चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पार्टीगाण्यांच्या दक्षिणाच्या प्रश्नाबाबत मी सहमत आहे. जरी हे सगळे मेक-बीलिव्ह असले तरी पार्टीमधे एखाद्या बर्‍यापैकी गाणार्‍या व्यक्तीला गायला लावणे हे प्रत्यक्षातही खूप कॉमन आहे. त्यामुळे चित्रपटात अशा वेळेस खालील काही पद्धतीची गाणी लोक का गातात (जे प्रत्यक्षात फारसे होऊ शकणार नाही) मला नेहमी प्रश्न पडतो:
१. कमालीची रडकी गाणी.
२. श्रीमंतांच्या पार्टीत जाउन आपण गरीब आहोत म्हणून आपल्याला काही मिळत नाही हे रडगाणे
३. थोडे जरी डोके असेल तरी हे गाणे कोणाला उद्देशून व का आहे हे सर्वांना सहज समजेल हे उघड असले तरी हीरॉइनच्या लग्नाच्या, सगाई ई च्या पार्टीत तू बेवफा है छाप गाणे
Happy

१. कमालीची रडकी गाणी.
२. श्रीमंतांच्या पार्टीत जाउन आपण गरीब आहोत म्हणून आपल्याला काही मिळत नाही हे रडगाणे
३. थोडे जरी डोके असेल तरी हे गाणे कोणाला उद्देशून व का आहे हे सर्वांना सहज समजेल हे उघड असले तरी हीरॉइनच्या लग्नाच्या, सगाई ई च्या पार्टीत तू बेवफा है छाप गाणे

>>>
सगःळे हिशेब चुकते करायला पार्ट्या हे एकमेव ठिकाण जणू Proud

शूम्पी तुमने मेरे मुंह की बात छिन ली. मलही रंगिला रे चीच आठवण झाली.

सगःळे हिशेब चुकते करायला पार्ट्या हे एकमेव ठिकाण जणू >> Lol

जरा पियानो सॉन्ग्जवर पण या ना.... Happy

विशेषतः पियानोच्या फळी आणि दाण्ड्क्याच्या मधल्या त्रिकोनातून घेतलेला क्यामेरा अँगल....

हीरोची बोटे कुठे आणि सूर कुठे ::फिदी:

आजकी रात मेरे दिलकी सलामी ले ले
कल तेरी बज्मेसे दिवाना निकल जायेगा
शमा रह जायेगी परवाना चला जायेगा....

मला तर तो डायरेक्टर कस सांगत असेल हेच कळत नाही?
उदा हिरोईन ला सांगत असेल का कि हे बघा आता तुमचा प्रेमभंग झालेला आहे आणि तुमच्या एक्स ची सगाई आहे तर त्या पार्टी मध्ये जावून तुम्ही दर्द भरे गाणे म्हणत नाचणार आहात.
किंवा वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गाणे आहे त्यावर नाच

मला तर तो डायरेक्टर कस सांगत असेल हेच कळत नाही?
उदा हिरोईन ला सांगत असेल का कि हे बघा आता तुमचा प्रेमभंग झालेला आहे आणि तुमच्या एक्स ची सगाई आहे तर त्या पार्टी मध्ये जावून तुम्ही दर्द भरे गाणे म्हणत नाचणार आहात.>>>> याचा मस्त स्पूफ ओम शांती ओम् मध्ये केला होता. Happy

हे लोक पार्टीबिर्टी भरवुन त्यात पन्नास माणसे बोलुन अशा ह्या चव्हाट्यावर आपली खाजगी दु:खे गाण्यातुन का गातात, ज्याला जे सांगायचे ते आधीच का सांगत नाहीत हा प्रश्न मला नेहमी पडायचा. Happy

रंगीला रे कसल्या अचाट स्टेप्स दिल्यात तिला आणि त्या बाईने साडी नेसुन त्या केल्यात.. कशा केल्या असतील बिचारीने देव जाणे... मी तर पाय गुरफटुन पडले असले बदकन... Happy

संगम चित्रपटावर मागे तुफानी चर्चा झालेली.. रा.क.ला मी शक्य तितक्या शिव्या घातलेल्या... पण तरीही संगम हा चित्रपट एका पिढीला भारीच भावलेला बहुतेक. एकदा टीवीवर लागला अस्ताना बाबांचे एक मित्र आमच्या बरोबर तो पाहात होते. पाहताना ते सोबत डायलॉग्स पण बोलत होते.. आम्ही त्यांचे हे नविन रुप अवाक होऊन पहात बसलेलो. Happy

पियानो सॉंग्सवर कित्येक हिरो शेण सारवल्यासारखे बोटे फिरवायचे...

