सहजपणे टाळता येणारी दुर्घटना - महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा

Submitted by उदय on 18 April, 2023 - 00:58

रविवार, १६ एप्रिल २०२३, खारघर (जि रायगड ) येथे महाराष्ट्र भूषण सोहळा दिमाखात पार पडत असतांना एक दुर्घटना घडली आणि त्यामधे १० + लोकांना प्राण गमवावे लागले. Sad

पुरस्कार वितरण समारंभ प्रत्यक्ष डोळ्यांनी बघण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते, आणण्यात आले होते. सभास्थानी, मोकळ्या मैदानात, उन्ह डोक्यावर घेत, हजारो/ लाखो लोक सकाळपासून ताटकळत बसले होते.
व्यासपीठावर राज्याचे तसेच केंद्रातल्या नेत्यांनी हजेरी लावली होती. एव्हढा मोट्ठा श्रोतागण आपल्याला एकण्यासाठी आले आहेत म्हटल्यावर त्यांच्याही उत्साहाला पारावर उरला नव्हता. हळू हळू तापमान ३८ से. कडे सरकत होते. तापमान, अनेक तास थेट उन्हाशी संपर्क, हवेतील आद्रता या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून अनेक उपस्थितांना उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यामुळे दहा पेक्षा अधिक लोकांना प्राण गमवावे लागले.

एव्हढा मोठा प्रेक्षक वर्ग एकत्र येत असतांना त्यांच्या साठी आवश्यक अशा किमान सोई सुविधांची व्यावस्था करण्याचे सौजन्य आयोजकांनी ठेवायला हवे होते. उन्हापासून रक्षण करण्यासाठी डोक्यावर छत नाही, थंड पिण्याच्या पाण्याची सोय नाही. एप्रिल महिन्यात, भर दुपारी, मध्यान्हीची वेळ, अनेक तास चालणार्‍या समारंभासाठी निवडली कुणी? या घटनेस जबाबदार कोण ?

ही मानवनिर्मीत घटना सहजपणे टाळता येण्यासारखी होती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

the Maharashtra government has banned all open-air public meetings/rallies between 12 noon to 5 p.m >> स्वतः चुका करायच्या आणि त्या निस्तरायला सामान्य जनतेवर कायद्याचा बडगा ऊगारायचा. डीमॉनेटायझेशनची अंमलबजावणी असाच भोंगळ प्रकार होता,
काळापैसा जमा करणार्‍यांना पकडता येत नाही, रिकवरी होत नाही म्हणून सामान्य जनतेला वेठीला धरले आणि लोक मेले.
भाषणे देतांना सामाजिक स्वास्थ्य आणि सुरक्षिततेप्रती जबाबदारीचा विसर पडत असेल तर जननेते आणि जनगुरू म्हणून मिरवायचा काय हक्क आहे ह्या लोकांना असे वाटते.

साडे दहाला सुरू झालेला कार्यक्रम दीड की अडीचला संपला हे हस्तर मान्य करायला तयार नाहीत. त्यांच्या विश्वात कार्यक्रम दहाचाच होता.

रेल्वेरुळांवर झोपलेले मजूर त्यांच्या वाहतुकीची सोय बंद केल्याने चालत निघाले. तिथेही सरकारचाच दोष होता.

नदीकिनारी प्रेतं जाळावी लागली कारण त्या राज्यात पुरेशा वैद्यकीय सुविधा नव्हत्या. तिथल्या सरकारने टेस्टिंगही कठीण करून ठेवलं.
ज्या राज्यांत असं काही झालं नाही त्यांच्या कोव्हिड केसेसचे आकडे जास्त म्हणून त्यांची कामगिरी वाईट असं म्हटलं गेलं.

हे असे विचार असणार्‍या जथ्यासाठी वाईट वाटून काय उपयोग? ब्रेनवॉश झालेलं आणि विचार करू न शकणारं पब्लिक आहे. मेल्यावर मुक्ती इ. इ. प्रकारची जळमटं मेंदून कायमची वास्तव्यास आहेत आपल्या. आनंदात जगण्यासाठी कोणी काही करत नाही, पण मेल्यावर मुक्ती साठी आनंदाचं जीवन खर्च करतात. हे असं हातचं सोडून पळत्याच्या पाठी चक्रमसारखं धावायला आपण बळी पडतो कारण हे कर्मकांड, लहानपणापासून मुक्तीला सोन्याच्या वर्खात बसवुन ठेवायचं आणि प्रश्न विचारायला आणि विचार करायला बंदी घालायची.
काय करतात बाकी या बैठकीत?

साडे दहाला सुरू झालेला कार्यक्रम दीड की अडीचला संपला हे हस्तर मान्य करायला तयार नाहीत. त्यांच्या विश्वात कार्यक्रम दहाचाच होता.

