चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तु आता काही दिवस पळून जा कशी, आता पुरोगामी विचारांच्या महिला येतील आणि तुला फाडून खातील . मग कसला सिनेमा अन कसलं काय. ...

>> ज्या बायका प्रत्यक्ष आयुष्यात माबोवर आणि बाहेरही हे मुद्दे (व्यक्तीस्वातंत्र, मध्ययुगीन कल्पना,,प्रोवोक इ. इ.) घेऊन एखाद्या शोषणाला बळी पडलेल्या मुलीची/ बाईची बाजु सावरू पाहातात त्यांची टर उडवण्याचा एक घाणेरडा प्रयत्न. असोच.

इथे दक्षिणाने चित्रपटाच्या अनुषंगाने विचारले होते. पण जिथेतिथे फेमिनिस्ट बायकांवर हसल्याशिवाय काहीजणांचे समाधान होत नाही असं दिसतंय.

निषेध !!! Angry

बँग बँग ... ह्रिथिक साठी बघु शकतो... डोक बाजुला ठेवायच...
म्हणजे व्हिलन पाठलाग करतोय .. शंभर गोळ्या चालवतोय पण हिरो इकडे तिकडे करुन सहज चुकवतो पण जेव्हा तो स्वतः मागे वळुन गोळी मारतो तर सगळे व्हिलन खल्लस.. असे अनेक सिन्स आहेत.. पण ह्रिथिक बेस्ट दिसला आहे .. अगदी खल्लास.. त्याच्यासाठी खास थिएटर मध्ये जाउ शकतो..

हैदर .. छान आहे..
तब्बु .. केके .. शाहिद तिघेही छान,,,
शाहिद चे होणार्या घटनांबरोबरचे मानसिक बदल अजुन दाखवायला हवे होते..
तरीही चांगला आहे.. नक्कीच बघु शकतो..

ऑफिशीअल रीमेक बनवताना त्यात काय काय असू नये याचं बँग बँग उत्तम उदाहरण आहे Proud

सिनेमामधला पहिला मुडदा पडतो तेव्हाचं फोनवर बोलणं चालू असलेलं ऐकून पुढं काय होणार हे मला आधीच लक्षात आलं आणि तसंच घडलं हा वैतागवाणा अनुभव फाईंडिंग फॅनीच्या वेळी पण आला होता.

बँंग बॅग डीझायनर फिल्म आहे त्यामुळे त्याकडे त्याच दृष्टीनं पाहिलं तर काही काही बाबी मस्त जमल्या आहेत आणी काही प्रचंड गंडल्या आहेत. नाईट अँड डेची सुरूवात अत्यंत वेगवान होती, इथं हीरो हीरोईन एकमेकांना भेटायलाच अर्धा तास घालवलाय, परिणामी शेवटाकडे येताना पटकथा अत्यंत वेगवान होते आणि ट्रॅक सोडून देते. Happy

कथेमध्ये काही गोष्टी अक्षरशः चुकल्या आहेत. ओमर जाफरला चोरी नक्की कशासाठी करवून आणायची असते हेच तो विसरलेला आहे कारण नंतर तो त्या चोरीच्या वस्तूमागे लागलेला दाखवलाय जे पूर्णतः अनाकलनीय आहे. ह्रितिक नक्की काय आहे ते कथेत नक्की कूठंच क्लीअर होत नाही, त्यामुळं विक्रम गोखले त्याला "महफूझ जगहला" घेऊन जातो म्हटल्यावर तो का पॅनिक होतो तेच समजत नाही, आफ्टर ऑल, ही वॉज अ हीरो इन दॅट ऑपरेशन तरी त्याला संपवायचा घाट घातला जायचं कारण काय?

