चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फाईंडिंग फॅनी पाहिला आणि अतिशय आवडला.
पान क्र. १३ वर आगाऊच्या पोस्टला +१००००!
चित्रपट जेमतेम दोन तासात पटकन संपतो, पण पुढचे कित्येक तास अंतर्मुख करतो! कित्येक पदर, nuances, छोटे छोटे संवाद नंतर आठवत राहतात आणि त्यांचा एक नवीन अर्थ सापडत जातो.
दिपिका आवडण्यासारखीच आहे. तिच्या पहिल्या सिनेमापासून मला ती आवडते. अतिशय सहज वावर असतो तिचा. अर्जुनच या व्यक्तिरेखेत फिट्ट बसतो. (बरं झालं रणवीर सिंगचा पत्ता कट केला). नसिरुद्दीन डोळ्यांनी बोलतो!! पंकज कपूर त्याचे पात्र जगला आहे. मला सर्वात आवडली ती डिंपल! डिंपलने तिच्या एकूणच चित्रपट कारकीर्दीत जे रोल केले आहेत- हिरॉइनपासून ते आत्ता प्रौढ नायिकेचे, त्यामध्ये ही नायिका उभी करणं सर्वात जास्त डेअरिंगचे काम आहे आणि ते तिने कोणतीही inhibitions न पाळता केले आहे, म्हणून मला सर्वात जास्त ती आवडली.

पौर्णिमा : प्रत्येक शब्दाला अनुमोदन! डिम्पल बद्दल तर अगदी अगदी. मेलेल्या मांजरा बद्द्ल रोझीच्या वागणूकी बद्दल जे वक्तव्य आहे, ते पण " एखादी गोष्ट आपल्याला प्रिय असते" म्हणजे नक्की काय याचा शोध घेणारे … शेवटाबद्दल मात्र मला नक्की काय वाटतंय ते सांगता येत नाहीये

अनुदोन, त्यांनी दाखवलेला शेवट जाऊ दे. तुला काय शेवट बघायला आवडला असता? सगळ्यांची आयुष्ये मागील पानावरून पुढे चालू?? दीपिका-नसीरची फ्रेन्डशिप बघता (आणि होमिचे आधीचे सिनेमे बघता) मला उगीच शेवट पर्यंत अगदी अतरंगी हिंदी फिल्मछाप काही होते का काय - दीपिकाची आई येते/सापडते आणि तीच फॅनी इ इ. अशी भीती वाटत होती. म्हणून आहे तो शेवट मला आवडला.

९९ नावाचा एक चित्रपट मी सिडीवर बघितला.. कुणाल खेमू, सायरस, सोहा खान, बोमन इराणी, विनोद खन्ना, महेश मांजरेकर.. अशी वेगवेगळ्या स्टाईलची स्टारकास्ट. पण मस्त विनोदनिर्मिती आहे. १९९९ चा काळ, त्या काळचे फोन, मॅच फिक्सिंग, बेटींग वगैरे कथा. विनोद चांगल्या दर्ज्याचे आहेत. सगळ्यांची कामेही चांगली आहेत.

बेवकूफियाँ पण बघितला. आयुषमान खुराना, सोनम कपूर आणि ऋषी कपूर एवढे तीनच कलाकार. थोडी वेगळी प्रेमकथा. सोनम प्रचंड स्थूल दिसलीय. ( त्यातच बिकीनी शूट आहे ) पण काम ठिकठाक. ऋषी कपूर नेहमीप्रमाणेच सहज वावरलाय. आयूषमान ने रंगवलेला बेकार दिल्लीकर तरुण खासच. असा दिल्लीकर म्हणून तो शोभूनही दिसतो. त्याचा चेहरा खुप हालता असतो त्यामूळे मनातले भाव छान दाखवू शकतो. त्याला एखादा चांगला रोल मिळायला हवा.

