चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल रंगरसिया पाहिला. बर्‍याच दिवसांपासुन पाहायचा होता पण काल वेळ मिळाला. रणजित देसाईंच्या राजा रवि वर्मा कादंबरीवर आधारलेला आहे. मूळ कादंबरी वाचली नव्हती त्यामुळे तुलना करता आली नाही. पण सिनेमा बरा आहे. थोडी फार माहिती मिळाली त्या चित्रकाराविषयी.

काल बेबी पाहिला. मस्त पिक्चर. नीरज पांडेला असले थ्रिलर सही जमतात. मला सर्वात जास्त आवडलं ते प्लान आयत्यावेळी भलतंच रूप धारण करत जाणं. नेपाळच्या हॉटेलमध्येही आणि सौदीमधलंही. हॉलीवूड स्टाईलनं ज्य त्या देशाचं नाव घेऊन आणि जो काय प्रॉब्लेम आहे त्याभोवती गोल गोल न फिरता सरळपणे केलेलं भाष्य उलट जास्त आवडलं.

सर्वच अभिनेत्यांची कामं आवडली तरी तापसी पन्नू आणि अक्षय कुमार विशेष आवडले. पण तो पाकिस्तानी अभिनेता कसला सही काम करतो. संवाद नेमके आणि अचूक. त्यातही प्लस ९२ घुमाओ वगैरे संवाद भारी आहेत.

शेवटचा अर्धा तास बघताना "मेले आता बॉलीवूड स्टाईल मारामारी चालू करतात की काय. आता विमानामागून पळतात की काय." असल्या भितीमध्येच पाहिला. पण क्लायमॅक्ससाठी नीरजला शंभरपैकी एकशेदहा मार्क्स!!

बेबी पाहिला. आवडला . पण मला जरा वेळखाउ वाटला . आता त्यांचा प्लॅन फ्सतोय का? अस वाटत रहाते. आणि उत्कंठा वाढते पण तरीही ...

पहिला डीएलएफ मॉल्चा सीन किन्वा शेवटचा हॉस्पिटलमधून निघायाचा सीन .. काहीकाही वेळा जाम ताणल्यासारखं वाटलं .
काही सीन फार क्लिशे वाटले - आयत्यावेळी पेशंट ला जाग येणं , त्यातून होणारा हल्ला , बाथरूमचा सीन .

अक्शय कुमार जामच आवडला . उगाचच त्याला फार डॅशिंग हिरो वगैरे दाखवला नाही . त्याच्या वयाप्रमाणॅ दिसतो .
तापसी पन्नु आवडली . खूप छान दिसते. सुशांत सिंग बरोबरचे सीन्स मस्त आहेत तिचे .

मौलाना आणि अश्फाक भन्नाट . केके , अनुपम खेर , राणा वाया .

इकडे शमिताभ म्हणत आहेत लोक्स अ‍ॅज इन शेमिन्ग ऑफ धनुष फॉर युजिन्ग अमिताभ्ज व्हॉइस.
पण पीळ आहे ना पिक्चर.

बर्याच दिवस किंवा महिन्यात सर्वात आवडलेला चित्रपट 'बेबी'. मस्ट वॉच! नीरज पांडे, अक्षय आणि टीमचे अभिनंदन! गतिमान चित्रपट, दहशतवादावर प्रसंगी थेट भाष्य, थ्रिलर दृश्ये (तापसी पन्नू आणि सुशांतची फाईट) अधून मधून विनोदाची झालर (अक्षय आणि मंत्र्याचा पीएचा सीन),अरेबियातील शेवटचा थरार .मजा आ गया!

आम्हाला काल शामिताभची टीकीटं मिळाली नाहीत म्हणून बेबी पहावा लागला. चेन्नईत तरी धनुषच्या नावाचा मस्त फायदा उठवलाय पिक्चरने.

काल टिव्हीवर Emperor पाहिला. अप्रतिम सिनेमा. पहिल्या महायुध्दात जपानवर टाकलेल्या अणुबाँबनंतर जपान-अमेरीकेमध्ये खेळलं गेलेलं सटल राजकीय युद्ध आहे यात. पर्ल हार्बरवर जपानने केलेल्या हल्ल्याला कोण जबाबदार? तत्कालिन पंतप्रधान टोजो की जपानी सम्राट हिरोहितो? वॉशिंग्टनला हिरोहितो दोषी हवाय पण जपानमध्ये याच कामासाठी ठाण मांडून बसलेल्या जनरल मॅकआर्थरला जपानमधील परिस्थितीची जाणीव आहे.

