चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पटकथा फारशी नाही आवडली. (तेव्हा गाणी आणि स्टारकास्टच्या नादात पटकथेकडे फारसं लक्ष देत नव्हते की काय अशी शंका यावी इतकी ढिली वाटली.)

आपली चित्रपटांकडे पाहायची नजर, सामाजिक संकेत, समज,गैरसमज, नितिमत्तेच्या कल्पना, चांगले/वाईट, भले बुरे या सगळ्या गोष्टी आता इतक्या बदलल्या आहेत की जुन्या गोष्टी कितीही पटवुन घेतल्या तरी पटत नाहीत. जुने चित्रपट पाहताना आपण या चित्रपटाच्या प्रेमात इतके का होतो किंवा चित्रपटात अमुक एक गोष्ट अशीच का घेतली, अशी का घेतली नाही असे अनेक प्रश्न मला पडतात. मी हल्ली जुने चित्रपट केवळ त्यातल्या गाण्यांच्या प्रेमामुळे आणि त्यातल्या कलाकारांमुळे (ज्यांची मी अजुनही फॅन आहे) पाहते. स्टोरीलाईन अजिबात सिरीयसली घ्याय्ची नाही असे ठरवले.

मला वाटतं अंदाज बॉलीवूडमधला पहिला अत्यंत क्लिशेड प्रेमत्रिकोण स्टोरी होता.

+१०००

कसली जबरदस्त गाणी आहेत यात.

माधुरी, शाहरुख, सलमानचा हम आपके है सनम याच्यावर बेतला होता असे वाचलेले कुठेतरी. खखो करायला दोन्ही पाहायला हवेत Happy

तेव्हा गाणी आणि स्टारकास्टच्या नादात पटकथेकडे फारसं लक्ष देत नव्हते की काय अशी शंका यावी इतकी ढिली वाटली. >>> अगदी अगदी. जुन्या हिंदी चित्रपटात पटकथा अशी नसायचीच बहुदा. संवादफेकही खूप विचीत्र असायची.

२५ तारखेला 'अमर' आहे. तो बघायचा विचार आहे मधुबाला आणि नौशाद करता. पण त्यात निम्मी (नटी) पण आहे, तिला पण काही गाणी असतीलच. म्हणून थोडी भिती वाटतेय Happy

अमर चुकवु नका प्ल..

न मिलता गम तो बरबादी के अफ्साने कहा जाते..
अगर दुनिया चमन होती तो विराने कहा जाते

अजरामर गाणे आहे त्यात... बाकी सगळी गाणीही तितकीच सुरेख आहेत.

लप्री..
हे तुम्ही २०१४ साली लिहिताय.दरम्यानच्या काळात अनेक तांत्रिक बदल झालेले असताना. मूल्ये बदललेली असताना.अभिनयाची अनेक वेगवेगळी स्कूल्स डोळ्याखालून घातलेली असताना. त्यावेळच्या अभिनयात नाटकीयता बरीच होती कारण बहुतेक कलाकार स्टेजवरून आलेले असत. त्याना कॅमेर्‍याचे तंत्र एवढे अवगत नव्हते. अगदी पठडीबाज अभिनय असे. त्यात नैसर्गिक अभिनयाचा ट्रेन्ड आनला दिलीपकुमारनेच.

नर्गीस बोजड वाटतेच. पण तेव्हा स्त्री कलाकारांच्या निवडीला मर्यादा होत्याच. मुळात या क्षेत्रातल्या करीअरला फारशी प्रतिष्ठा नव्हती. त्यामुळे नाचगाण्याशी संबंधीत व्यवसायातून बरीत आवक झालेली दिसते. नर्गीस आवडत नाही आणि तिची डुप्लिकेट डिम्पळ कशी काय चालते बोवा ::अओ:

अमर चुकवु नका प्ल..<<<< +१००

अत्यंत सुंदर गाणी आहेत, मधुबाला पाहण्यासाठी आम्ही बरसात की रातमधला भारतभूषण सहन केला होता. निम्मी त्यामानाने बरीच सुसह्य!!!!

हम आपके है सनम पाहिला आहे. तो बर्याच चित्रपटांचं मिश्रण होता. या चित्रपटाचा मला झालेला एकमेव फाय्दा म्हणजे अंताक्षरीमध्ये "अ‍ॅश-सलमान-शाहरूख माधुरी याचा पिक्चर सांगा" असा प्रश्न विचारून मिळवलेला विजय.

पिक्चर खूप रखडला होता म्हणून, अन्यथा त्यात शाहरूखचं काम भारी आहे. कधी नव्ह्र ते त्याची बायको दुसरंच कुणीतरी पळवतंय (म्हणजे त्याला तसा संशय आहे!!!)