दुसरा प्रचंड गंडलेलं ह्रितिक आणि कतरीना आयलंडमधून पळताना एक जबरदस्त अ‍ॅक्शन सीक्वेन्स आहे, तोदेखील पूर्ण पाण्यात. त्यानंतर कतरीनाला कितीतरी दिवसांनी ह्रितिक बेस्ट स्विमर आहे समजतं. सगळंच गडबडलंय.

हैदरचे रिव्ह्यू संमिश्रच आहेत. असणारच. विशाल भारद्वाजचे स्वतःचे असे एक स्कूल आहे. त्याच्याशी रिलेट न होणार्‍याना त्याचे चित्रपट आवडण अवघडच. ओंकारा , मकबूल हा लसावि होता. सर्वानाच आवडणारे. शेक्सपीअरचे भारतीयीकरण त्याचे झकासच असते. हैदर अजून पाहिला नाही . मध्ये विशालचा एक पिक्चर आला होता तो तर कुणालाच आवडला नाही अगदी सर्वानाच नॉन सेन्स वाटला होता .... मटरू की बिजलीका मंडोला .

कतरीना फार मस्त दिसली आहे, आणि तिचा स्क्रीन प्रेझेन्स खूप सुखद आहे. तिचा ड्रगचं इंजेक्शन घेतल्यानंतरचा सीन फार मस्त जमलाय (वे बेटर दॅन कॅमेरून डीयाझ!!!!)

ते दोघं पहिल्यांदा भेटतात त्यानंतर ह्रितिक शर्ट काढतो तो सीन शीट्टीवसूल झालाय. तेव्हाचे तिचे एक्स्प्रेशन्स क्लास आहेत!! आणि त्यावर ह्रितिकचे एक्स्प्रेशन कातील आहेत.

ह्रितिकबद्दल काही बोलून उपयोग नाही. स्पेशल ईफेक्ट्सने अंगातले शर्ट आग लावून तुम्ही ऑन स्क्रीन फायर आणू शकत नाही. त्यासाठी ह्रितिक हवा. धूम२ सारखाच स्टाईलबाज पॉलिश्ड परफॉर्मन्स आहे. काहीकाही सीन्स तर धूम२ मधून उचलल्यासारखे आहेत. अ‍ॅक्शन सीन्समधले त्याचं कौशल्य खास आहे, पण त्याहून सुंदर त्याचे रोमॅन्टिक सीन आहेत. टोट्टल पैस्सावसूल!!!!

(आता हैदर बघायला जाणार Proud )

ओमर जाफरला चोरी नक्की कशासाठी करवून आणायची असते हेच तो विसरलेला आहे कारण नंतर तो त्या चोरीच्या वस्तूमागे लागलेला दाखवलाय जे पूर्णतः अनाकलनीय >> चोरीचा मूळ उद्देश तो 'ट्रीटी' साईन होऊ नये म्हणून असला तरी अचानक दुसर्‍याच कुणी चोरी केल्याने त्याला त्याचा छडा लावणे भाग पडलं, असं असेल. थोडक्यात चोरीच्या वस्तूच्या नाही, तर चोराच्या मागे लागणं भाग आहे.

अचानक दुसर्‍याच कुणी चोरी केल्याने त्याला त्याचा छडा लावणे भाग पडलं,<< पण त्याला माहित आहे की कुणी चोरी केली आहे ते. हमीद गुलचा माणूस त्याच्या संपर्कात आहे,. चोर मिळाल्यावर तो विनाकारण "किधर है" कशाला विचारत् बसतो ?? त्याला केवळ इंडियननं चोरी केली आणि ट्रीटी साईन झाली नाही, एवढंच अपेक्षित असतं ना?

हो, पण तो इंडिय्न आपला नसून भलताच निघाला आणि 'इंडियन्स कुछ भी कर सकते हय' या न्यायाने सिच्युएशनवर पूर्ण कंट्रोल हवा असेल. Proud चोरी और चोर दोनो अपनी जेब में, वगैरे.

