सहजपणे टाळता येणारी दुर्घटना - महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा

Submitted by उदय on 18 April, 2023 - 00:58

रविवार, १६ एप्रिल २०२३, खारघर (जि रायगड ) येथे महाराष्ट्र भूषण सोहळा दिमाखात पार पडत असतांना एक दुर्घटना घडली आणि त्यामधे १० + लोकांना प्राण गमवावे लागले. Sad

पुरस्कार वितरण समारंभ प्रत्यक्ष डोळ्यांनी बघण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते, आणण्यात आले होते. सभास्थानी, मोकळ्या मैदानात, उन्ह डोक्यावर घेत, हजारो/ लाखो लोक सकाळपासून ताटकळत बसले होते.
व्यासपीठावर राज्याचे तसेच केंद्रातल्या नेत्यांनी हजेरी लावली होती. एव्हढा मोट्ठा श्रोतागण आपल्याला एकण्यासाठी आले आहेत म्हटल्यावर त्यांच्याही उत्साहाला पारावर उरला नव्हता. हळू हळू तापमान ३८ से. कडे सरकत होते. तापमान, अनेक तास थेट उन्हाशी संपर्क, हवेतील आद्रता या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून अनेक उपस्थितांना उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यामुळे दहा पेक्षा अधिक लोकांना प्राण गमवावे लागले.

एव्हढा मोठा प्रेक्षक वर्ग एकत्र येत असतांना त्यांच्या साठी आवश्यक अशा किमान सोई सुविधांची व्यावस्था करण्याचे सौजन्य आयोजकांनी ठेवायला हवे होते. उन्हापासून रक्षण करण्यासाठी डोक्यावर छत नाही, थंड पिण्याच्या पाण्याची सोय नाही. एप्रिल महिन्यात, भर दुपारी, मध्यान्हीची वेळ, अनेक तास चालणार्‍या समारंभासाठी निवडली कुणी? या घटनेस जबाबदार कोण ?

ही मानवनिर्मीत घटना सहजपणे टाळता येण्यासारखी होती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एप्रिलच्या थंड वातावरणात मुंबईत बर्फ पडते हे माहिती असताना शाल, स्वेटर, टोपी आणायच्या सूचना द्यायला हव्या होत्या. मे महीन्यात तर बर्फामुळे रस्ते बंद होतील. लहानाचे मोठे हेच बघत झालोत ना आपण ?

मी कोणत्याही पक्षाचा नाही आणि अंध भक्त बिल्कुल नाही
आधी मला वाटले कि गर्दी अचानक जमली व अंदाज आला नाही
पाण्याची सोया फक्त एका बाजूला करणे चूक
पण सकाळी १० ते १ मध्ये कार्यक्रम ,महाराष्ट्र मध्ये अजूनही होतात , उष्मा घात होईलच असे कोणाला वाटले असते तर तश्या सूचना दिसल्या असत्या
कोणालाच वाटले नव्हते एप्रिल मध्ये एवढे असेल
माझ्या मते बहुतेक लोक मुंबईत उन्हाळ्यात गेले नसतील म्हणून त्यांना उष्मा घात होत आहे असे वाटले पण नसेल

अपत्त्ती व्यवस्थापन बाबतीत मात्रा मी ठाम आहे
आपल्या देशात किती वेळा नीट झालेलं आहे ?
किल्लारी भूकंप झाला तेव्हा पण शरद पवार यांना पाचारण करावे लागले होते

. प्रत्यक्षात कार्यक्रमाच्या वेळी उष्माघाताचा त्रास झालेल्या सुमारे १४० लोकांवर उपचार करण्यात आले होते.

अतिमहत्त्वाच्या व्यक्ती निघून जात असल्यामुळे पोलिसांचे लक्ष त्यांच्या व्यवस्थेकडे जास्त होते

https://www.loksatta.com/maharashtra/maharashtra-bhushan-award-incident-...

नवीन मुंबई चे वातावरण आता सध्या कसे आहे हे जग जाहीर आहे.
मृत्यू उष्णता मुळे झाले असले तरी .
उष्णता जास्त होती हे मृत्यू चे कारण नाही.
बेजबाबदार पना.
लाखो लोकांस कडक उन्हात सहा सात बसवणे हे मृत्यू चे कारण आहे.
दुबई चे तापमान नवी मुंबई पेक्षा पण खूप जास्त असते.
उष्माघात नी एक व्यक्ती मरत नाही.
पण तेथील शेख लोकांनी भारताच्या बिनडोक राजकारणी लोकं न प्रमाणे तेथील लाखो लोकांस उन्हात सहा सात तास बसवले तर हजारो लोक उष्माघात नी मरतील.
दोषी फक्त आयोजक च आहेत.( त्या मध्ये सरकार,सत्कार मूर्ती,राजकीय पक्ष सर्व आले)

लोकांना कार्यक्रम स्थळी येण्यासाठी प्रवासी वाहनाची सोय कोणी केली
प्रवासी वाहनाचा खर्च कोणी केला?
प्रेमा मुळे लोक आली की त्यांना आणले गेले.
हा साधा प्रश्न आपल्याला पडत नाही .
धन्य आहोत आपन
१२ कोटी कुठे खर्च झाले ते पण लोकांच्या टॅक्स चे

जेव्हा बाळासाहेब ठाकरे ह्यांचे निधन झाले ह्याहून जास्त गर्दी होती
तेव्हा लोक आणावी लागली नव्हती
तेव्हा तुम्ही बघतीले का ?

