सहजपणे टाळता येणारी दुर्घटना - महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा

Submitted by उदय on 18 April, 2023 - 00:58

रविवार, १६ एप्रिल २०२३, खारघर (जि रायगड ) येथे महाराष्ट्र भूषण सोहळा दिमाखात पार पडत असतांना एक दुर्घटना घडली आणि त्यामधे १० + लोकांना प्राण गमवावे लागले. Sad

पुरस्कार वितरण समारंभ प्रत्यक्ष डोळ्यांनी बघण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते, आणण्यात आले होते. सभास्थानी, मोकळ्या मैदानात, उन्ह डोक्यावर घेत, हजारो/ लाखो लोक सकाळपासून ताटकळत बसले होते.
व्यासपीठावर राज्याचे तसेच केंद्रातल्या नेत्यांनी हजेरी लावली होती. एव्हढा मोट्ठा श्रोतागण आपल्याला एकण्यासाठी आले आहेत म्हटल्यावर त्यांच्याही उत्साहाला पारावर उरला नव्हता. हळू हळू तापमान ३८ से. कडे सरकत होते. तापमान, अनेक तास थेट उन्हाशी संपर्क, हवेतील आद्रता या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून अनेक उपस्थितांना उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यामुळे दहा पेक्षा अधिक लोकांना प्राण गमवावे लागले.

एव्हढा मोठा प्रेक्षक वर्ग एकत्र येत असतांना त्यांच्या साठी आवश्यक अशा किमान सोई सुविधांची व्यावस्था करण्याचे सौजन्य आयोजकांनी ठेवायला हवे होते. उन्हापासून रक्षण करण्यासाठी डोक्यावर छत नाही, थंड पिण्याच्या पाण्याची सोय नाही. एप्रिल महिन्यात, भर दुपारी, मध्यान्हीची वेळ, अनेक तास चालणार्‍या समारंभासाठी निवडली कुणी? या घटनेस जबाबदार कोण ?

ही मानवनिर्मीत घटना सहजपणे टाळता येण्यासारखी होती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धागा ओस कसा पाडतात? हे कृपया सांगावे. तुमचे नाही तर इतर एका आयडीचे धागे ओस पाडण्याबद्दल बऱ्याच लोकांना रस असेल. Proud

सरांचा ?
Happy
काही नाही हो , त्या धाग्यांवर फिरकायचेच नाही .

मी फिरकणार नाही कारण हिंदू धर्माहून वेगळ्या धर्मांची मला अगदीच जुजबी माहिती आहे. हिंदू धर्मच वरवर जाणून घेता घेता जन्म गेला. आता दुसऱ्या कुठल्या धर्माची तपासणी करावीशी वाटत नाही.
संकट प्रसंगी मुसलमान इतरांना ( सर्वांना) ताकदीनुसार झेपेल तेव्हढी मदत करतात हे पाहिले आहे. खारघर प्रसंगातही ते दिसले. २६ जुलै २००५ च्या जलप्रलयात ते प्रकर्षाने दिसले आणि अनुभवले.
त्या पलीकडे, आवर्जून लिहिण्याएव्हढी प्रत्यक्ष माहिती नाही.
मुंबईच्या साष्टी बेटात आणि जुन्या ठाणे जिल्ह्यात कुटुंबाचे आणि नातेवाईकांचे पूर्वापार वास्तव्य होते. इथले मूलनिवासी ईस्ट इंडियन ख्रिश्चन समाजाविषयी वडीलधाऱ्यांच्या अनेक मैत्रीपूर्ण प्रेमळ आठवणी आहेत. आजही पुढच्या पिढीतले कोणी भेटले आणि विचारपुशीनंतर जुन्या आठवणी निघाल्या तर आवर्जून घरी घेऊन जातात. सोपारा, भिवंडी इथल्या हरिस आणि फ़क़ि कुटुम्बियांशी घनिष्ठ घरोबा होता. घरातल्या जन्ममृत्यूप्रसंगी एकमेकांकडे उचित भेट घेऊन जाणे न चुकता व्हायचे. इतरही अनेक आहेत.
इतक्या गोड आठवणींनी मन भरलेले असताना कटू आठवणीना थाराच नाही उरत.
अर्थात इथल्या अनेकांकडे कटू आठवणी असतीलच. त्यांनी मर्जीनुसार त्या लिहाव्यात किंवा कसेही.

