चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'दम लगा के हैशा' >> काल बघितला... वरच्या सगळया पोस्ट्स ना अनुमोदन! आवडला अगदी..

कोणि बाजी सिनेमा पाहिला आहे का? नसेल तर आवर्जुन पाहु नका.<<<<<+१०० स ह म त.

एक तर तो लहान मुलांसाठी आहे असाच शेवटपर्यंत फील येतो. आणि दुसरा ती खानविलकरांची अमृता फारच बेचव दिसलीय. शिवाय कोकणातील गाव दाखवले आहे तर कोकणात परकर पोलके/शर्ट घातलेली गावकरी मुलगी किंवा अगदीच सुशिक्षित तर साडी किंवा साधा पंजाबी सूट अपेक्षित पण यात म्याडम ने जे काही घातले आहे ते अगदी कोणत्या काळातले व कोणत्या देशातले हेच कळत नाही सेम त्या तळपदेच्या आईच्या बाबतीत. पण सगळ्यात कहर म्हणजे तो विलन झालेला जितेंद्र जोशी काय डेंजर वाटला आहे. मला तोच आवडला. बाकी या भाजीत मीठ कमी आहे त्यामुळे खरच न बघितलेला बरा.

मी पण बाजीबद्दलच लिहायला आलोय Proud

टुकार पटकथा अन संवाद, पुर्वार्धात तळपदेंची ओव्हर अ‍ॅक्टींग, अगम्य ड्रेसकोड असे बरेच मायनस पॉईंट आहेत. पण खरा भाव खाल्लाय जितुने. अगोदरचा शांत पण डोक्यात प्रचंड खळबळ असनारा मार्तंड मला खुप भावला. प्रियदर्शन जाधवला कुणीतरी छोट्या अन मोठ्या पडद्यावरील फरक समजवा. ही मंडळी अजुन फु बाई फु च्या सेटवर वावरतोय अशीच अ‍ॅक्टींग करत असतात.

तो इन्स्पेक्टर नागनाथ मंजुळे आहे का ?

"वढ पाचची...!"

तो इन्स्पेक्टर नागनाथ मंजुळे आहे का ?>>> हो.

तो अजुन फँड्री मधुन बाहेर आलेला नाहि असे वाटले. ड्रेसकोड बद्द्ल न बोललेच बरे. बाजी ने त्याचा ड्रेस कुणाकडुन शिवुन घेतला होता ते शोधले पाहीजे. पहिलि ५ मिनिटे सिनेमा पाहिला आणि पैसे फुकट जाणार हे समजले.

बिग हिरो ६ : मस्त मस्त मस्तच !

धमाल आहे चित्रपट . सगळीच कॅरेक्टर्स आवडली . आणि अ‍ॅनिमेशन तर भन्नाट्च . तो कार चेजचा सीन तर केवळ महान .
बेमॅक्स एक्दम गोडुला आहे Happy .

