सोपी नानकटाई

Submitted by मंजूडी on 9 December, 2009 - 00:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी पातळ केलेलं साजूक तूप
१ वाटी पिठीसाखर
सेल्फ रेझिंग फ्लावर किंवा मैदा
थोडंसं दही किंवा दुध
केशर वेलची सिरप किंवा कुठलाही आवडीचा इसेन्स
काजू/बदाम/चारोळी सजावटीसाठी

क्रमवार पाककृती: 

एका पसरट भांड्यात तूप घेऊन हाताने भरपूर फेसावे. त्यात पिठीसाखर घालून ती विरघळेपर्यंत परत फेसावे. त्यात इसेन्स घालावा. आणि मग मावेल तितका मैदा घालून कणकेप्रमाणे भिजवावे. मैदा वापरला तर त्यात पाव टिस्पून बेकिंग सोडा घालावा लागेल. सेल्फ रेझिंग फ्लावर घेतल्यास सोडा घालायची आवश्यकता नाही.
साधारण घट्टसर असं पीठ भिजवून ७-८ तास झाकून ठेवावे.

अवन १८० डिग्रीला तापण्यास ठेवावा. दह्याचा किंवा दुधाचा हात लावून नानकटाईचे पीठ भरपूर मळून कणकेप्रमाणे तलम मऊसर करून घ्यावे. मग त्याचे बोराएवढे गोळे करून जरा चपटवून त्यावर काजू/बदाम/चारोळी लावून बेक करण्यास ठेवावे. साधारण ४० मिनीटात नानकटाई तयार होते.

वाढणी/प्रमाण: 
मध्यम आकाराच्या ४५-५० नानकटाया तयार होतात.
अधिक टिपा: 

घटक पदार्थ थोडकेच आहेत. कृती सुद्धा फार क्लिष्ट नाहीये.

नानकटाई बेक करायला ठेवल्यावर साधारण २५ मिनीटांनी तपासून बघावे. वरून गुलाबी - चॉकलेटी रंग आला की नानकटाई तयार झाली असे समजावे. गरम असताना ती मऊ लागू शकेल पण थंड झाल्यावर छान खुसखुशीत होते.

मी ऑफिसला जायच्या अगोदर म्हणजे सकाळी आठ वाजता हे पीठ भिजवून ठेवलं आणि संध्याकाळी आल्यावर म्हणजे साडेआठ वाजता एक बॅच बेक करायला ठेवली. उरलेलं पीठ डब्यात घालून फ्रिजमध्ये ठेवलं. आणि दुसर्‍या दिवशी तासभर बाहेर काढून मग बेक केलं. ती बॅच पण एकदम मस्त खुसखुशीत झाली.

माहितीचा स्रोत: 
बहिणीची पाकृ
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी दहा वर्षांपूर्वी दादरला घेतला होता. अ‍ॅल्युमिनियमचा, GETCO नावाच्या कंपनीचा आहे. कधी कधी गरम होत नाही. मग डॉक्टरला दाखवून आणला की पुन्हा गपगुमान चालतो. त्याचं टेंपरेचरचं बटण गोलगोल फिरतं. त्यामुळे टेंपरेचर सेट करता येत नाही. मॅक्झिममवर कायमची मांडवली झालेली आहे. असो. काही फरक पडत नाही. मला तो कुकिंगरेंज सहीत आवन वगैरे घ्यायचंय पण घरात जागा नाही.

खूप खूप धन्यवाद मामी. मला पण तसाच हवाय, आता नक्कीच घेईन मिळाला की. आजकाल मॉड्युलर किचनमुळे असे छान अवन मागे पडत चाललेय.

डालडा मला वाटतं थिजेल आणि नंतर त्याची चव येते तोंडात.
साजूक तूपच उत्तम. अजिबात तूपकट वगैरे होत नाहीत, खुसखुशीत राहतात.

मामीच्या शेफच्या नानकटाया सुपर्ब दिसताहेत. नानकटाई हातात धरलेली बोटं पण नाजूक सुबक सुंदर आहेत. नानकटाईवर ते हिरवं हिरवं काय घातलंय?

