सहजपणे टाळता येणारी दुर्घटना - महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा

Submitted by उदय on 18 April, 2023 - 00:58

रविवार, १६ एप्रिल २०२३, खारघर (जि रायगड ) येथे महाराष्ट्र भूषण सोहळा दिमाखात पार पडत असतांना एक दुर्घटना घडली आणि त्यामधे १० + लोकांना प्राण गमवावे लागले. Sad

पुरस्कार वितरण समारंभ प्रत्यक्ष डोळ्यांनी बघण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते, आणण्यात आले होते. सभास्थानी, मोकळ्या मैदानात, उन्ह डोक्यावर घेत, हजारो/ लाखो लोक सकाळपासून ताटकळत बसले होते.
व्यासपीठावर राज्याचे तसेच केंद्रातल्या नेत्यांनी हजेरी लावली होती. एव्हढा मोट्ठा श्रोतागण आपल्याला एकण्यासाठी आले आहेत म्हटल्यावर त्यांच्याही उत्साहाला पारावर उरला नव्हता. हळू हळू तापमान ३८ से. कडे सरकत होते. तापमान, अनेक तास थेट उन्हाशी संपर्क, हवेतील आद्रता या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून अनेक उपस्थितांना उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यामुळे दहा पेक्षा अधिक लोकांना प्राण गमवावे लागले.

एव्हढा मोठा प्रेक्षक वर्ग एकत्र येत असतांना त्यांच्या साठी आवश्यक अशा किमान सोई सुविधांची व्यावस्था करण्याचे सौजन्य आयोजकांनी ठेवायला हवे होते. उन्हापासून रक्षण करण्यासाठी डोक्यावर छत नाही, थंड पिण्याच्या पाण्याची सोय नाही. एप्रिल महिन्यात, भर दुपारी, मध्यान्हीची वेळ, अनेक तास चालणार्‍या समारंभासाठी निवडली कुणी? या घटनेस जबाबदार कोण ?

ही मानवनिर्मीत घटना सहजपणे टाळता येण्यासारखी होती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सामना, धन्यवाद! आमच्या बिल्डींगमधल्या काही बायका जायच्या व त्यावेळची मदतनीसही जायची त्यांनी कधी आग्रह केला नाही (अडीस तास एका जागी बसू शकत नाही माहिती असूनही) ). पण बैठक काय प्रकार असतो पहायला म्हणून गेले होते .ननिरूपण म्हणजे दासबोधातीस एखादा समास घेऊन त्यावर नितीमत्तेचे धडे असा प्रकार वाटला जो ऐकला तो कारण अडीच तासापैकी काही तास डुलक्या काढण्यात व त्या आवरण्यात गेला होता Happy . त्या एका बैठीतच समजलं की श्रवणभक्ती हा आपला पिंड नाही. मध्ये मध्ये कोणी शंका किंवा प्रश्नही विचारत नव्हते त्यावरून कळलं तुम्हाला विचार करण्याची मुभा नाही….. भक्तांची हजेरी नोंद ठेवली जाते हे वर कोणी लिहीलंच आहे. आता बैठकीसाठी बावधनमधे बसेस सुरू झाल्या आहेत चकटफू.

> त्यातही त्यांच्या घरात प्रत्यक्ष कामाला असणारा वर्ग बहुतेक उच्च वर्गीय अन बाकी कामाला मात्र बहुजन वर्ग.

No surprises. दासबोधातच असे लिहून ठेवलेले आहे.

रस्कृत व्यक्ति
वर्ष नाम क्षेत्र
१९९६ पु. ल. देशपांडे साहित्य
१९९७ लता मंगेशकर कला, संगीत
१९९९ विजय भटकर विज्ञान
२००१ सचिन तेंडुलकर खेल
२००२ भीमसेन जोशी कला, संगीत
२००३ अभय बंग और रानी बंग चिकित्सा कार्य
२००४ बाबा आमटे समाज सेवा
२००५ रघुनाथ अनंत माशेलकर विज्ञान
२००६ रतन टाटा लोक प्रशासन
२००७ र.कृ. पाटील समाज सेवा
२००८ नानासाहेब धर्माधिकारी समाज सेवा
२००८ मंगेश पाडगाँवकर साहित्य
२००९ सुलोचनादीदी कला, सिनेमा
२०१० जयंत नारलीकर विज्ञान
२०११ अनिल काकोडकर विज्ञान
२०१५ बलवंत मोरेश्वर पुरंदरे साहित्य
२०२१ आशा भोसले संगीत
2022 आप्पासाहेब धर्माधिकारी - समाजसेवा

२००८ बघा

मंजुताई छान पोस्ट.

