चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एलिझाबेथ एकदशीबद्दल - लोकमत का लोकसत्ताच्या परिक्षणात वाचले होते ते खूपच आवडले. कितीही खडतर प्रसंग आला तरी पंढरपुरात राहूनही घरातले कुणीही विठ्ठलासमोर जाऊन हात जोडून बसत नाहीत. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आणि कुवतीप्रमाणे संकटाला भिडतात आणि इथेच संपूर्ण चित्रपट जिंकतो.

एलिझाबेथ साठी सगळ्याना मोदक! साधा,सरळ पण, भिडणारा चित्रपट, गरम बागड्या तर लई भारी! सगळीच मुल मस्त काम करतात.

अग्गोबै .... चारुलता पाहिला.. प्ण बिपाशाच्या अलोनच्या ट्रेलरची अर्धीच स्टोरी जुळते... अर्धी वेगळी वाटते...

मूळ षिनेमात भूत कथा नावालाच आहे. बिपाशाच्या कथेत भूतकथा जास्त आहे असे वाटते.

आता तो ओरिजिनल अलोन जापनीज की कोरियन ... तो कसा आहे ? त्याची स्टोरी अजुन निराळीच आहे का ?

मी ही ए ए च्या प्रेमात ! मुख्य म्हणजे किती सकारात्मकता असावी त्या चित्रपटात ज्याची आजच्या जगाला फार गरज आहे. जीव निवतो ती सकारात्मकता पाहून.
तरी उगीच खोटं खोटं 'फील गुड' नाही. जे दाखवलंय ते सगळं वास्तववादीच, आजूबाजूला घडणारं / घडू शकणारं पण आयुष्यात येणार्‍या अडचणी, सतावणार्‍या विवंचना, देवाच्या नावाखाली चालणारा बाजार, शिव्या, वेश्याव्यवसाय,धंद्यातील फसवणूक, मारामारी-बाचाबाची ह्या सगळ्यांतून सतत अधोरेखित होतो तो चांगुलपणाच.

'हरिश्चंद्राची फॅक्टरी' ची नर्मविनोदी ट्रीटमेंट मला सुरुवातीला झेपली नव्हती. ह्या चित्रपटाची हाताळणी अगदी वेगळी आहे, विनोदी नाही. पण प्रेक्षक घरी जाताना, वाईटातून चांगलं तेवढं निवडून घ्यावं अशी प्रेरणा घेऊन जातील हा नीरक्षीर विवेक दोन्ही चित्रपटांतून परेश मोकाशींनी जाणीवपूर्वक जपलेला दिसतो.

एलिझाबेथ एकादशीबद्दल मला सगळ्यांत आवडलेली बाब म्हणजे चित्रपटात डोकावणारे ऐतिहासिक-सामाजिक-वैज्ञानिक-सांस्कृतिक संदर्भ. ढेरे आणि न्यूटन एकत्र आल्यावर मला भरून आलं.

एलिझाबेथ एकादशीबद्दल मला सगळ्यांत आवडलेली बाब म्हणजे चित्रपटात डोकावणारे ऐतिहासिक-सामाजिक-वैज्ञानिक-सांस्कृतिक संदर्भ.
+१
सायकलला एलिझाबेथ नाव का दिलं याचं कारण, न्यूटन जागृत देव आहे का- धमाल आहे सगळी!

मलाही खूपच आवडला एए. एकाच दिवशी दोनदा पाहीला मी! Happy
मलाही ते पंढरपूरच्या देवळात उभं राहून गाडगेबाबांचे प्रवचन, अन मग नंतर संत न्यूटनचे कीर्तन. अगदी खेडवळ दिसणारी लोकांच्या तोंडी देखील न्युटन, युरेका, ग्रॅव्हिटीबद्दल सहज उल्लेख येणं फार आवडले!
खरं तर मला लाजच वाटली पाहीजे, पण त्या दुकानात येणार्या , आजूबाजूला असणार्या लोकांकडे पाहून 'आता हा गडबड करणार', 'हा फसवणार मुलांना' असं काहीतरी मी एक्स्पेक्ट करत होते. पण सिनेमात निव्वळ सकारात्मकता, चांगुलपणा असणं किंवा टिपिकल फिल्मि खलनायकी वृत्तीची व्यक्ती नसणे हे फार अनपेक्षित व वेगळं वाटलं.

