शंकरपाळे

Submitted by सशल on 10 July, 2008 - 16:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

१ वाटी दुध,
१ वाटी साखर,
अर्धी वाटी तुप,
चवीला मीठ
मैदा साधारण ३.५ ते चार वाट्या
तळायला तेल/तूप

क्रमवार पाककृती: 

१ वाटी दुध, १ वाटी साखर आणी अर्धी वाटी तुप, चवीला मीठ उकळल्यावर त्यात मावेल तेवढा मैदा साधारण ३.५ ते चार वाट्या मावतो पीठ सैलसर मळून गार झाल्यावर एक तास ठेवायचं आणी मग शंकरपाळी करायची आणी महत्वाचे म्हणजे मंद आचेवर तळायची अगदी खुसखुशीत आणी कुरकुरीत होतात साखरेचे प्रमाण चवीप्रमाणे कमी जास्त करावे तुपाऐवजी तेल वापरले तरी चालते पण तेल वापरले तर एक वाटी घ्यावे

वाढणी/प्रमाण: 
भरपूर होतात :)
अधिक टिपा: 

वेळ बराच लागतो .. लाटणं, कातणं आणि तळणं वेळखाऊ काम आहे ..

माहितीचा स्रोत: 
सासुबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिवाळी चालु झाल्यावर एखाद्या दिवशी सशलच्या रेस्पीने करुन बघेन शंकरपाळ्या. दुध असल्याने जास्त खुसखुशीत होत असतील ना??

कालच केल्या ह्या रेसिपीने शंकरपाळ्या ...... मस्तच झाल्या आहेत..... सगळ्यांना इतक्या आवडल्या आहेत की आता अजुन दोन बॅच तरी कराव्या लागणार असं दिसतय. धन्यवाद सशल Happy

सशल अग तुझे खूप खूप आभार्....तुझ्या रेसीपी ने शंकरपाळ्या बनवल्या आणि खूप मस्त झाल्या. सगळे खूश आणि माझ्या ताया (ताई अनेक वचन) आच्चर्य चकित Happy एकदम रीलाय्बल रेसीपी.

पौर्णिमाच्या कृतीने शंकरपाळ्या केल्या. मस्त झाल्यात. जस्ट पर्फेक्ट Happy धन्यवाद पौर्णिमा Happy

Pages