अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाजीराव मस्तानी, त्यातलं मराठी वातावरण आणी एकंदरीतच हिंदी सिनेमा वाल्यांचा जो रिजनल स्टिरीओटाईप आहे, तो धन्य आहे. गाण्याच्या शब्दाचाच विषय आहे तर, 'कडक, तडक, भडक झाली, चटक, मटक, वटक झाली, दुष्मन की देखो जो वाट लावली' ह्याबद्दल काय बोलणार?

फेरफटका, सहमत :). त्या "गवत कोठे आहे? मग गाय तरी कोठे आहे?" सारखे वाटले वरच्या २-३ पोस्टी वाचून Happy

@ फारएन्ड, त्या "गवत कोठे आहे? मग गाय तरी कोठे आहे?" सारखे वाटले >>> कृपया, ह्या विषयी अधिक माहीती द्याल का? कुठली दृष्टांत कथा आहे का हि? जाणून घ्यायला माझी उत्सुकता ताणली गेलीय.

सरगम आताच पाहिला. खूपच ऐकलं होतं...

तर शेवटी ऋषी कपूर, असरानी यांना एका मंदिरात बांधून ठेवलेलं असतं. ते मंदीर एका टेकाडावरच्या एका उंच खडकावर असतं. टेकडी गावाच्या बाहेर असते. गाव कुठलं ते कुणालाच माहीत नसतं. जयाप्रदा गावालगतच्या मंदीरात राहत असते.तिला जशी बातमी कळते की ऋषी कपूरला शक्ती कपूरने पकडून नेलंय तशी ती डफली घेऊन गावभर वाजवत फिरू लागते. गाव संपल्यावर टेकाडावर फिरू लागते.

इतक्यात एक नाग दोघांच्या मधे येऊन फणा काढून बसतो. यांना असं का बांधलंय म्हणून त्याच्या चेह-यावर आश्चर्याचे भाव उमटताना दिसले . इकडे डफली चालूच असते.

थोड्या वेळाने साप निघून जातो. भिंतीवर चढतो आणि दोघांचे मधोमध डोक्यावर असलेल्या घंटेवर उडी घेतो. त्या घण्टेला वेटोळे घालून झोका देऊ लागतो. आणि घंटा वाजू लागते.मग ऋषी कपूर घंटेवर डोकं आपटतो आणि तिकडून असरानी. लोखंडी घंटा डोकं आपटून वाजवत राहतात. तिकडे डफली वाजत राहते.

अ आणि अ सीन आहे. पुढे काय होतं हे पहावलंच नाही. बंदच केलं.

कमल सदानाहचा विषय पहिल्याच पानावर वाचनात आला. या अभिनेत्याला कधीतरी १५/२० वर्षांपूर्वी पाहिलेलं आठवलं. लगोलग गुगलवर सर्च केला तर ही धक्कादायक बातमी वाचण्यास मिळाली.

https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=4&cad=rj...

पण पुढे तो त्यातून सावरला असावा. २०१४ मध्ये त्याचा Roar हा चित्रपट त्याने दिग्दर्शित केलेला येऊन गेला.

कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की, आपल्या सर्वांचे लाडके मा.श्री. ताहिर शहा ( इथे अंगठा आणि तर्जनी अनुक्रमे डाव्या मग उजव्या कानाच्या पाळीला , डोळे बंद) नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर रसिक प्रेक्षकांसाठी नवीन गाणं घेऊन आलाय म्हणे असं खालच्या लिंक वर दिसतंय. त्यात तूनळीची लिंक आहे, सध्या पाहता येत नाही. नंतर निवांत पाहीन.

http://www.news18.com/news/buzz/taher-shah-is-at-it-again-spreads-humani...