या विकांताला 'एक्स्पोज' बघितला .

सिनेमा अगदीच कैच्याकै आहे . सुरुवातीची २०-३० मि. पात्रपरिचयात घालवली आहेत , शेवट्ची १०-१५ मि. खूनाची उकल करण्यात .. तीही अगदीच बाळबोध आहे . फक्त शेवटचा एक ट्विस्ट सोडला तर .

पण खरा भाव खाल्ला आहे तो हिमेश रेशमियाने .
त्याच पात्र राज्कुमार वर आधारित आहे अस वाचलेलं , बर्यापैकी मस्त दाखवल आहे .
त्याच्या मक्ख चेहर्याने आणखी रंगत आली Wink

हनी सिंगही बर्यापैकी मजा आणतो .

चित्रपट मोठ्या ग्रुपबरोबर थेटरात जाउन शिट्या वगैरे मारत बघायला मजा आली असती.

@साधना ताई: पडलो मी खुर्चीतून Rofl
माणूस (नायक/नायिका) किती हि गरिब असला तरी त्याच्या घरी एक पियानो आणि त्यांची एक फॅमिली धुन असतेच. Uhoh
कसं परवडत असेल?

आणि हिन्दीच नाही , काही मराठी नायकाना ही पियानो यायचा ( आठवा : सूर तेच छेडिता )

हा एकमेव असणार.... मराठी हिरो फारतर पेटी वाजवत तेव्हा.

फॅमिली धून वरून आठवलं. मला लहानपणी आपण हरवलो गर्दीत कुठे तर कधीच सापडू शकणार नाही कारण अजून आपल्याला आपल्या घराचं गाणंच माहिती नाहीये अशी भिती अनेकदा वाटून गेलीये.
यादोंकीबारात वगैरे बघितल्याचा परिणाम... Happy

हा एकमेव असणार.... मराठी हिरो फारतर पेटी वाजवत तेव्हा.>>> हो ना . आणि हिरॉईनी सतार, तंबोरा ,वीणा यापैकी एक काहीतरी .

फॅमिली धून वरून आठवलं. मला लहानपणी आपण हरवलो गर्दीत कुठे तर कधीच सापडू शकणार नाही कारण अजून आपल्याला आपल्या घराचं गाणंच माहिती नाहीये अशी भिती अनेकदा वाटून गेलीये. -भीती नाही पण आपण फारच डाऊन मार्केट असल्याच वाटल होत मला हा सिनुमा बघितल्यावर. आम्ही तिघी बहिणी असल्यामुळे तर फारच.

यादोंकीबारात वगैरे बघितल्याचा परिणाम... <
नुस्ती याकीबा नव्हे तर तुम बिन जाऊं कहा ( प्यारका मौसम) , नाशीर हुशेणच्या पर्तेक पिच्चरमंदी फ्यामिली गाणं वळखीसाटी असायच...

पियानो वरून आठवलं टॉवर हाऊस मधलं अजित आणी शकिला चं 'मैं खुशनसीब हूँ' हे गाणं. गाणं छान आहे आणी मला आवडतं. पण त्यात अजित पियानो च्या पट्ट्यांना (keys) ना, एका लयीत गोंजारतो ज्याचा गाण्याच्या सुरांशी, लयीशी काहिही संबंध नाहीये.

http://www.youtube.com/watch?v=0gvnjI6k-08

नी Happy

पण त्यात अजित पियानो च्या पट्ट्यांना (keys) ना, एका लयीत गोंजारतो Proud बघितला विडीओ. भयंकर विनोदी वाटतेय ते Happy

मला लहानपणी आपण हरवलो गर्दीत कुठे तर कधीच सापडू शकणार नाही कारण अजून आपल्याला आपल्या घराचं गाणंच माहिती नाहीये अशी भिती अनेकदा वाटून गेलीये. >>> Lol खत्रा.

