चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजचा माझा दिवस हा मीही अपघातानेच टीव्ही वर पाहिला. चित्रपट म्हणून चांगलाच आहे. सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून मान्य केले तरी जरा जास्तच हळवा आहे... त्यामुळे रिअलिस्टिक वाटत नाही. भूमिका सगळ्यांच्या सुंदर आहेत. कसदार अभिनय आणि वेगळा विषय आहे. मात्र हॉस्पिटलला असलेला स्टेनो सलाईनसकट ऑफिसमध्ये आणणे हे फारच हास्यासपद वाटले त्यामुळे चित्रपटाचे गांभीर्यही कमी होते.

ता. क. यातील पब्लिसिटी की कला संचनालयाच्या बडबड्या कर्मचारी बाईंचे एक पात्र आहे ते ज्या बाईंवरून बेतण्यात आले आहे त्या बाईंची एकदा गाठ मीटिंगमध्ये झाली. त्याना यथास्थित झापून गप्प बसवावे लागले Happy

मात्र हॉस्पिटलला असलेला स्टेनो सलाईनसकट ऑफिसमध्ये आणणे हे फारच हास्यासपद वाटले त्यामुळे चित्रपटाचे गांभीर्यही कमी होते.>>> एक्झॅक्टली! फार्सिकल विनोद मधेच घुसडले आहेत. दुसरे म्हणजे मुख्यमंत्री = चांगला आणि बाकीचे सरकारी नोकर= वाईट असे सोपे समीकरण धरले आहे. महेश मांजरेकर अडवणूक करतो कारण तो उगाच अडवणूक करणारा आहे हे दाखवणे सोपे आहे. मंत्र्यांचा एखादा रॅण्डम नियम अमलात आणणे व तो रेग्युलराईज करणे हे कठीण काम असते - एखादा 'तयार' नोकरशहाच ते सहज करू शकतो. बाकीच्यांना त्यात काय अडचणी दिसतात ते किमान थोडे दाखवून मग हे सोडवलेले दाखवलेले नाही.

येथे अजून चर्चा आहे याबद्दल
http://www.maayboli.com/node/42168

लिंक बद्दल धन्यवाद फारेन्डा.. फार्सिकल विनोदांबद्दल अनुमोदन.. बर्‍याचदा काहीही हां (जान्हवी स्टाईल) म्हणावंसं वाटलं. पण एकंदर सिनेमाचा फिलगुड फॅक्टर आवडला. इच्छा तिथे मार्ग हा संदेश व्यवस्थित पोचला. हृषिकेश जोशीचा उल्लेख राहून गेला वर. त्याच्या बद्दल आजकाल वेगळं असं लिहिण्यासारखं नसतंच. म्हणजे साचेबद्ध भूमिका करतो या अर्थाने नाही, तर त्याला कुठलीही भूमिका द्या.. त्याचं तो सोनं करतो या अर्थाने.

ह्या वीकेंड ला दावत-ए-ईश्क बघितला. चांगला आहे. 'डोक्याला त्रास नाही' असे हलके-फुलके चित्रपट आवडत असतील तर बघण्यासारखा आहे. माझ्यापुरत्या चांगल्या कलाकृतीची जी व्याख्या आहे, की ज्याचा हँगओव्हर राहीला पाहीजे, त्यात जरी बसत नसला, तरी आवडला. परिणीता चोप्रा, अनुपम खेर, सिद्धार्थ रॉय कपूर सगळ्यांची कामं छान झाली आहेत. फार ईंप्लिसीट अर्थाचे चित्रपट बघण्याचा नेहेमीच मूड असतो असं नाही (किंबहून क्वचितच असतो). त्यामुळे वेळ छान गेला.

परवा कुठल्या तरी चॅनल वर हिरोपंती पाहिला. कथा अत्यंत फालतू. पण गाणी चक्क आवडली मला. मेरे नाल तू व्हिसल बजा आणि आ रात भर जाए ना घर.
शिवाय फायटिंग चे सिन्स स्लो मोशन मधले तर मस्तच होते. टायगर श्रॉफ हा अव्वल दर्जाचा मार्शल आर्टिस्ट आहे त्यामुळे फायटिंग सिन्स पर्फेक्ट अ‍ॅटिट्यूड ने केले आहेत.

मी पण हिरोपंती पाहिला .
मला टायगर श्रोफ झेपला . ( आवडला म्हणण धाडसाचं ठरेल)
हिरवीण जास्त आवडली .
टायगर श्रॉफ हा अव्वल दर्जाचा मार्शल आर्टिस्ट आहे.त्यामुळे फायटिंग सिन्स पर्फेक्ट अ‍ॅटिट्यूड ने केले आहेत. >>> + १

काल " बँग बँग " चे अ‍ॅडव्हन्स बूकिन्ग करून आले !