मला बरेच जण तिथे जा सांगायचे, मी कधीच लक्ष दिलं नाही, कीर्तन प्रवर्चन फार ऐकणं माझा फार पिंड नाही, कुठल्या पंथात जाणंही मला आवडत नाही, मी धार्मिक आहे तरीही नाही आवडत. आई लहानपणी देवळात सोबत न्यायची तेव्हा मी आवारात गप्पा मारत बसायचे, मैत्रिणीही असायच्या त्यांच्या आई बरोबर, त्याही आत श्रवण न करता बाहेर यायच्या. हे जनरल कीर्तन, प्रवर्चन कुठल्या पंथाचे नव्हतं. अमुक मास आहे म्हणून वगैरे त्या टाईप. देवाचं दर्शन मात्र घ्यायचे, मला देवळात जायला आवडायचं पण बाकी बोअर व्हायचं.

फडणवीस, शहा वगैरे लोकांचं समजू शकतो त्यांना फक्त मते हवीत. हायवेला बॅनर लावायला पैसे होते पण मंडप टाकायला नाही. पण अप्पासाहेबांना तर आपल्या लेकरांची चिंता हवी होती ना? अप्पासाहेबांनी स्वतची पाठ थोपटून घेण्यासाठी लोक ऊन्हात बसवले. मेलेल्या लोकांची भेटही न घेता फक
रांगोळी पुसून मोठा त्याग केला. महाराष्ट्र भूषण पुरस्कार काढून त्यांना महाराष्ट्र दुषण पुरस्कार द्यायला हवा.

मटा च्या लेखात लेख ज्यांनी लिहला आहे त्यांचे नाव च नाही.
फक्त लेखक वरिष्ठ पत्रकार आहेत .
असे लीहले आहे.
काय समजायचे लोकांनी कोण हे वरिष्ठ पत्रकार.

भक्त गण म्हणतात की स्वारींच्या पेट्रोलपंपवर जाऊन बघा एकदा काय सुविधा आहेत आणि ग्राहकांच्या कसल्या रांगा.. सेवेतील प्रामाणिकपणासाठी स्वारींच्या पेट्रोलपंपाचे उदाहरण दिले जाते.

ते अप्पा स्वारी मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या घरी गेले, त्यांना सरकारने त्वरित मदत घ्यावी यासाठी प्रयत्न करणारे, तोपर्यंत आपल्याकडून काही मदत दिली आहे असे काही झालं आहे का?
माझ्या वाचनात नाही, बातम्या पण नाहीत

आणि जर हे केलं नसेल आणि आपला भूषण पुरस्कार गोंजारत बसले असतील तर मग त्यांच्या भक्तांची कीव करावी तेवढी थोडी आहे

आज पंचतारांकित मंडपात गृहमंत्री व इतर जेवत असल्याचा फोटो पाहिला. तो याच कार्यक्रमातला आहे किंवा कसे, हे माहीत नाही. पण ते बघून वाईट वाटलं.
भक्ती आणि करुणा यांचा संबंध असतोच असं नाही.
कोव्हिडकाळात मजुरांना घरी जायला एकाही बाबाबुवाबापूने पैसे किंवा बसेस दिल्या नाहीत. मजुरांना जेवणही दिलं नाही, कारण ते त्यांचे भक्त किंवा मतदार नव्हते.
पायी गावी जाणार्‍या मजुरांना बिस्किटं वाटणार्‍या काही बाबाबुवाबापूभक्तांनी ’पायी चालत जाण्यासाठी शक्ती यावी म्हणून पार्ले जी वाटत आहोत’ असं लिहिलेलं आठवतं. आपली वागणूक क्रूर आहे, याचीही या भक्तांना जाणीव नव्हती.

ते अप्पा स्वारी मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या घरी गेले, त्यांना सरकारने त्वरित मदत घ्यावी यासाठी प्रयत्न करणारे, तोपर्यंत आपल्याकडून काही मदत दिली आहे असे काही झालं आहे का? >> वरचा ठोसर ह्यांचा प्रतिसाद वाचून मृत्यूमुखी पडलेल्यांना निरूपणाच्या बैठकीतून आणि आप्पास्वारीच्या घरी वा शेतावर करावयाच्या कामातून गैरहजर राहण्यासाठी श्रीसदस्यातील अधिकारी लोकांनी सूट दिली तरी आपण मृतांसाठी ती एक भली मोठी मदत समजली पाहिजे.

माणूस कसा सद्सद्विवेक बुध्दी हरवून बसतो त्याचे उदाहरण मी बघितले आहे.. .

रोज सकाळी लवकर उठून. Walking करणारा व्यक्ती,.
असाच मला वाटत हरे राम पंथाचा .
आता सकाळी लवकर उठतो पण वॉकिंग करत नाही..
माळ हातात घेवून त्याचे मनी मोजत असती दोन तीन तास .
म्हणजे physical activity बंद.
आता नवीन च फॅड त्याच्या टोक्यात घातले आहे.
नॉन वेज जेवण बंद अंड पण नाही..
हे पण ठीक आहे
त्याच्या पुढे आता लसूण आणि कांदा खायचा नाही.
असे त्याला ज्ञान दिले आहे .
म्हणजे अन्न मधून पोस्टिक घटक मिळणे पण शरीराला मुश्किल...
आणि फक्त माळ जपण्यात च त्याचा वेळ जात आहे.
असे ह्या बैठकी च पण आहे तीन ते चार तास लोक त्याच्यात वाया घालवतात.
परत घरात पूजेचे वेगळेच तास वाया जातात.
भक्ती असावी पण आंधळी नसावी.
हे एकनाथ महाराज नी पण त्यांच्या भारुड मधून सांगितले होते.
देवावर माझा विश्वास आहे .ह्या जगाचा कोणी तरी निर्माता आहे .
मग त्याला देव mhana किंवा एक शक्ती.
पण हे कर्मकांड मला बिलकुल आवडत नाहीत.

