चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी यूट्यूब वर बघितला. तसे पाहणे एथिकल आहे का ते माहीत नाही पण सर्च केले आला बघितला बात खतम. पण इतका नवा सिनेमा लगेच यूट्यूब वर म्हणजे त्यात मेकर्सचे नुकसान होत नाही का? अशी ही शंका आलेली. मी पहिले अंत बघून घेतला. ते मुलाला मारतात ते काही बघवले नाही पुढे करून टाकले. झेंडूला अगदी पोटाशी धरावे वाटते. ती एकाठिकाणी फोडणीचा भात खात बसलेली असते ते ही क्यूट आहे. एकदम बिन्धास्त मुलगी. ते गणितात ४२ मार्क हे तर बेस्टच.

माझ्या सांगलीच्या बारक्या नणंदा/ दीर साधारण अश्याच बोलत व कपडे घालत. त्यांची खूप आठवन झाली.

ती झेंडू सगळ्यात फेवरिट त्यात माझी. कदाचित सर्वात लहान म्हणूनही असेल. पण भयंकर मिश्किल रोल आहे तो. चहावाल्याच्या आरोळ्या कॉपी करते तो शॉट सर्वात आवडला होता.

ती झेंडू सगळ्यात फेवरिट त्यात माझी. कदाचित सर्वात लहान म्हणूनही असेल. पण भयंकर मिश्किल रोल आहे तो. >> खूप गोड मुलगी आहे ती... पापीच घ्यावीशी वाटते पटकन... काही पंचेस खूप कॉन्फीडिएंटली सादर केलेत. सगळ्याच बाल कलाकारांची कामे मस्तच! रेडकू ची कॉलर ट्यून, बांगड्या गरम, गल्ली बोळातली, छतांवरची पळापळ... मस्तच!

आपलीमराठीच्या कृपेने बघायला मिळाला शेवटी एलिझाबेथ एकादशी.
अतिशयच आवडला. कोणी मुद्दाम अभिनय केला असं खरंच वाटलं नाहीये. अगदी त्या घरमालकीण बाई, वारकरी, चहावाला सगळेच खरेखुरे!
ज्ञानेश आणि श्वास मधला तो लहान मुलगा खूप साम्य वाटलं मलातरी.
झेंडु गं ती झेंडु कित्ती गोडुली.. 'मला गणितात १०० पैकी ४२ मार्क आहेत'. हायलाईट आहे पिक्चरचा Happy

मुंबई मध्ये कामासाठी जाण झाल की एक घाणेरडा वास सतत आपला पाठलाग करत आहे अस एक अस्वस्थ करणार फिलिंग येत . हा वास पोत बदलत असला तरी त्याचा गाभा एकच आहे . काहीतरी सडत आहे असा तो वास . अख्ख्या मुंबईत हा घाण वास तुमचा पाठलाग करतो . अनुराग कश्यप च्या 'अग्ली ' मध्ये हि असा सडका वास येणारी घाणेरडी मुंबई बहुतेक फ्रेम मध्ये दिसते . अजून एक गोष्ट . मुंबई मध्ये कितीही इच्छा असली तरी तुम्ही एकटे नसता . Personal Space वैगेरे चोचले मुंबई पुरवत नाही . मुंबई ला अंतर्बाह्य ओळखून असलेल्या अनुराग ने हिच मुंबई कॅमेरा फ्रेम मध्ये टिपली आहे . कुठल च पात्र एकट आहे असे फ्रेम मध्ये दिसत नाही . किमान दोन लोक तरी फ्रेम मध्ये असतात . यापूर्वी मुंबई च्या या वैशिष्ट्यांचा वापर फार कमी चित्रपटात झाल्याचा दिसतो . ते चित्रपट म्हणजे सत्या (पटकथा लेखक -अनुराग कश्यप ), Black Friday ( पुन्हा दिग्दर्शक अनुराग च ) आणि इतर काही नियम सिद्ध करणारे अपवाद .