असं काय करता ? त्याच्या मेंदूला दुखापत झाली होती ना, बारीकसारीक गोष्टी विसरणारच तो. मालिकेत तर नुसते डोके आपटले तरी स्मृतीभंश होतो.. इथे तर खरंच दुखापत झाली होती Happy

मी तर सिडी संग्रही ठेवणार आहे त्याची,, "काईट्स" ची पण आहे माझ्या घरी Happy

काईट्स ? दिनेश साहेब मग हमशक्ल्सची पण ठेवाच. पाहुण्यांना पळवुन लावण्याकरीता उपयोगी पडेल

स्पेशल ईफेक्ट्सने अंगातले शर्ट आग लावून तुम्ही ऑन स्क्रीन फायर आणू शकत नाही. >> हाहाहाहा फुल्ल्ल्ल टोमणा! आवडलाच Happy

पण तो इंडिय्न आपला नसून भलताच निघाला<<< ओ राडा, चोरीची सुपारी निघाली, यानं सुपारी घेतली. चोरी केली. नंतर त्याचं काही का करेनात, इथं ओमार जाफरनं त्याचं लक्ष ट्रीटी साईन न होइल याकडे द्यायचं की सगळी फोर्स एका चोराच्या मागे लावून टाकायची?

सुरूवातीला जोरावर हरलीनला "मेन्टली अन्स्टेबल आहे" वगैरे सांगतो त्याचं काय लॉजिक होतं? गव्हर्नमेंट एजंटकडं त्याची माहिती येतेच कुठून? त्यानंच चोरी केली आहे ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये कसं समजतं.

एकंदरीत धूम३ चा फंडा इथंपण वापरलाय, चोरी दाखवायचीच नाही. नुसती चोरी झाली म्हनून बोंबाबोंब दाखवायची. (चोरी कशी केली हा हाईस्ट मूव्हीचा खरा क्रक्स असतो, पण त्याला जाम अक्कल लावून स्क्रीनप्प्ले लिहावा लागतो, इतकं कोण करणार? त्यापेक्षा ऑफिशीअल रिमेक बनवू!!!!! )

काल मायबोलीवर ( टी.व्ही वाहिनी) बिनकामाचा नवरा धमाल चित्रपट (कितव्यांदा ते मलाहि आठवत नाहि)पाहीला .सुन्दर गाणी ,पर्फेक्ट फॅमिली एन्टरटेनर.

"पिझ्झा" पाहिलाय .चांगले भयपट हिंदीत फार कमी होतात .पिझ्झा हा चांगला प्रयत्न होता .शेवट पर्यन्त खिळवुन ठेवतो. फारच घाबरट लोकांसाठि सुचना- पहिलि १५ मिनिटे पाहु शकलात तर पुर्ण पिझ्झा चित्रपट पाहु शकता Proud

Wink

बोल , खुदा के लिये दोन्ही चित्रपट बरेच आधि डी डी नॅशनल वर अर्धवट पहिलेले.मग तुनळी वर पुर्ण पाहीले.मला तर आधी माहितही नव्ह्ते बोल मधे हुमैमा मलिक आणी खुदा के लिये मधे फवाद खान जे आता भारतीय चित्रपटांत काम करत आहेत ते होते पण दोन्हि चित्रपट आवड्ले.खुदा के लिये मधला शेवट्चा कोर्टातला नसीरुद्दिन शहाचा सीन तर एकदम जबरद्स्त.