अप्पा स्वारीना पेट्रोल पंप कशासाठी? त्यांची स्वतःची गाडी म्हणे 1.67 करोडची आहे.
आणि घराणेशाहीच्या नावाने जिथे तिथे आरोळ्या ठोकणाऱ्यांना नानासाहेव मग आप्पासाहेब पुढे त्यांचे तीन पुत्र ह्याबद्दल कौतुक वाटत राहतं

-संजय भुस्कुटे

-----------------------
मटा च्या लेखात लेख ज्यांनी लिहला आहे त्यांचे नाव च नाही.
फक्त लेखक वरिष्ठ पत्रकार आहेत .
असे लीहले आहे.
काय समजायचे लोकांनी कोण हे वरिष्ठ पत्रकार.

नवीन Submitted by Hemant 333 on 20 April, 2023 - 1

एकूण अंधानुकरण प्रकार आहे. हे करा ते करू नका. ज्या घरात ही बैठक वगैरे फालतुगिरी चालते त्या घरातले लहान सहान कार्य सुद्धा स्वारीच्या सहमतीने पार पडते. मुलाचे नाव ठेऊ का? मुलीचे लग्न करू का? वगैरे वगैरे. >>>>> जवळून बघितलयं….हसाव की रडावं या लोकांवर तेच कळत नाही.

विद्यापिठाचे नाव तेवढे आवडले मला Happy जगदीश प्रसाद झांबरमाल टीब्रेवाला विद्यापीठ!
तसेही तिथली डोक्टरेट कशाला हवी , हे लोक स्वतःचे विद्यापीठ पण काढू शकतील की.

धर्माधिकारी यांच्यावर स्वतंत्र धागा काढायला हवा. हे नाव या निमित्ताने मी पहिल्यांदा ऐकले. यांना ईतका मोठा पुरस्कार मिळावा असे कार्य नेमके काय आहे हा प्रश्न पडला आहे एकूणच.

ऋनमेष.
हा opening च खेळाडू शेवटच्या ओव्हर ला बॅटिंग
ल कसा काय

धन्यवाद हेमंत
घटनेबद्दल शोक व्यक्त करणारी पोस्ट टाकली होती एखादी. पण पोस्ट वाचल्या बऱ्याचश्या. बहुतांश पटल्या. स्पेशली तुमच्या सर्वच पोस्ट छान आहेत या विषयावरच्या.

अमितव - मृत्युचे प्रमाण वर्षाला दरहजारी पाच ( किंवा सात ) असे धरले तरी त्यांच्या मृत्युला विविध/ अनेक कारणे असतात, पैकी उष्माघात हे एक कारण असेल. उष्माघात या कारणाने जाणार्‍यांची संख्या पाचचा एक फार छोटा सबसेट/ उपसंच असेल.
हे सर्व लोक एका दिवसात गेले आहे असे वरकरणी दिसत असले तरी येथे सहा ते आठ तासांत लोक गेले आहेत म्हणजे १/३ - १/४ दिवस. काही दोन दिवसांनी, आणि काहींना बरे होण्यासाठी दोन महिने लागतील.

मृत व्यक्तींचा सरकारी आकडा १४ असला तरी तो कितपत खरा आहे ? मोठी शंका आहे. आता चेंगराचेंगरी झाल्याचे व्हिडिओ बाहेर येत आहेत. तसेच रस्ते अपघातांत काही व्यक्ती दगावले आहेत, घरी गेल्यावर मृत झाले असतील तर त्यांची मोजणी नाही.

आयुष्यभर (?) वृक्षारोपण कार्यक्रम राबवणारा पर्यावरण प्रेमी व्यक्तीने विस लाख लोकांना (साध्या पुरस्कार सोहळ्याला हजर रहाण्यासाठी) लांबचा प्रवास करण्यापासून नक्कीच परावृत्त करायला हवे होते - तेव्हढीच पर्यावरणाला मदत झाली असती. लोक होरपळत असतांना व्यासपिठावरिल एकाही व्यक्तीच्या संवेदना जाग्या झाल्या नाहीत हे अचंबित करणारे आहे.

वर दिलेली यादी पाहिल्यावर लक्षात आले की स्वारी आणि त्यांचे पिताश्री सोडले तर इतर सर्व जण वादातीत आहेत

Pages