प्रस्थापितांना विरोध करणारा च स्वतः कधी प्रस्थापित बनतो हे त्याला पण कळत नाही . आणि हा फ़क़्त राजकारणाला लागू पडणारा नियम नाही . जौहर -चोप्रा च्या चित्रपटांवर टीकेची झोड उठवणारा अनुराग कश्यप आता स्वतः च प्रस्थापित झाला आहे अशी ओरड चालू झाली होती . करण जौहर सोबत चित्रपटाची सह निर्मिती करण , रणबीर कपूर सारख्या 'स्टार ' सोबत पुढचा चित्रपट सुरु करण वैगेर कारणांमुळे हि ओरड सुरु झाली होती . पण 'अग्ली ' ने हि ओरड तात्पुरती का होईना थांबेल अशी अपेक्षा आहे . गँग्स ऑफ वासेपूर नंतर खर तर अनुराग अजून मोठ्या बजेट चा चित्रपट बनवू शकला असता पण त्याने 'अग्ली ' ची निवड केली . राहुल भट , विनीत सिंग , रोनित रॉय , तेजस्विनी कोल्हापुरे , गिरीश कुलकर्णी अशी कास्ट घेऊन हा चित्रपट केला . एका लहान मुलीचे होणारे अपहरण आणि त्यानंतर घडणारया घटना चित्रपटात दाखवल्या आहेत .

राहुल हा अपयशी नट आपल्या मुलीला फिरायला घेऊन जातो . त्याचा आणि बायको शालिनी चा घटस्फोट झाला असून शालिनी ने दुसरा विवाह केला आहे . तिचा दुसरा पती बोस हा राहुल आणि शालिनी चा कॉलेज मधला सहध्यायी असतो . आता तो एक बडा पोलिस ऑफिसर आहे . अतिशय कडक आणि दरारा असणारा असा तो ऑफिसर आहे . कॉलेज जीवनात झालेल्या काही घटनांमुळे तो राहुल वर खार खाऊन आहे . राहुल आपल्या मुलीला कार मध्येच बसवून कास्टिंग एजंट आणि मित्र चैतन्य ला भेटायला त्याच्या घरी जातो . दरम्यान कुणीतरी त्याच्या मुलीच अपहरण करते . संशयाची सुई सर्व पात्रांवर फिरायला लागते . बोस चा पहिला संशय अर्थातच राहुल वर असतो . नंतर नंतर संशयास्पद भूतकाळ असणार्या चैतन्य वर ठपका ठेवला जातो . या चित्रपटातल्या सर्वच व्यक्तिरेखा भावनिक दृष्ट्या असुरक्षित अस्थिर अशा आहेत . नातेसंबंध असून आणि कुठल्या न कुठल्या धाग्याने जोडले गेलेलं असून पण इथे कुणाचाच कुणावर विश्वास नाही . दुर्दैवाने आजची मुंबई पण अशीच आहे . अस्थिर आणि धुरकट . या सिनेमात मुख्य मुद्दा अपहरण कुणी केल हा नाही आहे हे थोड्याच वेळात कळायला लागत . पण एका घटनेनंतर संबंधित लोक प्रतिक्रिया कशा आणि का देतात हे जाणून घेणे हा मुख्य मुद्दा आहे . इथे पण अनेक लोकांचे नात्यांचे बुरखे टराटरा फाटतात . मुलीचा मामा असो , शालीनीची जवळची मैत्रीण असो वा दस्तुरखुद सख्खी आई असो इथे कुणालाही मुलगी सापडणे तितकेसे महत्वाचे वाटत नाही तर यातून आपले उल्लू कसे सीधे करता येतील हे महत्वाचे वाटत आहे हे कळल्यावर प्रेक्षकाला धक्का बसतो . जागतिकीकरण , त्यातून जवळ आलेले जग , त्यातून एकाकी पडणारा माणूस आणि त्यातून येणारी असुरक्षितता हि आता आपल्यापण दरवाजावर येउन ठेपली आहे हि अस्वस्थ करणारी भीतीदायक जाणीव करून देण्यात अनुराग पुरेपूर यशस्वी झाला आहे . राहुल भट , तेजस्विनी कोल्हापुरे , रोनित रॉय यांनी आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत . पण सर्वात उल्लेखनीय आहेत ते चैतन्य ची भूमिका करणारा विनीत सिंग आणि इन्स्पेक्टर जाधव ची भूमिका करणारा आपला गिरीश कुलकर्णी . मुलीच अपहरण झाल आहे हे कळल्यावर राहुल आणि चैतन्य पोलिस ठाण्यात जातात आणि इन्स्पेक्टर जाधव त्यांच्यावर कसा चढतो हा १३ मिनिटाचा प्रसंग निव्वळ अजरामर या श्रेणीत यावा . आपली पोलिस यंत्रणा दाद मागायला येणाऱ्या लोकांना कशी वागणूक देते हे इथ कळत . गिरीश कुलकर्णी आणि विनीत सिंग ने हा सीन जबरदस्त खुलवला आहे . तांत्रिकदृष्ट्या पण चित्रपट सरस आहे . निकोस अन्द्रीत्साकीस ने मुंबई आपल्या कॅमेऱ्यात जबरदस्त टिपली आहे. संकलन पण सरस . चित्रपट कुठेही रेंगाळत नाही .