>>>स्पेशल ईफेक्ट्सने अंगातले शर्ट आग लावून तुम्ही ऑन स्क्रीन फायर आणू शकत नाही
Lol ह्या वेळेस लादीपावाची १.२ लादी आहे असं ऐकलं त्याचं काहीच नाही का? Wink

हैरद पाहिला. मला हॅम्लेटची कथा आजिबात आठवत नव्हती आणि मुद्दामच ती आधी वाचून गेलो नाही.
चित्रपटाची सुरूवात आणि साधारण पहिला दिड तास खूप भारी आहे ! अगदी पिफ मधल्या युरोपियन चित्रपटांची आठवण होते. उत्कृष्ठ सिनेमॅटोग्राफी, महान कॅमेराअँगल, सुंदार काश्मिर, प्रत्येक फ्रेममध्ये एकही अनावश्यक गोष्ट नाही, एकही अनावश्यक डायलॉग नाही आणि सगळ्यांचे दमदार अभिनय. नंतर ते गाणं येतं आणि तिथून चित्रपट एकदम बॉलिवुडी होऊन जातो. ते गाणं आणि तो शाहिदचा डान्स ह्याचा मोह आवरता आला असता तर फार बरं झालं असतं असं वाटलं. शिवाय अगदी शेवटच्या दृष्यातला तब्बू आणि शाहिदचा इमोशनल ड्रामा पण बर्‍यापैकी अ आणि अ वाटला. ह्यांचा इमोशनल ड्राम सुरु असताना ती संधी साधून बाहेर पोलिस आणि आर्मी काहीच करत नाहीत फक्त वाट बघत उभे रहातात हे पटत नाही.
'झेलम झेलम' आणि इतर लोकसंगीतावर आधारीत गाणी मस्त आहेत. मला उर्दू भाषा, शेरोशायरी वगैरेबद्दल फार काही आकर्षण नाही पण ह्या चित्रपटातले उर्दू डायलॉग खूप मस्त वाटले. एकदम भरदार, क्लासिक आहेत!
काश्मिर प्रश्नाचं (बर्‍याचदा असतं त्याप्रमाणे) एकांगी वर्णन आहे. पण चित्रपट काश्मिरप्रश्नापेक्षा वैयक्तिक कथेकडे अधिक झुकलेला असल्याने ठिक आहे. चित्रपट फुटीरतावाद्यांच्या पर्स्पेक्टीव्हमधून केलेला असला तरीही आर्मीबद्दलच नकारात्मक सुर मला खटकला.
शाहिद कपूर, तब्बू, इरफान, केके मेनन सगळ्यांचेच अभिनय भारी! शाहिद आणि तब्बू तर काही दृष्यांमधून फक्त डोळ्यांमधून बोलतात. दोघांच्याही डोळ्यांची क्लोसअप दृष्ये मस्त आहेत. त्यांचे रंग खूपच सारखे दिसतात. ते खरच तसे आहेत की लेन्सेस वापरल्या आहेत माहीत नाही.
एकंदरीत मला ठिक वाटला पण शेवटचा एक तास अजून उंचवता आला असता.

शिवाय अगदी शेवटच्या दृष्यातला तब्बू आणि शाहिदचा इमोशनल ड्रामा पण बर्‍यापैकी अ आणि अ वाटला<<< वरिजिनल हॅम्लेटमध्ये पण असाच ड्रामा आहे. Happy

असेल पण जर हा चित्रपट पूर्णपणे वेगळ्या काळातला आणि वेगळ्या पार्श्वभूमीवरचा आहे आणि शिवाय जर पुन्हा बनतोच आहे तर अ आणि अ ड्रामा कॉपी कशाला करावा? Happy

विशालचा एक पिक्चर आला होता तो तर कुणालाच आवडला नाही अगदी सर्वानाच नॉन सेन्स वाटला होता .... मटरू की बिजलीका मंडोला .--not true - मला जाम आवडला होता

बाप रे तो मटरु की बिजली मी थेटरात बघितला होता. महाबोअर.
म्हणजे तसा विषय पटण्यासारखा होता- भ्रष्टाचार, राजकारण्यांनी लोकांच्या जमिनी लाटणं, लोकांनी लढा देणं. पण बाकी खूप बोअर गोष्टी होत्या त्यात.
रिव्ह्यूजसाठी न थांबता केवळ विशाल भारद्वाजचा आहे (आणि अनुष्का शर्मा आहे) म्हणून नवरोबाने फ्रायडेची तिकीटं काढलेली. पैसे फुकट गेले!

