>>>>>

स्वाती, मुम्बैत हिट स्ट्रोकने मृत्यु हा प्रकार बहुधा पहिल्यांदा घडला आहे. मागे ढगफुटि व समुद्र भरती एकत्र येऊन मुंबै बुडाली तेव्हापासुन पावसाळ्याआधी समुद्र भरती व पावसाचा अंदाज ह्या तारखा जाहिर करतात. पब्लिक किती मनावर घेते ते तिलाच माहित.

हिट बद्दल अंदाज अजुन जाहिर केले गेले नाहित. बदलते हवामान पाहता तेही करावे लागेल.

Pages