माधुरी, शाहरुख, सलमानचा हम आपके है सनम याच्यावर बेतला होता असे वाचलेले कुठेतरी. खखो करायला दोन्ही पाहायला हवेत Happy >>> अरे हम आपके है सनम नाही हम तुम्हारे है सनम Happy

हो, माझा अंदाज मिस झाला. स्टोरी माहित आहे, क्लिशेड आहे हे ही मान्य पण साठ-पासष्ट वर्षांपूर्वीची आहे.. तेव्हा ती वेगळी होती. शिवाय नंतरचा बथ्थड दिसणारा दिलीपकुमार आवडत नाही बरेचदा. पण तरुणपणी हॅन्डसम दिसायचा एकदम. राजकपूरही असह्य चॅप्लिनिश अवतार घ्यायच्या आधीचा होता (तो अवतार घेऊन त्याने स्वतःच्या अभिनयकौशल्याची वाट लावली). नर्गिस आवडते बर्‍यापैकी. गाणी सहीच आहेत. तेव्हा परत दाखवतील त्यावेळेस पहायचा प्रयत्न असेल.

अमर पहायला जमणार नाहीये. पण तसाही मधुबालासाठीही निम्मीला पाहेन की नाही माहित नाही. याआधी निम्मीचा फक्त बरसात बघितला आहे. जेवढा वेळ होती तेवढीही इरिटेट झाले होते (खरं तर ती त्या काळाच्यामानाने ओके होती)

अंदाज मला अनेक कारणांनी आवडला, आजही आवडतो.

उच्चभ्रू सोसायटीचं दर्शन घडवणारी त्या काळातली (१९४९) ही पहिली 'आधुनिक' फिल्म होती. अनेक संवाद आणि दृश्ये. विचार पायोनियर आहेत या सिनेमातली. यातला प्रेमाचा त्रिकोण क्लिशे नाही. स्त्रियांचे मोकळे वागणे, पेहराव, परपुरुषाशी मैत्री. प्लेटॉनिक मैत्रीचा खरे-खोटेपणा, लग्नानंतर 'आधुनिक' विचारांच्या स्त्रीने अचानक पारंपरिक विचारांनी चालावे ही केली गेलेली अपेक्षा, याबद्दलचे समाजातले टिपिकल विचार आजही, इतक्या पिढ्यांनंतरही कालबाह्य नाहीत. नंतरच्या सिनेमांमधे प्रेमाचे त्रिकोण फक्त वैयक्तिक पातळीवरच मर्यादित राहिले. त्याला असा सामाजिक कोन दिला गेला नाही.

नर्गिस अंदाज आणि आवारा दोन्हींमधे खूप आवडली होती. अंदाजमधे तिने फुलपाखरी हायब्रो सोसायटी गर्ल मस्त रंगवलीय. त्या काळातल्या अभिनेत्रींमधे असा पॉइज घेऊ शकणारी ती एकटीच होती.

नरगिसने पिस्तुल पूर्ण रिकामे होईपर्यंत गोळ्या झाडणे, त्यावेळचा तिच्या चेहर्‍यावरचा सुन्न भाव नंतर असंख्य चित्रपटांमधे कॉपी झाला. अगदी अनुराग काश्यपनेही उचलला. कोर्टामधली दृश्ये नरगिसने अप्रतिम दिली होती.

राजकपूरही असह्य चॅप्लिनिश अवतार घ्यायच्या आधीचा होता>>> वरदाच्या वाक्याला असंख्य प्लस.

शर्मिला Happy
मला आवारा मधला आणि श्री ४२० मधला उच्चभ्रू वर्तुळात गेलेला रा.क मनापासून आवडतो. त्याला कॉम्प्लेक्स, थोडी ग्रे कॅरेक्टर्स किंवा निगेटिव्ह इमोटिंग जास्त चांगली जमायची असं मत आहे माझं. प्री-चॅप्लिनिश रोमॅन्टिक हीरो म्हणूनही आवडतो. श्री ४२० नंतर बट्ट्याबोळ केला स्वतःचा (चोरीचोरी बर्‍यापैकी अपवाद). अनाडी वगैरे तर अगदी सहनशक्तीच्या पल्याडचे वाटतात आता

शर्मिला, मस्त लिहिलं आहेस. Happy

नर्गीसच्या मैत्रिणीचं पात्र वाया घालवलंय असं मला वाटलं.

बॉलडान्सच्या दृष्यात ते विनोदी पात्र एक वाक्य म्हणतं - "एकाची बायको दुसर्‍याच्या कमरेभोवती हात घालून नाचते आहे ही पद्धत अजबच म्हणायला हवी" अशा अर्थाचं...
ते वाक्य ऐकताना 'सिलसिला' आठवला. त्यातही संजीवकुमारच्या तोंडी अश्याच आशयाचा संवाद आहे.