मी या पुढील् कार्य क्रमा चे विचारत होतो

महाराष्ट्र सरकार सकाळी दहाचा कार्यक्रम डॉट दहाच्या ठोक्याला चालू करून उन्हं वाढायच्या आत संपवण्यासाठी संपूर्ण जगात विख्यात आहे. स्वतः मुख्यमंत्री देखील आटोपशीर आणि नेमक्या व मुद्देसूद भाषणासाठी ओळखले जातात.

दहाची वेळ जरी दिली असली तरी दूरदूरचे भक्तगण आधीच घरून निघतात. कनेक्टिंग गाड्या, एस टी बसेस नसतात. मग मुंबईत जसे सी एस टी किंवा मुंबई सेंट्रलवर रात्री प्रवाशांच्या पथाऱ्या पडतात तसे मध्ये कुठेतरी थांबून राहायचे, मग मिळेल त्या गाडीने केव्हाही समारंभस्थळ गाठायचे. सकाळी आठ नऊ वाजताच लोक येऊन बसले असतील, न खाता न पिता. dehydration होणार नाही तर काय होणार!

अजून दोन कोटी खर्च केला असता तर एक रात्र राहण्याची ,खाण्याची सोय करणे सरकार ल कठीण नव्हते.
जे लांब राहणारे आहेत त्यांची राहण्याची व्यवस्था करायला हवी होती.
ते सर्व श्री सदस्य होते गरज नसताना त्यांनी राहण्याचा पर्याय निवडला नसता .
पण कार्यक्रम संध्याकाळी च पाच सहा च्या दरम्यान ठेवला पाहिजे होता.
7 पर्यंत संपला असता

जथ्यासाठी वाईट वाटून घ्यायला नकोच, पण काळ सोकावतो. मारणारे लोक पुण्यात्मे ठरतात आणि कल्ट वाढतच जातो. अशीही टोकाची गोष्ट घडू शकेल की मेलेल्यांच्या समाध्या त्यांच्या त्यांच्या गावी बांधल्या जातील आणि तिथेही श्रीस्वारी पूजा सुरू होईल. सरकार, संघटना भरपाई देईल. लोक उदो उदो करतील आणि आणखी जोमाने भक्तीला लागतील. स्वतः ही पुण्यात्मे होण्यासाठी धडपडतील.
इथल्या कुणालाही तरी यावर उपाय सुचतोय का? लोकांना ह्या गर्तेतून बाहेर काढण्याचा उपाय?

हो. ह्यावर उपाय नाही. केवळ वाट पाहाणे. जेव्हा बेगडी धर्मसत्ता राजसत्तेवर हामी होते, तिचा ताबा घेते, तेव्हा ती अधिकच धोकादायक बनते.
spirituality आणि religion हे एक नव्हेत हे लोकांना कळेल तो सुदिन.

धाग्यावरचा 'मेलेले त्यांच्या मूर्खपणामुळे मेले हा भावनिक सूर थोडा खटकला.' अज्ञानी किंवा एखाद्या गोष्टीमागे बहकलेले असणे ह्याची पनिशमेंट म्हणजे मृत्यू नव्हे किंवा मृत्यू ओढवल्यास तो समहाऊ अज्ञानाचा वा बहकण्याचा परिणाम म्हणत लेजिटिमाईझ करणे . हिमालय सर करायला गेलेले गिर्यारोहक मरतात... आपण त्यांना अज्ञानी किंवा बहकलेले न म्हणता पॅशनेट म्हणतो.
मान्य आहे खारघर मध्ये जमलेल्या लोकांच्या आदरस्थानाशी आपण रिलेट करू शकत नाही तसेच आपण फॅमिलीला मागे ठेऊन हिमालयासारख्या पदोपदी मृत्यू पुढ्यात ठेवणार्‍या घटनांना स्वतःहून आजमावण्याच्या वेड्या धाडसाशी सुद्धा बर्‍याच प्रमाणात रिलेट करू शकत नाहीच ना. रॉक स्टार्सच्या म्युझिक कोन्सर्टमध्येही श्रोते मरतात... मागच्या वर्षी केके सुद्धा असा ऊश्माघाताने मेला... तो तर कधीही 'मी पर्फॉर्म करत नाही' म्हणून सोडून जाण्याची ऑथोरिटी ठेऊन होता.
गिर्यारोहक, गायक आणि खारघर मधल्या सभेतल्या श्रोत्यांची थेट तुलना करण्याचा हेतू नाही पण कोणी कशाने ड्रिवन असावे हे आपण जज करू शकत नाही आपल्याला ते कितीही मूर्खपणाचे वाटले तरी.

