अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षिणा.......
आगे आगे लडकी
पिछे मैं भी सयाना
दुनिया कहे
बाबा हो गया है दिवाना

बाबा, अपाची इंडियन, युफोरिया , कलोनियल कजिन्स या मंडळींची शाळेच्या दिवसात (म्हणजे माध्यमिक शाळा) सॉलीड चलती होती..
हाँगकाँग लेन मधे हवी ती गाणी रेकॉर्ड करुन देणारी काही दुकानं होती, त्यातल्या एकाने अनेक दिवस उद्या उद्या करत कॅसेट करुन दिली नव्हती तेव्हा एका मित्राच्या घरात एका रुममधे अति शांत बसून एकासमोर एक टेपरेकॉर्डर ठेऊन या मंडळींच्या गाण्यांची कॅसेट तयार केलेली आठवते Happy
या हिशोबाने म्या बी म्हताराच !

मित, भारी आठवण. मी पण हॉगकाँग लेनमधूनच घ्यायचे रेकॉर्ड करून. पण तो प्राणी कॅसेट द्यायचा वेळेत Proud

माझ्या इतकं म्हातारं हितं कुणी हाय का? >>> दक्षिणा, मला ही गाणी माहिती आहेत पण मी म्हातारी नाय बा! Proud बाबाची गाणी आवडायचीच तेव्हा. 'मंजूला मंजूला' आठवतंय का? बाकी पण इंडिपॉप्स भारी यायचे तेव्हा. ते डिस्कशन मात्र इतरत्र करूया Happy

मी पण हॉगकाँग लेनमधूनच घ्यायचे रेकॉर्ड करून. पण तो प्राणी कॅसेट द्यायचा वेळेत >>> हे तुम्ही नक्की कुठल्या देशाविषयी बोलताय ? कॅसेट करणारा प्राणी म्हणजे नक्कीच चिंपांझी असणार Proud

बाकी पण इंडिपॉप्स भारी यायचे >>> हो हो मस्त आल्बम्स यायचे. त्यांचे व्हीडिओज पण किती इन्टरेस्टिंग असायचे!! ते कल्चर गेलंच का आता?

कॅसेटमधली फीत रेकॉर्डरमध्ये गुंडाळी होऊन बाहेर पडल्यावर, कॅसेटचे चक्र पेन्सिलीने गोल गोल फिरवून फितीला मी पुन्हा आत गुंडाळायचो.

ह्या हिशोबाने मीसुद्धा म्हातारा.

Rofl

ते कल्चर गेलंच का आता? >>> कोण जाणे! यो यो चे वगैरे म्युझिक व्हिडीओज येत असतील तर ते बघायची माझी हिंमत नाही Proud शिवाय हल्ली म्युझिक चॅनल्सवर म्युझिक सोडून बाकी सगळं असतं म्हणे Wink

श्री, जाऊदे यार, तुम नहीं समझोगे Proud

Lol
अरे इथे कोणी बाबा सहगलला फेसबुकवर फॉलो नाही करत का? दर महिन्याला एक तरी नवीन गाणं इमानेइतबारे रिलीज करत असतो. *मोनिशा मोड ऑन* वो भी फ्री *मोनिशा मोड ऑफ*
नमुन्यादाखल काही ओळी

आलू को मिर्ची लगा दो तो बन जाएगी चाट
भालू को मिर्ची लगा दो तो लग जाएगी वाट
.....

कंप्युटर को चाहिए ओन्ली जीबी रॉम रॅम
मुझको घर में चाहिए ब्रेड बटर जॅम

बा SSSSSSSSS बा SSSSS ...
आजा मेरी गाडी मे बैठ जा ...

मी पण म्हातारीच Happy

अरे बाबा सेहेगल आता बँक चोर मध्ये पण दिसणार आहे. त्याचा ट्रेलरच अ अ आहे :

https://www.youtube.com/watch?v=Kx0jZWnlS3Y

"लिप्स है तेरे लाल काले है तेरे बाल
पेहेले आये अन्ना बाद मे केजरीवाल "

Rofl

म्हाताऱ्या लोकांची ला़ट आलीये का....

मला पण घ्या मग त्यात

बाबा सहगल, अपाचे इंडियन चे चक दे का चोक दे का चख दे

आलिशा चिनॉय मेड इन इंडिया, परी हू मै - सुचित्रा का सुनिता राव, त्यानंतर मिसो काहीतरी वाजवत असतो आणि आशा भोसले गाणे म्हणत असते ते रिमिक्स जानम समझा करो, त्यानंतर चांदनी राते
टिपिकल लग्नात वाजणारी गाणी - फाल्गुनी पाठक, आणि गुड नाल इशक मिठा

लकी अलीची जवळपास सगळीच, सिल्क रुटचे डूबा डूबा त्यावेळी कसले भारी वाटलेलं, आजही ऐकायला छान वाटेल असेच आहे.

फुल्ल पुर्वजन्मवाली स्टोरी होती ते बूम बूम

मग क्लासिकल बेस वाले शुभा मुद्गलचे अबके सावन ऐसे बरसे सगळ्यात फेवरिट...काय माहोल उभा केलाय. पण बाई मधली आलापी इतक्या जोरात घेतात की हंबरडा फोडल्यासारख्या वाटतात.

बरं मग या लिस्टमधे जोजो ची गाणी (वो कौन थी, सॉरी आय अ‍ॅम लेट वगैरे), छुईमुईसी तुम, क्यू फंक, जॉनी गद्दार, उवा उवा, बाली सागूची गाणी इ.इ. हे सगळं पण अ‍ॅड करा Proud

बाली सागूची बरीच मस्त गाणी(त्यात पण व्हिडिओजमु़ळे जास्त लक्षात रहायची ती) होती. आजा नचले नी आजा नचले हा एक आठवतोय.
दीवाने तो दीवाने है, (श्वेता शेट्टी), शान , सागरिका, सोनू, अनाइदा, आर्यन्स, जुनून बरेच आर्टिस्ट होते.
गुरुनाल इश्क मीठा तर आय हाय! त्या जस अरोराच्या ख़ळ्यांमधे हरवून जायला व्हायचं तेव्हा Happy आता ठोकळा वाटेल तोच कदाचित. फाल्गुनीचे पण व्हिडिओज मस्त असायचे. सोनू च्या दीवानाचे व्हिडिओज अजून लक्षात आहेत. अब मुझे रात दिन .... एकदम रोम्यान्टिक दिसणारा दिवाकर पुन्डिर होता त्यात.

एकदम रोम्यान्टिक दिसणारा दिवाकर पुन्डिर होता त्यात. >>> +१

बाली सागूचं 'चुरा लिया है' चं रिमिक्स जास्त लक्षात आहे. त्याच्या व्हिडिओमुळे खासकरून Wink

आयमिन माझ्या इतकं म्हातारं हितं कुणी हाय का? >>> दक्षे तुझ्यापेक्षा पण हाय म्हातारी मी, मज्जा यायची बाबा सहगलच्या गाण्यांना. मला तो पाकीस्तानी कोण होता त्याची गाणी पण आवडायची, शावा ये नखरा गोरीका वाला.

Pages