चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'फाइंडिंग फॅनी' जबरी आहे.
मला सगळ्यांत आवडलेला भाग - अहंकार, गंड यांमुळे आयुष्यातलं श्रेयस आणि प्रेयस बरेचदा निसटून जातं. आणि हे लक्षात न घेता आपण त्या अहंभावाला कुरवाळत बसतो. हा अहंभाव मात्र आपल्याला रितं करतो. किंबहुना आपण पोकळ आहोत, हे हा अहंभाव आपल्याला दाखवून्द एतो. जेव्हा हे कळतं, तेव्हा आपण नक्की काय गमावलं, याचं दु:ख होतं. एकदा ही समज आली की मजा अशी की, हा अहंभाव कधी गळून पडतो, कुठे जातो, हे आपलं आपल्यालाही कळत नाही. अहंभाव कुठेतरी खोल तळाशी जाऊन बसला, की लहानपणापासून जोपासलेलं वैषम्य येताजाता मधलं बोट दाखवत नाही, आयुष्यभर एखाद्यानं विश्वासानं सांभाळलेल्या गुपिताची किंमत कळते. हे सगळं घडून यायला जो प्रवास व्हावा लागतो, तोही सहज नसतो. मारूनमुटकून, एखाद्याच्या ऋणातून मुक्त व्हायला, किंवा खोट्या प्रतिष्ठेपायी हा प्रवास केला जातो. पण असं असलं, तरी शेवटी प्रेयस सापडणं महत्त्वाचं.

सर्वांच्या अभिनयाबद्दल बरंच लिहिलं गेलं आहे. नसिरुद्दीन शाह यांच्या कारकिर्दीतला हा महत्त्वाचा चित्रपट ठरावा. या चित्रपटातला त्यांचा वाचिक अभिनय अप्रतिम आहे. पडद्यावर फ्रेडीचा चेहरा नसिरुद्दीन शाह यांचा असला, तरी आवाज मात्र पूर्णपणे फ्रेडीचाच आहे. 'मकबूल'मधल्या पंकज कपूरनंतर फ्रेडीच्या भूमिकेतल्या नासीरच्या अभिनय अवाक करून जातो.

अनिल मेहता यांचं छायांकनही अफलातून आहे. अनेक वर्षांनी भारतीय चित्रपटांत इतक्या उच्च दर्जाची रात्रीची दृश्यं चित्रीत केलेली दिसली.

मलाही क्वीन आवडलेला .

मला भावलं ते तिच ट्रान्फॉरमेशन .
त्या मुलाच्या प्रेमात पडते , त्याची प्रत्येक गोष्ट ऐकते , तो टिपिकल नवरेपणा गाजवायला लागतो आणि मग ती आपल्याला शोभणार नाही म्हणून लग्न नाकारतो .

आपण उगाच रडत कुढत बसण्यापेक्शा एकटेच हनिमून ला जावे हा विचार करते .

ती शिकलेली आहे , ईन्ग्रजी बोलता येते , काही बाबतीत " नेव" आहे , असेनाका Happy . आयुश्य एन्जॉय करयाला शिकते , नविन मित्र मैत्रिणि जमवते , आत्मविश्वास परत मिळवते.

ती पब्मध्ये बेधुन्द होउन नाचते , दारू पिउन तर्र्र झालेल्या मित्राना गाडी चालवून परत हॉस्टेल्वर आणते , पाणिपूरीचा स्टोल लावते - प्रत्येक प्रसन्गात या अगोदर तिच्या होणार्या नवर्याने कसे तिचे खच्चीकरण केलेले ते मस्त दाखवले आहे .

ग्रीन टी ऑर्डर करताना , मुझे देर हो रही है , दोस्त इन्तझार कर रहे होंगे , असे त्याला ऐकवून जेन्वा ती रस्त्यातून फुलपाखरासारखी बागडत येते , तीचा आत्मविश्वस आवडला

कंगना फारशी आवडत नाही , पण यात मात्र - हॅट्स ऑफ .
राजकुमार नेहमीच आवडतो .

आणि तिचा तो इटालियन दोस्त तर फारच भारी >> + १०००.
तिची रिअ‍ॅक्शन पण भारी आहे ( नक्के आठवत नाही , पण काहीतरी भन्नाट डायलॉग मारते ती)

काही प्रसंग अनावश्यक किन्वा लाउड आहेत हे मान्य करूनही आवडला .

तुम्हाला आवडला नाही हे मान्य. पण आता मला किती आवडला हे पण लक्षात घ्या >>> + १००

एक सूचना - हा सिनेमा विनोदी म्हणून पाहणे हे 'द डार्क नाईट' अ‍ॅक्शन थ्रिलर म्हणून पाहण्यासारखे आहे! >> अगदीच परफेक्ट आगाऊ.