या कार्यक्रमासाठी दोन दिवस अगोदरपासून महाराष्ट्रामधल्या अनेक आगारांमधल्या बसेस भक्तांना आणायला - सोडायला आणल्या गेल्या होत्या. अगदी अकोला - परभणीहून बसेस गेल्या. एक मित्र बार्शीत होता. तिथल्या विसापेक्षा जास्त बसेस इकडे वळवण्यात आल्याने शनिवार - रविवार लाखो प्रवाश्यांची गैरसोय झाली. एसटीचे हे पैसे कोणी दिले? का दिलेच नाहीत?

बरोबर आहे अश्विनी, थोडी तुलना अ‍ॅपल आणि ऑरेंजेस वाटली, पण कीस पाडण्यात अर्थ नाही.
त्याच बरोबर प्रत्येक मृत्यू जवळच्यांसाठी तितकाच वाईट असला तरी तिर्‍हाईताची प्रतिक्रिया कणव सहानुभूती सहवेदना ते इन डिफरंट अशा रेंज मध्ये बदलते ते ही मानवी स्वभावानुसार बरोबर रादर अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक मृत्यूला तितकीच इंटेसिटी असली तर जगणे कठिण होईल.

भक्त तिकिट काढून आले असतील ना? एस्टीला उलट भरघोस छप्परतोड नफा झाला असेल.
गणपतीला कोकणात, वारीला पंढरपूरला एस्टी फुकट बसेस चालवत नाही. इथे चालवल्या असतील का?

नाही, माझ्या माहितीप्रमाणे भक्तांना तिकीट नव्हतं.
त्या त्या गावच्या श्रीसदस्यांनी याद्या दिल्या होत्या, त्यानुसार बसेस मागवल्या गेल्या.
तिकीट काढून येण्याची ऐपत सर्वांची नसावी कारण हायवेवरून चालत येणारे भक्त आदल्या दिवशी अनेकांनी पाहिले होते. ओळखीतल्या दोघा पत्रकारांच्या त्यावर पोस्टी आहेत.

<गणपतीला कोकणात, वारीला पंढरपूरला एस्टी फुकट बसेस चालवत नाही. इथे चालवल्या असतील का?>

हा वेगळा इव्हेंट होता. इथे गृहमंत्र्यांना एकगठ्ठा काही लाख लोक समोर आयते मिळाले. त्यासाठी फुकट व्यवस्था असणंच सोयीचं आहे.

मी अश्विनी
केकेचा मृत्यू आयोजकांनी हॉलच्या क्षमतेपेक्षा जास्त गर्दी केल्याने श्वास घुसमटून आणि नंतर हृदयक्रिया बंद पडून झाला. त्याच्या खोलात जात नाही. पण तिथे आलेल्या प्रेक्षकांना सरकारी कार्यक्रमासाठी आणलेले नव्हते.

गिर्यारोहकांनी तर रिस्क गृहीतच धरलेली असते. त्याची जबाबदारी सरकारवर येत नाही.
लष्करात भरती होतानाही रिस्क गृहीत असते. युद्धात मृत्यू झाला तर तक्रार नसते. त्या मृत्यूकडे उदात्त भावनेने पाहिले जाते.
त्यांची तुलना सरकारी पुरस्कारासाठी गरज नसताना काहीच्या काही भरमसाठ नियोजनशून्य गर्दी जमवून त्याची परिणती अशा घटनेत होण्याशी करणे बरं वाटत नाही.

स्वतःच्या मानाने लोक येत नाहीत किती ही भक्ती असली तरी लोक स्व खर्चाने,स्व मर्जी नी येत नाहीत.
येण्या जाण्याचा खर्च, नाश्ता, पाणी ,जेवणाचा खर्च .
स्पॉन्सर लोक करतात,हा सरकारी कार्यक्रम होता म्हणजे सरकार नी केला असेल.
गैर धंदे करणारे राजकीय लोकांना पैसे देतात त्या बदल्यात त्यांचे गैर धंद्या ना सुरक्षा दिली जाते
पैशाचा महापूर असतो .
ज्यांना व्यवस्था करण्याची जबाबदारी दिलेली असते ते परत हवा तितका पैसा खातात.
बीबीसी रिपोर्ट बघितला.
कागदावर खूप उत्तम योजना सरकार नी केली होती.
5 कोटी लिटर पाणी टँकर मध्ये होते.
नळाने पाणी पुरवठा होता तो वेगळा.
300 डॉक्टर,गरजेची औषध ह्यांचं मुबलक साठा होता.
ग्रुप नुसार हॉस्पिटल मध्ये बेड राखीव होते.
पण हे सर्व टँकर गेले कुठे हा प्रश्न हा उभा राहत आहे.
इतकी सुविधा कागदावर होती पण प्रत्यक्षात ती नव्हती.
मग हा खर्च जो कार्य क्रमाच्या नावावर दाखवला आहे ते पैसे गेले कुठे.
त्या सुविधा तर तिथे नव्हत्याच
कागदावर मंडप,पंखे,कूलर ह्याचा पण उल्लेख असेल खर्च पण दाखवला असेल.
शोध पत्रकार कधी तरी शोधून काढतील च

