चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवाजुद्दीन आणि इर्फान दोघांनाही यश थोडे उशीरा मिळाले पण जेव्हा ते मिळाले तेव्हा धडाक्याने मिळाले. त्यांच्या गुणांना यश मिळाले.

नुकताच लंचबॉक्स पाहिला, त्यात नंतर नंतर तर मी इर्फानला सोडुन नवाजुद्दीनलाच पाहु लागले. कायम हसरा चेहरा ठेवुन वावरणारे कॅरेक्टर पण तरीही त्यामागची वेदना अजिबात बोलुन न दाखवताही आपल्या लक्षात येते. लंच टेबलवर फक्त दोन फळे घेऊन येणारा आणि इर्फान कधी आपल्याला आग्रह करतोय डब्बा खाय्ची याची वाट पहणारा... एका दृश्यात तो स्वतःच्या आईचा उल्लेख करतो तेव्हा इर्फान त्याला तु तर अनाथ, आई कुठून काढलीस विचारतो. तेव्हा हसत हसतच तो उत्तर देतो पण तो हसरा चेहराही इतका पिळवटलेला असतो की बघवत नाही.

नीना गुप्ता ही इतकी हुशार अभिनेत्री असून तिला नेहमी साईड रोल्सच का मिळाले. दिसायला सुंदर, हिन्दी भाषेवर प्रभुत्व, उत्तम फिगर, तरीही ती मागे का राहिली? मला नीना गुप्ता प्रचंड आवडते.

दम लगा के हैशा एकदा बघण्याजोगा आहे. साधी कथा आहे पण रंजक आहे. (थोडा मेलोड्रामा आहे पण मला तो आवडतो Happy )

बी, नीना गुप्ता ह्यांनी प्रॉडुस केलेली व स्वतः महत्वाचा रोल केलेली सीरीअल सांस म्हणून आहे. त्यात त्यांचा रोल फार छान आहे. सर्व भाग यूट्यूब वर आहेत. मालिका आता जरा जुनी वाट्ते पण बघितली नसली तर आव्डेल कदाचित. त्यांची मुलगी चांगली डिझायनर आहे तिचे आता लग्न आहे नोव्हेंबरात.

उत्सव, व मट्टी मनुषुलु मध्ये नीना ने छान काम केले आहे.

अमा, दर्द ही पण नीनाची मालिका आहे. ७५ भाग आहेत पैकी ६८ तूनळीवर आहेत.

सांस पाहिली आहे.

उत्सव, रेखाचा का?
मट्टी मनुषुलु >> हाही नाही पाहिला.

दम लगाके ...........असाच एका मराठी सिनेमा आला होता. मकरंद अनासपुरे आणि हिरोइन????? नाही आठवत. मकरंदच्या वडिलांनी त्याचे लग्न लहानपणीच त्यांच्या मित्राच्या मुलीबरोबर ठरवले असते. मकरंदला त्याच्या ऑफिसातील मुलीबरोबर लग्न करायचे असते. पण त्याची आई जबरदस्तीने आपल्या नवर्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी गावी जावून मकरंदचे लग्न ठरल्याप्रमाणे गावच्या मुलीशी लावून देते. आणि ती मुलगी म्हणजे हिरोइन अक्षरश: इतकी जाडी असते कि तिच्यामुळे ज्या गमती जमती होतात वैगरे वैगरे.

दम लगाके ...........असाच एका मराठी सिनेमा आला होता. मकरंद अनासपुरे आणि हिरोइन????? नाही आठवत. >>>> फिल्म अगडबंब

इथे कुणी शबाना आझमीचा लिबास हा सिनेमा पाहिलेला आहे का?>>> प्लीज प्लीज कोणी पाहीला असेल तर रिव्ह्युज द्या. मलाही बघायचाय हा सिनेमा.

उत्सव रेखाचाच. त्यात नीना ही चोराची प्रेयसी आहे. कमालीची बारीक व ग्लॅमरस दिसते.
मट्टी मनुषुलु मध्ये मोइन अली बेग हीरो आहे त्याचा भाउ माझा कलीग होता म्हणून मला माहीत. तेलुगु सिनेमा आहे. एका कन्स्ट्रक्षन साइट वरील मजुराची कथा आहे.

नीना गुप्ता ठिकठाक अभिनेत्री होती पण ती हिरोईन मटेरिअल नव्हती. अर्थात हिरोईन मटेरिअल नसलेल्या ब-याच जणी हिरोईन म्हणुन चमकल्यात पडद्यावर पण त्यासाठी डोक्यावर मजबुत वरदहस्त असावा लागतो, तसा हिच्या नसेल म्हणुन हिरॉईन म्हणुन एखादाही चान्स मिळाला नसेल.