बघूया काय होतय ते Happy

रिया एकटीने थेटरात? Uhoh

असो, पण टायगर श्रॉफ नाचतो ही उत्तम. आणि चेहरा निष्पाप आहे अगदी.
कपिल च्या शो मध्ये आला होता तेव्हा ही खूप शहण्या मुलासारखा वागत होता.

मला हिरोपंतीची गंमत च कळली नाही. बाप इतका स्ट्रिक्ट, ऑनर किलिंगकडे झुकणारी कथा दाखवली आहे, पण पोरगी इतके रिविलिंग कपडे घालते. म्हणजे पाठ उघडी, पोट उघडं, झिरझिरित ओढणी.
आणि घरात बायांपेक्षा पुरूष चौपट.

अगं एकदिवशी जाम बोअर होतं घरात बसुन म्हणून उठले आणि सिनेमा पाहिला गेले तर हा लागला होता.
काहीतरी बघायचं म्हणून पाहिला गेले
आणखी बोअर होऊन परत आले
२८० रुपयात एसी मधे चांगली झोप मात्र काढुन आले Proud

फायटिंग चे सिन्स स्लो मोशन मधले तर मस्तच होते. टायगर श्रॉफ हा अव्वल दर्जाचा मार्शल आर्टिस्ट आहे त्यामुळे फायटिंग सिन्स पर्फेक्ट अ‍ॅटिट्यूड ने केले आहेत. >>> +1

शादी से पेहले. चित्रपट बेकार असणार आहे हे माहीत असुनही अ‍ॅम्झॉन वर फुकटात आहे म्हणुन चालु केला. पण धमाल आली टाईम पास म्हणुन नक्की बघा.

" खुदा के लिये " हा पाकिस्तानी चित्रपट सिडीवर बघितला. शान, फवाद खान यांच्या मुख्य भुमिका आहेत.
कथा ९/११ च्या अवतीभवती फिरते पण तो मुख्य कथाभाग नाही. इस्लाम धर्मातल्या काही बाबींवर चर्चा आहे ( मुलीचे मर्जीविरुद्ध लग्न, संगीत वगैरे ) नासिरुद्दीन शहा पाहुणा कलाकार आहे तरी महत्वाची भुमिका आहे.
सर्वांचाच अभिनय सुंदर आहे. भडक दृष्ये पूर्णपणे टाळली आहेत.

मला यातले संगीत आणि पार्श्वसंगीतही खुप आवडले. नीरभरन कैसे जाऊ .. या ठुमरीवर देशोदेशीच्या संगीत
विद्यार्थ्यांनी दिलेली साथ खुप छान वाटते. पार्श्वसंगीतात सरगम आणि तबल्याच्या बोलाचा छान वापर आहे.

http://www.youtube.com/watch?v=1ymzQHW_de8

इथे पूर्ण चित्रपट आहे.

दिनेशदांनी पाकिस्तानी सिनेमा चा विषय काढला म्हणून.
मध्यंतरी दोन पाकिस्तानी सिनेमे पाहण्यात आले.

'बोल' - सगळे पाकिस्तानी माहित नसलेले चेहरे, अपवाद आतिफ अस्लमचा. एका पाकिस्तानी मंदीत दुकान चालणार्‍या हकीमाला सगळ्याच मुली.. एक मुलगा होतो तो ही transgender. या हकीम बापाचा, त्याच्या मुलींचा, 'त्या' मुलाचा जगण्यासाठीचा संघर्ष अशी थोड्क्यात गोष्ट. पोट भरण्यासाठी या खानदानी कर्मठ मुस्लीम हकीमाला काय काय थराला जावं लागतं, दबलेल्या कर्मठ वातावरणात मुलींचं काय होतं, 'त्या' मुलाचं काय होते.. ह्या सगळ्याचं भयानक चित्रण सिनेमात आहे. आतिफचं 'होना था प्यार, हां मेरे यार' असं एक गाणं आहे.. आवडलं. मला स्वत:ला त्याचा आवाज आणि गाणी आवडतात.. आतिफचा आवाज आणि गाणी हा परिसंवाद आणि वादाचा विषय आहे.पण असो..

'रामचंद पाकिस्तानी' - भारत-पाक सिमेवरच्या पाकिस्तानातील एका गावातला एक छोटा हिंदू दलित मुलगा रामचंद, नकळत सीमा पार करुन भारतात येतो आणि पकडला जातो. मागोमाग त्याचे वडील ही पकडले जातात. जेल मधल्या ह्या दोघांचे दिवस याचे चित्रण या सिनेमात आहे. मुलाच्या आईचे पात्र नंदिता दास ने केलं आहे. रामचंद चं काम करणार्‍या लहान मुलाचं काम कमालीचं आवडलं.

वेगळे सिनेमे पाहायची इच्छा असणार्‍यांसाठी आवर्जून पाहण्यासारखे हे दोन्ही...

Thanks मित.. इतक्या सुंदर चित्रपटाची माहिती करून दिल्याबद्दल.