हस्तर , ही इंडियन एक्स्प्रेसची बातमी. शेवटचा परिच्छेद
"२०-२५ लाख लोक येतील असं आम्हांला वाटत होतं."

आजच्या इं ए मधून
"लोकांना उकाड्याने त्रास होऊ शकतो हे लक्षात घेऊन आम्ही ३०० डॉक्टर आणि ४००० खाटांची व्यवस्था केली होती. पण अज्ञानामुळे लोकांनी आपल्याला होणार्‍या त्रासाबद्दल कार्यक्रमस्थळी हजर असलेल्या वैद्यकचमूला काही सांगितलं नाही. "

२५ लाखाच्या पुरस्काराच्या सोहळ्याला १३ कोटीच्या खर्चाची तयारी होती, असं वाचलं.

या धाग्यावर येऊन खालील गोष्टी नव्याने समजल्या.

भूकंप, त्सुनामी याप्रमाणेच उष्मा आणि गर्दीमुळे होणारे मृत्यू ही नैसर्गिक आपत्ती आहे किंवा उलट.

"लोकांना उकाड्याने त्रास होऊ शकतो हे लक्षात घेऊन आम्ही ३०० डॉक्टर आणि ४००० खाटांची व्यवस्था केली होती. पण अज्ञानामुळे लोकांनी आपल्याला होणार्‍या त्रासाबद्दल कार्यक्रमस्थळी हजर असलेल्या वैद्यकचमूला काही सांगितलं नाही. " >>>
हे माहित होत तर!
केव्हढी ही फोरसाईट!
पण एक राहिलेच की स्मशानभूमीत लाकडांची आणि भटजींची पण जय्यत तयारी ठेवली होती.

उष्मा घात, भूकंप,पुर,दुष्काळ ह्या सर्व नैसर्गिक आपत्ती आहेत.
पण ठरवून लाखो लोकांना उन्हात बसवणे सहा सात तास आणि त्याचा परिणाम म्हणून उष्मा घात नी लोकांचे जीव जाणे ही नैसर्गिक आपत्तीचा प्रकार नाही.
हा गुन्हा आहे

पण एक राहिलेच की स्मशानभूमीत लाकडांची आणि भटजींची पण जय्यत तयारी ठेवली होती.

अजून तरी इतके निर्लज्ज झाले नाहीत राजकारणी.
पुढे होवू शकतात

>>"लोकांना उकाड्याने त्रास होऊ शकतो हे लक्षात घेऊन आम्ही ३०० डॉक्टर आणि ४००० खाटांची व्यवस्था केली होती. पण अज्ञानामुळे लोकांनी आपल्याला होणार्‍या त्रासाबद्दल कार्यक्रमस्थळी हजर असलेल्या वैद्यकचमूला काही सांगितलं नाही. " >> कठीण आहे! लोकांना त्रास झाला तर ४००० खाटांची व्यवस्था वगैरे पेक्षा मोजक्या आमंत्रितांच्या उपस्थितीत हॉलमधे समारंभ करायला हवा होता.

एवढ्या लोकांना येता यावं म्हणूनच तर ती जागा निवडली. बसेस पाठवून लोकांना आणलं होतं. हौस सरकार इतकीच उत्सवमूर्ती किंवा त्या संस्थेची / कल्टची होती.
स्थानिक प्रशासनाला फक्त जबाबदारी दिली होती. निर्णय प्रक्रियेत त्यांना आवाज नव्हता, असं बातम्या वाचून दिसतंय.

अपत्त्ती व्यवस्थापन बाबतीत मात्रा मी ठाम आहे
आपल्या देशात किती वेळा नीट झालेलं आहे ?
किल्लारी भूकंप झाला तेव्हा पण शरद पवार यांना पाचारण करावे लागले होते >> हे कोण बलं बोलतंय ?

बरेच लोकं सध्या मुंबईतून परगावी स्थायिक झाले आहेत.
काही परदेशातही आहेत. त्यामुळे त्यांना ही हीट वेव्ह अचानक आली का, असे प्रश्‍न पडणं साहजिक आहे.
ही हीट वेव्ह येणार ह्याची यंत्रणांना कल्पना होती.
त्यासंदर्भात ही दैनिक तरुण भारतची दि. ५ एप्रिलची बातमी..
https://www.google.com/amp/s/www.tarunbharat.net/Encyc/2023/4/3/Heat-wav...

किल्लारी मध्ये भुकुंप झाला.