मला हरिश्चंद्राची फॅक्टरी देखील खूप आवडला होता. परेश मोकाशींचा अजून एक मुव्ही आहे का या दोन मुव्हीज व्यतिरिक्त? डीव्हिडीज घेऊन ठेवल्या पाहीजेत.

क्सा - ढेर्‍यांचा संदर्भ कोणत्या प्रसंगात आहे?

टिपिकल फिल्मि खलनायकी वृत्तीची व्यक्ती नसणे हे फार अनपेक्षित व वेगळं वाटलं. >> हो मलाही.

चित्रपटात तीनदा त्यांच्या संशोधनाबद्दल संवाद आहेत. एकदा एका प्रसंगात आणि दोनदा फक्त ऐकू येतात. पंढरपूरचं मूळ आणि विठ्ठलाची मूळ मूर्ती याबद्दल संवाद आहेत. ते फारसे कोणाच्या लक्षात आले नसावेत.

चित्रपटात तीनदा त्यांच्या संशोधनाबद्दल संवाद आहेत. एकदा एका प्रसंगात आणि दोनदा फक्त ऐकू येतात. पंढरपूरचं मूळ आणि विठ्ठलाची मूळ मूर्ती याबद्दल संवाद आहेत. ते फारसे कोणाच्या लक्षात आले नसावेत.>>म्हणजे पुन्हा पहायला हवा! तसाही एए पुन्हा पुन्हा पहावा असा आहे!
परेश मोकाशी लहान मुलांची निरागसता किंवा एकूण भाबडेपणा फार भारी पकडतात! ह.फॅ. मध्ये पण असे बरेच मजेदार निखळ विनोद होते - आम्ही एकमेकांना विकतोय! किंवा त्या शेजारच्या आजीबाई म्हणतात, अरे इंग्रज पकडून नेतील! (तो ही पुन्हा पहायला हवा!).

या बाफवर नको. मूळ विषय मागे पडायला नको. त्यापेक्षा पुन्हा लक्षपूर्वक चित्रपट बघा / ऐका. Happy

'श्रीविठ्ठल - एक महासमन्वय' हे पुस्तकही वाचा, वाचलं नसल्यास. Happy

http://kharedi.maayboli.com/shop/ShreeVitthal-Eka-Mahasamanvay.html

फा? सिरिअसली? ह फॅ पाहीला नाहीस? आजच बघ! Happy
नेटफ्लिक्सवर होता पूर्वी. अजुनही आहे का बघावे लागेल.

मी पण नाही बघितला. नेटफ्लिक्सवर क्यु मध्ये टाकून ठेवला आहे कधीचा.

Happy नेफिवर स्ट्रीमिंग वर असेल तर अगदी आजच. माझ्याकडे नेफि डीव्हीडी ची मेम्बरशिप नाही. पण आमच्या डीवीडीवाल्या सांगितले की १-२ आठवड्यात आणेल तो.

१ जाने पासून खूप बदल झाले नेफि स्ट्रीमिंग मधे.

Whole 9 Yards परत पाहिला. जबरी भट्टी जमली आहे. ब्रुस विलीस, मॅथ्यू पेरी, अमांडा पीट, केविन पोलॉ़क, मायकेल क्लार्क डंकन सर्वांचीच कामे धमाल. संवादही भन्नाट आहेत.