एन एच १० च्या निमित्ताने ---
या देशाचे भारत आणि इंडीया अशा दोन भागात विभाजन झाले आहे असे म्हणतात . कितपत खरे आहे हे ? असल तर हे अर्धसत्यच . कारण या एकाच देशात अनेक देश वसतात . मुख्य म्हणजे त्यातल्या बहुतेकांना एकमेकाच्या अस्तित्वाची गंधवार्ताही नाही . म्हणजे इथेच मलबार हिल आहे आणि इथेच धारावी आहे . आपण अणुउर्जा पण वापरतो आणि अजूनही आमच्या मराठवाड्यात उर्जेसाठी लोक लाकड जाळतात . अशी कितीतरी उदाहरण . इतकी जीव दडपणारी विविधता असून पण आपण आपल्या वर्तुळातला भाग हाच पूर्ण देश आहे असे मानून चालतो आणि देश कसा असावा /चालावा यावर आपली मत दडपून ठोकून देतो . पण या अनेक टोकावरच्या धृवांमध्ये मोजकी साम्य पण आहेत . एकंदरच बाई ही जमात पुरुषाच्या वर्चस्वाखालीच असावी ही पुरुषी मानसिकता ईशान्य भारताचा अपवाद वगळता सर्वत्र सारखीच .
या पुरुषी मानसिकतेचा फटका या चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा मीरा ला तिच्या ऑफिस मध्ये पण बसतो . चित्रपटात सुरुवातीला एक प्रसंग आहे ज्यात मीरा आपल्या वरिष्ठांसमोर प्रेझेन्टेशन देते . बॉस मंडळी खुश होतात . पण एक पुरुष सहकारी कुजका शेरा मारतो ,"बायकांना आजकाल सगळ सोप झालंय सगळीकडे ." याच अतिसमृद्ध भागात मीरावर एक टोळी चोरीसाठी हल्ला करते . मीराचा नवरा जरी तिच्यावर जीवापाड प्रेम करत असला तरी त्याची पण या पुरुषी मनोवृत्तीतून सुटका नाही . बायकोसमोर थोबाडीत खावी लागली म्हणून त्याचा पुरुषी 'इगो ' दुखावतो आणि बायकोसमोर आपला आत्मसन्मान 'पुनः प्रस्थापित ' करण्यासाठी तो नंतर इतक्या मूर्खासारख्या गोष्टी करतो की त्यामुळे तो स्वतः सोबत बायकोचा जीव पण धोक्यात घालतो . बायकांना दडपणारी पुरुषी व्यवस्था या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे . आपल्याच गोत्रात विवाह केला म्हणून बहिणीला मारून टाकणारा भाऊ आणि एक बाई आपल्यापेक्षा चांगल काम कस करते म्हणून मनात जळणारा कलीग यांच्या कृत्यामध्ये जमीन आसमान चा फरक असला तरी त्याच्या टोकाशी असणारी वृत्ती तीच पुरुषी आहे .
दिग्दर्शक नवदीप सिंगला चित्रपटाच्या विषयाची उधार उसनवारी बाहेरून करायला आवडत . त्याचा 'मनोरमा सिक्स फिट अंडर ' हा चायना टाऊन वरून घेतला होता . एन एच १० चित्रपटातले पण अनेक संदर्भ 'एडन लेक ' मधून घेतले आहेत . पण नवदीप ला एक गोष्ट इतर दिग्दर्शकांपासून वेगळी बनवते . कथेवर जो ते देशी अस्तर चढवतो ते अफलातून असते . 'मनोरमा सिक्स फिट अंडर ' मध्ये पाण्याच सतत दुर्भिक्ष असणाऱ्या आणि रुक्ष राजस्थान मध्ये त्याने जी कथा विणली होती त्याला तोड नाही (ज्यांना trivia आवडतो त्या सगळ्यांसाठी एक मजेशीर माहिती . मनोरमाच्या च्या लेखक मंडळीत एक आश्चर्यकारक आणि उत्सुकता वाढवणारे नाव आहे. दबंग फेम अभिनव कश्यपच ). एन एच १० मध्ये पण त्याने हरियाना मधले geo -socio -political संदर्भ वापरून जी कथा वापरली आहे ती अस्सल इथल्या मातितलिच वाटते .
चित्रपट अर्थातच अनुष्काभोवती फिरतो . तीन काम पण चांगल केल आहे . नील भूपालन हे हुशार कास्टिंग च उदाहरण. असा देखणा चेहरा जो चांगला अभिनय करतो पण चित्रपट निर्मातीचाच राहावा याची पण काळजी घेतो . पण चित्रपट आपल्या खांद्यावर पेलला आहे तो अनुष्का चा पाठलाग करणाऱ्या टोळक्याने. त्या नटांची (थोडा दर्शन कुमार चा अपवाद वगळता ) नाव पण कुणाला माहित नाहीत . पण त्यांनी कामगिरी जबरदस्त बजावली आहे .
ह्या चित्रपटात प्रचंड क्रौर्य आहे अमानुषपणा आहे असा काही लोकांचा आक्षेप . त्यांच्यासाठी पुरोगामी महाराष्ट्रात काही वर्षापूर्वी घडलेली घटना . कोमल हृदयाचे असाल तर वाचू नका . बीड जिल्ह्यात घडलेली ही सत्य घटना . एक परिवार आपल्या कार मधून कुठेतरी बाहेरगावी जात होते . पती पत्नी आणि मुल . रस्त्यात एका धाब्यावर ते जेवायला थांबले . त्याचवेळेस त्या परिसरातला एक नामचीन गुंड पण आपल्या टोळीसोबत तिथेच जेवत होता .त्याने या परिवाराला हेरले . आणि जेवण करून बाहेर पडल्यावर जोडप्याचा पाठलाग केला . एका निर्जन ठिकाणी त्यांना अडवले . पैसा अडका लुटला आणि शस्त्राच्या जोरावर पत्नीला आणि गाडीला आपल्यासोबत घेऊन गेले . तिच्यावर सामुहिक बलात्कार केला आणि तिला निर्वस्त्र करून सोडून दिल . रात्री अपरात्री कुणी मदतीला येण्याची शक्यता नव्हतीच . ती बिचारी तशाच अवस्थेत रस्त्याच्या कडेकडेने निघाली . पुढ लांब गेल्यावर तिकडून चालत येणारा नवरा तिला भेटला . त्या अभागी परिवारावर जे बेतल ते एन एच १० पेक्षा भयंकर आहे असे माझे मत . बाकी चित्रपट हे समाजमनाचा आरसा आहे असे म्हणतात . ते जर खर असेल तर या चित्रपटाने आपल्याला आपलाच सगळ्यात कुरूप चेहरा दाखवला आहे .