पीके बघून राजकुमार हिराणी च साचेबद्ध होत असण अस्वस्थ करत असतानाच अनुराग कश्यप मात्र बदलला नाही हे आश्वस्त करणार फिलिंग आहे .

बघितला पाहिजे अग्ली. या चित्रपटाचा पहिला रिव्ह्यु वाचला तो निगेटिव्ह होता पण इथल्या दोन पोस्ट्स वाचून उत्सुकता निर्माण झाली आहे.

एलिझाबेथ एकादशी..
BSK >खरं तर मला लाजच वाटली पाहीजे, पण त्या दुकानात येणार्या , आजूबाजूला असणार्या लोकांकडे पाहून 'आता हा गडबड करणार', 'हा फसवणार मुलांना' असं काहीतरी मी एक्स्पेक्ट करत होते.<< ....100+

ज्याच्याबद्दल कसलीही चर्चा करु नये, मनातून पुसून टाकायचा प्रयत्न करावा, ज्याचे अस्तित्वच नाकारावे असा एखादा अत्यंत जळजळीत, बोचरा अनुभव म्हणजे 'अग्ली'.

दावत ए इश्क बघितला,एकदा बघायला खरच मस्त आहे, परिणिती किती सहज अभिनय करते, तिला अजुन आव्हानात्मक भुमिका मिळायला हव्यात, तीचा पडद्यावरचा वावर सुखद असतो, आदित्य-रॉय कपुरही बरा आहे, त्याला चक्क कमी फुटेज आहे.

दावत ए इश्क इतका काही आवडला नाही. तो असा कृत्रीम वाटतो. काय माहीती पण चोप्रांच्या फॅक्टरी मधे तयार झाल्यामुळे असेल कदाचीत.

सगळ्यात चांगला अनुपम खेर आहे त्यात. बाकी सगळ्यांनी नुसत्या पाट्या टाकल्यासारखे वाटते. तो लखनौचा मोहोल्ला पण खोटा वाटतो आणि त्यातली माणसे पण.

मला तर दावते इश्क मधे कोणीच आवडलं नाही. नॉर्मली मला परिणिती आणि अनुपम खेर आवडतात आणि आदित्य बद्दल काहीच वाटत नाही. या सिनेमात सगळेच डोक्यात गेले Sad