इथली चर्चा वाचून हे आठवलं,

काम अगर ये हिंदू का है
मंदिर किसने लुटा है
मुस्लिम का है काम अगर ये
खुदा का घर क्यू टूटा है
जिस मजहब मे जायज है ये
वो मजहब तो झूठा है.

इथल्या अनेकांकडे कटू आठवणी असतीलच. ## 1% लोकांनाही स्वतःला इतर धर्माचा कटू अनुभव नसेल. सगळे सांगोवांगी अनुभव असतील , तेही अतिरंजित.

कटू अनुभव असतील तर ते स्वधर्माचे असण्याची शक्यता जास्त असेल

ख्रिश्चन समाजाविषयी वडीलधाऱ्यांच्या अनेक मैत्रीपूर्ण प्रेमळ आठवणी आहेत...... यावरून लहानपणची एक आठवण ताजी झाली. आमच्याकडे गणपतीत छान जास्वंदीची फुले असायची.वसईवाल्या भाज्या,फुले घेऊन यायच्या.वडलांना आवर्जून द्यायच्या.(अर्थात विकत.) बरेच जण आम्हाला विचारायचे की तुम्हाला कुठून मिळतात इतकी जास्वंदीची फुले? वडीलही त्यांना प्रसाद नेऊन द्यायचे.आई म्हणायची की घरी बोलवा.तर त्यांच्या ठरलेल्या विरार गाड्या असायच्या.

चर्चा करून काहीही उपयोग होणार नाही...कारण ह्या अश्या cult च्या नादी लागलेली जनता brainwashed करून पाठवलेली असते जणू programmed केलेले रोबोट...आला आदेश की निघाले ! त्यांना दुसऱ्याने केलेली चर्चा, उपदेश कशानेही काहीही फरक पडत नाही...ज्याला मेंदू आहे आणि त्यात विचार करण्याची क्षमता आहे तो माणूस कधीच ह्या अश्या cult च्या अध्यातमध्यात पडत नाही...ह्यांचं गिऱ्हाईक म्हणजे कमजोर मनाची आणि सदसद्विवेकबुद्धी गहाण ठेवलेली लोक...त्यांना बरोबर जाळ्यात अडकवतात.
शेवटी...म्हातारी मेल्याच दुःख नाही पण काळ सोकावतो आहे...काळजी घ्या !

इथल्या अनेकांकडे कटू आठवणी असतीलच. ## 1% लोकांनाही स्वतःला इतर धर्माचा कटू अनुभव नसेल. सगळे सांगोवांगी अनुभव असतील , तेही अतिरंजित.

Submitted by भ्रमर on 25 April, 2023 - 09:28

धागा ज्या दुर्घटनेबद्दल आहे त्यातील पीडित असण्याचा मायबोलीवर लिहिणार्‍यांपैकी किती जणांना स्वतःला अनुभव आला असेल?

इतरांच्या अनुभवाबद्दल व्यक्त व्हायचं नाही असं ठरवलं तर हा धागादेखील त्यावरील साडेचारशे प्रतिसादांसह अर्थहीन ठरेल.

एक व्हिडियो नुकताच बघितला , कोणाला पाहायचा असल्यास इथे टाकू शकतो !
एक मौलाना हातात वाळू घेवून त्यावर मंत्र फुंकून वर अल्ला हू अकबर च्या घोषणा देत आग लागलेल्या घरावर फेकत आहे .
आग तर विझली नाहीच , पण टिव्ही चॅनेल ला दिलेल्या मुलाखतीत योग्य वेळेवर मंत्र फुकण्याच्या स्वताच्या बुद्धीचे कौतुक करत आहे .