इतक्या उच्च दर्जाची रात्रीची दृश्यं चित्रीत >> आणी शिवाय तो रात्रीचा अंधार सार्‍याच चित्रपटाचा जो एक पोत ठरवून टाकतो, आणि आपल्यावर परिणाम करून जातो- ते महान..

पडद्यावर फ्रेडीचा चेहरा नसिरुद्दीन शाह यांचा असला, तरी आवाज मात्र पूर्णपणे फ्रेडीचाच आहे.>>> आणि स्वतःचा आवाज/ शब्दफेक इतकी आयकॉनिक असताना तिचा मोह अथवा कंफर्ट झोन टाळून त्या 'पात्रा'च्या आवाजात उतरणे हे भल्याभल्यांना जमत नाही.

प्रत्येक प्रसन्गात या अगोदर तिच्या होणार्या नवर्याने कसे तिचे खच्चीकरण केलेले ते मस्त दाखवले आहे

मलाही ते खुप आवडले चित्रपटातले. तिचे खच्चिकरण तीही दरवेळी स्विकारते कारण तशीच पद्धत आहे. आपल्यातच कमी आहे तिने गृहीत धरलेले असते आणि प्रत्येक वेळी तिला तिची क्षमता कळते. ती कळल्यावर मुळात अजिबात नसलेला आत्मविश्वास हळूहळू तयार होत जातो आणि शेवटी अतिशय शांतपणे ती होणा-या नव-याला नाकारते, तेही त्याला थँक्स म्ह्णुन.

आज फॅनी पाहणार.

फायंडींग फॅनी हे नाव ऐकल्यावर हे कुठेतरी ऐकलेय अशी जाणिव सतत होत होती. या नावाचा किंवा फॅनी हे नाव असलेला एक विदेशी चित्रपट मी कुठेतरी पाहिलाय, त्याबद्दल बरेच वाचलेय असे सतत वाटत होते. पण नेमके हाती काही लागत नव्हते. काल अचानक fanny and alexander हे नाव आठवले आणि मग फॅनी कुठे ऐकले ते लक्षात आले Happy

नुकताच मुस्कुराहट नावाचा नितांत सुंदर चित्रपट पाहिला . प्रियदर्शन या सध्याच्या आघाडीच्या दिग्दर्शकाचा हा हिंदी मधला बहुदा हा पहिला चित्रपट . जय मेहता हा अभिनेता (याला काही typical मसाला चित्रपटात पाहिले होते . या चित्रपटा प्रमाणेच त्याचे बहुतेक चित्रपटांची निर्मिती त्याच्या वडिलांनीच केली होती ) रेवती (माझी आवडती अभिनेत्री ) आणि अमरीश पुरी (कमाल ) हि तीन मध्यवर्ती पात्र . आपल्या दुरावलेल्या बापाला पुन्हा आयुष्यात आण्यासाठी एका मुलीने राजू (जय मेहता ) याच्या सहाय्याने केलेल्या नाना खटपटी हा चित्रपटाचा मध्यवर्ती विषय . यावरून हा चित्रपट गंभीर आहे असे वाटू शकते पण तसे नाही . धमाल विनोदी चित्रपट आहे . राजू चा धान्दरट आणि कायम मार खाणारा मित्र (अन्नु कपूर ) आणि अमरीश पुरी च्या घरात काम करणारा घाबरट नौकर (जगदीप ) यांनी धमाल आणली आहे . रेवती तर उत्तम अभिनेत्री आहेच पण जय मेहता पण बर काम करून जातो . पण चित्रपटाचा backbone आहे अमरीश पुरी . एका खडूस रुक्ष कडक माणसापासून ते नंतर मुलीच्या सहवासात आल्यानंतरचा हळुवार आयुष्य समरसून जगणारा इसम त्याने भन्नाट रंगवला आहे . चित्रपटात अनेक हळवे प्रसंग पण तरलतेने घेतले आहेत . विशेषता climax संगीत आपल्या राम लक्ष्मण याचं आहे . गुन गुन करता आया भवरा हे गाण प्रियदर्शन ने सुंदर शूट केल आहे . शितावरून भाताची परीक्षा करायची असेल तर उत्सुकाना तुनलिवर बघता येईल . पूर्ण चित्रपट एका हिल स्टेशन वर घडतो आणि अप्रतिम छायांकन आहे . तस ते प्रियदर्शन च्या बहुतेक सिनेमात असत . आमचा चित्रपट हृषीकेश मुखर्जी यांच्या चित्रपटाच्या जातकुळीतला आहे असे आजकाल उठसुठ कुणी पण म्हणतो . पण असला काही दावा न करता चित्रपट अडीच तास निखळ मनोरंजन देतो . कुणाला काही वेगळ try करायचं असेल तर हा चित्रपट आवर्जून बघा .