इमिटेशन गेम बघितला. आधुनिक संगणकाचा बाप एलन टुरिंग ह्याच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपट आवडला.
दुसर्या महायुद्धात जर्मन सैन्य वरचढ ठरत होते. त्यांच्या प्रगत एन्क्रिप्शन तंत्रज्ञानामुळे त्यांच्या सैन्याची हालचाल गुप्त राखू शकत होते. मित्र पक्षांना त्यांच्याकडील एन्क्रिप्शन करणारे "एनिग्मा" मशीन मिळते. हे मशीन दर दिवशी नव्या कूट संख्येने नव्या जुळवणीने एन्क्रिप्शन करू शके. त्यामुळे मित्र पक्षाला ते संदेश नव्याने समजून घ्यावे लागत. जर्मनांच्या गुप्त संदेशांची उकल करण्यासाठी बुद्धिमान लोकांची एक गुप्त टीम बनवली जाते. गणिताचा प्राध्यापक एलन टुरिंग अतिशय बुद्धिमान, असामान्य विचार करणारा आणि थोडासा माणूसघाणा विक्षिप्त. इतक्या बुद्धिमान टीमकडून ब्रूट फोर्स पद्धतीने काम करणे त्याला पटत नाही. तो एक मशीन बनवण्याच्या मागे लागतो आणि शेवटी यशस्वी होतो. परंतु जर्मन लोकांना जर हे कळले तर ते "एनिग्मा" मशीन परत बदलतील आणि सगळ्या मेहेनतीवर पाणी पडेल म्हणून ती टीम त्यांचे काम गुप्त ठेवते. ब्रिटीश गुप्त सेवा "MI6" च्या मदतीने ते संदेश उकल करण्याचे काम चालू ठेवतात. त्यांच्या मदतीमुळे युद्ध जवळपास २ वर्ष लवकर संपले.
युद्धानंतर एलन टुरिंगला त्याच्या समलिंगी संबंधामुळे अटक केली गेली. समलिंगी संबंध ख्रिस्ती संस्कृतीमध्ये बसत नसल्यामुळे त्याला गुन्हेगार ठरवून हार्मोन थेरपी दिली गेली. वर्षभराने ह्या सगळ्याला कंटाळून त्याने आत्महत्या केली.
बायकोच्या मैत्रिणीच्या एका साध्या संवादातून एलनला ब्रेकथ्रू मिळतो तो प्रसंग कदाचित सत्यापेक्षा जास्त सोपे करून दाखवला असावा असे वाटले. पण एरवी चित्रपट मस्त प्रेझेंट केला आहे.
हि सत्यकथा आहे. एखाद्याची लैगिक आवडनिवड त्याच्या बाकी सगळ्या अत्त्युच्च बुद्धिमत्तेला आणि देशसेवेला झाकोळून टाकते, तेही ब्रिटन सारख्या प्रगत देशात. युद्ध संपल्यावर ७० वर्षांनी २००९ मध्ये ब्रिटनच्या पंतप्रधानांनी एलनची मरणोत्तर जाहीर माफी मागितली. नंतर २०१३ मध्ये राणीने त्याला "royal pardon" ग्रांट केले.
The description on wiki is "Queen Elizabeth II granted him a posthumous pardon in 2013". I thought pardon was something to be asked for and not to be granted. Now I doubt my English knowledge. :-o

रार >> +१

आमच्याही दोन लाईनी: The imitation game provokes you to think. Unless people stop judging those who are different, world won't be a happy place to live.

षामिताभ बघितला. स्टोरीमध्ये फार मार खातो सिनेमा Sad टी.व्ही वर चॅनल सर्फिंग करता करता कधी चुकून दिसला तर जरूर बघा.

https://www.youtube.com/watch?v=JadANyJ9HfM

१०.४५ अमिताभ म्हणतो ष वापरा...(लहानपणी शिवाजी म्हणतो असा खेळ खेळायचो, राजा बदलत राहिला पण खेळ चालूच Wink )

हो जि, धनुष, अक्षरा आणि अमिताभ अगदी मन लावून काम करतात पण स्टोरी फार ग्रिप घेत नाही. अक्षरा आवडली.

मी यूट्यूब वर बघितला. तसे पाहणे एथिकल आहे का ते माहीत नाही

>>> यू ट्यूब हे रेव्हेन्यू मॉडेल आहे. ट्यामुळे काही करारमदाराशिवाय तिथे चित्रपट येणे शक्य दिसत नाही. अशा अटींचा भंग करणारे व्हिडेओ काढलेही जातात.त्यामुळे त्यात अनएथिकल काही नसावे. डोन्ट बी गिल्टी माम

https://support.google.com/youtube/answer/2807622?hl=en

बाजी पाहिला. सर्वच्या सर्व आघाड्यांवर अत्यंत फसलेला चित्रपट. दु:स्वप्न म्हणून विसरायचा प्रयत्न चालू आहे. टीव्हीवर आला तरी आपले मौल्यवान २ तास ५० मि. वाया घालवू नका असा कळकळीचा सल्ला.