दम लगा के हैशा' चित्रपट बनवताना आणि प्रदर्शित करताना यशराज फिल्म्सने यापूर्वी कधीही न केलेले काही प्रयोग केले आहेत. नेहमी यशराजचे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी जे प्रमोशनल ब्लीत्झक्रिग राबवल जात ते हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी राबवल गेल नाही.चित्रपटाच प्रमोशन प्रदर्शनाच्या केवळ तीन आठवडे अगोदर सुरु झालं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नायक आणि नायिकेच्या व्यक्तिरेखेचेचे अनेक साचे जे यशराजच्याच यापूर्वीच्या सिनेमांमुळे तयार झाले आहेत ते या सिनेमात दिग्दर्शक शरत कटारिया याने मोडले आहेत.म्हणजे इथला नायक चक दे च्या कबीर खान प्रमाणे किंवा धूम सिरीज मधल्या हिरो प्रमाणे लार्जर दॅन लाईफ नाही ,तर घडी घडी अश्रू गाळणारा , दहावी नापास आणि कधी कधी तापट वडिलांच्या हाताने चपलेचा मार खाणारा आहे . इथली नायिका ही शिफोनची साडी घालून स्वित्झर्लंडच्या बर्फात नाचणारी कुणी शेलाटी सुंदरी नाही तर चक्क ८५ किलो वजनाची आणि गोलगरगरीत आहे .

दम लगा के हैशाच कथानक नव्वदच्या दशकात घडतं .हे दशक सामाजिक आणि राजकीय बदलांसाठी ओळखल जात.चित्रपटाच्या कथानकासाठी हा काळ दिग्दर्शकाने खुबीने निवडला आहे .जागतिकीकरण दाराशी येउन ठेपल आहे . दूरदर्शन जाऊन नुकतच केबल टीवीच आगमन झाल आहे. टेपची जागा आता सीडी प्लेयर घ्यायला लागले आहेत .हे बदल नुसतेच समाजजीवनात होत नाहीयेत तर ते प्रेम (आयुषमान खुराणा) आणि संध्या (भूमी पेडणेकर ) यांच्या पण आयुष्यात घडत आहेत .नायकाला आपल्या आयुष्यात हा बदल नकोय . त्याचे तापट वडील (संजय मिश्रा ) मुलाच्या आवडीनिवडीपेक्षा परिवाराचे आर्थिक हितसंबंध लक्षात घेऊन जोर जबरदस्ती करून जाडजूड नायिकेशी त्याच लग्न जुळवतात . वडिलांना विरोध करण्याची धमक नसल्याने नायक मनाविरुद्ध लग्न केल तरी बायकोपासून उखडून राहायला लागतो .बिचारी नायिका आपल्या परीने नायकाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करते पण त्या मोबदल्यात तिला फ़क़्त अपमान आणि मानहानी मिळते .एका दिवशी या धुसफुसीचा स्फोट होतो आणि पाळी घटस्फोटापर्यंत येते . दरम्यानच्या काळात म्युझिक सीडीचे आगमन झाल्यामुळे नायकाच्या परिवाराचा ध्वनिफितीचा पारंपारिक धंदा बसण्याच्या मार्गावर आहे . नायकाचा प्रतिस्पर्धी कम मित्र कम शेजारी जो आपल्या सुंदर बायकोवरून नायकाला सतत टोमणे मारत असतो तोच हा सीडीचा धंदा चालू करत आहे .एकदा अशीच बोलाचाली होते आणि तो मित्र नायकाला त्यांच्या शहरात होणारी पारंपारिक दम लगा के हैशा शर्यत जिंकून दाखवण्याचे आव्हान देतो . नायक शर्यत जिंकला तर आपला धंदा बंद करू अस आमिष पण नायकाला आणि त्याच्या परिवाराला दाखवतो (इथे लगान मधला उद्दाम ब्रिटीश अधिकारी भुवनला क्रिकेट सामन्याचे आवाहन देतो तो प्रसंग प्रकर्षाने आठवतो ). दम लगा के हैशा म्हणजे आपल्या बायकोला पाठीवर घेऊन अडथळ्यांची शर्यत धावण्याची स्पर्धा . आता नायकांच वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्य पणाला लागल आहे आणि त्याच्या बायकोची मदत घेतल्याशिवाय तो यातून बाहेर पडू शकणार नाही हे उघड आहे . दरम्यान कोर्ट असा निकाल देत की सहा महिने या दोघांनी एकत्र रहाव मगच कोर्ट घटस्फोट मंजूर करण्याबद्दल निर्णय घेईल . जुलुमाचा रामराम म्हणून दोघेही पुन्हा एकत्र राहायला लागतात . नायक दम लगा के हैशा शर्यत जिंकतो का ? नायक आणि नायिका घटस्फोट घेतात की एकत्र येतात ? नेहमी शर्यत जिंकणच महत्वाच असत का कधी कधी फ़क़्त भाग घेण महत्वाच असत ? या प्रश्नांची सुंदरपणे उलगडलेली उत्तर पडद्यावर पाहण्यात मजा येते .

