सहजपणे टाळता येणारी दुर्घटना - महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा

Submitted by उदय on 18 April, 2023 - 00:58

रविवार, १६ एप्रिल २०२३, खारघर (जि रायगड ) येथे महाराष्ट्र भूषण सोहळा दिमाखात पार पडत असतांना एक दुर्घटना घडली आणि त्यामधे १० + लोकांना प्राण गमवावे लागले. Sad

पुरस्कार वितरण समारंभ प्रत्यक्ष डोळ्यांनी बघण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते, आणण्यात आले होते. सभास्थानी, मोकळ्या मैदानात, उन्ह डोक्यावर घेत, हजारो/ लाखो लोक सकाळपासून ताटकळत बसले होते.
व्यासपीठावर राज्याचे तसेच केंद्रातल्या नेत्यांनी हजेरी लावली होती. एव्हढा मोट्ठा श्रोतागण आपल्याला एकण्यासाठी आले आहेत म्हटल्यावर त्यांच्याही उत्साहाला पारावर उरला नव्हता. हळू हळू तापमान ३८ से. कडे सरकत होते. तापमान, अनेक तास थेट उन्हाशी संपर्क, हवेतील आद्रता या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून अनेक उपस्थितांना उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यामुळे दहा पेक्षा अधिक लोकांना प्राण गमवावे लागले.

एव्हढा मोठा प्रेक्षक वर्ग एकत्र येत असतांना त्यांच्या साठी आवश्यक अशा किमान सोई सुविधांची व्यावस्था करण्याचे सौजन्य आयोजकांनी ठेवायला हवे होते. उन्हापासून रक्षण करण्यासाठी डोक्यावर छत नाही, थंड पिण्याच्या पाण्याची सोय नाही. एप्रिल महिन्यात, भर दुपारी, मध्यान्हीची वेळ, अनेक तास चालणार्‍या समारंभासाठी निवडली कुणी? या घटनेस जबाबदार कोण ?

ही मानवनिर्मीत घटना सहजपणे टाळता येण्यासारखी होती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधी पण पदवी दान कार्यक्रम झाला होता तेव्हा काही गालबोट लागले नव्हते
सकाळी १० चा मुद्दा मीच नाही बऱ्याच लोकांना पटल होता

तसेच उष्मा जास्त असतो तर २२ लाख लोकांपैकी किमान हजार लोकांना झाला असता
१४ लोकांनाच जीव पण महत्वाचा हे खरे पण तुम्ही कधी व्यास पीठावर बसले आहात ?
२२ लाख लोकांवर भाषण देत नजर ठेवता येते ?
काहीही

६५० लोक इस्पितळात भरती होते. हा वृत्तपत्रांपर्यत पोचलेला आकडा.
Witnesses reported that some attendees had collapsed and that the situation quickly escalated into a stampede as the crowd began exiting the venue through small gates.
चेंगराचेंगरी झाली असेल तर मृतांचा आकडा वाढेल.
अर्थात अनेक साधक (किंवा जे काही म्हणतात ते) यात कोणाचा दोष नाही असंच म्हणत असल्याने आपल्याला तरी काय करायचंय.

बावीस लाख लोक जमवण्याच्या मुद्द्याचे कोणाला काहीच वाटत नाही का? बंदिस्त सभागृहात हजार पाचशे लोकांसमोर पुरस्कार प्रदान झाले असते तर पुरस्काराचे महत्त्व कमी झाले असते काय?

पुलनामा मुळे bjp sarkar प्रसिद्ध झाले आणि
खारखर घटने मुळे ed Sarkar आणि धर्माधिकारी.
घराघरात नाव पोचले..
हा पण त्या घटनेचा परिणाम च आहे
मरण काय आज नाही तर उद्या येणार च असते ते काय टाळता येत नाही

तसेच उष्मा जास्त असतो तर २२ लाख लोकांपैकी किमान हजार लोकांना झाला असता
१४ लोकांनाच जीव पण महत्वाचा हे खरे पण तुम्ही कधी व्यास पीठावर बसले आहात ?
२२ लाख लोकांवर भाषण देत नजर ठेवता येते ?
काहीही >>>>> समर्थन करायच्या नादात इतके पण वाहवत जाऊ नये.

सध्या रेडीओ, टीव्हीवरून उष्माघाताचा फटका कुणाला बसतो हे डॉक्टर्स सांगत आहेत. आपले सामान्यज्ञान वाढवणे हा काही गुन्हा नाही. या लॉजिकने कोरोना काळात भारताची लोकसंख्या शून्य का झाली नाही, थोड्याच लोकांचे मृत्यू का झाले असेही विचारले जाईल.