अवांतर - सुरुवातीच्या काळातला प्रियदर्शन हा (मुस्कुराहट , गर्दिश , विरासत ) हा पोस्ट हेराफेरी इरा पेक्षा खूप वेगळा वाटतो

धन्यवाद नंदिनी . पण काळाच्या ओघात हा चित्रपट हारवून गेला . त्याची dvd पण बहुदा मिळत नसेल . हि पोस्ट वाचून काही लोकांनी जरी हा चित्रपट पाहिला तर पोस्ट च चीज : )

तिची रिअ‍ॅक्शन पण भारी आहे ( नक्के आठवत नाही , पण काहीतरी भन्नाट डायलॉग मारते ती) >>>>>>>>>>>. ती म्हणते आपको पता नही मेरा सेन्स ऑफ ह्युमर बहोत अच्छा है....तेव्हा तो हिंदी न समजुन असा कसानुसा चेहरा करतो

माझा अत्यंत आवडता चित्रपट. >> माझाही!! फ्रेश चित्रपट आहे मुस्कुराहट!! गर्दिश आणि मुस्कुराहट मधील अमरीश पुरीचा पॉझिटिव्ह अभिनय सुखद होता. रेवती तर ऑटाफे... अगदी हल्ली हल्लीच्या २ स्टेट्स मध्येही (खरं तर यात जास्त अमृता आवडलेली तरी)

...

गर्दिश आणि मुस्कुरहट मधला अजून एक समान दुवा म्हणजे अनु कपूर . गर्दिश मध्ये भिकार्यांना वेगवेगळ्या ठिकाणी बसवून भिक कशी मागायची याची ट्रेनिंग देणारा आणि त्याचा धंदा उघडणारा अन्नू कपूर लैच भारी होता

नुकताच मुस्कुराहट नावाचा नितांत सुंदर चित्रपट >>>> प्लस वन वन वन

मी हा चित्रपट खूप लहानपणी (जेव्हा आलेला तेव्हा) पाहिलेला, तेव्हा फार्र आवडलेला. आता फक्त स्टोरी आठवतेय पण त्यातील छोटेछोटे प्रसंग नाही आठवतेय. पण चित्रपटाची आठवण कधी आलीच तर वाटते तेव्हा तो मला लहान बुद्धी म्हणून आवडलेला की खर्रच चांगला चित्रपट होता .. पण आता हि पोस्ट बघून वाटतेय की कधी परत बघायचा मौका आला तर गमावू नये ...... धन्यवाद Happy

100 ft journey पाहिला.. खूप आवडला.. अतिशय संयत हाताळणी आणि सुरेख दिग्दर्शन आहे. सगळ्यांचेच अभिनय मस्त! ओम पुरी उच्च ! नविन हिरो, हेलन मिरन पण छान..
पाककृती बनवण्याचं चित्रण एकदम सही झालय.. शिवाय युरोपातील लोकेशन्स त्यामुळे चित्रपट एकदम नेत्रसुखद झालाय!
हेलन मिरनला पहाताना डेविल वेअर्स प्राडा आणि ज्युली अँड ज्युलियामधल्या मेरील स्ट्रीपचं मिश्रण केल्यासारखं वाटतं.. मेरील स्ट्रीप पण ह्या रोलमध्ये एकदम फिट बसली असती.

तिची रिअ‍ॅक्शन पण भारी आहे ( नक्के आठवत नाही , पण काहीतरी भन्नाट डायलॉग मारते ती) >>>>>>>>>>>. ती म्हणते आपको पता नही मेरा सेन्स ऑफ ह्युमर बहोत अच्छा है....तेव्हा तो हिंदी न समजुन असा कसानुसा चेहरा करतो >>>>
नाही गं अनिश्का , तो ऑलेक्झांडर Happy

क्वीन मलाही प्रचंड आवडला.
कंगणा बोले तो एकदम रियल अँड झक्कास , मला आता कळलं की ऋयाम आणि चिनुक्स , कंगणाला एवढा हिंग का लावतात ते ? Proud

गला बादला वर्कचा ड्रेस घालते पण दागिने काहीच नसतात. असले तरी कायतरी अतरंगी फुलांचे असतात. बहुदा नंतर ती कशी वेल ग्रूम होते ते दाखवण्यासाठी सुरुवात साधी.<<< बहुतेक पंजाबी लोकांमध्ये मेहंदीच्या कार्यक्रमाला फुलांचे दागिने घातलेले असतात. एका मित्राच्या लग्नाच्य सीडीमध्ये पाहिलं होतं.>>
झी जिंदगी वरच्या काही सिरियल्समधेही मेहंदीच्या वेळेस फुलांचेच दागिने घातलेले दाखवले आहेत.