स्पिलर्बग चा war horse (2011) पाहीला. पहील्या world war च्या पार्श्वभुमीवर इंग्लडच्या एका खेडयात राहणार्‍या एका टीनएजर मुलाची आणि त्याच्या घोडयाची गोष्ट आहे. छान वाटला.

नुस्ती याकीबा नव्हे तर तुम बिन जाऊं कहा ( प्यारका मौसम) , नाशीर हुशेणच्या पर्तेक पिच्चरमंदी फ्यामिली गाणं वळखीसाटी असायच... <<
अहो ल्हानपणी एवढे सगळे बघितले नव्हते ना.

काल 'किक' पाहिला. सल्लूभाई चा 'वॉन्टेड' पासून पंखा आहे...त्यामुळे चित्रपट आवडला. त्या आधी त्याचा फक्त 'तेरे नाम' आवडला होता. जॅकलिन या सिनेमातली सरप्राईज फॅक्टर म्हणावी. सिनेमाभर मस्त दिसली आहे, आणि कतरिना पेक्षा खूपच चांगला अभिनय केला आहे. एका गाण्यापूरती बदकमूखी नरगिस फाकरी आहे..गाणंभर शाळेत विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात लहान मुलं जशी नाचतात तस्सा नाचायचा प्रयत्न केला आहे. त्या गाण्याचे बीट्स कितीही कॅची असले तरी या बाईच्या एकंदर हावभावामुळे गाणंच हास्यास्पद वाटतं. रणदिप हूडा, नवाजुद्दिन, मिथुनदा आपापल्या वाटेला आलेली कामं चोख बजावतात. टिपिकल सलमान खान मूव्ही आहे. सल्लूभाय चे फ्यान असाल, तर कणेकरांच्या भाषेत बोलायचं तर, सलमानखानचा चित्रपट, घरचं कार्य.. त्यामुळे चुकवू नका... आणि हो.. 'मेरे बारे ज्यादा मत सोचना, दिल में आता हूं, समझ में नही ' असले डायलॉग फक्त आणि फक्त सलमानच्या तोंडीच ऐकावे !!! (इथे मस्कत मधे सुद्धा या डायलॉगवर थिएटर मध्ये टाळ्या आणि शिट्ट्या पडल्या :))

स्पॉयलर !!!
मध्यांतरातून अचानक 'धूम ३' सुरु झाला की काय अशी शंका येते !!!

जॅकलिन अजिबात आवडत नाही. त्यामुळे महत्प्रयासानेच बघावा लागणार हा.

A good day to die hard पाहिला. घरी व्हिडीओ वर पाहायला ओके आहे. पण पहिल्या चार एवढा नाही. आता पुन्हा एकदा पहिल्या चार ची मॅरेथॉन करायला हवी.

American Hustle बघणेबल. जेवढी तारीफ ऐकली तेवढा काही भारी वाटला नाही. लोकांची कामे मात्र मस्त.

We are the Millers - एक जरा ओंगळ पण बर्‍यापैकी हसवणारी कॉमेडी. बघायला हरकत नाही.

भूतनाथ एक पूर्ण पाहिला नाही अजून, पण भाग २ फुल टाईमपास आहे. अमिताभ व त्या मुलाची सुरूवातीची केमिस्ट्री मस्त आहे. त्यांचे एकत्र संवाद धमाल आहेत. अमिताभने जबरी काम केले आहेच पण त्या मुलानेही.

एरवी मुद्दामहून बघितले नसते असे काही चित्रपट एमिरेट्स च्या विमानात बघायला मिळाले.

१) यंगीस्तान - पंचवीशीतला एक तरुण भारताचा पंत्रप्रधान झाला तर.... कल्पना छान आहे. बर्‍यापैकी निभावलाय. हिरो शोभलाही आहे. हिरवीण मात्र वाईट्ट.

२) शादी के साईड इफेक्ट्स - कल्पना चांगली पण कल्पनाविस्तार बेकार.अख्तर आणि बालन फुकट घालवल्यासारखे वाटले.

३) वॉर छोड ना यार - भारत पाकिस्तान सीमेवरचे ( बहुतेक काल्पनिक ) वातावरण छान टिपलेय. तेरे बिन लादेन एवढा विनोदी नाही तरी पण ठिक आहे.

Pages