काल शबाना आझमी यांची अंकुर फिल्म बघितली... जास्त काय बोलू Hats off

बायदवे हिंदी पि़झ्झा भयपट कसा आहे???

बोल मधे महिरा खान खुपच सुंदर दिसली होती
बहुतेक त्या चित्रपटात पाकिस्तान्च्या सगळ्याच टॉपच्या अभिनेत्री होत्या

मित.. बोल माझाही आवाडता चित्रपट.

बाबा आमटे चित्रपटाची इथली जाहीरात कोण करतंय ? जी आडवी जाहीरात आहे त्यातले नाना व सोनालीचे फोटो अगदी अस्पष्ट आहेत. चांगल्या चित्रपटाची जाहीरात दर्जेदार असावी अशी अपेक्षा आहे.

पण पोरगी इतके रिविलिंग कपडे घालते. म्हणजे पाठ उघडी, पोट उघडं, झिरझिरित ओढणी.
आणि घरात बायांपेक्षा पुरूष चौपट.

>> दक्षे, कोणी काय आणि किती कपडे घालावेत हा व्यक्तीस्वातंत्र्याचा प्रश्न आहे. काय उघडं टाकाव आणि काय नाही याचे कुठे नियम नाहीत. असले तरी मान्य करण्याचे कार ण नाही. आणि पुरुष अर्ध्या च्ड्ड्या आणि बनियानं घालून निर्लज्जपणे हिंडतात त्याचे काय? कसल्या मध्ययुगीन कल्पना आहेत ... श्या: . ही मॉरल फौजदारकी तुला कोणी दिली. आणि हे उघडं टाकलं अन ते उघडं टाकलं म्हणून पुरुषाना प्रोव्होक होण्याचा अधिकार कुणी दिला...?
तु आता काही दिवस पळून जा कशी, आता पुरोगामी विचारांच्या महिला येतील आणि तुला फाडून खातील . मग कसला सिनेमा अन कसलं काय. ...

Finding Fanny सगळ्यांच पोस्टचे अनुमोदन. चिनुक्स्ला १००००+

खुदा के लिये पण आवडला होता - फार त्रास झाला होता बघून, पण एकूण चांगला चित्रपट

तेरे बिन लादेन धमाल होता

मध्ये देढ इश्किया बघितला --वोह जो हममे तुममे करार था आणि इतालवीजी अफलातून

नसीर लाजवाबच दोन्ही सिनेमात

आज 100 feet journey चा नंबर आहे

east is east and west is west ही आवडला होता. ओमपुरी आणि त्याचा identity चा प्रवास खूप छान

हैदर स्ट्राँग पाँईंट्स - १) म्युझिक - गाणी सिनेमात कुठेही घुसडलेली वाटत नाहीत. आवर्जून प्लेलिस्ट बनवावी अशी गाणी २) शाहीद - कुठे कुठे हास्यास्पद होईल अशी शंका असताना (उदा: वडिलांच्या कबरीवर रडताना, स्वगते इ.) सीन्स खेचून घेतो ३) काश्मीरमधले शुटींग (आणि तत्कालीन १९९० मधली सलमानची गाणी).
कॅन डू बेटर - १) तब्बू - मकबूल मधल्या पेक्षा तिचा संघर्ष फार वेगळा असतानाही तेवढाच समोर येतो. तिच्याशिवाय दुसरे कुणीही ही भूमिका करू शकणार नाही. पण तरी एक अॉथर बॅक्ड रोल असताना शाहीद उठून दिसावा म्हणून ही अंडरप्ले करते अस उगीचच वाटत राहील. २) श्रद्धा कपूर - गुलझारनी शाहीदच्या 'खुल कभी तो' गाण्यात हिच्या बरोबरचा वेळ म्हणजे "गुलमोहर" (आता काश्मिरी माणूस गुलमोहर म्हणणे म्हणजे केवढी एक्सोतिक वाटली पाहिजे ही!) म्हणल आहे. पण बाईसाहेब ओके ओकेच Sad

वाईट: खूप हिंसक वाटला. काश्मीरची पार्श्वभूमी ठीक पण तिथे आता सगळ हळू हळू मार्गी लागत असताना खरच ह्या हिंसाचाराची गरज होती का (मार्गी लागत आहे हे माझे मत सिनेमाच्या शेवटी असलेल्या नोट्स वरून, बाकी राजकारणाचा अभ्यास नाही). हैदरचा (हॅम्लेट) संघर्ष स्वतःशी जास्त असतो. तो पार झाकोळून जातो.

हैदर मध्ये आधीच्या सीन मध्ये टकलू असलेला शाहीद बरोबर श्रद्धा कपूर गायला आली की लगेच एकदम क्रू कट मध्ये येतो. तेल गोठणारी थंडी असताना कसे काय असे झटपट वाढतात केस! Sad

Pages