त्याचा दुसरा एक सहकारी जनरल फेलर याचं एका जपानी मुलीवर कॉलेजमध्ये असताना प्रेम असतं पण ती जपानला परत येते आणि आता या युद्धात मारली गेली आहे. फेलर वैयक्तिक पातळीवर तिचा शोध घेत असतो, त्याच वेळी जपानी संस्कृतीची ओळख असल्याने मॅकआर्थर त्याच्यावर हिरोहितो कितपत दोषी आहे हे शोधून काढण्याची कामगिरी सोपवतो.

एकीकडे कर्तव्याची जाणीव, दुसरीकडे वैयक्तिक भावनांतून जपलेलं जपानी संस्कृतीचं प्रेम आणि तिसरीकडे हिरोहितोला दोषी ठरवल्यास जपानमध्ये होणार्‍या अराजकाची कल्पना असल्या तिठ्यातून तो वाट काढत असतो.

या त्याच्या शोधात अनेक मानवी वृत्ती, जपानी संस्कृती, व्यक्तीपेक्षाही उच्च ठरणारी डिवोशन, जपानी मानसिकता आणि अमेरिकन मानसिकता हे सगळे पैलू अतिशय सुरेख समोर येतात. सर्वात शेवटी तर ज्याला देवाप्रमाणे वागवले जाते, ज्याचा आवाजही सामान्य माणूस ऐकू शकत नाही असे सम्राट आपल्या देशाला वाचवण्यासाठी शेवटचा प्रयत्न म्हणून जनरल मॅकआर्थरला भेटायला येतात. सगळे शिष्टाचार बाजूला टाकून एखाद्या सामान्य माणसासारखे भेटतात हा प्रसंग अतिशय मस्त रंगला आहे.

चित्रपटच्या शेवटी काही खरी छायाचित्रं दाखवतात तेव्हा मॅकआर्थर आणि हिरोहितोचं छायाचित्रं सिनेमात एकदम हुबेहुब घेतलं आहे.

बघण्याचा प्रयत्न केला .
जाम डिप्रेसिन्ग वाटला आणि कन्फुजिन्ग.

कदाचित डोक शान्त ठेउन पाहीला तर कळेल्ही .
पण झोपाळू डोळ्याचा रणविर कपूर आणखी डिप्रेसिन्ग वाटतो .

फाइंडींग फॅनी, सिडीवर बघितला. इथली चर्चा वाचून ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या त्या नक्कीच पूर्ण झाल्या. मूळात एक चित्रपण म्हणण्यापेक्षा खरेच एखादी रोडट्रीप बघतोय असे वाटले. दिपिका फ्र्श दिसली. डिंपलला अशी भुमिका यापुर्वी क्वचितच मिळाली असेल.

रात्रीची दृष्ये पण फार छान चित्रीत झाली आहेत. जसे डोळ्यांना दिसेल तसे चित्रीत झाल्यासारखे वाटले.

पण मला खटकलेले काही.

१) रोझी आणि अँजीचा चरितार्थ कसा चालतो ते कळत नाही. रोझी केवळ सोशल वर्क करते, त्यातून काय उत्पन्न मिळणार ?

२) मी हिंदी व्हर्जन बघितले. त्यात मूळ कलाकारांचेच आवाज आहेत, पण ते मूळ इंग्लिश फिल्मचे डबिंग आहे. अजिबात लिप मूव्हमेंट्स जूळत नाहीत. असे का ?

३) माहि वे, गाण्याबद्दल इथे अनेकांनी लिहिले होतेच. मला इतर संवादातली भाषाही पटली नाही. गोवन वळणाचे हिंदी संवाद लिहिता आले असते. आजकाल जिथे कथानक घडतेय, तिथली भाषा वापरायचे प्रयत्न क्वचित दिसतात.
( गंगा जमुना, लगान, गँग्ज ऑफ वासेपूर..... )

४) कंटीन्यूटीचे इश्ञुज आहेत.. फ्रेडी पेट्रोल आणायला पांढरा कॅन नेतो आणि निळ्या कॅनमधून आणतो. पेड्रोच्या कपाळावरच्या जखमेची जागा बदलते.

५) गोवन भाषेतले संवाद, चोरट्या आवाजात डब झालेत. गोव्यातला टोनही पकडता आलेला नाही.

६) यात दिसलेत त्यापेक्षा गोव्यात अनेक सुंदर रस्ते आहेत, त्यामूळे त्याबाबतीत मी असमाधानी.

७) कोंबडी बाहेर कापल्यावर , पिसे काढायला घरी का नेते ?

८) मांजरीला दूधात बुचकळन्याइतका, दूधाचा महापूर गोव्यात कधी होता ? ? गोव्यातल्या मांजरी पण मासेखाऊच आहेत.