राजकपूरसारखा उपरोध, मनातला कडवटपणा चेहर्‍यावर आणणे, तो हसण्यातून, भुवईच्या हालचालीतून किंवा नुसत्या नजरेच्या छटेतून व्यक्त करणे आजवर कुणालाही जमलेले नाही.

चॅप्लिनिश राजकपूर डोक्यात जातो. अनाडी मधल्या काही सीन्सकरता त्याला माफी. सबकुछ सिख हमने मधे तो शुभा खोटेकडे जो कटाक्ष टाकतो तो अफाट होता.

त्याचं 'तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी..' गाणं त्याच्या चेहर्‍यावरच्या वेगवेगळ्या छटांकरता मी आजवर निदान हजारो वेळा पाहिलं असेल.

राजकपूरसारखा उपरोध, मनातला कडवटपणा चेहर्‍यावर आणणे, तो हसण्यातून, भुवईच्या हालचालीतून किंवा नुसत्या नजरेच्या छटेतून व्यक्त करणे आजवर कुणालाही जमलेले नाही.>>> +१.

ला कॉम्प्लेक्स, थोडी ग्रे कॅरेक्टर्स किंवा निगेटिव्ह इमोटिंग जास्त चांगली जमायची असं मत आहे माझं>>> यालाही +१.

संगम "अंदाजचाच" रिमेक म्हटला जातो ना? संगमपेक्षा मला अंदाज जास्त आवडलेला.

संगम "अंदाजचाच" रिमेक म्हटला जातो ना? >>> अंदाज मेहबुबखानचा आणि संगम राजकपूरचा. दोन्ही दिग्दर्शकांच्या व्हिजनमधला फरक स्पष्टपणे दोन्ही सिनेमांच्या हाताळणीत दिसला.

सबकुछ सिख हमने मधे तो शुभा खोटेकडे जो कटाक्ष टाकतो तो अफाट होता.>> मान्यच Happy

त्याचं 'तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी..' गाणं त्याच्या चेहर्‍यावरच्या वेगवेगळ्या छटांकरता मी आजवर निदान हजारो वेळा पाहिलं असेल.>> मीही कधी कुठे लागलेलं असेल तर बघतेच.

संगममधला शॉव्हिनिस्ट, स्वार्थी हीरो उबग आणणारा आहे. त्याचे सगळे उमाळे ढोंगी वाटतात (अपवाद - ओ मेरे सनम). एकुणात डोक्यात तिडीक जाते तो सिनेमा बघताना

अंदाज मधेच संगमच्या वळणाला जातोय काय असं वाटलं खरं.. (मी संगम आधी पाहिलेला असल्यामुळे)

पण मग मी असं म्हणेन, की संगममधल्या नायिकेपेक्षा अंदाजमधल्या नायिकेचे कन्सेप्ट्स अधिक क्लिअर आहेत.. आपल्याला काय हवंय, काय नकोय, झालेली चूक सुधारण्याची संधी मिळताच ती साधणं, परिस्थितीचा साकल्यानं विचार करणं हे तिला अधिक व्यवस्थित समजतं.
संगमची नायिका (वैजयंतीमाला नव्हे) सिनेमात अनेकदा चीड आणते... विशेषतः विमान उडल्यावर "मै तुमसे प्यार नहीं करती" म्हणताना...

अनुष्काबद्दल सहमत. आता ती केवळ मी कित्ती बारीक हेच मिरवताना दिसते. बॅबॅबा मधला हेल्दी लुक (हेल्दी म्हणजे व्यवस्थित, नीटस. आपण स्वतःच्या लुकला 'हेल्दी' म्हणतो तो नव्हे ) कुठल्याकुठे गेला.>>>>
एकूण निरिक्षणा प्रमाणे बायकांना छान, स्वताची फिगर व्यवस्थित ठेवलेल्या नायिका आवडत नाहीत.
कमीत कमी २ मुलांच्या आया शोभाव्यात अश्या विद्या बालन, सोनाक्षी बद्दल मात्र फार प्रेम असते. Happy

संगमची नायिका (वैजयंतीमाला नव्हे) सिनेमात अनेकदा चीड आणते... विशेषतः विमान उडल्यावर "मै तुमसे प्यार नहीं करती" म्हणताना...>>> अगदी. बोटिंगच्या वेळी राजकपूर तिला स्पष्टपणे विचारतो की काय हद आहे माझ्या प्रेमाची ते सांग. तर हिचं आपलं 'नही मालूम, नही मालूम' चं पालूपद चालूच. अजिबात सहानुभूती वाटत नाही वैजयंती मालाची.