आचार्य,
माझा मुद्दा मृत्यूला जबाबदार सरकार की आयोजक, आणखी कोणी बुवा की त्यांचा परिवार हा नसून 'मेलेले त्यांच्या मूर्खपणामुळे मेले' ह्या घटनेतील मृतांप्रती काहींच्या प्रतिक्रियांतून दिसलेल्या condescending भावनेबद्दलचा आहे.
घटनेची चौकशी करून जबाबदार व्यक्ती, समूह शोधून त्यांच्यावर खटले भरले पाहिजेत आणि अशा आयोजनासाठी कायदेबदल बरोबरच संबंधित विभागाची पुर्वप्रवानगी, लोक जागरण वगैरे करायला पाहिजे ह्याच्याशी मी पूर्ण सहमत आहेच.

'मेलेले त्यांच्या मूर्खपणामुळे मेले' ह्या घटनेतील मृतांप्रती काहींच्या प्रतिक्रियांतून दिसलेल्या condescending भावनेबद्दलचा आहे. >> पण त्यासाठी जी जंत्री दिली आहे ती एकाच मापात सबकुछ वाटली.

खटला भरणार कशाच्या जोरावर? रॅशनलायझेशन नाही... पण २२ लाख आकडा खरा असेल. आणि सगळ्या उत्तम आदर्श सुविधा असत्या तर किती लोक मेले असते? इतके मृत्यू होऊन चेंगराचेंगरी, केऑस कसा काय झाला नाही?
महाराष्टाचा डेथ रेट पाच ते सहाच्या मध्ये आहे. म्हणजे १००० माणसांमागे वर्षांकाठी मृत्यू होणार्‍यांची संख्या.
२०, लाख भागिले १००० गुणिले ५ भागिले ३६५ हा आकडा ३२ येतो. आता डेथ रेट हा जनरल पॉप्युलेशनचा असतो, इथे येणारी लोकसंख्या स्क्यूड आहे, धडधाकट आहे हा फॅक्टर जमेस धरला तर काय मॉडेल वगैरे आहे का?

पण त्यासाठी जी जंत्री दिली आहे ती एकाच मापात सबकुछ वाटली. >> तोच तर मुद्दा आहे ना.. माप व्यक्तीपरत्वे बदलते म्हणून त्यांना सरसकट मूर्खपणा केला असे म्हणणे योग्य नाही. त्यांच्या जाण्यामागे ड्रायविंग फोर्स काहीका असेना आपण तो जज करू नये ईतकेच.

कदाचित थोडे पटेल असे ऊदाहरण द्यायचा प्रयत्न करते. अमेरिकेत मेक्सिकोतून आणि कॅनडातून ईलिगल बॉर्डर क्रॉस करणे प्रचंड धोकादायक आणि जीवावर बेतणारे असते. पण लोक करतात आणि मरतात. मागे एक भारतीय फॅमिली ज्यात ३ आणि ११ वर्षांची मुले होती जिवानिशी गेली.
मी ईथे बसून बातमी वाचू संपताच त्यांना 'मुर्ख लेकाचे' म्हणून राईट ऑफ करू शकते पण घटनेमागची पूर्ण परिस्थिती समजून घेतली तर तसे राईट ऑफ नाही करता येत आणि ह्यासाठी जबाबदार आणखीही आहेत ज्यांना शिक्षा व्हायला पाहिजे हे पटते.

खटला भरणार कशाच्या जोरावर? रॅशनलायझेशन नाही >> बरोबर. घटनेचे बील मेलेल्या लोकांच्या मूर्खपणावर फाडले तर मग ईतर कोणी कसा जबाबदार ऊरतो?

काल रात्री अगदी चे़ंगराचे़ंगरी नाही, पण लोक, त्यातही अधिक स्त्रिया धडपडून पडत असल्याचे व्हिडियो ट्विटरवर होते.

हे लोक कार्यक्रमासाठी इतक्या आधीपासून ( शनिवार सकाळ ते शनि - रवि रात्र पहाट) येत होते. रांगा लावून आत शिरले . इतके तास बसून राहिले. म्हणजे भलतेच शिस्तबद्ध आणि स़ंयम राखून होते.

तसं नाही म्हणते. पेपरवर पाण्याची सोय होती इ. इ. सिद्ध होईल. जमणारी गर्दीच सांगेल आम्ही राजीखुषी आलेलो.

Pages