सकाळी दहाचा मुद्दा ? दहा वाजता थंडी असते का ? त्या दिवशीचा हवामानखात्याचा रिपोर्ट बघा, जमल्यास तापमान स्क्रीनशॉट्सहीत इथेही द्या.
मुळात कार्यक्रम दहा वाजता संपवला का ?

सकाळी सातपासून लोक बसले होते. ते दुपारी तीनपर्यंत उपाशी होते याच्याशी घेणे देणे नाही का ?
ही चूक मविआ सरकार असताना सुद्धा झाली असती तर त्यांनीही जबाबदारी घेतलीच नसती. पण किमान सामान्य नागरिकांनी त्यांची बाजू घेणे, लंगडे समर्थन तरी केले नसते. मविआच काय कुठलाही पक्ष असू देत. सामान्य मतदारांना मृतांप्रती असंवेदनशीलता दाखवत एव्हढी खिंड लढवण्याचे काय कारण आहे ? तसे असेल तर मग असे करणारे लोक राजकीय कार्यकर्ते समजावेत. अशांशी काय चर्चा होणार ?

मायबोली ही सामान्य लोकांनी एकमेकांशी चर्चा करण्यासाठी आहे असा माझा तरी समज आहे. राजकीय कार्यकर्त्यांनी त्याप्रमाणे आपला वावर ठेवला तर बरंच होईल.

तुम्हाला माझे मुद्दे खोडून काढता येत नाही ,लगेच माझ्यावर कार्यकर्ता असल्याचा आरोप करा
साधा प्रश्न विचारलाय ,व्यास पीठावर बसून कधी २२ लाख लोकांवर नजर ठेवलीये का ?

तुम्हाला माझे मुद्दे खोडून काढता येत नाही >>> Lol
साधा प्रश्न विचारलाय ,व्यास पीठावर बसून कधी २२ लाख लोकांवर नजर ठेवलीये का ? >>> Rofl

व्यास पीठावर बसून कधी २२ लाख लोकांवर नजर ठेवलीये का ? >>
स्वारी ठेऊ शकत असतील की
त्याशिवाय काय इतके श्री जमले होते तिथे
स्वारी नी पाहिलं आणि आपण नव्हतो असे नको व्हायला

22 लाख लोक हवीत कशाला ?
सरळ अर्थ आहे राजकीय हेतू आणि शक्ती प्रदर्शन

नवीन Submitted by Hemant 333
+11

वरातीमागून घोडे:
माझ्या वैयक्तिक ओळखीतल्या एका मोठ्या शाळेच्या मुख्यध्यापिका बाई गेल्या होत्या ह्या कार्यक्रमात. एसटी चा प्रवास होता, पैसे त्यांनी भरले की कसे ते माहीत नाही, पण बहुधा बैठकीचेच आयोजन होते. नेमका त्या दिवशी मी मुंबईहून खान्देशात प्रवास करत होतो, रस्त्याने ह्या बैठकीच्या शेकडो गाड्या स्वतः पाहिल्या.

बैठकीविषयी: एकूण अंधानुकरण प्रकार आहे. हे करा ते करू नका. ज्या घरात ही बैठक वगैरे फालतुगिरी चालते त्या घरातले लहान सहान कार्य सुद्धा स्वारीच्या सहमतीने पार पडते. मुलाचे नाव ठेऊ का? मुलीचे लग्न करू का? वगैरे वगैरे. बैठक एकदा सुरू झाली की खंड पाडता येत नाही. इतर गाढवं बैठक चुकवलेल्या गाढवाला टोमणे मारतात, वाळीत टाकतात. हे वाळीत टाकणे त्या बैठकीचा जो कोण महा गाढव निरुपणकार असेल तो ठरवतो. अखंड xतीयापा..

असं समोर येतंय की या श्री सेवकांना सोशल मिडियापासून लांब राहण्याची "आज्ञा" केली गेली आहे.>>>

हे खरं आहे..माझ्या सासरी सासू सासरे नणंद आणि नणंदची फॅमिली सगळे बैठकीला जातात....आणि खरच लोक अति करतात..गुरुचरित्र वाचायला सुद्धा स्वारी ना पत्रक पाठवून त्यांची permission घ्या ..बारस कधी करायचा .ते याना विचार...लग्न करताना इकडे विचार,..असे प्रकार खूप आहेत ...बैठकीला जाणार्रेच फक्त शहाणे..बाकी मूर्ख असा एकंदरीत आव असतो ...हे स्वतः अनुभवले आहे...कुलदैवताला पाय पडणार नाहीत पण अप्पा स्वारीचा सगळं करतील..एकूणच हास्यास्पद प्रकार आहे हा ..