९) मांजर मेल्यावर दुर्गंधी येत नाही का ?

१०) लग्नातला बुके, वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळतात ?

असो, , क्षुल्लक बाबी आहेत या !

आपलीमराठी वर हॅपी जर्नी आणि क्लासमेट्स हे दोन चित्रपट पाहीले. दोन्ही चित्रपटांचे प्रोमोज आधी पाहताना वाटलं होत की हॅपी जर्नी छान हलकीफुलकी कथा असेल आणि क्लासमेट्स दुनियादारी सारखा असेल. पण दोन्ही अंदाज चुकले .
हॅपी जर्नी फारच संथ वाटला आणि कथेत काहीच नाविन्य नव्हतं, ओढून ताणून विनोद असलेले काही प्रसंग फारच कंटाळवाणे आहेत.
क्लासमेट्स मधली बरीच मंडळी कॉलेजवयीन वाटत नसूनही चित्रपट ठीक वाटला . कॉलेज मधले ग्रुप्स, इलेक्शन त्या पार्श्वभूमी वरची स्टोरी आणि त्याला रहस्याचा प्लॉट ..एकंदर चांगला वाटला.

अर्जुन कपूर आणि दिपिका कुठल्याही प्रकारे गोवन कॅथलिक वाटत नाहीत असे नाही वाटले का तुम्हाला?
नुसतं 'व्हॉट, मॅन्न!' असं केलं की गोवन कॅथलिक टोन आला असा जो काय हिंदी सिनेमांचा गैरसमज आहे त्याला तोड नाही.

अधूनमधून फॅनी म्हणून अंजली पाटील दिसते. तिचे काम फार सुंदर वाटले. शेवटी ती फॅनीची मुलगी म्हणून दिसते. तो सीन तिने मस्त केलाय.

क्लासमेट्स मलाही आवडला. छोटी भुमिका असुनही अनी चे काम आवडले. गोड आहे तो मुलगा. अग्निहोत्रमधे पण त्याचेच काम आवडले होते जास्त, महादेव काका व विनय आपटे च्या मागोमाग.

झेंडामध्येही होता ना!

त्या पात्राचा इनोसन्स छान जपलाय त्याने Happy

पण क्लासमेट्समध्ये सोकु ला पाहावत नाही, क्लोज अप शॉटवेळी कसली भयाण दिसते.

पण क्लासमेट्समध्ये सोकु ला पाहावत नाही, क्लोज अप शॉटवेळी कसली भयाण दिसते.>>> सहमत , अगदी भयाण वैगरे नाही पण नटर,न्ग मधे ती सुरेख दिसली होती.
अन्कुश चौधरी ला अगदी दुनियादारी टाइप चाच रोल केलाय. दुनियादारी शी साम्य जाण्वत राहत.. सस्पेन्स चान्गला राखलाय.
गाण एकही लक्षात राहत नाही..

नुसतं 'व्हॉट, मॅन्न!' असं केलं की गोवन कॅथलिक टोन आला असा जो काय हिंदी सिनेमांचा गैरसमज आहे त्याला तोड नाही.<<<< शॉर्ट स्कर्ट हवेतच की सोबत. शिवाय बाप्याच्या हातात दारूची बाटली मस्ट. Happy

अग्निहोत्रमधे पण त्याचेच काम आवडले होते जास्त, महादेव काका व विनय आपटे च्या मागोमाग. >> +१
हो त्याचं अग्निहोत्र मधे काम छान होतं .सिद्धार्थ चांदेकर नाव आहे त्याचं

मला आवड्ला क्लासमेट्स..
सस्पेन्स चान्गला राखलाय..१+

नीधप,
उत्सुकता म्हणून विचारतोय.. कुठलाही कलाकार निवडला तर त्याला योग्य तो पेहराव, हेअर स्टाईल देऊन प्रादेशिक लूक देणे अगदीच अशक्य होते का ?

का त्या कलाकारांचाच हट्ट असेल आम्हाला आमचा लूक हाच राहील म्हणून ?

दिनेश, तो कलाकार कित्ती मोठ्ठा स्टार आहे यावर हे अवलंबुन राहिन ना? आणि जितका मोठ्ठा स्टार, तितकी त्याची इमेज मोठी, आणि तितके त्याला त्या इमेजमधुन बाहेर येणे कठिण..

चक दे मध्ये शाहरुख शाहरुख वाटत नाही तर त्याजागी कबीर दिसतो. तेच चेन्नै एक्प्रेसमध्ये तो फक्त शाहरुखच वाटतो.

Pages