मर्दानी बघितला. ट्रेलर बघूनच हा 'द व्हिसल ब्लोअर'ची कॉपी असणार असा अंदाज होता, तो खरा ठरला. पण तरी आवडला. ह्युमन ट्रॅफिकिंगच्या विक्टिम्सना मदत करू बघणारी एक(टी) महिला पोलिस ऑफिसर हे कथाबीज दोन्ही चित्रपटांत आहे आणि तेवढंच साम्य आहे. मला व्हिसलब्लोअर खूप आवडला होता. आधी आवडलेल्या चित्रपटाची बॉलीवुडी आवृत्ती बघतना प्रचंड चिडचिड होते. आवडते कलाकार असले तरी डोक्यात जातात (प्यार तो होना ही था). रानी मुखर्जी आवडते, खूप आवडते, उगीचच आवडते. त्यामुळे बघावा की नाही अशी जरा काचकुच सुरू होती. पण तरी नेटफ्लिक्सवर आल्या-आल्या चित्रपट बघितला आणि आवडला.

चित्रपटाचं देशीकरण convincing आहे. रानी मुखर्जीचं काम खूपच चांगलं झालं आहे. सहसा हिंदी चित्रपटांमधली मराठी माणसं दोन-चार मराठी शब्द फेकतात आणि उरलेल्या वेळात अस्सल हिंदी बोलतात. रानीनं चक्क मराठी 'अ‍ॅक्सेंट'मधलं हिंदी फेकलं आहे. फक्त काही सीन्समध्ये तो 'अ‍ॅक्सेंट' गायब होतो. तिचे कपडे, मेक अप सगळंच तिच्या कॅरॅक्टरला सूट होइल असं आहे. शेवटच्या सीनमध्ये तर एक ढगळ टी-शर्ट घातलेला दाखवला आहे. फक्त तिनं थोडे मसल बिल्ड केले असते तर शेवटची मारामारी थोडी आणखी परिणामकारक वाटली असती. ताहीर राजचं काम पण आवडलं. काय पो चे मध्ये आणि या चित्रपटात एकदम वेगळेच रोल केलेत याने. वकील म्हणून एक कॅरेक्टर आहे त्यानं पण मस्त काम केलं आहे. बाकी बरेच कलाकार अजिबात ओळखीचे नाहीत. एकुणात अशा प्रकारच्या 'कमर्शियल' चित्रपटांच्या तुलनेत 'मर्दानी' खूपच उजवा वाटला.

हे चित्रपटाविषयी आणि रानीविषयी. चित्रपटाचा विषय अर्थातच unfortunate but true. चित्रपटातली काही दृष्य बघवत नाहीत अजिबात. चित्रपट संपल्यानंतर किती तरी वेळ त्या छोट्या मुली डोळ्यांसमोरून हलल्या नाहीत. शेवटी नामावलीनंतर ह्युमन ट्रॅफिकिंगविषयी काही माहिती दिली आहे. त्यानुसार भारत या व्यवसायातला नंबर एकचा 'हब' आहे. आपल्या देशात दर ८ मिनिटांना एक लहान मूल गायब होतं. दर वर्षी ११,००० मुलांचा तपासच लागत नाही. जगभरात पिडोफाइल्स आहेत हे आणखी एक किळसवाणं सत्य माहिती असलं तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात असतील हा विचार भितीदायक आहे.

मी पण पाहिलाय मर्दानी. इथे लिहिले की नाही आठवत नाही, पण आवडला होता. त्या ताहिर चं काम सही झालं आहे. रानी चे फाइट सीन्स चक्क कन्विन्सिंग वाटलेत.

Pages