९९ नावाचा एक चित्रपट मी सिडीवर बघितला.. कुणाल खेमू, सायरस, सोहा खान, बोमन इराणी, विनोद खन्ना, महेश मांजरेकर..>>>>> बघितल्या सारखा वाटतोय . तेन्व्हा आवडलेला. कूणाल खेमु आणि कंपनी , फ्लॉप चित्रपट काढायच ठरवतात . तो का?

९९ >>> दिल्ली में लडकीयोंके सिर्फ दो ही नाम होते है - नेहा या पूजा| : तोच ना हा? सगळेच कास्टिंग आवडले होते या चित्रपटातले. शेवट तर भारी होता.

फा, कन्नड सिनेमे (तेही उपेंद्रचे) कळायला भाषेची अडचण येत नाही, स्वानुभवाने सांगतो!!!
तो एक अतिनट आहे!

मला आज 'फाईंडिंग फॅनी' बघायचाय पण त्याचे हिंदी शो टाईम्सच मला सोयीचे आहेत ( कालपर्यंत सकाळचा इंग्लिश शो दाखवत होते आजच्या तारखेसाठीही Sad ) खरंतर माझी जरा निराशा झालीय कारण मला तो इंग्लिशमधून बघायचा होता. हिंदी पाहिल्यास फार रसभंग होईल का ?
हिंदी डबिंग चांगल्या दर्जाचे नसेल तर मग विकेंडपर्यंत थांबायला लागेल पण तेव्हा जवळच्या थिएटरमध्ये राहील ह्याची गॅरेंटी नाही.

परवा दावत ए इश्क बघायचा योग आला.
असे योग माझ्या पत्रिकेत पुन्हा येऊ नये यासाठी कोणती शांती करावी या विचारात आहे मी सध्या Uhoh

रीया , काल असाच एक अचानक योग माझ्याही राशीत आला .
काल टी.व्ही. वर " आम्ही सातपुते " बघितला .
सत्ते पे सत्ता ची इतकी भ्रष्ट आव्रुत्ती बघून रडाव की डोक आपटाव कळल नाही.
पण मग टी.व्ही बंद करून टाकला.

सचिन दुसरं करतो काय? Uhoh
नवरा माझा नवसाचा पण असाच बाँबे टू गोवा आणि साधु और शैतान मिक्स सिनेमा आहे. अत्यंत फालतू. Sad

अस नको ग बोलु दक्षिणा .
अशी ही बनवाबनवी विसरलीस का?

त्याचे हल्लीचे चित्रपट असे बकवास आहेत , जुने नाहीत .

गेल्या आठवड्यात 'सिटीलाईटस' पाहिला. राजकुमार राव, पत्रलेखा.

एकदम वास्तवदर्शी सिनेमा. पूर्वार्ध खूप अंगावर येणारा. शेवटाकडे जऽरा फिल्मी झाला. पण एकंदर आवडला मला.

काल दुपारी जरा मोकळा वेळ होता. मूव्ही ऑन डिमाण्डवर 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' फुकट उपलब्ध होता.
'अ ट्रिब्यूट टू डीडीएलजे' म्हणून म्हटलं पाहू तरी काय आहे...
तर अगदीच पचकट, मिळमिळीत निघाला.
इन्टेन्सिटी कुठे नावालाही नव्हती, ना अभिनयात, ना कुठल्या दृश्यात, ना व्यक्तीचित्रणात.
वरूण धवन बालीश वाटतो. उत्तरार्धातही त्याचा वावर बदलत नाही. आलिया भट कॅमेरासमोर सफाईने वावरते. पण तेवढ्यानं काय होणार. मुळात डोळे बोलले पाहिजेत...:(

डीडीएलजे खूप काही ग्रेट नव्हता. पण त्यात शाहरूख खान, काजोल, अमरीश पुरी होते. तेव्हाच्या कॉलेजवयात तो आवडला होता. नुकताच परत कुठल्यातरी चॅनलवर पाहिला तेव्हाही वयानुरूप जो कंटाळा येऊ शकला असता तो आला नव्हता.