संगममधल्या नायिकेपेक्षा अंदाजमधल्या नायिकेचे कन्सेप्ट्स अधिक क्लिअर आहेत.. आपल्याला काय हवंय, काय नकोय, झालेली चूक सुधारण्याची संधी मिळताच ती साधणं, परिस्थितीचा साकल्यानं विचार करणं हे तिला अधिक व्यवस्थित समजतं.>>>> अनुमोदन.

संगमच्या नायिकेचं अख्खं पात्र गंडलेलं आहे. त्यामानानं राज कपूरचं पात्र स्वार्थी वगैरे कसंही असलं तरी किमान व्यवस्थित आहे.

आख्ख्या संगमचीच मेन पात्रं गंडलेली आहेत. आणि तशीही त्याकाळची वै.माला सुद्धा डोक्यात जाते. इथे तर डबल ताप - पात्र+ अभिनेत्री.

जे काय आहे ते स्वच्छ स्पष्ट बोलून टाकलं तर सिनेमा झालाच नसता म्हणा Proud (त्या शारुख, माधुरी, अक्षयकुमार, करिश्माचा सिनेमा - डिट्टो तसंच.)

जे काय आहे ते स्वच्छ स्पष्ट बोलून टाकलं तर सिनेमा झालाच नसता म्हणा>> हे असंख्य बॉलीवूडी त्रिकोण )चौकोन पंचकोनदेखील( यात आलेच्) लागू पडेल.

थोडे अवांतरः सबकुछ सिख हमने हे गाणे ऐकल्यावर मला नेहेमी दोन प्रश्न पडत आलेले आहेत.
१. ती गाण्यातली नर्तकी पाहून कुणाला सुलोचनाबाईंची आठवण येते का? की खरोखर त्याच आहेत?
२. अशी दु:खी गाणी खरंच अश्या (उच्चभ्रू?) पार्ट्यांमध्ये ऐकली जायची/जातात का?

धारा दुसर्‍या पॉईंटला अनुमोदन. अनुपमा सिनेमात सुद्धा क्यूं मुझे इतनी खुशी दे दी... नंतर धर्मेंद्र पार्टीत शिरतो आणि अचानक या दिल की सुनो म्हणतो. धरून चालू की सर्वांना तो लेखक आहे म्हणून माहित असते. मग पत्थर के सनम तुझे हमने.. हे गाणं पण पार्टितच आहे की. किंवा यहाँ मै अजनबी हू.... ही गाणी काय पार्टित म्हणण्याजोगी आहेत? Uhoh

आधी मुळात उठसुट गाणी म्हणणे, मग ते प्रेम, विरह व्यक्त करायला असो, बागेत असो, गच्चीत असो नाहीतर पार्टीत. अचानक उठून कोणीही गाणी गाणे हाच मुळात एक कृत्रिम, खोटा, अवास्तव प्रकार आपण हिंदी चित्रपटांचा अविभाज्य भाग म्हणून मान्य केल्यावर त्याला अजून एक "पार्टीत कोणी दु:खी गाणी गाईल का?" वगैरे लॉजिक लावण्यात काय अर्थ आहे?

भावना व्यक्त करायला दिग्दर्शकांनी वापरलेला तो एक शॉर्ट कट आहे हे मान्य करायचं आणि बागेतल्या गाण्यांमधला पियानो, सगळे आनंदात असताना हिरोने आपल्या वेदना व्यक्त करणे, त्या फक्त हिरॉइनलाच कळणे वगैरे मुकाट स्विकारायचे Happy

अंदाज मी अर्धाच पाहिला होता आता पूर्ण बघणार Happy
मला रा. क. पेक्षा दिलीप कुमार कितीतरी पटीने जास्त आवडतो. रा. क. ना आवडण्याचं कारण ते वरदाने दिलय तेच.
दो. कु. चा कोहिनूर एकदम मस्त सिनेमा आहे. त्यात तर एकदम हसरी खेळती मीनाकुमारी पण बघायला मिळेल बोनस म्हणून Happy

संगम तर आख्खा सिनेमाच डोक्यात जातो.

शर्मिला Proud

पण पार्टीगाण्यांमध्ये "तुमक हमारी उमर लग जाय" ला तोड नाही. काय नाचत सुटते ती. बर्थडेविश करायला काय ड्यान्स स्टेप्स दिल्यात. आणि आजूबाजूचे हातात ग्लास घेऊन ढिम्म उभे!!!

पण पार्टीगाण्यांमध्ये "तुमक हमारी उमर लग जाय" ला तोड नाही. काय नाचत सुटते ती. बर्थडेविश करायला काय ड्यान्स स्टेप्स दिल्यात. आणि आजूबाजूचे हातात ग्लास घेऊन ढिम्म उभे!!!
>>> ते "रंगीला रे" पण तसलच आहे की. वहिदा आहे ना त्यात?

Pages