मला आवडला हैदर. मूळ कथेचा प्लॉट माहित होता, डीटेल्स नव्हते माहित.
ती कथा सादर करायला काश्मीर बॅकड्रॉप अगदी सूट झाला आहे. सिनेमाचे बलस्थान म्हणाजे कथा आणि त्यातले कॅरेक्टर्स ची" वीव्हिंग" हेच आहे. म्हणजे , हैदर च्यभोवतीची तमाम कॅरेक्टर्स एका प्रसंगात अगदी जेन्युइन , त्यांच्या जागी बरोबर अशी वाटतात आणि पुढच्याच प्रसंगात दुसरी बाजू ऐकली की आधीचे सर्व खोटे वाटू लागते... आपणच हैदरच्या जागी आहोत आणि कोण खरे कोण खोटे , कशावर विश्वास ठेवावा , कशावर नाही, कोण चूक कोण बरोबर हेच कळेनासे होते आणी हैदरच्या मनातला "तो सनातन प्रश्न" आपल्यापर्यन्त बरोब्बर पोहोचतो !!
सुंदर असून तणावग्रस्त, उदास, म्रुत्यूच्या छायेतले ते हिवाळ्यातले काश्मीर, ते कब्रस्तान मधले, जळलेल्या घरातले सीन्स ... खूपच इन्टेन्स ! विशाल भारद्वाज डीड अ ग्रेट जॉब (अगेन!) !!

पग्या - मूळ हॅम्लेट मध्ये पण त्या प्रसंगी एक खुनाच्या रिएनॅक्टमेन्ट चं नाटक हॅम्लेट सादर करतो असे आहे! आणि नोइंग विशाल भारद्वाज, त्याला कथेशी बर्‍याच प्रमाणात प्रामाणिक राहणे आवडते , किंबहुना, त्याला त्या ओरिजिनल कलाकृतीविषयी प्रेम /आदर असावा त्यामुळे असले महत्त्वाचे सीन्स तो आपल्या इन्टरप्रिटेशन मधे घेतोच घेतो. तसेही तो नाच गाण्याचा सीन हैदरची मेन्टल अवस्था जी दाखवलीय त्याच्याशी सुसंगतच वाटला मला. सिचुएशन तर अशीच आहे , अल्मोस्ट बेगिंग फॉर अ साँग सिक्वेन्स !! Lol
शाहिद ची निवड पर्फेक्ट !! तबू , केके मेनन , इर्फान , सगळेच आवडले!!

>>>स्पेशल ईफेक्ट्सने अंगातले शर्ट आग लावून तुम्ही ऑन स्क्रीन फायर आणू शकत नाही.

त्याला नावं ठेवल्याशिवाय कुठल्याही चित्रपटाचं परिक्षण/मतप्रदर्शन पूर्ण होतच नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

मी काल "हवा हवाई" बघितला. इथे कुणी लिहिले होते का त्याबद्दल ?
अमोल गुप्ते यांचे लेखन आणि दिग्दर्शन आहे.
खुप सुंदर चित्रपट आहे. एका गरीब घरातील मुलगा स्केटींग चँपियन कसा बनतो त्याची कथा. पण ती मांडली आहे अतिशत हृद्य रितीने. सर्वच पात्रे अगदी जिवंत वाटतात.
पार्थो गुप्ते व रेखा कामत, मकरंद देशपांडे सोडल्यास बाकी चेहरे ओळखीचे नाहीत. पण कुठेही नवखेपणा नाही. चित्रपटात जी पात्रे हमखास क्रूर दाखवली जातात ( बालमजूरांचे मालक ) ती पण इथे मानवी चेहर्‍याची आहेत. नायक नायिका असून त्यांचावर फार वेळ न घालवता मुख्य कथाभागावरच लक्ष दिलेले आहे. कथेतील दोन भाऊ, तसेच त्या मुलाच्या घरातील माणसे पण अस्सल.