टुनटुन, आमच्याकडे आधी बजाजचा असा गोल ओव्हन होता. इलेक्ट्रिक ओव्हन म्हणायचे त्याला. पण आधी ओटीजी आणि मग मायक्रोवेव आल्यावर आता असा मिळतो का माहिती नाही.

प्रितीभूषण, शक्य असेल तर कुठल्याही पदार्थात डालडा तूपाचा वापर करणं टाळा.

या विकांताला परत प्रयत्न करणे झाले .
या वेळी बेसोच वापरला , बेपा नाही. गेल्या वेळेपेक्शा अंगापिंडाने बर्याच धष्ट्पुष्ट झाल्या होत्या.
पण्......... एक अन्दाज घेउन पहिला घाणा काढ्ला तो जरा कच्चा वाटला म्हणून दुसरा जरा जास्त वेळ ठेवला तर पोटातुन जास्तच करपल्या,बाहेरून व्यवस्थित .

आणखी एकदा प्रयत्न करेन म्हणते , बघु , हळूहळू जमेल भाजण्याच तंत्र.

मंजु धन्यवाद. मला पण नावच आठवत नव्हतं. पण आता हा जरा कालबाह्य झालेला वाटतोय, कारण बजाज च्या साईटवर सर्च केले तर दिसला नाही. पण असो मिळाला की नक्कीच घेणार, कारण घरात सामानाची रेल्वेपेक्षा गर्दी झालीय. मावेलाच कशीबशी जागा आहे.

घरात दीड वाटी मैदा होता म्हणून मी पाव वाटी तूप घेऊन सुरुवात केली, पण मैदा संपला तरी मिश्रण पातळ च होतं.म्हणून मी त्यात गव्हाचं पीठ घातलं.साधारण पाऊण वाटी बसलं पण मंजूडी नि सांगितल्याप्रमाणे कणकेसारखा गोळा नाही झाला. जरा भुरभुरीत झालाय. म्हणजे मळताना सुटून आला ताटापासून पण गोळे करायला घेतले कि जरा भुरभुरीत लागतंय हाताला..गोळा भिजवून ठेवलाय खरा, पण नीट होतील न?भुरभुरीतपणा असतोच का? नसेल तर तो जातो का? आत्ताचगोळा केलाय, सुधारण्यासाठी काही टिप्स असतील तर प्लीज लवकर द्या! फिंगर्स क्रॉस्ड Uhoh Sad

पण गोळे करायला घेतले कि जरा भुरभुरीत लागतंय हाताला>> किंचीत दह्याचा किंवा दुधाचा हात लावून गोळा मळून गुळगुळीत करून घे.

एव्हाना झाल्याही असतील तुझ्या नानकटाया Uhoh

नाही... मी घाबरून गोळा ठेऊन दिला फ्रीज मध्ये..आत्ता म्हणलं आधी माबो बघूया मग करूया.. दह्याचा हात लावला पण भुरभुरीत च आहे. केक करताना क्रम्ब्स कसे होतात तसं झालंय. तूप कमी पडलं का?? पातळ करून मिक्स करून घेऊ का?

१००% मैदाच होता!! आणि तुम्ही म्हणताय कणकेसारखं तलम करून घ्या, म्हणजे कणकेसारखं चिकट (इलॅस्टिक) पण अपेक्षित आहे का?

वॉव मस्त मंजुडे...माझी आई आत खोबर्याचं फीलिंग असलेल्या नानकटाया बनवायची....कशी ते नाही हो माहीत.. Happy पण तुझी रेसिपी सोप्पी आहे...मी प्रयत्न करणार...

धन्यवाद अश्विनी आणि मंजूडी!
नाही चॉकोचिप्स बिलकुल करपल्या नाहीत. मधल्या नानकटाईत मी नुसत्याच वरून रोवल्या त्या वितळल्या पण नाहीत अर्ध्या तासात!चव पण मस्त! मैदा आणि कणिक कॉम्बी वर्क्ड! Happy

Pages