मी पण कोणतातरी एक व्हिडीओ पाहिला, ज्यात एका गुप्त ठिकाणी एका संघटनेचे लोक विशिष्ट धर्मियांचा पेहराव, दाढी कशी ठेवावी आणि त्या वेषात आपले व्हिडीओज कसे बनवावेत याचे प्रशिक्षण हातात लाठ्या काठ्या घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना देत होते.

ठाणे: खारघर दुर्घटनेच्या अनुभवानंतर राज्य सरकारने उभारला वातानुकूलीत मंडप; ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय इमारतीचा भुमीपुजन सोहळा
https://www.loksatta.com/thane/state-government-set-up-an-air-conditione...

फक्त भूमिपूजन सोहोळ्यासाठी गर्दी का जमवायची? २०-२५ माणसांमध्ये भूमिपूजन होऊ शकत नाही का? की तिथेही भाषणांची माळका लावणार? कमीत कमी माणसे आणि कमीत कमी वेळात हे कार्य आटपता येण्याजोगे नाही का?
सरकारी खर्चाला काही लगामच राहिलेला नाही. कोणीही उठावं आणि सोहोळा ' घालावा '. ?

राजकारणी लोकांना गर्दी जमवावी च लागते.
त्यांच्या करिअर साठी ते गरजेचे आहे.
अगदी प्रामाणिक काम कोणत्या नेत्याने केले आणि स्वतःची लाल मात्र केली नाही,गर्दी जमावली नाही,
टोळ भैरव पाळले नाहीत.
तर तो नेता किती ही चांगले काम केले तरी निवडून मात्र येणार नाही.
जशी जनता तसे नेत्यांना राहावे लागते.
अफेअर दाखवली नाहीत, कमी कपड्यात हेरॉईन नसेल, मसाला बिलकुल नसेल तर .
किती ही दर्जेदार सिनेमा असू ध्या थिएटर मध्ये गर्दी खेचणार नाही..हीच रिॲलिटी आहे भारतात तरी
झोपडपट्टी मध्ये पैसे vatavech लागतात.
काही तरी साड्या बिड्या वाटणे गरजेचे च असते.
मी नाही असे चुकीचे काम करणार असे जो नेता ठरवेल तो किती ही प्रामाणिक असू ध्या जिंकू शकत नाही
तेच श्रीमंत वस्ती मध्ये वेगळे फॉर्म्युला असतो.

हो, पण पैसे कुठून आणतात? सरकारचेच ना? की दोन नंबरचा पैसा असा खर्च करून लोकांचे डोळे दिपवून टाकतात ?

सरकारचेच ना?
हो .
कोणताच नेता स्वतःच्या खिशातून एक रुपया पण खर्च करत नाही.
आणि सत्ताधारी असेल तर .
लोक स्वतः पैसे आणून देतात.मागायची पण गरज नसते.
दोन हजाराचे बजेट आणि आणि प्रत्यक्षात कामावर 600 रुपयेच खर्च होतात.
बाकी संबंधित लोकांच्या खिशात.
हे नागडे सत्य आहे.

ग्रामपंचायत ही आपल्या लोकशाही मधील शेवटी ची स्वराज्य संस्था.
त्या ग्राम पंचायत मधील सदस्य हे गावातील टगे च असतात.
फक्त ज्या जागा आरक्षित असतात आणि त्या समाजात टगा व्यक्ती च नसतो तिथे फक्त साधा व्यक्ती ला निवडून आणले जाते पण फक्त प्यादे म्हणूनच.
साधा ,प्रामाणिक,व्यक्ती ग्राम पंचायती मध्ये पण उभा राहिला तर गावातील लोक त्याला निवडून देणार नाहीत.

Pages