मुळात धर्माधिकारी स्वतः सांगू शकले असते कि कार्यक्रमाला येऊ नका..गर्दी करू नका. पण त्यांनी तसे केले नाही .आणि स्वतः मुख्यमंत्री नि च इतिहास नोंद घेईल असा कार्यक्रम करू अशी घोषणा दिली..मन काय अनुयायी तर तसे पण आंधळे असतात..लोक आदल्या रात्री पासून तिकडे जाऊन थांबली ..

या एका बाबाजी च्या मागे इतके वेडपट भक्त तर राज्यातल्या सगळ्या बापु बुवा यांनी किती जनतेला नादाला लावले असेल आणि मग डोके जागेवर असलेले उरलेत तरी किती हा प्रश्न पडतो.
तरी बरं माबोवर या बुवांचे समर्थन करायला कोणी आले नाहीं.

तरी बरं माबोवर या बुवांचे समर्थन करायला कोणी आले नाहीं. >>> खरंच! जरी घरातील महत्वाची मंडळी बैठकीला जात असली तरी ९६कनी स्पष्टपणे अनुभव व मत मांडल्याबद्दल खूप कौतुक आहे.

खरंच! जरी घरातील महत्वाची मंडळी बैठकीला जात असली तरी ९६कनी स्पष्टपणे अनुभव व मत मांडल्याबद्दल खूप कौतुक आहे.>>..धन्यवाद ..या वरून एक अनुभव आठवला..माझ्या सासर्यांना paralysis चा स्ट्रोक आला..त्यानंतर फक्त आणि फक्त सासूबाई बोलल्या म्हणून ते बैठकीला जायचे...पण तिथे त्यांना ३ तास मांडी घालून बसायला जमायचे नाही ..याची घरात जेव्हा सहज चर्चा झाली त्यावर सासूबाई च बोलणं असं होत कि त्रास झाली तरी चालेल पण निरूपण देणाऱ्या व्यक्ती समोर खुर्ची वर बसणं चूक आहे,..आपण काय इतके मोठे आहोत का अश्या टाईप च ..ते ऐकून खरंच वाईट वाटलं कि शारीरिक दृष्टया त्रास होतोय तरी हि या लोकांवर त्या बैठकीचा इतका परिणाम झालाय कि चूक कायआणि योग्य काय हे समजू नये.

जरी घरातील महत्वाची मंडळी बैठकीला जात असली तरी ९६कनी स्पष्टपणे अनुभव व मत मांडल्याबद्दल खूप कौतुक आहे.
+१

सरळ अर्थ आहे राजकीय हेतू आणि शक्ती प्रदर्शन...... अर्थातच! >>> अगदी अगदी.

सासूबाई च बोलणं असं होत कि त्रास झाली तरी चालेल पण निरूपण देणाऱ्या व्यक्ती समोर खुर्ची वर बसणं चूक आहे,..आपण काय इतके मोठे आहोत का अश्या टाईप च .. >>> बापरे, धन्य धन्य.

९६क कौतुक वाटतं तुमचं.

उदय, तुमचे सगळे मुद्दे मान्यच आहेत. कोर्टात गेलं की काय चिरफाड होईल आणि कसे एकेक मुद्दे निकाली निघतील याची एक झलक म्हणून लिहिलेलं.
आपली पातळी (लेव्हल), उच्च नीच भेद आपल्या रंध्रारंध्रात इतका एकरुप झाला आहे की या बुवा बाबांच फावतं. जगावर लाथ मारुन स्वकर्तृत्त्व ताठ कणा इ. इ. नावालाही अस्तित्त्वात नाही. भारतातली तर नवी पिढीपण अशीच झापडबंद आहे. कायखरंनाही.

जरी घरातील महत्वाची मंडळी बैठकीला जात असली तरी ९६कनी स्पष्टपणे अनुभव व मत मांडल्याबद्दल खूप कौतुक आहे.>> +१११

जरी घरातील महत्वाची मंडळी बैठकीला जात असली तरी ९६कनी स्पष्टपणे अनुभव व मत मांडल्याबद्दल खूप कौतुक आहे.>> +११११

ह्या घटनेवर राष्ट्रीय माध्यमांतून पुरेशी चर्चा झाली होती का?
मी न्यूज चॅनल्स बघत नाही म्हणून हा प्रश्न. आज एक चॅनल बघितला तिथे ओवैसी साहेबांच्या भाषणाचे दोन तीन निवडक तुकडे आणि अतीकवर चर्चा हेच बघायला मिळालं.

Pages