आला रे... ताहिर आला रे..
रच्याकने ते पाकिस्तानातुन **** पाय लावुन पळून गेले अशी बातमी मध्यंतरी वाचनात आली.. त्यांचे सेक्रेटरी (कर्)वदले कि येथील लोकांनी त्यांना धमक्या वगैरे देवून धाक देणे सुरु केल्यामुळे एवढ्या मोठ्या कलाकाराला या देशातुन असे गुपचुप निघुन जावे लागले यासारखे दुर्दैव ते काय..

पाकिस्तानातुन कुठे पळाले?>> परत यावर त्यांच्या सेक्रेटरीने वाच्य केले कि सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांचा ठावठिकाणा आम्हालासुद्धा माहिती नाही... भिती अशी कि यांचे चरणकमल भारतभूला लागु नये.. भूचाल आजायेगा..
नक्की एखाद्या तालिबान्याला सकाळ संध्याकाळ यांच्या गाण्याचा प्रसाद शिक्षा म्हणुन मिळाला असेल अशी दाट शंका आहे मला... त्याशिवाय का कुणी यांच्यासारख्या कलाकाराला अश्या धमक्या देईल..

हे भगवान... खुप हिम्मत जुटाके लिंक वर क्लिक केल मी...
हाय वो आवाज...रुह काप जाती है.. मेरे जैसा नापाक इन्सान इनकी आवाज को, इनके चेहरे को झेल आपल हे देख भी नही सकता..
इथे ज्याने कोणी यांची पूर्ण कविता (?) ऐकली असेल त्याला माझा साष्टांग...
नाही रे नाही...हा एकटाच एक स्वतःमधे एक अख्खी दहशतवादी संघटना प्रिटेन्ड करण्याच सामर्थ्य ठेवतो...

ऋन्म्याच्या नविन धाग्यावर अजय देवगण ची एंट्रीचा विडियो ओतलाय कोणतरी...

अरारारा... काय ती एंट्री.. एंड्रिन पिल्यावानी तोंड करुन येणारा हिरो.. जबरदस्तीची फाकवलेली स्ट्रेचिंग अन खर्रा खाउन थुकल्यासारखे दिलेले फ्लाईंग किसेस... अन कहर म्हणजे त्या बोदल्याच्या कुशीत बसण..
"रॉकी का गुरुप",
"तुम हमारे ग्रुप मे शामिल हो जाओ फिर तुम्हे छेडनेकी कोई हिम्मत नही कर सकता"..
अन हे बोलत असताना नाकातुन मसाला बाहे काढल्यावानी हिरोचे एक्स्प्रेशन..

अबे तो बोदल्या कित्ती मोठा अन् त्याले पाहुन असबी छेडाची इच्छा होईन का कोणाले..का एक एक डायलॉग हाय भाउ...

पाहाच तुमी..दिन बन जायेगा...
https://www.youtube.com/watch?v=Qkk6q1REoAI

प्रिय भक्तानो नतमस्तक व्हा.... आपले तिकीट आधीच आरक्षित करून ठेवा... अगदी चुकवू नका कारण राम रहीम बाबा यांचा नवीन चित्रपट येत आहे "हिंद का नापाक को जवाब, MSG Lion Heart-2 "

स्वस्ति, आभारी आहे. बाबांच्या सिनेमाचे, मी आणि माझे दोन मित्र फार मोठे फॅन्स आहोत. आता पर्यंतचे तीनही मुव्हीज थिएटर मधे पहिल्या आठवड्यात पाहिले आहेत ( दुसर्या आठवड्यात टिकतील कि नाही या भितीपोटी). एक मात्र खरं कि बाबा अमिर खानसारखे वर्षातुन एकच सिनेमा करतात पण तो एक सिनेमा आम्हाला अख्खं वर्ष हसवत ठेवतो. वर्षाभराच बुस्टर.......