हा चित्रपट दोन प्रकारच्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून तयार केला आहे . पहिला म्हणजे अरेंज मॅरेज झालेला वर्ग जो की उघडच आपल्या देशात बहुसंख्य आहे . आपल्याला मनाप्रमाणे जोडीदार मिळाला नाही अशी ठुसठुस कुठेतरी त्यांच्या मनात असते .लग्नानंतर एक खोली शेयर करणाऱ्या 'त्या' अनोळखी माणसासोबत जुळवून घेण्यात त्यांचा बराच वेळ खर्च झालेला असतो . त्याला या चित्रपटातल्या नायक आणि नायिकेत आपल प्रतिबिंब दिसु शकत . दुसरा प्रकार म्हणजे नॉस्टाल्जियामध्ये रमायला आवडणारे लोकं . ज्यांच्या जन्माचा आणि जडणघडणीचा काळ नव्वदच्या दशकातला आहे त्यांच्यासाठी या चित्रपटात नॉस्टाल्जियाची बहार आहे . कुमार शानूचा आवाज , झुकवल्याशिवाय चालू न होणारी बजाज स्कूटर ,चुन्याचा गिलावा दिलेल्या आणि पोपडे उडालेल्या घराच्या भिंती, ती अतिप्राचीन फोनची डबडी आणि कितीतरी .अतिशय झपाट्याने भोवंडून टाकणारे बदल पाहिलेल्या आणि त्यामुळे पंचविशी आणि तिशीतच नॉस्टाल्जिया आलेल्या पिढीला हा चित्रपट या संदर्भामुळे नक्की आवडेल.

चित्रपटभर नर्म विनोदाची पखरण आहे . नायकाच्या वडिलांचे चुरचुरीत संवाद जाम मजा आणतात . मध्यंतरानंतर चित्रपट थोडा गंभीर वळण घेतो . पण तोपर्यंत प्रेक्षकाला मानसिकदृष्ट्या जोडून घेण्यात चित्रपटाने यश मिळवले असते .

आयुषमान खुराणाने भारीभरक्कम भूमी पेडणेकरच ओझ चित्रपटात वाहून नेल आहेच पण आपल्या संयत संवेदनशील अभिनयाने चित्रपटपण आपल्या खांद्यावर वाहून नेला आहे . नायिकेच्या रोलमध्ये असणाऱ्या भूमी पेडणेकरचा हा पहिला चित्रपट आहे आणि तिला अभिनयाची कसलीही पार्श्वभूमी नाही हे पटतच नाही (यापूर्वी ती यशराजमध्येच विपणन शाखेत काम करायची). आपल्या पराभूत पण मनाने नितळ नवऱ्याबद्दल तिला जे प्रेम वाटत ते तिन अतिशय अप्रतिमपणे दाखवल आहे . 'आंखो देखी' मध्ये लक्ष वेधून घेणाऱ्या संजय मिश्राने इथे पण आपल्या भूमिकेच चिज केल आहे .सर्वच सहाय्यक कलाकारांनी आपली काम चोख बजावली आहेत . अजून एक महत्वाच म्हणजे या चित्रपटातून संगीतदिग्दर्शक अनु मलिक आणि गायक कुमार सानूच पुनरागमन झाल आहे . सानू तर काहीकाळ पडद्यावर दर्शनपण देऊन जातो . मनु आनंद या गुणवान छायाचित्रकाराने नव्वदच्या दशकातल उत्तर भारतीय शहर अप्रतिमपणे टिपलं आहे .चित्रपट उत्तरार्धात थोडा संथ वाटतो .चित्रपटाची लांबी किंचित कमी असती तर चित्रपट अजून परिणामकारक झाला असता.दिग्दर्शक शरत कटारिया हा पूर्वी सातत्याने वेगळे चित्रपट देणाऱ्या रजित कपूर (आंखो देखी,मिथ्या) चा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायचा.त्याची छाप त्याच्या कामावर दिसते . गेल्या काही वर्षात आलेला यशराजचा हा सर्वोत्तम चित्रपट आहे .दावत- ऐ -इश्क ,किल दिल ,बेवकुफिया या आपटलेल्या चित्रपटानंतर यशराज 'दम लगा के हैशा' मुळे पुन्हा रुळावर येईल असे वाटते .आपल्या जोडीदाराबरोबर (अरेंज मॅरेजवाले असाल तर दुधात साखर )जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की हा चित्रपट पहा .