तुलना न करता बघावं म्हटलं तर मग 'अ ट्रिब्यूट टू डीडीएलजे'चं काय करायचं? Uhoh

९९

हा मी थेटरात जाऊन पाहिला होता. त्या काळात मी प्रत्येक पिक्चर थेटरात पाहत असे. ह्याची व्हीसीडी मी घेउन ठेवली आहे. मला फार आवडतो. अमित त्रिवेदीचं म्युझीक आहे. 'बाअदब बामुलाहिजा' गाणं खूप आवडतं. मस्त पिक्चर ! Happy

'मुस्कुराहट'चा विषय निघाला आहे वरती.. फार आवडता पिक्चर आहे. जरासा लांबला आहे, त्यामुळे पुन्हा पुन्हा बघताना जरा कंटाळा येतो. पण तरीही सुंदरच पिक्चर.
मस्त गाणी..
गुनगुन करता आया भंवरा.., बंदा नवाझ.., अपनी जेब में लाखों होंगे आज कल या परसों..

पोर(कट) बाजार

एका चांगल्या विषयाची ढिसाळ हाताळणी. 'मुलांची तस्करी' हा विषय नुकताच 'मर्दानी'त पाहिला होता. 'मर्दानी'चा वेग तर नाहीच, पण इतकी कमकुवत पटकथा की हा चित्रपट पहिल्या काही मिनिटातच 'बोअर बाजार' वाटायला लागतो.

सई ताम्हणकरच्या प्रत्येक चित्रपटात असण्याचा आता कंटाळा आला आहे. फुकट काम करते का, प्रत्येक चित्रपटात हिला घेत असतात ते ? की तिला अशी भीती वाटते की आज काम मिळतंय तोवर जे मिळेल ते सगळं करून घ्यावं, उद्या कुणी विचारलं नाही तर ? अत्यंत बिनडोक शिक्षिकेच्या भूमिकेतली सई आणि तितक्याच बिनडोक गुंडाच्या भूमिकेतील अंकुश चौधरी, ही ह्या चित्रपटाची वैशिष्ट्यं. (जनरली वैशिष्ट्यं 'चांगली' असतात, पण मला ह्यात 'चांगलं' काही दिसलं नाही म्हणून जे ठळक महत्वाचं आहे, ते सांगितलं.)

मनवा नाईक एक खूप चांगली अभिनेत्री आहे. मला आवडते. दिग्दर्शक म्हणून तिला हा विषय पेलवला नाही. असंख्य दृश्यांवर दिग्दर्शकाची पकडच जाणवत नाही. पात्रं उगाच हसतात काय... धावतात काय.. काहीही चालतं ! पटकथा आणि दिग्दर्शनाच्या नावाने बोंब आहे. त्रास देण्याची उरलेली कसर संगीतकार पूर्ण करतो.

पाच पोरांमधलंही कुणीच 'प्रॉमिसिंग' वाटलं नाही.
अजिबात बघू नका, असा माझा एक अगोचर सल्ला.
त्यापेक्षा खुबसुरत किंवा दावत-ए-इश्क़ पाहायला हवा होता, असं वाटतंय. इतकं निराश कुठल्याच मराठी चित्रपटाने केलं नाही.

दावत ए इश्क इतका मुर्ख सिनेमा आहे की काही बोलायला नको Uhoh

हुंड्यासारखी चांगला विषय आणि परिणिती आणि अनुपम खेर सारखे लोकं अगदीच वाया घालवलेत या पिक्चर ने Uhoh

खुबसुरत बेकार आहे, त्यातला त्यात किरण खेर जरा रन्गत आणायचा प्रयत्न करते... पण , बापाने काढ्लाय म्हणुन लेकिवर
सतत कॅमेरा असायला पहिजे हे गणित कळत नाही! सोनम ला अभिनय जमत नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे..