अगदी मोजकेच प्रसंग मेलोड्रामॅटीक आहेत पण तेही कथेच्या ओघात चालून जातात. शेवटच्या शर्यतीचे चित्रीकरण अफलातून आहे. सर्वांनी बघावा असा आहे हा चित्रपट.

अमोल गुप्तेने कथानकाच्या ओघात बालमजूर, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, शिक्षण अश्या अनेक गोष्टींवर सूचक दृष्ये टिपली आहे.

हैदर जबरदस्त आहे!!
पग्या, 'बिसमिल' हे गाणं हवंच होतं. स्टोरीटेलिंग आहे त्या गाण्यात. हैदरची घुसमट, त्याचा राग, इन्तकाम सगळंच त्या गाण्यात येतं. गाण्याला जी चाल लावली आहे त्याने उलट गाणं कमाल रंगतं.

तसंच एक गाणं- 'झेलम'! काय दर्द आहे त्या गाण्यात. 'जेहेलम' असा उच्चार केला आहे. टू गुड.

उलट हैदर-आर्शियाचं गाणं नको होतं असं माझं वैम. (गाणं सुरेख लिहिलं आहे, अप्रत्तिम चित्रिकरण आहे.. तरीही)

तब्बूच्या म्हणजेच गजालाच्या अर्थातच जर्ट्र्यूडच्या कॅरॅक्टरने मी पुरती भंजाळले आहे Happy अतिशय गुंतागुंतीचं, कॉम्प्लेक्स पात्र आहे. केवढे कंगोरे आहेत त्या पात्राला. वॉव. शाहिदपेक्षाही तब्बू आवडली मला हैदरमध्ये. अर्थात, शाहिदने सुरेखच निभावलाय हैदर. तरी. चित्रपटाचे संवाद अतिशय अ‍ॅप्ट.

एकूणात, बघावा आणि अनुभवावा असा हैदर.

पार्थो गुप्ते व रेखा कामत, मकरंद देशपांडे सोडल्यास बाकी चेहरे ओळखीचे नाहीत.>>>>>पार्थो ची आई झालेली मराठी अभिनेत्री नेहा जोशी आहे जी सध्या का रे दुरावा मधे आहे.पार्थोचे मित्र व त्यांनी बनवलेले स्केट पण खास आवडलेले.

पग्या, 'बिसमिल' हे गाणं हवंच होतं. स्टोरीटेलिंग आहे त्या गाण्यात. हैदरची घुसमट, त्याचा राग, इन्तकाम सगळंच त्या गाण्यात येतं. गाण्याला जी चाल लावली आहे त्याने उलट गाणं कमाल रंगतं.<< हो. शिवाय गाण्याच्या स्टेप्स नीट बघा, टिपिकल बॉलीवूडी कोरीओग्राफी नाही. अफ्रो स्टाईल आहे, पण तरी स्टेप्स वेगळ्याच आहेत मला परत एकदा ते गाणं अखंड बघायचं आहे जस्ट फॉर द स्टेप्स.

सिनी.. सिरियल्स नाही ना बघत मी.. म्हणून ओळखले नाही तिला. पण मूळ कथाकल्पना दमदार असेल तर नवे कलाकार घेऊनही चांगला चित्रपट काढता येतो हे त्याने दाखवून दिलेय.

दिनेशदा, मी लिहिले होते 'हवाहवाई' पाहिल्याचे. त्याच पानावर अजूनही पोस्ट्स आहेत एकदोन.

हैदर बघावासा वाटतोय. मुहूर्त कधी लागेल माहीत नाही.

मराठी चित्रपट 'टपाल' पाहिला का कुणी ? मुलाच्या शाळेत चित्रपट बघून त्याची कथा मराठीतून वर्गासमोर सांगण्याचा होमवर्क दिला आहे.

Pages