पाहायला हवा ' दम लगाके हैशा'
मी काल हसी तो फसी पाहिला.इतके दिवस हे काम, ते काम, वेळ नाही... अस करत करत बरेच पिक्चर वेंटीग मधे पडले होते.त्यातलाच हा एक.
पुर्ण चित्रपट फक्त परिणीती साठी आहे.मस्त काम केलय तिने.स्वतःच्याच बहिणीला लग्नासाठी नकार दे आनि माझ्याशी लग्न कर म्हणनारी मिता भारीच.( इथे लगेच आमिर आनि असीन चा प्रपोज चा सीन आठवला गजनी मधला.. का कोणास ठाऊक Uhoh बस मुळे बहुधा )
शेवटी उलट्या करुन गोळ्या बाहेर काढणारी... हमसुन हमसुन रडणारी.. आनि परत स्वतःच्ज्या प्रेमाला मिळवण्यासाठी जोरात पळणारी मिता छानच.

पुर्ण चित्रपट फक्त परिणीती साठी आहे >>> +१

तिची बहीण सेल नंबर मागते तेव्हा एकामागून एक वेगवेगळे नंबर देते तो सीन कसला भारी केलाय तिनं.

धन्यवाद. मी मराठि लाइव या वर्त्मान्पत्रात हे लिखाण १ मार्च ला प्रकाशित झाले आहे हा उल्लेख कराय्चे राहुन गेले

शेवटी एकदाचा निवांत वेळ काढुन 'ए. एकादशी' पाहिला. सिनेमाने किती सुंदर असावं ते यात कळते.

++++++ कोणी पाहिला नसेल तर खालचे वाचु नका ++++++
सिनेमा पाहिल्यावर मगच इथे मागे जाऊन २०-२१ पानावर चर्चा झाली ती वाचली. सर्वांनी मस्त लिहिले आहे व तुम्ही उल्लेखलेले प्रसंग सुरेख तर आहेतच, त्यात अजुन भर म्हणजे, पहिल्या प्रसंगात मुलांची आई सोलापुरला जायला निघते तेव्हा देवाला नमस्कार करताना झेंडु हसत तिच्याकडे पहात उभी असते. आई गावाला जायची खुषी तिच्या हसण्यात नुसती निथळत असते. किती गोड!!
दुसरा प्रसंग, 'बांगड्याचे ३००० दे व मगच मुलाला घेऊन जा' सांगितल्यावर त्याची आई न बोलता जाते व घरातले होते नव्हते ते पैसे घेऊन येते, देते व त्याला फरफटत घरी घेऊन जाते तो सर्वच प्रसंग कमीतकमी संवादात आपल्याला जास्तीतजास्त भिती कशी वाटेल असाच बनवला आहे. कुठेही ताणला नाही तो प्रसंग.
(कन्येला दामटुन पहायला बसवले. ती उठुन गेली नाही व तिला समजला व आवडला ही अजुन एक भर)

अजुन २-३ दा पाहुन होईलच.

बावरा मन, छान लिहिलं आहे 'दम लगा के हैशा' बद्दल. खरोखर सुंदर सिनेमा आहे. कुमार सानु, नॉस्टेल्जिया बद्दल अगदी अगदी. आयुषमान फारच प्रॉमिसिंग आहे. त्याने नाईन्टीज मधल्या डान्सस्टेप्स घेत केलेलं शेवटचं गाणं मस्तच. नवरा बायकोच्या भांडणानंतर कुमारसानुची गाणी लावायची स्पर्धा आणि आदळआपट, त्यावेळी इतरांनी दोघांकडे बघत राहणं, शिवाय त्यावेळी उप्योगात आलेलं घराचं नेपथ्य, रचना आणि वातावरण- हा सीन सही जमून आलेला आहे. Happy संजय मिश्राचा कॅमेरा सेन्स जबरी आहे..

एलिझाबेथ एकादशीसारखाच, अतिशय चिमुटभर आशय मनोरंजनाच्या आणि समज-उमज-अभिरूचीच्या उच्च पातळीवर कसा नेऊन ठेवता येतो- त्याचं 'दम लगाके..' उत्तम उदाहरण..

ए एकादशी निरागस सिनेमा आहे.
झेन्डु भारीय. क्युट.
शंभरात ४८ मार्क म्हणते ते हि फुल्ल कॉन्फिडन्स मध्ये. Happy

एन एच १० बटबटीत वाटला. दिप्ती नवल एकदम अमेझिंग आहे! कुणी फुकट दाखवला तर जरूर बघा.

इथल्या पोस्ट्स वाचून 'दम लगा के हैशा' पाहायचं ठरवलं होतं .काल योग आला पाहायचा..छान वाटला चित्रपट. सगळ्याच कलाकारांचा अप्रतिम अभिनय , त्यांची भाषा, हरिद्वारच वातावरण सगळं छान जमून आलयं . शेवटचं गाणं धमाल आहे . गोविंदाचं एखादं जुनं गाणं पाहतो आहोत असं वाटतं

Pages