ए ए मध्ये अजून एक आयरनी चांगली पकडली आहे. वारीच्या निमित्ताने गणिकांचा व्यवसाय चांगला होतो. बांगड्या हे त्यांना नेहमी लाग णारे पदार्थ आहे. व्यवसायासाठी आवश्यक. त्यां च्या कडे पैसे आले, ते मुलांना बांग ड्या विकून मिळाले व त्यातून सिंगल पेरेंट आईचे प्रश्न सुटले. सायकल परत आली घरी. पुरु श प्रधान व्यवस्थेत स्त्रिया कसे सर्वाइव करतात ते दाखवले आहे. त्यात तो मुलगा मित्राची आई म्हणून तिच्या पाया पडतो, काकू म्हण तो व तिला रिस्पेकट करतो हे फार महान आहे. न्युटनच्या नियमांची सांगड पण फार छान घातली आहे. शेव्टी मुले रिलेटि विटी विटी करत नाचतात. ही विठी व ती विटी!!! टेरिफीक घेतले आहे.

ए.ए ची आण्खी एक जबरदस्त बाजू म्हणजे त्याचे साऊंड डिझाईन. पडद्यावर जे चालले आहे त्यावर तर फोकस आहेच पण त्याचवेळी बॅकग्राऊंडला लोक जे बोलत आहेत, गाणी वाजताहेत त्या सर्वांकडे नीट लक्ष दिले तर पंढरपूर-विठ्ठल-वारी यासर्वांबद्दलचेच अनेको रफरेन्सेस जागोजागी फार खुबीने पेरले आहेत. उदा. मुले पळापळ करताना दोन वारकर्‍यांचा संवाद 'कोण्ती प्रत?....पराडकर' किंवा फिल्मी गाण्याच्या चालीवरची देवाची गाणी

येस चिनूक्स, मूळ मूर्तीबद्दलही त्या मुलांच्या गच्चीवरील वारकरी बोलत असतात. ती मूळ मूर्ती माझ्या गावी आहे असा प्रवाद आहे त्यामुळे कदाचित माझे कान टवकारले असतील!!!

महाराष्ट्रात आपण काळ्या रंगावरून विठोबाला पांडुरंग म्हणतो, त्याचाच दुसरा अर्थ - कर्नाटकात (बहुतेक बेळगाव जवळ) ताम्रपत्र सापडलं त्यावरून 'पुंडरिका क्षेत्र' किंवा पांडरांगपल्ली ( उच्चार कदाचित वेगळा असू शकतो ) येथील जो विष्णू तो पांडुरंग , अशी ढेर्‍यांनी व्याख्या समजावली आहे असे काही वाचल्याचे स्मरते.
( काही काळापूर्वी हे वाचले आहे, आणि हाताशी तपासायला कोणताही संदर्भग्रंथ नाही, त्यामूळे नावात, उच्चारात काही चूक झाली असण्याची शक्यता आहे… चु,भु.द्या.घ्या. )

शिवाय आता मूळची मूर्ती झिजायला लागली, म्हणून अभिषेकासाठी वेगळी मूर्ती केली आहे असे ऐकले….

एकूणच सिनेमा जबरदस्त… त्यातले बारीक बारीक रेफरन्ससेस, संवाद, काम, टेकींग सगळंच अशक्य भारीये.
इंटेलिजंट पण कुठेही हेवी न होणारा….
सिनेमातील कंटेंट न पाहता केवळ ह्या सिनेमाच्या नावावरून वाद झाले असतील, तर .. पुढे न बोललेलेच बरे !

आणि शेवटी त्या मुलाच्या आईने, गणिकेने या वारीत तिच्या व्यवसायासंबंधी ज्ञानेशच्या आईशी केलेले संभाषण..... किती चुटपुट लाऊन जाते..,

व्हीसीडी/डिव्हिडी मिळतेय का ए ए ची? >> अद्याप नाही. मी डीव्हीडी आल्यावर मागवून घेणार आहे. मलादेखील बघायची उत्सुकता आहे. रच्याकने परवा चेन्नई फिल्म फेस्टिवलमध्ये फॅण्ड्री दाखवला, अजूनही असे इतर मराठी पिक्चर आले तर बघायला नक्की जाणारे.

Pages