दम लगा के हैशा साठि वर सगळ्याना अनुमोदन, अगदी छोटी पटकथा पण सुरेख फुलवलिय, ९०च्या आठवण करुन देणार्‍या अनेक गोष्टी दिसत राहतात, आयुष्यमान आणी भुमीने आपल्या व्यक्तिरेखेला अगदी योग्य न्याय दिलाय...

फिल्मीस्तान बद्दल कुणी लिहिले होते का ? फारशी अपेक्षा न ठेवता सिडी बघायला घेतली आणि एक छान चित्रपट बघितल्याचे समाधान मिळाले.

सिनेसृष्टीत धडपडणारा एक तरुण अपघाताने पाकिस्तानी अतिरेक्यांच्या तावडीत सापडतो. ते त्याला एका घरात जेरबंद करुन ठेवतात. तिथे त्याला त्याच्यासारखाच एक वेडा भेटतो आणि दोघे सुटकेचा प्रयत्न करतात.

या चित्रपटात पाकिस्तानातल्या खेड्यातले गावकरी आणि तथाकथित अतिरेकि यांचे अगदी वास्तव दर्शन झालेय.
कथाभाग कुणाला भाबडा वाटू शकेल पण तेच वास्तव असायची शक्यता जात आहे.

प्रमुख कलाकार ओळखीचे नाहीत ( स्त्री कलाकार तर नाहीतच ) तरीही त्यांचा अभिनय अस्सल आहे. चित्रपटातील लोकांचा भाबडेपणा बघून मनापासून हसू येते. अवश्य बघा.

बाबू बॅण्ड बाजा पाहिला.

हेलावून टाकले. मूवी रडायला लावतोच. शेवटी तर खूप रडले. विदर्भातील जीवन, त्यांची भाषा आहे. अभिनय तर तोडीचा आहे. तो लहान मुलगा व त्याची आई हिचा अभिनय उच्च.
एक गोष्ट आठवेली व त्यातले वाक्य, "एक वेळ बाप मेला तर चालेल पण आई जगावी".

सीटीलाईट्स : असाच एक मस्त वाटलेला मूवी.

'दम लगा के हैशा' >> काल बघितला... खूप खूप आवडला
नक्की बघा. ९० च्या दशकाला रिलेत करत असाल तर बघाच बघा

राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आणि इथे कुणीच कसं लिहिलं नाही? एलिझाबेथ एकादशीला सर्वोकृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार मिळाला. बाकी यादी http://www.loksatta.com/mumbai-news/marathi-five-films-win-national-awar... इथे आहे.

ओत्तल/उत्तल (?) या मल्याळी चित्रपटाला दोन पुरस्कार मिळालेत त्याबद्दल एक इंटरेस्टिंग आर्टिकल http://www.thehindu.com/news/cities/kozhikode/when-a-photo-inspired-a-fi...

रच्याकने, लोकसत्तानं एक नवीनच मराठी भाषा उदयास आणलेली दिसते.