९९ पाहिला होता, आता काही आठवत नाहीये. वरचं वाचून परत पाहण्याची इच्छा होतेय.
मी सध्या बॅकलॉग भरुन काढतेय. क्वीन पाहिला, आवडला. लुटेरा आज संपवेन. सुरेख हाताळणी. अजून तासभर राहिलाय, त्यामुळे पुढे काय होईल काही माहिती नाही. सिटीलाईट्स पण लिस्टमध्ये टाकते आता.

आताच romedy now वर द बिग इअर पाहिला . आवडला . एका वर्षात सर्वाधिक वेगवेगळ्या पक्ष्यांना पाहणे आणि बघणे याला अमेरिकेत Birding म्हणतात . दरवर्षी सर्वाधिक पक्षी नोंदानार्या पक्षी निरीक्षकाला Birder of The Year पुरस्कार मिळतो . कहाणी मधले तीन मुख्य पात्र बोस्टिक , स्टू , आणि ब्रॅड हे तिघेही वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले या पुरस्कारासाठी जीव तोडून प्रयत्न करत असतात . या पैकी बोस्टिक हा सद्य विजेता . नवीन रेकॉर्ड बनवण्यासाठी आणि अजून कोणी आपल्या पुढे जाऊ नये यासाठी झपाटलेला . यासाठी कुठलीही किंमत मोजायला तैयार . अगदी वैयक्तिक आयुष्याची पण . स्टु हा करोडपती उद्योगपती . पण आयुष्याच्या संध्याछायेत आपण काय कमावल यापेक्षा काय गमावलं याची tally करणारा संवेदनशील माणूस . आयुष्याच्या शेवटी उद्योग साम्राज्य वाऱ्यावर सोडून तो आपल्या आवडत्या कामासाठी बाहेर पडतो . Birding साठी . आणि शेवटचा ब्रॅड . ३६ वर्षाच्या ब्रॅड हा ३६ वर्षीय घटस्फोटीत . निव्वळ रेटायच म्हणून रटाळ नौकरी करणारा . थोडक्यात loser type . पण त्याला पण आता जग आपल्याला आपल्यानंतर कस आठवेल याची चिंता भेडसावू लागली आहे . हे तिघे पण जास्तीत जास्त पक्ष्यांना आपल्या Camera मध्ये कैद करण्यासाठी सर्व विवनचनावर मात करून बाहेर पडतात . झपाटलेल्या बोस्टिक ला मात द्यायला दोन ध्रुवा वरचे स्टु आणि ब्रॅड हात मिळवणी करतात . शेवटी हि स्पर्धा कोण जिंकत ? या स्पर्धेत कोण काय कमावत आणि कोण काय गमावत ? या प्रश्नाची उत्तर प्रत्यक्ष बघण्यात मजा आहे . बाकी सिनेमा चा सगळ्यात मोठा plus point म्हणजे मला कळलेले Birder आणि Birding च अनोख सुंदर विश्व . ते पडद्यावर अतिशय सुंदर टीपल पण आहे . माझ्या आवडत्या जेक ब्लेक ने ब्रॅड च पात्र सुंदर उभारलंआहे . त्याला ओवन विल्सन आणि स्टीव मार्टिन ने तितकीच तोलामोलाची साथ दिली आहे . मला background score पण भन्नाट आवडला . एकूण चुकवू नका संधी मिळाली तर . भारी

नीता वोल्वो च्या सौजन्याने 'आजचा दिवस माझा' पहायला मिळाला. आवडला..एका रात्रीत घडलेल्या काही घटनांवर आधारलेला सिनेमा. सरकारी कामं, बाबूगिरी, नर्मविनोद असं एकंदर सुंदर सादरीकरण. सचिन खेडेकर, महेश मांजरेकर... मस्त कामं नेहमीप्रमाणे. आनंद इंगळे आणि समीर चौगुले पण आवडले या सिनेमात. कधी नव्हे तो पुष्कर श्रोत्री ही आवडला.

Pages