आणि .
सर्व यंत्रणा फक्त vip लोकांकडे च लक्ष देण्यात व्यस्त होत्या.
ह्या वरून एक प्रसंग आठवला.
,२६, जानेवारी ल गुजरात मध्ये भूकुंप झाला .
भारतीय मीडिया २६ जानेवारी च्या कार्यक्रमात व्यस्त होत्या आणि लोक तो कार्यक्रम बघण्यात.
मी पण तो कार्यक्रम बघत होतो.
गुजरात मध्ये मोठ्या taकतीचा भुकप झाला कोणालाच माहीत नाहीत.
विदेशी मीडिया CNBC नी पहिली न्यूज दिली.
आणि भारत सरकार खाडकन जागे झाले

तापमान जीव घेणे नव्हते तर.
स्टेज वर छपर का होते?
तिथे कूलर आणि पंखे का लावले होते.
त्यांना पण उन्हात च बसवायचे ना.

नवीन Submitted by Hemant 333 on 18 April, 2023 - 12:46>>> १००% सहमत

शरद पवार ह्यांनी तुफान पावसात सभा घेतली होती.
छत्री पण न घेता.
आणि ह्यांना उन्हात पारितोषिक वितरण कार्यक्रम मध्ये भाषण देता aale नाही.
काय तो मंडप.
काय ते कूलर.
काय ते पंख्ये

या धाग्याच्या विषयाचा किल्लारी भूकंपाचा आणि पावसाचा संबंध आहेच आहे.
फक्त पापी लोकांना तो ठाऊक नाही.

पुरस्कार देण्यामागची भावना बाजुला राहून असे कार्यक्रम आता राजकीय शक्तीप्रदर्शनाचे साधन झाले आहेत असेच दिसते.

खारघर पासून चाळीसेक किलोमीटरवर बीकेसी मध्ये अ‍ॅपल स्मार्टफोनचे दालन ऊघडून देश विकासाच्या वाटेवर एक मोठे पाऊल टाकतो आणि ईथे खारघर मध्ये तपमानाच्या अतिशय बेसिक माहिती अभावी आणि निवारा व पाण्याच्या जीवनावश्यक सुविधांअभावी हकनाक मृत्यू होतात. विकासाच्या वाटेवर टाकलेले पाऊल किती फसवे आहे आणि भौतिक/आर्थिक प्रगतीच्या परे सामाजिक प्रगतीच्या वाटेवर समाज म्हणून भारत अजून कितीतरी अविकसित आहे असेच दिसले.

प्रेक्षक का मध्ये सर्व सामान्य लोक च होती.
जे मृत्यू पडले आहेत ते सर्व सामान्य आर्थिक स्थिती मधील लोक आहेत..
आणि ज्यांना त्रास झाला आहे ती पण लोक सामान्य आर्थिक स्थिती मधील आहेत.
विविध क्षेत्रातील नावाजलेली ,श्रीमंत लोक प्रेक्षक म्हणून येणार असती तर त्यांना .
उन्हात बसवले असते का?
उद्योगपती, चित्रपट कलाकार,खेळाडू,डॉक्टर्स, इत्यादी इत्यादी.

विरोधक बहुधा समारंभास गेले नसावेत. तो जास्त करून भक्तांचाच मेळा होता. त्यामुळे गैरसोयीची आधी कल्पना येणे शक्य नव्हतेच.

ब्रेकिंग न्यूज.
Maha sunstroke toll is 14, seven still in hospital

बहुजन समाजाला कर्तुत्व वान नेतृत्व नसल्या मुळे ह्याच समाजातील लोक ह्यांची शिकार बनतात.
काम धंदे सोडून तीन चार तास बैठका मध्ये जातात.
थोडा पण विचार न करता लाखो च्या संख्येने जमतात.
आपण आहे तिथे च आहे आणि गुरू करोडपती आहे आणि अब्जाधीश होण्याकडे वाटचाल करत आहे.
हे पण ह्यांच्या लक्षात येत नाही.
ठेविले अनंते तैसेचि रहावे.
हा उपदेश फक्त अनुयायी लोकांसाठी असतो.

अशा कार्यक्रमाला मूर्ख लोकच जातात. पण मृतांच्या वारसांना सरकारी तिजोरीतून प्रत्येकी पाच लाख द्यायचे प्रयोजन काय? श्री सेवक फंडातून द्या ना,? ,सामान्य जनतेच्या पैशातून का? किंवा मिंधे साहेबांनी स्वतःचे म्हंजे जे खोके मिळाले त्यामधून द्या ना.
हा भुर्दंड आम्हाला कशाला?

त्या बुवांनीच भक्तांना सांगायला पहिजे होते की उन्हातानात नका येऊ बाबांनो.
किमान आता तो कोणता पुरस्कार मिळवला आहे तो तरी परत करावा आणि जे गेलेत त्यांच्या परिवारांची जबाबदारी उचलावी

सुजाण लोकांनी आपले पैसे नुकसान भरपाई म्हणून देण्यास शक्य त्या सर्व सनदशीर मार्गाने विरोध केला पाहिजे. हे लोक स्वतःच्या मूर्खपणामुळे आणि गलथानपणा मुळे मेले आहेत.
सांगली मधून ac बस किंवा कार जरी अस्ती तरी मी गेलो नसतो.

Pages