फिल्मीस्तान >> ज्यांचं हिदी सिनेमावर प्रेम आहे त्यांनी जरूरच बघावा... मला आवडला, त्यातले बारीक सारीक रेफरन्ससेस कळल्याने, आणि मुख्य म्हणजे हिंदी सिनेमाच्या बाबतीत मी देखील प्रचंड वेडी असल्यानी सॉलीड रीलेट झाला Happy
शिवाय इजिप्त सारख्या देशात हिंडताना किंवा खेड्यापाड्यातही ' बॉलीवूड' हे एक माध्यम असं आहे, की जे 'आईस ब्रेकर पासून ते लोकांशी ओळख होण्यासाठी ' कसं कामी येतं ते अनुभवलेलं आहे, त्यामुळे फारच जवळचा वाटला सिनेमा Happy

मुंबई-पुणे-मुंबई चा हिन्दी रेमेक बघण्याचा प्रयत्न केला . मुम्बई-देल्ही-मुम्बई

कित्त्ती लाउड आहे Sad

मुंबई-पुणे-मुंबई चा हिन्दी रेमेक बघण्याचा प्रयत्न केला . मुम्बई-देल्ही-मुम्बई

कित्त्ती लाउड आहे >+१
दहा मिनिटांच्या वर नाही पाहू शकले

मुंबई-पुणे-मुंबई चा हिन्दी रेमेक बघण्याचा प्रयत्न केला . मुम्बई-देल्ही-मुम्बई

कित्त्ती लाउड आहे >+१
दहा मिनिटांच्या वर नाही पाहू शकले>>>>>>>

मी पळवत पळवत पूर्ण बघितला Proud

एकतर तो हिरो डोक्यात जातो . पूर्ण वेळ तो रणवीर सिंग ची नक्कल मारल्यासारखा वागतो.
त्याचं कॅरेक्टर ईतक बालिशपणा करत फिरतं - टशन मारत की शेवटी त्याच अचानक मॅच्युअर होणं पटत नाही .
"याचसाठी केला अट्टाहास " ??? असं वाटतं Happy

हिरविण त्यातल्या त्यात बरी वाटते.

स्टीव्हन स्पीलबर्ग आणि ऑप्रा विनफ्रे निर्माते. ओम पुरी आणि जुही चावला कलाकार.. वगैरे बघून मी द १०० फूट जर्नी नावाचा चित्रपट सिडीवर बघितला.. भारताबद्दल किती ते गैरसमज असावेत लोकांचे !!!

सुरवातीलाच एका ( मुंबैच्या ) बाजारात एक माणूस टोपलीत सी-अर्चिन्स ( स्टार फिशसारखा एक जलचर ) घेऊन जात असतो. त्याच्यामागे हातात पैसे घेऊन लोक धावत असतात. अपनी जुही पण त्यात असते. तिचा मुलगा त्या टोपलीतला एक सी-अर्चिन घेतो आणि आत बोट घालून त्यातले मांस खातो. या त्याच्या रसिकतेवर फिदा होऊन तो विक्रेता त्याला ते सगळे सी अर्चिन देऊन टाकतो. पहिला घोळ इथेच. भारतात काय अगदी मुंबईच्या समुद्रात देखील हे सी-अर्चिन मिळत असले तरी भारतात कुठेही ते खाल्ले जात नाहीत ( जगातलेही फारच कमी देशातील लोक ते खातात. )

मग जुही त्याची तिखटजाळ, तर्रीदार करी करते. ढवळता ढवळता चांगली करी करण्यासाठी कुणाचातरी जीव घ्यावा लागतो असा डायलॉक मारते ( हे, राम ! ) मग ती उकळती करी तशीच आपल्या लेकाच्या हातावर देते. तो लेक ती तशीच खातो. पदार्थ चाखायची हि पद्धत भारतातली कुठली स्त्री वापरते म्हणे ?

मग एका निवडणुकीच्या निकालात जुही बाई, तिचा नवरा ओम पुरी , ५ लेकरे मिळवून चालवत असलेल्या एका हॉटेलला आग लावली जाते. त्यात जुहीचा अंत होतो. तिचे नाव अखिया (?) असते ते आपल्याला ती गेल्यावरच
कळते.

मग चित्रपट थेट फ्रांस मधे.
पण त्यापुर्वी हसन कदम ( हो कदम ) आणि फॅमिलीला यू.के. मधे राजाश्रय मिळालेला असतो. पण दोन कारणांसाठी त्यांना यू.के. आवडत नाही. एक म्हणजे यू केतल्या भाजीपाल्यात " जीव " नसतो आणि दुसरे म्हणजे त्यांचा स्टॉल अगदी हिथ्रो विमानतळाच्या इतका जवळ असतो कि वरून विमान गेले कि यांचा स्टॉल कोलमडतो. हे चक्क सिनेमात दाखवलेय, आता त्या विमानतळावर महिन्यातून एखाद दुसरेच विमान उतरत असेल नै.