मुस्कुराहट नावाचा नितांत सुंदर चित्रपट>>>>+१०० मीपण हा चित्रपट खूप लहानपणी पाहिलेला .कधिहि पहावा असा हा चित्रपट आहे.रेवतीने मस्त काम केलय .ती कायमच क्युट दिसते अगदि अगदी हल्ली हल्लीच्या २ स्टेट्स मध्येही अलिया पेक्षाहि.तिच्या प्रेमापोटी रामुचा भयपट' रात'हि त्यावेळि पाहिलेला. प्रियदर्शन चा आणखि एक चित्रपट" डोली सजाके रखना" लहानपणी पाहिलेला तेव्हा खुपच आवडलेला.त्यातलं "किस्सा हम लिखेंगे " हे गाणं अजुनहि आवडतं.प्रियदर्शनचे चित्रपट फार सुन्दंर इमोशन्स दाखवितात. डोली सजाके रखना ह्या चित्रपटात ज्योतिका ,अक्षय खन्ना आहे . अक्षयच्या मित्रांची कामंही मस्त धमाल आहेत.जरुर बघा .

जाता येताविमानात ४ सिनेमा बघितले. मी सहसा हिंदी आणि इंग्रजी चित्रपट टाळतो. कारण ते कुठेही बघू शकतो. पण ह्यावेळी हाय-वे आणि वक्त (जुना) बघितला.

हाय-वे बरा आहे. आलिया भटने कामही चांगले केले आहे.(मला तरी अपेक्षित नव्हते) मध्ये थोडा रेंगाळ्यासरखा वाटला. क्लायमॅक्स चांगला आहे.

वक्त बर्‍याच वर्षांनी परत पाहिला. काह प्रसंग विसरलो होतो. राजकुमारची ऐंट्री, शर्मिला सुनिल दत्तला त्याच्या जन्मावरुन खडसावते तो प्रसंग, शशीकपुर चिनॉयला redhanded पकडतो, वगैरे. दिग्दर्शक जरी चोप्र असला तरी मलातो बी. आर. चोप्राचा म्हणुन आवडतो. त्याचे चित्रपट नेहमी करमणुक करणारे असले तरी संदेशही देत असत. थोडेफार लॉजिकल असायचे.

Miracle In Cell no 7: मिळाल्यास नक्की बघाच. अप्रतिम कोरीयन चित्रपट आहे. विमानात जे हिंदी चित्रपट होते त्यांच्या तुलनेत हा वरचा क्लास होता. Mentally Challenged आणि आपल्या ६-७ वर्षाच्या मुलीवर नितांत प्रेम असलेल्या यंगवूवर त्याच वयाच्या दुसर्‍या मुलीवर रेप आणि खून केल्याचा आरोप येतो. त्याला सोडविण्यासाठी तुरुंगातील सहकारी जे करतात आणि त्याचे मुलीशी असलेले हृदयस्पर्शी नाते ह्याचे उत्कृष्ट सादरीकरण आहे. अभिनय तर अनुभवण्यासारखा आहे.

सिमंतिनी, हाहाहा
फवाद खानची पन जादू नाही वाचवू शकली काय मूवील?

सोनम तशी पण खूप आचरटपणा करताना ट्रेलर मध्ये दिसलीय.

क्वीन मला खूप आवडला ! आणि कंगना चा अभिनय पण .
बरेच सकारात्मक मेसेज आहेत यात ..
हिरो ने पण टिपिकल orthodox नवरा छान रंगवला आहे .आणि कंगना ने आधी आत्मविश्वास नसलेली पण नंतर तो मिळवलेली क्वीन छान रंगवली आहे .

सोनम तशी पण खूप आचरटपणा करताना ट्रेलर मध्ये दिसलीय.>>>>>>>>>>>. सोनम आचरट पणा करताना मुव्ही मधे दाखवलीय?? मग एरवी ती करते ते काय असते?????

फवाद खान लैच क्युट अ‍ॅन्ड हॅन्ड्सम दिसलाय पण त्याला अ‍ॅक्टिंगला जास्त काही स्कोप नाही मिळाला खुबसुरतमधे. स्टोरी पण काही खास नाही. सोनम एक मॅनरलेस मुलगी शिवाय दुसरे काही दाखवु शकली नाही सिनेमात. एवढी काही खास पण दिसली नाहिये. फवाद खानसाठी म्हणुन पूर्ण बघितला Proud

Pages