अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ दिनेश. या गाण्याचे ते अत्यंत ढीसाळ भाषांतर आहे.>>> आपले म्हणणे पूर्णपणे मान्य आहे. मी थोड्याशा विनोदीमार्गाने भाषांतर करून पाहिले होते. पण प्रयत्न फसलेला दिसतोय. आपल्या भावना दुखावल्याबद्दल क्षमस्व!!

पूर्वी इथे जबसे हुई है मोहोब्बत वर चर्चा झाली होती. तेव्हा एक प्रश्न पडलेला कि या महान कलाविष्काराचे इतर सीन वा गाणी का मिळत नाहीत बुवा. अखेर या आठवड्यात तो कलाविष्कार पूर्ण पाहिला आणि कारण कळून चुकले. खूनी रात या महान चित्रपटातील सर्वात सेन्सिबल ३ मिनिटे जबसे हुई है मोहोब्बत या गाण्याची आहेत. एवढ्यावरून कल्पना यावी कि बाकीचा सिनेमा काय (आणि च्या काय) आहे.

इच्छुकांनी लाभ घ्यावा - https://www.youtube.com/watch?v=H68ex7JKm5A&list=PLD3F381F21D55ED71

वरचं वर्णन कमी पडल्यास सेलिंग पॉईंट - गाण्यात आपल्याला दिसलेला ग्यानेंद्र चौधरी नामक इसम हाच चित्रपटाचा लेखक, निर्माता व दिग्दर्शक आहे.

पायस _/\_
पिक्चरचं टायटल पाहूनच डोळ्यांचं पारणं फिटलं. 'खूनी रात' इंग्लिशमधे लिहीताना 'bloody night' असं ट्रान्सलेशन करून लिहीलंय Lol

धन्यवाद पायस. बघायलाच पाहिजे.

खूनी रात या महान चित्रपटातील सर्वात सेन्सिबल ३ मिनिटे जबसे हुई है मोहोब्बत या गाण्याची आहेत. >>> लोल

सुरुवातीलाच गाढवं का दाखवली असतील फ्रेममधे ? >>> हा चित्रपट बघण्यासाठी हौसेने थिएटरमधे गेलेल्या प्रेक्षकांचे प्रतिक असेल ते. Wink Proud Light 1

चारी धाम माझ्या घरी, आहे सुख भरूनी आभाळ
माझ्या तुकोबानं केलं माझ्या घराचं गोकुळ

https://youtu.be/Va-WntGF9fY

हे गाणं पाहिलंय का कुणी? लिरिक्सपासून अभिनय (??) आणि नृत्या (????) पर्यंत सगळंच अचाट आहे. चित्रपटाचं नाव साजेसंच, " अशी फसली नानाची टांग "
यात मोहन जोशी आणि प्रिया बेर्डे आहेत.

त्यातली निशा परुलेकर हि आमच्या मुंबईत असलेल्या एका चुलत मामाच्या शेजारी रहायाची.
इतकी नाटकी बोलणं , चालणं आणि शाळेतच भयाण मेकाअप करून जायची. खोट्या लेन्स वगैरे.
लहानपणी इतक्या थापा मारायची. आई नर्स असताना डॉक्टर सांगायची.

अजूनही तिची आई तिथेच चेंबूरला रहाते.

हे उगाच वरचे गाणं पाहून आठवले...

म मूवी हॉरीबल.... कोण बघतं हे मूवी?

जंजीर तर सर्वांना आवडणारा मूवी आहे ना ?

https://www.youtube.com/watch?v=QDLkIowNXGI

हा नक्की बघा मग. जंजीर अजूनही पाहिलेला नसल्याने बघत होते... बराच वेळ कळेचना काय चाललंयत ते. बराच वेळ अमिताभची एण्ट्री होण्याची वाट बघत बसले मग पुन्हा नावे पाहिली....

अशक्य ओपन हार्ट सर्जरी आहे ही..
तो हिरो किती मस्त एमोशन्स कॅरी करुन होता..मलाच रडू फुटलं...
आणि तो डॉक.. आई ग्गं.. विणकाम करताना आई धागा तोडायची ते आठवलं..

लिंकवर क्लिक केलं नाही. ओपन हार्ट सर्जरी म्हणजे बहुतेक साऊथची असावी. हा संपूर्ण मूव्हीच अ आणि अ आहे. या अ‍ॅक्टरच्या आणखीही काही क्लिप्स अहेत ... मागच्या पानावर पण पाहिल्यासारखी झाली आहे..

https://www.youtube.com/watch?v=x3IrKCa1A2Q

हिसुद्धा क्लिप बघा! हिरो खाण्याच्या केळ्याचा हत्यारासारखा उपयोग करून गुंडांचा कसा खातमा करतो ते!!! एक केळे तर असे फेकून मारतो, कि ते एका गुंडाच्या छातीत जाऊन रुतते. आणि हे दाखवताना अँकरची दातखिळी कशी बसते ते पहा. Rofl

https://youtu.be/49EN9EOSn1E

सचिन काळे,हीच लिंक वर दिलेली आहे.
Prank Movies किंवा संपूर्णेश बाबू या नावाने सर्च द्या. सिंघम १२३ या नावाचा spoof आहे तो.

हो! हो! बघितली! काय जबरी हिरो आहे! हम तो फिदा हो गए इस हिरो पर! ऐसा हिरो अबतक बॉलिवूडमें पैदा क्यों नहीं हुआ? अक्षरशः जिवंत कोंबडी धनुष्याला बाणासारखी लाऊन गुंडावर नेम धरून छातीत मारतो. Rofl त्याच्या सगळ्या क्लिप्स मी बघणार.

कोंबडी व केळे दोन्ही हॉट शॉट्स -२ वरून जसेच्या तसे घेतले आहे.
https://www.youtube.com/watch?v=H00EKqNuGLw
https://www.youtube.com/watch?v=tVKzigyz-bI&t=2m12s

तो हीरो चितेवरून उठून येतो तो सीन आहे का वरती? त्यात त्याच्या पाठीत आधी मारलेली कुर्‍हाड तशीच आहे. म्हणजे त्याला ती कुर्‍हाड न काढताच चितेवर ठेवून अंत्यसंस्कार करायला निघाले होते.

काल बाजीराव मस्तानी मधलं दीवानी मस्तानी हो गयी हे गाणं परत पाहिलं. गाण्याच्या सुरवातीला मराठी शब्द आहेत 'नभातून आली अप्सरा, केसात तिच्या गजरा!' पण मस्तानीचे केस तर मोकळे सोडलेले आहेत आणि गजरा काय एक फूलही तिच्या केसात नाही Happy

नभातून आली अप्सरा, केसात तिच्या गजरा!' पण मस्तानीचे केस तर मोकळे सोडलेले आहेत आणि गजरा काय एक फूलही तिच्या केसात नाही >>>> आणि ती नभातुन तरी आलीये का?

Pages