हा सिनेमा भारतीय सेनेला ट्रिब्युट आहे असं बाबा म्हणतात. मी त्यांचा गन डान्सवाला ट्रेलर पाहिला होता, पण हा स्वस्तिने दिलेला म्हणजे उच्चच आहे. १० फेब. पर्यंत वाट पहाणं अवघड आहे. दिवस ढकलत जगावं लागणार आहे अगदीच.

फक्त बाबांकडे एकच प्रार्थना आहे कि, या वेळेस आमचा शो, भाग १ आणि २ सारखा मो़कळ्या थिएटर मधे असु देत. भाग ३ मधे थिएटर मधे बाबांचे 'इन्सान' फ्री टिकेट आणि बस भरुन आणले होते. आम्हाला जीव मुठीत धरुन सिनेमा पहावा लागला. मोठ्याने हसणं शक्य नसल्याने, जॅकेट मधे तोंड लपवुन हसताना जीव गुदमरले होते. आणि एवढं करुनही इटर्वलमधे डेडली सिचुएशन मधे अडकलो होतो. Lol

नोट - कोणी ट्रेलर पहाणार असेल तर बाबांची पिंक बाइक आणि जुत्ते पहायला विसरु नका. बाबांचे ड्रेसेस नेहमीप्रमाणेच भारी. यावेळेस बाबा रोमॅन्स पण करणार आहेत. Wink

दुसर्या आठवड्यात टिकतील कि नाही >>> सर्वांनी असाच विचार केला तर ऐनवेळी आलेल्या माझ्यासारख्यांना तिकीटाविना निराश होऊन तर जावं लागणार नाही ना ?

बाबाच्या भक्तानो आताच एका माहिती नुसार प्रिय बाबांना यंदाचा (२०१६) चा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे. त्यांना extraordinary work to reform the society via a movie' या विभागात हा पुरस्कार मिळाला आहे.
आपले सुदैव म्हणावं (?) कि या पुरस्काराने गंभीरतेने घेऊन बाबांनी आगामी नापाक को हिंद का जवाब मध्ये ४३ विविध भूमिका स्वःत एकट्याने केलेल्या आहेत.

आता हा माझ्या चित्रपट २०१७ चा बहु प्रतीक्षेत असलेल्या चित्रपटा पैकी एक झालेला आहे.

बाबाच्या भक्तानो आताच एका माहिती नुसार प्रिय बाबां आणखी एक चित्रपट " जटू इंजिनीअर" प्रदर्शित करणार आहेत. तरी भक्तांनी लाभ घेण्या साठी आधीच बुकिंग करून ठेवावा.

नेटफ्लिक्स वर मिस्टरी सायन्स थिएटर ३००० चे नवीन भाग आले आहेत. अमेरिकेत आहेत, इतरत्र माहीत नाही. मुकुंद ने इथे पूर्वी उल्लेख केला होता त्या जुन्या सिरीज चा. हे भाग नवीन आहेत. एकदम धमाल आहेत. जरूर पाहा. लक्ष देउन बघावे लागतात अनेक कॉमेण्ट्स समजण्याकरता.

आज टी व्ही वर कुठलस गाण बघीतल त्यात दिव्या भारती होती अणि कुणीतरी नवखा हीरो (पृथ्वी ? ) होता.
तो गाण म्हणत होता " दिल जिगर नजर क्या है मै तो तेरे लिये जा भी दे दू"
त्यात हिरोने डोक्याला पट्टी बान्धली होती. डोक्याला पट्टी बान्धायची ही फॅशन बहुदा मिथून चक्रवर्ती ने सुरू केली असावी.

मला राहून राहून प्रश्न पडला की हीरोने डोक्याला पट्टी कशाला बान्धली असावी बर ?
खुप विचार केल्यावर मला उत्तर सापडल ....
बहुदा हीरोला अर्धशिशी चा त्रास असावा म्हणून असणार
(आणि कुमार शानूने बॅकग्राउन्ड ला म्हटलेल गाण ऐकून तो त्रास अधिक उफाळून आला असणार)

Pages