मग ते फ्रांसमधे जातात आणि त्यांच्या खटारा गाडीचे ब्रेक फेल होतात. तर त्यांना एक सुंदर फ्रेंच तरुणी मदत करते आणि घरात आसरा देते. तिला चक्क इंग्रजी येत असते. ती त्यांना घरचेच पदार्थ खाऊ घालते. इथे ओम पुरीच्या तोंडी एक भन्नाट डायलॉग आहे. ( आम्हाला वाटतय आम्ही सगळे अपघातात मेलोय आणि आता स्वर्गात जेवतोय. )

त्या गावातले एक बंद पडलेले हॉटेल तो विकत घेतो. पण त्याच्या समोरच ( म्हणजे १०० फूटावर बरं ) एक फ्रेंच बाई एक हॉटेल चालवत असते. मग तिच्याशी स्पर्धा. त्यांना भेटलेली मुलगी त्याच हॉटेलात उमेदवारी करत असते.
त्या बाईला मिशिलीन स्टार हवे असतात. ते हसनला हॉटेलमधे घेतले तरच मिळणार असतात.

मग ती एक रात्र ओम पुरीच्या घराबाहेर आमरण ( हो असा डायलॉग आहे सिनेमात ) सत्याग्रहाला बसते. मग हसन तिच्याकडे उमेदवारी करायला जातो ( हसन म्हणजे ओम पुरीचा मुलगा हो ) मग तिकडे ती मुलगी कामाला असल्याने तिच्याशी स्पर्धा.... खरोखरीच कथा हवी तशी भरकटवलीय.

एकमेव चांगली गोष्ट म्हणजे उत्तम चित्रीकरण. ते फ्रेंच गाव आणि फ्रेंच क्यूझीन चे चित्रण अप्रतिम आहे. दोन्ही फ्रेंच अभिनेत्रींचा हेलन मिरें आणि शार्लोत ले बाँ चा अभिनय सुरेख आहे. जुही काही सेकंदच पदद्यावर आहे आणि तिचा मेकपही जमलेला नाही. ओम पुरी ने स्वतःला अजिबात मेंटेन केलेले नाही. चक्क ढेरपोट्या झाल्याचे जाणवते. चेहराही आता पुर्वीसारखा बोलका राहिलेला नाही. हसन च्या भुमेमिकेतला मनीष दयाल ठिकठाक.

हाहाहा दिनेशदा, फार आवडलं परीक्षण! हा पिक्चर आला तेव्हा बघायचा होता कारण एक, त्या दिग्दर्शकाचा (Lasse Hallstrom) आधीचा सिनेमा खूप आवडला होता (chocolat) आणि दोन, बडे नाम (ओम पुरी, स्टीव्हन स्पीलबर्ग, ओप्रा वगैरे) . पण तुमची निरीक्षणे अचूक आहेत!

chocolat >> +१०००

दिनेशदा चांगला रिव्ह्यू Happy ह्या सिनेमाचे मिक्स्ड रिव्यूज आधी वाचले होते त्यामुळे पाहिला नव्हता, आता अजिबातच नाही बघणार Happy

chocolat >> +१०००००००००००००००
मुळात डेप आवडता सो बघीतला होता पण मुव्ही खरच मस्त आहे..

काल सिल्व्हर लाईनींग्स प्लेबुक पाहिला .. ऑसम मुव्ही ..
खतरनाक अभिनय लॉरेन्स आणि कुपर चा .. काय क्लास इमोशन्स टाकलेयत त्यात .. तू येडा आणि हि आणखीनच पागल Lol .. फस्ट हाफ मधे जाम हसायला आल पण सेकन्ड हाफ मधे ती केमिस्ट्री इतकी सही होत जाते कि क्या केहेना .. दोघांचेही चेहरे काय बोलले आहेत .. सुपर्ब .. स्टोरी नै सांगणार इथ .. तुम्ही लोकांनी माईट बी पाहिलाच असणार पण जर नसेल पाहिला तर मी स्ट्राँगली रिकमेन्ड करेल ..
You might fall in love with those stupid's love story Blush

तो १०० फूट जर्नी मी एका फ्लाईटमध्ये झोपत झोपत चिकाटीने पाहिला होता. हेलन मिरेनचं काम नेहमीप्रमाणे चांगलं आहे. पण बाकी चित्रपट अतर्क्य आहे. मला त्या फ्लाईटमध्ये फार पर्यायच नव्हते पण अदरवाईझ आवर्जून बघण्यासारखं काही नाही!

Pages